टाईपरायटिंग कोर्सची संपूर्ण माहिती Typewriting Course Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Typewriting Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागला की ,पुढच्या अभ्यासक्रमांसाठी मुलांमध्ये एकच गोंधळ उडून जात असतो. बारावीनंतर कोणती शाखा निवडावी? कोणत्या अभ्यासक्रमाला जावे? कोणता कोर्स करावा? या प्रश्नांनी मुले ही भारावून जातात. ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती चांगली असते ती मुले उच्चशिक्षित असे अभ्यासक्रम निवडतात.  परंतु ज्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असते ती मुले त्यांच्या आर्थिक परिस्थितीला परवडेल असा कोर्स करतात. की जेणेकरून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. शिक्षण प्रणालीमध्ये असे काही कोर्स आहेत जे कोर्स करून आपण किमान शिक्षण असतानाही व्यवसायाची व नोकरीची संधी प्राप्त करू शकतो.

Typewriting Course Information In Marathi

टाईपरायटिंग कोर्सची संपूर्ण माहिती Typewriting Course Information In Marathi

आज मी तुम्हाला अशाच एका कोर्सची सविस्तरपणे माहिती सांगणार आहे तो कोर्स आहे टाईपरायटिंग कोर्स म्हणजेच ज्याला आपण मराठीत टंकलेखन असे म्हणतो. दहावी बारावी झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना हलाखीच्या परिस्थितीमध्ये उच्च शिक्षण घेता येत नाही. अशा परिस्थितीत किमान शिक्षण असतानाही व्यवसायाची व नोकरीची संधी प्राप्त करून देणारा अभ्यासक्रम म्हणून टंकलेखन म्हणजे टाईपरायटिंग कडे पाहिले जाते.

टाईपरायटिंग कोर्स म्हणजे कीबोर्ड द्वारे मजकूर किंवा वाक्य टाईप करणे .हस्तलेखन किंवा कॅलिग्राफी पेक्षा टंकलेखन हे वेगळे असते. टाईपरायटिंग हा कोर्स आपल्या इच्छेनुसार आपल्या पसंतीच्या भाषेत म्हणजेच इंग्रजी ,हिंदी, उर्दू इत्यादी टाईप करण्यासाठी प्रशिक्षित करत असते.

टंकलेखन हा एक व्यावसायिक अभ्यासक्रम असल्यामुळे टाईपरायटिंग मध्ये डिप्लोमा आणि व्यवसायिक प्रमाणपत्र हे दोन लोकप्रिय टंकलेखन अभ्यासक्रम आहेत. टंकलेखन हा अभ्यासक्रम ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही स्तरावर उपलब्ध आहे. NIOS म्हणजे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन लर्निंग’ हे वर्ग इयत्ता आठवी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी टंकलेखन अभ्यासक्रम ऑफर करत असते.

टाईपरायटिंग हा कोर्स केल्याचे फायदे

एक कार्यक्षम व्यक्ती बनवण्यासाठी टायपिंग हे मदत करत असते. कारण कंपन्यांमध्ये वेळेच्या कार्यक्षमतेने वापर करू शकणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती होत असते. त्यामुळे तुमची नोकरी मिळणे हा पर्याय साध्य होत असतो. टायपिंग हे एक अशा प्रकारचे कौशल्य आहे. त्यामुळे तुम्ही संगणकावर आधारित असलेले कार्य यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. टायपिंग केल्यामुळे तुमचा थकवा कमी होण्यास मदत होते.

टाईप करताना तुमचे डोळे जरी विसावले तरी टायपिंगचा वेग कमी न होता गतिशील असतो. म्हणून तुमचा थकवा कमी होण्यास मदत होते. टायपिंग केल्याने तुमचे मुद्रा सुधारण्यास मदत होते. टायपिंग कोर्स केल्यामुळे नोकरीची संधी शोधण्यास मदत होते. तुम्ही टायपिंग मध्ये कुशल असाल तर ट्रान्सक्रीप्शनिस्ट, पत्रकार तसेच स्टेनोग्राफर यांसारख्या चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी तुम्ही पात्र आहात.

टाईपरायटिंग मध्ये प्रमाणपत्र आणि डिप्लोमा असे दोन अभ्यासक्रम असतात. दोन्ही अभ्यासक्रमासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असावे ही पात्रता निकष असते. टाईपरायटिंग प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे शुल्क हे 10200 पर्यंत असते. तर डिप्लोमा अभ्यासक्रमाचे शुल्क हे 3000 ते 8200 पर्यंत असते.

टाईपरायटिंग मध्ये प्रमाणपत्र आणि डिप्लोमा यांचा कालावधी काही तास ते एक वर्ष असा असू शकतो.

आता आपण टाईपरायटिंग याच्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती पाहुयात!!!

टाईप रायटिंग प्रमाणपत्र अभ्यासक्रम

अलीकडच्या काळात टंकलेखन प्रमाणपत्र या अभ्यासक्रमाला अधिक लोकप्रियता प्राप्त झाली आहे. हा अभ्यासक्रम ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने दिला जातो.

टाईपरायटिंग मधील ऑनलाईन प्रमाणपत्रे खालील प्रमाणे:-

  • टायपिंग प्रशिक्षण
  • टायपिंग मास्टरी टाईप करायला शिकणे
  • टच टाइप फास्टर टायपिंग कोर्स टायपिंग शिकणे
  • टायपिंग कसे करायचे आणि तुमचा टायपिंग स्पीड कसा सुधारावायचा.

टाईपरायटिंग या ऑफलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात पुढील प्रमाणे:-

  • वैद्यकीय कार्यालय व्यवस्थापनातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम.
  • स्टेनोग्राफी आणि सेक्रेटरियल प्रॅक्टिस मधील प्रमाणपत्रअभ्यासक्रम .
  • वर्डप्रेस मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम.

टाईपरायटिंग डिप्लोमा अभ्यासक्रम:-

  • कार्यात्मक हिंदी आणि भाषांतरात डिप्लोमा.
  • ऑफिस ऑटोमेशन मध्ये डिप्लोमा.

डिप्लोमा इन मेडिकल रेकॉर्ड टेक्नॉलॉजी.

डिप्लोमा कोर्स चा सरासरी कालावधी हा एक वर्षाचा असतो. हा अभ्यासक्रम सामान्यता नियमित पदवी कार्यक्रमांच्या जागी निवडला जातो. ज्या व्यक्तींना नियमित पदवी कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी वेळ नसेल त्या व्यक्ती हे डिप्लोमा प्रोग्रॅम ची निवड करतात .मेडिकल ट्रान्सक्रीप्शन्स ,शॉर्ट हॅन्ड, मायक्रोसॉफ्ट ऑफिस सूट इ. डिप्लोमा कोर्स करण्यासाठी लोकप्रिय स्पेशलायझेशन म्हणून हा डिप्लोमा निवडू शकतात.

भारतामध्ये टाईपरायटिंग ऑनलाईन कोर्स देणारे विविध प्लॅटफॉर्म आहेत. ते म्हणजे Udemy, Alison, Linkedin ,Learning

टंकलेखन अभ्यासक्रमांतर्गत येणारे विविध अभ्यासक्रम .

विद्यार्थी मित्रांनो टंकलेखन म्हटले की आपणास फक्त आणि फक्त संगणकावरील टायपिंग एवढेच चित्र डोळ्यासमोर तरळते .मात्र टंकलेखनाअंतर्गत इतरही विविध अभ्यासक्रम येतात त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया.

तर सर्वप्रथम

मेडिकल ट्रान्सक्रिपशन यामधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम म्हणजेच सर्टिफिकेट कोर्स हा अभ्यासक्रम आपण पाच हजार रुपये एवढी फी भरून करू शकता.

यासोबतच डेटा एन्ट्री अँड प्रोसेसिंग सर्टिफिकेट अर्थातच डेटा एन्ट्री व प्रक्रिया प्रमाणपत्र कोर्स आपण दहा हजार दोनशे रुपये एवढी फी भरून करू शकता.

सर्टिफिकेट कोर्स इन विंडोज एप्लीकेशन हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम  करण्यासाठी आपण केवळ अडीच हजार रुपये एवढीच फी भरून या कोर्समध्ये प्राविण्य मिळविण्यास पात्र ठरता.

सोबत सोबतच स्टेनोग्राफी आणि सेक्रेटरीयल प्रॅक्टिस अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रमास प्रवेश मिळविण्यासाठी आपण रुपये 3000 एवढी फी भरून प्रवेश निश्चिती करू शकता.

डिप्लोमा इन ऑफिस ऑटोमेशन या डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी मात्र आपणास जास्त फी द्यावी लागेल जी आठ हजार एकशे पंचवीस रुपये इतकी आहे.

मेडिकल रेकॉर्ड टेक्नॉलॉजी या डिप्लोमा कोर्स साठी आपण साडेतीन हजार रुपये फी भरून प्रवेश मिळवू शकता.

या सशुल्क अभ्यासक्रमाबरोबरच आपण काही निशुल्क अभ्यासक्रमास देखील पात्र ठरतात. ज्यामध्ये सर्टिफिकेट इन शॉर्टहँड डिप्लोमा इन डॉक्युमेंट रायटिंग  काही स्टडीज व रेकॉर्ड मॅनेजमेंट मध्ये डिप्लोमा या डिप्लोमा कोर्सला आपण कसलीही फी न भरता पात्र ठरू शकतो.

टाईप रायटिंग कोर्स केल्यानंतर मिळणाऱ्या विविध नोकऱ्यांची माहिती:

आपण या पोस्टवरून जाणलेच असेल की टंकलेखन अर्थातच टाईप रायटिंग कोर्स किती महत्त्वाचा व उपयोगिता चा आहे. टंकलेखन कोर्स केल्यानंतर आपण आपल्या कौशल्य अनुरूप विविध पदांसाठी पात्र ठरू शकतो .ज्यामध्ये सहाय्यक टंकलेखक ,माहिती संपादक ,कंटेंट राईटर, भाषांतरकार व माहिती भरणारा अधिकारी यांसारखे इतरही अनेक पदे मिळवू शकता .ज्यामध्ये आपण वार्षिक दीड ते अडीच लाखांपर्यंत रगड पगार देखील मिळू शकता.

टंकलेखक कोर्स केल्यानंतर नोकरी मिळविण्याकरिता आवश्यक असणारी कौशल्य

मित्रांनो क्षेत्र कुठलेही असो नोकरी व व्यवसाय आपल्यात असणारे कौशल्य हीच आपल्या यशाची गुरुकिल्ली ठरते .टंकलेखकाच्या नोकरीमध्ये पुढे जाण्यासाठी आपल्या मध्ये नवीन तंत्रज्ञान अवगत करण्याची कला लिखित अथवा संभाषण मजकूर जलद गतीने टाईप करण्याची कला वेळ व्यवस्थापन संगणकाचे ज्ञान संप्रेषण ज्ञान विविध माहिती अलंकारिकरित्या टाईप करण्याची कौशल्य कुठलेही काम स्वयंस्फूर्तीने आणि वेळेत पूर्ण करण्याची कौशल्य बहु कार्यक्षमता तपशीलकडे विशेष लक्ष देऊन अचूक माहिती टाईप करण्याची कौशल्य इत्यादी कौशल्य आवश्यक असतात.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न:

टाईपराईटर अर्थातच टंकलेखन कोर्स कुठे फायदेशीर ठरतो?

आजकाल संगणकाचेच युग असल्याने टंकलेखन हे सर्वच क्षेत्रात उपयोगी ठरते ज्यामध्ये खाजगी व्यवसाय सरकारी नोकऱ्या खाजगी नोकऱ्या अस्थापना कंपन्या या ठिकाणी टंकलेखक या पदाची आवश्यकता असते.

टंकलेखन कोर्स नंतर आपण कोणकोणत्या नोकऱ्या मिळवू शकतो?

टंकलेखन कोर्स नंतर आपण टंकलेखक माहिती भरणा अधिकारी भाषांतर कार सामग्री लेखक इत्यादी प्रकारच्या नोकऱ्या करू शकतो.

टंकलेखन कोर्स किती प्रकारचे असतात?

टंकलेखन कोर्स हे विविध प्रकारचे असतात ज्यामध्ये डिप्लोमा कोर्स व्होकेशनल कोर्स प्रोफेशनल कोर्स इत्यादी प्रकारचे कोर्स येतात.

टंकलेखक कोर्स केल्यानंतर आपण किती पगाराची नोकरी मिळवू शकतो?

टंकलेखन कोर्स केल्यानंतर आपण वार्षिक दीड ते अडीच लाखांपर्यंत पगाराची नोकरी मिळवू शकतो.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment