संत चोखामेळा विषयी संपूर्ण माहिती Sant Chokhamela Information In Marathi

Sant Chokhamela Information In Marathi संत चोखामेळा (चोखोबा) हे यादव काळातील नामदेवांच्या संतमेळ्यातील वारकरी संतकवी होते. चोखोबांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा या गावी झाला. संत चोखोबांचे कुटुंब हे जातीने महार होते. पंढरपूरला झाल्याचे संत महाबती असे सांगतात. ते वऱ्हाडातील आहेत असे म्हटले जाते.

Sant Chokhamela Information In Marathi

संत चोखामेळा विषयी संपूर्ण माहिती Sant Chokhamela Information In Marathi

त्यांची पत्नी सोयराबाई, बहीण निर्मळा, मेहूना बंका व मुलगा कर्ममेळा हे सर्व प्रपंचाचे काबाड कष्ट उपसत असताना नित्यनेमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण व गुणसंकीर्तन करीत होते. त्यांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हातून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता. यावरून नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली असे चरित्रकार सांगतात.

संत चोखामेळाचे जीवन :

संत चोखोबा हे एक संत ज्ञानेश्वर यांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरू होते. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे तुकोबा होरपळून निघाले. ते शूद्र अतिशूद्र गाव वाडा समाज जीवन भौतिक व्यवहार उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले होते. संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ होते. ते उदरनिर्वाहासाठी काबाड कष्ट मोलमजुरी करत होते. पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. गावातील या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्र्य, वैपुल्य यामुळे ते जीवनात अस्वस्थ होते.

परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले. त्यांना संतसंग लाभला त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. श्री विठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते. परंतु ते सावळे गोजिरे रूप महाद्वारातून पहावे लागले. ही खंत त्यांच्या मनात होती, चंद्रभागा नदीच्या वाळवंटात अध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेव यामुळे तेराव्या शतकात उदयाला आली म्हणून संत चोखोबा म्हणतात. यावे शुद्ध होऊन जावे असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्म अनिष्ट अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचविले.

एकादशीसाठी सकाळ संतांबरोबर चोखामेळा इ. आपल्या कुटुंबासह भूलोकीच्या वैकुंठाला निघाला पंढरपुरला आल्यावर पांडुरंगाच्या देवळा बाहेर उभे राहून दुरून दर्शन झाले तरी चौकात या सावळ्या परब्रह्माच्या प्रेमात अडकून पडला. ठरलं आपण आता इथेच पंढरपूर चंद्रभागेत लांब जाऊन आंघोळ करून रोज महाद्वारापाशी येऊन विठ्ठलाला मनात आठवून हृदयात साठवून लोटांगण घालावेत. विठ्ठलाच्या महाद्वार बाहेर उभे राहून दर्शन घेणे त्यांच्या डोळ्यात खुपत होते. ते त्याला फिरवून म्हणाले अरे पांडुरंगाला तुला दर्शन घ्यायचे असते तर तुला त्याने आत नेले नसते का? आणि आमच्या वाड्यात मध्ये येतो हा शेवटचा प्रश्न त्यांना सतावत होता.

पुढे उपमा दृष्टांत तत्वज्ञान सांगत त्याच्यावर छाप पडावी म्हणून बोलत अल्पायुषी आयुष्य हि रानोरानी वारे भटकला तरी त्याला कल्पतरू भेटेल का? तसाच देवळात असूनही तुझ्यासारख्याला जगजेठी दिसणार नाही. दुरूनही न दिसणाऱ्या विठ्ठलाला दंडवत घालतो. चोखा मेळा बडव्यांना आचार्यांना म्हणतात, माझे मायबाप हो पांडुरंगाने मला देवळात नेऊन दर्शन द्यावे तेवढे मोठे भूषण कशाकरता पाहिजे. लक्षावधी आवरून सूर्य इथल्या तळ्यातील कमळ फुलवतो तसा दुरूनही पांडुरंग माझं रक्षण करतो.

त्यांच्या शब्दात मध घालताना म्हणतो. लक्ष गावे अत्यंत प्रीति कृपा मूर्ती माझा सांभाळ करीत असे. इथेच न थांबता पुढे त्यांना सांगतो. प्रेमळ नजरेने पाहत आपल्या पिल्लांना वाढवते. सांभाळ करते तसे नाही माझ्याकडे इतक्या दुरून कृपा दृष्टीने पाहतो चोखामेळा त्यांना आता विचारतो, महाराज 24 तास त्याच्या जवळ असले आणि मनात पांडुरंगाविषयी भक्ती नसली इतकेच काय त्याचा विचारही मनात नसला तर त्याच्याजवळ राहण्यात काय फायदा? ती सर्व पंडित मंडळी चला चला लवकर निघा चला म्हणत लगबगीने पुढे निघाले.

रात्री अचानक पंढरीनाथ आले आणि म्हणाले, चल माझ्यासोबत मी तुला मंदिरात नेतो. आता तुला माझा राग येतो आणि क्षणार्धात चोखोबा आणि विठ्ठल गाभा-यात आले. आपल्याशी बोलून दाखवले. शोभा रोज सकाळी मी तुला महाद्वाराबाहेर उभा असलेला पाहत असतो. तुझी आठवण येत नाही, असा क्षण ही जात नाही. नाम्याचा नैवेद्य खाताना, पाणी पिताना तुझ्या आठवणीने उचकी येते. तुझ्या आठवणीत हे होतं. चोखा काय बोलणार, त्याचे डोळे भरून आले. पाहिजे विठोबाचे पाय धरतो. इतकेच बोलू शकला विठ्ठला मायबापा तूच आहेस. बाजूला असलेल्या एका पुजाऱ्याला हा संवाद ऐकू येत होता.

त्याने पांडुरंगाचा आवाज ओळखला नाही पण सुखाचा आवाज ऐकला. व ही बातमी धावत पळत जाऊन पुजारी मंडळींना सांगितली सगळे जमले. चोखा तिथे विठ्ठल मूर्तीजवळ हात जोडून असलेला दिसला. मग काय विचारता. तो सारखे इतकेच म्हणत होता. माझा काही गुन्हा नाही हो. मला स्वतः पांडुरंगानी हात धरून आणलं खरं तेच सांगतोय. मला जाऊ द्या. दया करा माझ्यावर ,जाऊ द्या मला. सगळ्या वरिष्ठांनी दरडावून सांगितले या पंढरपुरात राहायचं नाही.

तर तू सांगतोस कसा पांडुरंग तुला देवळात घेऊन यायला नको. लक्षात ठेव त्याला तंबी दिली. हे ऐकल्यावर तुकोबांनी त्यांना सांगितले की, नदी पात्रात जर शुद्ध आणि अशुद्ध पाण्याने अंघोळ केली तर नदीचे पाणी बाटत नाही आणि शुद्राच्या अंगाला वारा लागल्यास वारा शुद्र होतो का? यामध्ये मग विठ्ठल कसा जातीमध्ये भेद करेल विठ्ठलाला ही सर्व जाती सारख्याच आहेत. त्याचे हे बोलणे ऐकून सर्व मंडळी थक्क झाली. अशाप्रकारे अनेक चमत्कार त्यांच्या जीवनात झाले आहेत.

संत चोखोबा विषयी आख्यायिका :

संत चोखोबा हे आपल्या उदरनिर्वाहासाठी पंढरपुरी येथे गेले असता. विठ्ठल भक्तीत दंग झाले ते सदैव पांडुरंगाचे नामस्मरण व भजनात रंगून जायचे त्यावेळी मंगळवेढे नगरी भरभराटीस आली होती. शके 1260 ला मंगळवेढ्यातील विशीच्या तटाची भिंत कोसळली होती व तिचे बांधकाम करण्यासाठी पंढरपूरचे मजूर आणण्यासाठी दुत पंढरपुरी आला आणि त्या सोबत चोखामेळा तटाच्या भिंतीच्या बांधकाम करण्यासाठी सहकुटुंब मंगळवेढ्यात आले. संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ होते. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत होते. पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग होते.

त्यांच्या कुटुंबातील सर्वजण हरिभक्त पारायण करत असत. त्या सर्वांचे श्री विठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते. त्यांची पत्नी सोयराबाई हिचे बाळंतपण स्वतः विठाई माऊलीने नणंदेचे रूप घेऊन केले. अशी कथा प्रचलित आहे. संत चोखोबांचा मुलगा कर्ममेळा हा पण संत परंपरेत आहे. सोयराबाई व कर्ममेळा यांच्याही काही सुंदर अभंग रचना आहेत. संत चोखोबांचे मेव्हणे बंका महार व बहीण निर्मळा यांच्याही काही रचना आहेत.

संत चोखोबांच्या भक्तीची उंची फार मोठी होती. ते स्वतःला विठू पाटलाचा बल्लेतूदार म्हणून समजत असत. परंतु किल्ल्याच्या पूर्वेकडील वेशीचे बांधकाम सुरू असताना एके दिवशी उजळ भिंत कोसळली व त्याखाली श्री चोखोबा आणि अनेक मजूर मयत झाले. ही घटना १२६० म्हणजे इ.स. १३३८ मध्ये वैशाख, वद्य पंचमीस घडली. पुढे श्री संत नामदेव महाराज हे मंगळवेढ्यास आले. ज्या हाडांमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता. त्या अस्ती श्री चोखामेळा यांच्या आहेत. असे ओळखून त्यांनी त्या पंढरपुरी विठ्ठल मंदिरापुढे सध्या नामदेव पायरी समाधी जवळ त्यांची समाधी बांधली.

“तुम्हाला आमची माहिती कशी वाटली, ते कमेंट करून नक्की सांगा.”

या सणाबद्दल जरूर वाचा :