Mahatma Gandhi Information In Marathiमहात्मा गांधीजींना आपण सर्व राष्ट्रपिता म्हणून ओळखतो. तसेच महात्मा गांधीजी ‘बापू’ या नावाने देखील ओळखले जातात. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रयत्न सुरू केले. इंग्रजांविरुद्ध लढा उभारला सत्याग्रह व सहकारी चळवळीमुळे सारा देश त्यांच्या पाठीशी उभा राहिला. भारत स्वतंत्र व्हावा एवढेच नव्हे तर स्वतंत्र होऊन चालणार नाही, तर स्वावलंबी व्हावा असे त्यांचे स्वप्न होते. गांधीजींनी सत्य, अहिंसा, शांती याचा आयुष्यभर प्रचार केला व स्वतःही तीच शिकवण आचरणात आणली. आधी करावे, मग सांगावे असे त्यांचे आचरण होते. त्यांच्या देशप्रेमाने व चळवळीने संपूर्ण देश जागृत झाला. तर चला मग पाहूया आपण महात्मा गांधी विषयी माहिती.
महात्मा गांधी यांची संपूर्ण माहिती Mahatma Gandhi Information In Marathi
जन्म:
महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर, 1869 या दिवशी गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई असे होते. करमचंद गांधी तत्कालीन काठेवाड प्रांतातील पोरबंदरमध्ये दिवान होते. त्यांच्या आजोबांचे नाव उत्तमचंद गांधी असे होते. त्यांना उत्ता गांधी असे देखील म्हणत होते. पुतलीबाई या करमचंद यांच्या चौथी पत्नी होत्या.
बालपण :
महात्मा गांधीजींचे बालपण अगदी धार्मिक वातावरणात गेल्यामुळे त्या वातावरणाचा परिणाम गांधीजींवर तसेच त्यांच्या पुढील आयुष्यावर आपल्याला दिसून येतो. विशेषत अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता इतरांबद्दल करुणा या तत्त्वांचे बीज याच काळात त्यांच्यामध्ये रोवले गेले. आईमुळे मोहनदासांवर जैन संकल्पना आणि प्रथांचा प्रभाव होता.
प्राचीन वाड्मयातील श्रावण बाळ आणि हरिश्चंद्र या दोन कथांचा मोहनदासांच्या मनावर खोल परिणाम झाला होता. हे त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेले आहे. त्यामध्ये ते लिहितात त्याने मला झपाटले आणि मी अगणित वेळा माझ्याशीच हरिषचंद्रा सारखा वागलो. असे गांधीच्या सत्य आणि प्रेम या दैवी गुणांची झालेल्या स्व:ओळखीचा मार्ग हा या पौराणिक पात्र पर्यंत येऊन पोहोचतो.
सन 1883 मध्ये वयाच्या 13 व्या वर्षी त्यांचा कस्तुरबा माखनजी यांच्याबरोबर बालविवाह झाला. त्यांचे नाव लहान करून कस्तुरबा आणि त्यांना प्रेमाने ‘बा’ असे म्हटले जाई. परंतु त्या काळातील रिवाजानुसार कस्तुरबा ह्या बर्याच काळ त्यांच्या वडिलांच्या घरीच होत्या. या प्रक्रियेत मोहनदासला शालेय शिक्षणाचे एक वर्ष गमवावे लागले.
लग्नाच्या दिवसाच्या आठवणीबद्दल ते एकदा म्हणाले होते, “आम्हाला लग्नाबद्दल फार काही माहीत नसल्यामुळे लग्न म्हणजे आमच्यासाठी नवीन कपडे घालने, गोड खाऊ खाणे आणि नातेवाईकांबरोबर खेळणे हेच होते”. 1885 मध्ये जेव्हा गांधीजी पंधरा वर्षाचे होते. तेव्हा त्यांना आपले अपत्य झाले. पण ते खूप कमी काळ जगले. त्याच वर्षी आधी वडील करमचंद गांधींचा स्वर्गवास झाला होता. पुढे गांधीजींनी आणि कस्तुरबा यांना अजून चार मुले झाली. त्यांचे नाव हरीलाल, मणिलाल रामदास आणि देवदास अशी ठेवण्यात आली.
शिक्षण :
महात्मा गांधीचे शिक्षण पोरबंदरमधील प्राथमिक तसेच राजकोटमधील माध्यमिक शिक्षणामध्ये ते एक साधारण विद्यार्थी होते. त्यांचा एका वार्षिक परीक्षेतील अहवाल असा होता की, इंग्रजीत चांगला, अंकगणितात ठिक, भूगोलात कच्चा, वर्तणूक अतिशय चांगली, हस्ताक्षर खराब याप्रमाणे ते मॅट्रीकची परिक्षा भावनगरमधील श्यामळदास कॉलेजमधून थोड्या कष्टानेच पास झाले. तेथे असताना त्यांनी वकिल व्हावे व त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेबद्दल ते नाखुश होते.
शालेय शिक्षण संपवून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी 1888 मध्ये ते इंग्लंडमध्ये लंडनला युनिव्हर्सिटी कॉलेज वकिलीचे शिक्षण घेण्यास गेले. इंग्लंडला जाण्याआधी त्यांनी आईला जैन साधूच्या उपस्थित आपण मास, बाई व बाटली या पासून दूर राहू असे वचन दिले होते. त्याचे त्यांनी तिथे पालन केले. परंतु त्यांना लंडनमधील शाकाहारी जेवणाची चव आवडली नाही आणि लंडनमधील त्याकाळी दुर्मिळ असलेली एक भारतीय खानावळ सापडेपर्यंत ते खूप वेळा उपाशी राहिले.
इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर बनले आणि हिंदुस्थानात परत येऊन वकिली करू लागले.
दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य :
गांधीजींनी आयुष्याची 21 वर्षे दक्षिण आफ्रिकेत घालविले. जिथे त्यांनी त्यांचे राजकीय दृष्टिकोन नैतिक आणि राजकीय नेतृत्व कौशल्य विकसित केली. दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांच्या नेतृत्व असणारे श्रीमंत मुसलमानांनी आणि अतिशय कमी अधिकार असणाऱ्या गरीब हिंदू गिरट्यांनी गांधींना नोकरी दिली. भारतीयत्व सर्व धर्म आणि जातीमध्ये उरले आहे, असा दृष्टिकोन आयुष्यभर ठेवत गांधींनी या सर्वांना भारतीयच मानले.
दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधींना समाजाच्या विकलांगतेची ओळख झाली. भारतीय धर्म आणि संस्कृती यामध्ये असलेल्या गुंतागुंतीच्या समस्येपासून आपण दूर आहोत, याची त्यांना जाणीव झाली आणि दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना समजून घेऊन व त्यांचे नेतृत्व करून आपणास भारत समजला असे ते म्हणू लागले.
दक्षिण आफ्रिकेतील गांधींना गोरेत्तर लोकांबद्दल असलेल्या भेदभावाला सामोरे जावे लागले. तेथील भारतीयांना दिली जाणारी असमान वागणूक अनुभवली. पहिल्या वर्गाचे तिकीट असताना सुद्धा त्यांना रेल्वे अधिकाऱ्यांनी तिसर्या वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले. गांधीजीनी नकार देताच त्यांना अपमान करून आगगाडीतून ढकलून देण्यात आले.
ती संपूर्ण रात्र गांधींनी फलाट वरील गेस्ट रूममध्ये काढली. गांधीजीनी ठरवले असेल तर त्यावाईट वर्तन करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यास ते अद्दल घडवू शकले असते. पण सूड भावनेने गांधीचा कोणालाही शिक्षा करणे हा त्यांचा हेतू नव्हता. तर अन्यायकारक व्यवस्था बदलविणे हा त्यांचा हेतू होता.
कार्य व चळवळी :
महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत असत.
सुभाषचंद्र बोस यांनी 1944 मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ म्हणून संबोधले. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. गांधीजींना पहिले मोठे यश 1918 मध्ये चंपारण आणि खेडामधील सत्याग्रहात मिळाले. चंपारण्य बिहारमधील जमीनदार जे प्रामुख्याने ब्रिटिश होते. स्थानिक शेतकर्यांना सक्तीने नीळ उत्पादन करावयास लावत असत. त्यांना योग्य मोबदला पण मिळत नसे.
यांमुळे ते सतत गरिबीत राहत. शेतकर्यांची गावे अत्यंत घाणेरडी आणि आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठेवली जात. तसेच दारू, अस्पृश्यता, पडदा पद्धत अशा अनेक समस्या या गावांमध्ये होत्या. यावर भर म्हणजे तेथील दुष्काळ. पण इंग्रजानी तरीही अनेक जाचक कर लादले होते व ते वाढतच होते.
गुजरातमधील खेडा मध्येसुद्धा स्थिती काही वेगळी नव्हती. गांधीजींनी तिथे एक आश्रम उभारला. तिथे त्यांनी त्यांच्या लहान-मोठ्या सर्व अनुयायांना एकत्र केले. त्यांनी त्या भागातील परिस्थितीची माहिती गोळा केली व तिचा सखोल अभ्यास केला. गावकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी गावाच्या स्वच्छतेचे तसेच शाळा रुग्णालयाच्या बांधकामाचे काम हाती घेतले. या व्यतिरिक्त गावातील वाईट प्रथा नष्ट करण्यास प्रवृत्त केले.
असहकार :
गांधीजींनी असहकार, अहिंसा आणि शांततामय विरोध यांना शस्त्र म्हणून इंग्रजांविरुद्ध वापरले. पंजाबमध्ये जालियनवाला बाग हत्याकांडानंतर लोकांच्या क्रोधाचा उद्वेग झाला आणि अनेक ठिकाणी हिंसक विरोध झाले. गांधीजींनी जालियनवाला बाग हत्याकांड तसेच त्यानंतरचे हिंसक विरोध दोन्हींचा निषेध केला.
त्यांनी या दंग्यांना बळी पडलेल्या ब्रिटिश नागरिकांबद्दल सहानुभुती दर्शविणारा आणि दंग्यांचा निषेध करणारा एक ठराव मांडला. या ठरावाला काँग्रेसमध्ये सुरुवातीला विरोध झाला. पण गांधीजींच्या तत्त्वांनुसार कोणत्याही प्रकारची हिंसा ही पाप होती. त्याचे समर्थन करता येणे शक्य नव्हते. हे तत्त्व मांडणार्या त्यांच्या भावनाप्रधान भाषणानंतर काँग्रेसने त्यांचा ठराव मान्य केला.
गांधीजींनी अहिंसेच्या तत्त्वाला स्वदेशीची जोड दिली. त्यांनी सर्वांना परदेशी विशेषता ब्रिटिश वस्तूंचा बहिष्कार करण्याचे आवाहन केले. ब्रिटिश कपड्यांच्या आयोजित खादीचा उपयोग करावा असे अभिप्रेत होते.
त्यांनी भारतीय पुरूष आणि स्त्रीने प्रत्येक गरीब आणि श्रीमंत व्यक्तीने दिवसाचा काही काळ भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या समर्थनार्थ चरख्यावर सूत कातावे, असा गांधीजींचा आग्रह होता. याचा मुख्य उद्देश लोकांमध्ये शिस्त आणि स्वावलंबनाचे प्रतिबिंब बसवणे हा होता. ब्रिटिश वस्तूंचा बहिष्कार, ब्रिटिश शैक्षणिक संस्थांचा बहिष्कार, सरकारी नोकरीचा त्याग आणि ब्रिटिशांनी दिलेल्या मान आणि पदव्यांचा त्याग करण्याचे आवाहन गांधीजींनी केले.
मृत्यू :
30 जानेवारी 1948 ला दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असतांना, गांधीजींची गोळी मारून हत्या करण्यात आली. त्यांचा मारेकरू नथुराम गोडसे हा एक पुरोगामी हिंदू होता. व त्यांचे संबंध जहालमतवादी हिंदू महासभेशी होते. दिल्लीतील, राजघाट हे महात्मा गांधीजींचे समाधी स्थान आहे.
ही माहिती कशी वाटली, ते कमेंट करून नक्की सांगा.