उद्धव ठाकरे यांची संपूर्ण माहिती Uddhav Thakre Information In Marathi

Uddhav Thakre Information In Marathi उद्धव ठाकरे हे एक भारतीय राजकारणी असून हिंदू राष्ट्रवादी दल शिवसेनेचे नेता आहेत. हे शिवसेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी आधी शिवसेनेचे एक मराठी दैनिक ‘सामना’ हे काम सांभाळत असत. ते पक्षाच्या निवडणुकीशी संबंधित कामांमध्ये भाग घ्यायचे. 2002 मध्ये जेव्हा पक्षाला मुंबई महानगरपालिका निवडणुकीत यश मिळाले, तेव्हा जानेवारी 2003 पासून त्यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Uddhav Thakre Information In Marathi

उद्धव ठाकरे यांची संपूर्ण माहिती Uddhav Thakre Information In Marathi

मुख्यमंत्रीपदाचा काळ :

महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की….असं म्हणत शिवतीर्थ अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पार्कच्या भव्य मैदानावर हजारोंच्या जनसमुदायाच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली.

शिवाजी महाराजांना वंदन करून आई वडिलांना स्मरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. शिवाजी पार्कच्या मैदानात संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांच्या मुहूर्तावर शपथविधी सोहळा पार पडला. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी फक्त शिवसेनाच नाही, तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्गज नेते सुद्धा मंचावर उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ तर काँग्रेस कडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवाजी पार्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्या समोरच हे सहा हजार चौरस फूट भव्य व्यासपीठ उभारण्यात आलो होते.

जन्म :

शिवसेनेचे विद्यमान राजकारणी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा जन्म 27 जुलै, 1960 रोजी झाला. ते शिवसेना अध्यक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. 2004 मध्ये शिवसेनेचे अध्यक्ष घोषित केले गेले. आपली राजकीय कारकीर्द सुरू होण्याआधी उद्धव यांना कला आणि पर्यावरणाची विशेष आवड होती. तर हे वन्यजीवांच्या चित्रांवर नजर टाकून, त्यांच्या प्रतिभेचा अंदाज लावला जाऊ शकतो.

ते खूप चांगला छायाचित्रकार सुद्धा आहे. विभाजनामुळे शिवसेना आणि मनसेची मते निवडणुकीत समर्थकांच्या दोन गटात विभागली आहेत. उद्धव ठाकरे यांना त्यांच्या राजकीय कारकीर्दी व्यतिरिक्त वन्यजीव छायाचित्रणाची सुद्धा आवड आहे. आणि पर्यावरणाशी संबंधित प्रदर्शन व कार्यक्रमाचे आयोजन करतात. त्यांच्याकडे बरीच छायाचित्रे पुस्तके आहेत. ज्यातून लोकजीवन आणि राज्यातील वारसा यावर प्रकाश टाकतात.

शिक्षण :

उद्धव ठाकरे यांनी जे जे स्कूल ऑफ आर्टमधून पदवी घेतली आहे. त्यांच्या छायाचित्रांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. एक सिद्धहस्त लेखक आणि व्यावसायिक छायाचित्रकार असलेल्या ठाकरे यांच्या कलाकृतींची दखल अनेक नामवंत मासिकांनी वेळोवेळी घेतली आहे. तसेच त्यांच्यातील जागतिक दर्जाच्या छायाचित्रकाराचे दर्शन विविध प्रदर्शनाच्या माध्यमातून रसिकांना घडले आहे.

जीवन :

उद्धव ठाकरे यांचे लग्न रश्मी ठाकरे यांच्याशी झाले. त्यांना दोन मुलं आहेत. मोठ्या मुलाचे नाव आदित्य ठाकरे आणि ते युवा सेनेचे अध्यक्ष आहेत. तर दुसरा मुलगा तेजस अमेरिकेत महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्याचे सांगितले जाते. वडील आणि मोठा भाऊ त्यांच्या तुलनेत प्रसिद्धी आणि जनसंपर्कातून दूर राहतो.

गेल्या अनेक दशकांपासून मराठी माणूस शेतकरी कष्टकरी जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या उद्धव ठाकरे यांना त्यांचे वडील शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे, आई मीनाताई आणि आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे.

राजकारणात येण्यापूर्वी उद्धव ठाकरेंना पर्यावरणाची आवड होती. आज देखील त्यांना काढलेल्या वन्यप्राण्यांच्या फोटोग्राफरला पाहून आपल्याला याची प्रचीती येते की, ते उत्तम फोटोग्राफर आहेत. वर्ल्ड लाइफ फोटोग्राफी जी त्यांना फार आवड होती.

राजकीय जीवन :

सुरुवातीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात ही विद्यार्थिदशेपासूनच झाली. शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रिय असलेल्या ठाकरे यांच्याकडे 197 च्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी पार पाडली.

निवडणुकीच्या काळात शिवसेनेच्या प्रचार यंत्रणेतही त्यांचा सहभाग असे. 2002 साली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका शिवसेनेला विजय प्राप्त झाला व त्यासह सत्ताही लाभली. 2003 साली त्यांच्याकडे शिवसेनेच्या कार्य अध्यक्षपदाची सूत्रे हाती आली. मात्र या काळात तत्कालीन शिवसेनेतील प्रमुख नेते नारायण राणे व उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान मतभेद झाले व नारायण राणे यांनी पक्षातून हकालपट्टी झाली.

उद्धव ठाकरे व त्यांचे चुलत भाऊ राज ठाकरे यांच्यातील दरीही रुंदावत गेली. परिणामी 2006 साली राज ठाकरे यांनी शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाशी युती न करता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे 63 आमदार निवडून आणले.

2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजप बरोबर युती करून निवडणूक लढवली. 56 आमदार निवडून आले. पण सत्ता वाटप करण्यात वाद निर्माण झाल्यामुळे युती तुटली व उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केले व राज्याच्या 29 व्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली.

उद्धव ठाकरे यांचे योगदान :

शिवसेनेच्या कार्य अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिवसेनेला अधिक सर्वसमावेशक करताना आधुनिकतेशी त्यांनी शिवसेनेला जोडले. युवक कामगार आणि शेतकरी यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी राज्यभर चालवलेल्या विविध आंदोलनांना यश आले. 80% समाजकारण आणि 20% राजकारण अशा धोरणाने कार्य करणार्‍या शिवसेनेच्या समाजकारणाची दखल गिनीज बुक घेतली आहे.

ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मलेरिया आजारासाठी चाचणी आणि उपचार केंद्र सुरू करून गरजूंसाठी औषध पुरवठा ही सुरू केला. मुंबईमधील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने अनेक रुग्णालयाची निर्मिती केली. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण समाजाचे पायाभरणी त्यांनी केली.

2002 च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी आणि विजयाचे शिल्पकार म्हणून महाराष्ट्रात पक्ष विस्तार केल्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला यश आले. गेल्या पाच वर्षापासून राज्यातील आणि केंद्रातील सरकारमध्ये शिवसेना एक प्रमुख घटक पक्ष म्हणून सहभागी झाला. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला भरघोस यश मिळाले आहे.

राज्य आणि केंद्र शासनाकडून आवश्यक ती मदत न मिळाल्याने उद्धव ठाकरे यांनी 2007 मध्ये विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्ज मुक्तीसाठी यशस्वी मोहीम राबवली. उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कल्याणावर लक्ष केंद्रित करीत आपल्या पक्षाचा विस्तार वाढवला आणि राजांनीही त्याचे नेतृत्व स्वीकारले.

संवेदनशील लेखक कवी अभ्यासू आणि छायाचित्रकार असलेल्या उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणले आणि पक्षाला आजचे सुसंघटित रूप दिले. महाराष्ट्राला विविध आघाड्यांवर पुढे घेऊन जाणारे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्या रूपाने महाराष्ट्राला लाभले आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न त्यांनी सोडवले व गरीब लोकांना त्यांनी मदत म्हणून आश्वासन दिले. विद्यार्थ्यांचे देखील त्यांनी समर्थन केले आहे.

“ही माहिती कशी वाटली ते, कमेंट करू नक्की सांगा.”

या सणाबद्दल जरूर वाचा :

Leave a Comment