संजीव कुमार यांची संपूर्ण माहिती Sanjeev Kumar Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Sanjeev Kumar Information In Marathi संजीव कुमार यांना बॉलिवूड हरी भाई म्हणायचे. त्यांचे खरे नाव हरिहर जेठालाल जरीवाला होते. जरी आज संजीव कुमार जगात नाहीत तरी देखील त्यांच्या अभिनयाची छाप आजही त्यांच्या चाहत्यांच्या मनात तशीच आहे. संजीव यांना अभिनयाचा छंद जडला. ते इतरांशी जोडले गेले आणि रंगमंचावर काम करू लागले. तेव्हा त्यांनी भारतीय राष्ट्रीय रंगमंचाच्या माध्यमातून बऱ्याच नाटकात कामे केलीत. अशा प्रकारे त्यांनी आपल्या जीवनाची सुरुवात केली. तर चला पाहू या त्यांच्या विषयी माहिती.

Sanjeev Kumar Information In Marathi

संजीव कुमार यांची संपूर्ण माहिती Sanjeev Kumar Information In Marathi

जन्म :

संजीव कुमार यांचा जन्म 9 जुलै 1938 साली झाला. त्यांचे जन्म नाव हरिहर जरीवाला होते. परंतु प्रेमाने सर्व नातेवाईक आणि नातेवाईकांनी त्यांना हरिभाई जरीवाला म्हणून ओळखत. त्यांचे वडिलोपार्जित घर सूरत असले तरी चित्रपटसृष्टीच्या कामाच्या इच्छेने त्यांना मुंबईत आणले.

कौटुंबिक जीवन :

संजीव कुमारने लग्न केले नाही परंतु अनेक वेळा प्रेम केले.  त्यांना एक अंधश्रद्धा होती की, त्यांच्या कुटुंबात मोठा मुलगा 10 वर्षांचा झाल्यावर वडिलांचा मृत्यू होतो.  हे त्याचे आजोबा, वडील आणि भाऊ सर्वजणांसोबत घडले होते.  संजीव कुमारने आपल्या दिवंगत भावाच्या मुलाला दत्तक घेतला आणि दहा वर्षांचा असताना मरण पावला.

करियर :

संजीव कुमार यांचा ‘हम हिंदुस्तानी’ हा पहिला चित्रपट होता. यानंतर त्यांनी बऱ्याच चित्रपटातून छोट्या-मोठ्या भूमिका केल्या आणि हळूहळू आपली ओळख निर्माण केली. यानंतर 1968 मध्ये प्रदर्शित झालेला ‘राजा और रंक’ चित्रपटाच्या यशानंतर संजीव इंडस्ट्रीमध्ये खऱ्या अर्थाने उभे राहिले. ‘संघर्ष’ मध्ये त्यांनी दिलीपकुमार यांच्यासोबत छोटीशी भूमिका साकारली होती.

त्या छोट्याशा भूमिकेतूनही त्यांनी आपल्या अभिनयाची एक वेगळीच छाप सोडली. दिलीप साहेब देखील तेव्हा त्यांच्या अभिनयाने खूप प्रभावित झाले होते. संजीव कुमार आणि शत्रुघ्न सिन्हा यांची घट्ट मैत्री होती. ‘खिलौना’ चित्रपटात संजीव यांच्या सांगण्यावरूनच शत्रुघ्न यांना खलनायकाची भूमिका मिळाली होती.

एकदा शत्रुघ्न यांना पैशांची खूप गरज होती, तर ते सुभाष घई यांच्याकडे मदत मागण्यासाठी गेले, परंतु त्यांनी मदत करण्यास नकार दिला. त्यानंतर शत्रुघ्न यांनी संजीवला मदत मागितली. संजीव यांनी त्वरित 10 लाख रुपये काढून त्यांना दिले आणि म्हणाले, शत्रुघ्न, ज्यावेळी तुझ्याकडे पैसे येतील तेव्हा तू मला परत कर. मात्र, शत्रुघ्न त्यांना पैसे कधीच परत करू शकले नाहीत, कारण काही दिवसांनंतर संजीव कुमार यांचे निधन झाले.

संजीव कुमार हे हेमावर खूप प्रेम करायचे. त्यांनी हेमाला हे सांगितले ही होते आणि लग्नाचा प्रस्तावही ठेवला होता. या दरम्यानच त्यांच्या आयुष्यात धर्मेंद्र यांची एंट्री झाली आणि संजीव यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. अभिनेत्री सुलक्षणा पंडित सोबत संजीव यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चादेखील खूप होती, परंतु संजीव, सुलक्षणासोबत लग्न करू शकले नाहीत. संजीव यांच्या मृत्यूनंतर सुलक्षणा डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. याचा परिणाम असा झाला की, सुलक्षणा पंडित यांनी लग्नच केले नाही.

सायरा यांना लिहिले प्रेमपत्र :

सायरा बानो आणि संजीव यांची पहिली भेट ‘जंगली’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. संजीव त्या काळात नवोदित अभिनेते होते आणि स्टुडिओमध्ये स्टंटमॅन म्हणून काम करायचे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सायरा, शम्मी कपूर यांच्या वर्तणुकीमुळे खूप त्रस्त असायच्या. संजीव यांची सायरा यांच्या आई आणि भावाशी चांगली मैत्री होती.

त्रस्त सायरा यांना संजीव सेटवर असल्यामुळे हायसे वाटायचे. दोघांतही चांगली मैत्री झाली. संजीव या मैत्रीला प्रेम समजले आणि सायरासाठी त्यांच्या मनात वेगळ्या भावना येऊ लागल्या. संजीव यांनी सायराला प्रेमपत्र लिहिल्यावर त्यांना संजीवच्या भावना समजल्या. सायरा यांच्यासाठी हा धक्काच होता, परंतु त्यांच्या आईला हे समजले तर गोंधळ सुरू झाला. शेवटी त्यांना मनातून सायरा यांचे विचार काढावेच लागले.

जीवनातील प्रसंग :

करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये संजीव यांचा अभिनेत्री नंदा यांनी सेटवर खूप अपमान केला होता, परंतु या गोष्टींची नंदा यांना आयुष्यभर खंत होती. संजीव ‘पति पत्नी’ चित्रपटात नंदा यांच्या पतीची भूमिका साकारणार होते.

एक दिवस ते काम संपल्यानंतर मेट्रो सिनेमामध्ये चित्रपट पाहायला गेले. योगायाेगाने नंदादेखील त्या दिवशी तेथे आल्या. नंदा या प्रसिद्ध अभिनेत्री असल्यामुळे त्या बालकनीत बसल्या आणि संजीव खाली फर्स्ट रो मध्ये बसले होते. संजीव यांनी नंदा यांना पाहिल्यावर हाय केले.

हा नायक पाहा, काय याचा अवतार आणि फर्स्ट रो मध्ये जाऊन चित्रपट पाहतो. हा माझा नायक असूच शकत नाही, अशी तक्रार दुसऱ्या दिवशी नंदा यांनी दिग्दर्शकाकडे केली. यानंतर संजीव सेटवर पोहोचले तर संपूर्ण युनिट त्यांच्याकडे पाहून हसले. या गोष्टीचे संजीवला खूप वाईट वाटले, तरीदेखील त्यांनी त्यांचे काम सुरूच ठेवले. चित्रपट लोकप्रिय झाला.

संजीव कुमार यांनी आपल्या करिअमध्ये अनेक प्रयोग केले. जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी केवळ नायक म्हणून काम न करता प्रौढ व्यक्तीच्या भूमिकाही साकारल्या. रंगमंचावर काम करत असताना संजीव कुमार यांनी वयाच्या 22 व्या वर्षीच 60 वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारली होती.

याचेच एक उदाहरण द्यायचे झाले तर त्यांना ‘खिलौना’ चित्रपटात एका वेड्या युवकाची भूमिका करण्याची संधी मिळाली तर त्यांनी ते पात्रही साकारले आणि असे उत्कृष्ट साकारले की फिल्म फेअरमध्ये उत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले. त्याच वर्षी ‘दस्तक’ प्रदर्शित झाला, त्यासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कारही मिळला.

संजीव यांचे कौतुक :

संघर्ष आणि खिलौना नंतर संजीव यांना चांगले चित्रपट मिळू लागले होते. त्याच काळात दाक्षिणात्य निर्मात्यांना 60 च्या दशकातील ‘नवरात्री’ चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवायचा होता. यासाठी ते दिलीप कुमार साहेबांना भेटले. मूळ चित्रपटात शिवाजी गणेशन यांनी 9 वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या.

निर्माते ए. पी. नागराजन यांना असे वाटत होते की, ही भूमिका फक्त दिलीप कुमारच करू शकतात. परंतु ते दिलीप साहेबांकडे गेले व ते म्हणाले, मी तर हा चित्रपट करू शकत नाही, परंतु तुम्ही संजीवला घेऊ शकता.

तोच असे काही तरी वेगळे करू शकतो. नंतर ‘नया दिन नई रात’ हा चित्रपट आला. यात त्यांनी 9 भूमिका साकारल्या ज्या अविस्मणीय झाल्या. दिलीप साहेब त्यांचे कौतुक करताना म्हणाले की, हिंदी चित्रपटात एक असा कलाकार आहे. ज्याच्यात नऊ रस सादर करण्याची क्षमता आहे.

निधनानंतर प्रदर्शित झालेले चित्रपट :

प्रोफेसर की पडोसन 1993
कातिल 1986
हाथों की लकीरें 1986
बात बन जाए 1986
कांच की दीवार 1986
लव्ह अॅण्ड गॉड 1986
राही 1986
दो वक्त की रोटी 1988
नामुमकिन 1988
ऊंच नीच बीच 1989

पुरस्कार :

संजीव कुमार यांना 14 फिल्मफेअर पुरस्कारांसाठी नामांकन देण्यात आले होते, तीनदा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेते म्हणून तर उर्वरित सर्वोत्कृष्ट अभिनेता.
त्याने दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून आणि एकदा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून पुरस्कार जिंकले.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला. सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला. संजीव कुमार यांच्या स्मरणार्थ सर्वोत्कृष्ट अभिनेता, दिग्दर्शक आणि बॅकस्टेज तंत्रज्ञ यांना दरवर्षी पुरस्कार आणि रोख बक्षिसे दिली.

निधन :

संजीव कुमार यांनी 6 नोव्हेंबर 1985 रोजी अखेरचा श्वास घेतला.  संजीव कुमार यांच्या निधनानंतर त्यांचे दहापेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित झाले.  बऱ्याच चित्रपटांची शूटिंग बाकी होती.  कथा बदलून हे प्रदर्शित केले गेले.  संजीव कुमार यांचा ‘प्रोफेसर की पडोसन’ हा शेवटचा चित्रपट 1993 मध्ये प्रदर्शित झाला होता.

ही माहिती कशी वाटली, ते कमेंट करून नक्की सांगा.

या सणाबद्दल जरूर वाचा :

Leave a Comment