गोकुळाष्टमी विषयी संपूर्ण माहिती Krishna Janmashtami In Marathi

(Krishna Janmashtami In Marathi) गोकुळाष्टमी हा सण भारतामध्ये खूप आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये त्यांच्या जन्मदिवशी दहीहंडी सारखे कार्यक्रम साजरे केले जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाला वेगवेगळ्या नावांनी बोलावले जाते. जसे की गोविंद, बाल गोपाल, कान्हा, गोपाल केशव हि सर्व श्रीकृष्णांची प्रसिद्ध नावे आहेत. गोकुळाष्टमी ही भगवान श्रीकृष्णाच्या जन्मापासून हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवसापासून, हिंदू द्वारा प्रत्येक वर्षी  साजरी केली जाते.

Krishna Janmashtami In Marathi

गोकुळाष्टमी विषयी संपूर्ण माहिती Krishna Janmashtami In Marathi

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सृष्टीचे पालनकर्ता म्हणणारे श्रीहरी विष्णूचे अठरावे अवतार प्रभु श्रीकृष्ण आहे आणि कृष्णाच्या जन्मदिवशी गोकुळाष्टमी साजरी केली जाते. श्रीकृष्णाबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी आपल्या भुतलावर म्हणजे पृथ्वीवर एक साधारण माणसाचा जन्म घेतला आणि श्रीकृष्णाचा जन्म हा धर्माचे रक्षण करण्यासाठी झाला होता.

त्यामुळे भारतामध्ये हजारो वर्षांपासून गोकुळाष्टमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गोकुळाष्टमी भारतामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने श्रीकृष्णाचे पूजन करून केले जाते. काही ठिकाणी भक्ती संगीत गायली जाते. तर काही ठिकाणी कृष्णाच्या मूर्तीला दही दुधाचा अभिषेक घातला जातो.

गोकुळाष्टमी चे महत्व:

कृष्णाचा जन्म दिवस श्रावण महिन्यात वैद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत झाला. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. अष्टमीच्या दिवशी काही लोक व्रत सुद्धा करतात या दिवशी एकभक्त राहून पांढर्‍या तिळाचा कल्प अंगाला लावून स्नान करतात. व्रताचा संकल्प करून देवघर फुलं, पाकड्यांनी सुशोभित करतात व त्या स्थानी देवकीचे सुतीकारागृह स्थापन करतात. मंचकावर देवकी आणि कृष्ण यांच्या मूर्तीची स्थापना करतात व बाजूला यशोदा व तिची नवजात कन्या, वसुदेव नंद यांच्या मूर्ती बसवतात.

सप्तमीच्या मध्यरात्री सुधीरभूत होऊन संकल्प करतात व सहपरिवार कृष्णाची पूजा करतात. अष्टमीच्या दिवशी देवालाही फराळ, नैवेद्य दाखवतात. गोपाल म्हणजे कायद्याचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मो- उत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो. यामध्ये काला म्हणजे एकत्र मिळवणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, भिजवलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ असतो.

कृष्णा हा फार प्रिय होता. असे मानले जाते, की श्रीकृष्ण व त्यांचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर काला तयार करत असत व वाटून खात असत. गोमंतकाळातील काल्याला गवळण काला सुद्धा म्हटला जातो आणि हे एक मिश्रण पौष्टीक आहार म्हटल्या जाते, म्हणूनही गोकुळाष्टमीचे महत्व आहे. कोकणात व महाराष्ट्रात उत्सवा निमित्त दहिकाला होतो. या ठिकाणी ही हंड्या फोडत, काही ठिकाणी गोपाळकाला होतो. गोकुळाष्टमीचे एक व्रतही सांगितले असून ते केल्याने संतती, संपत्ती व वैकुंठ लोक यांची प्राप्‍ती होते. असे महत्त्व आपल्याला दिसून येते.

गोकुळाष्टमी साजरी कशी करतात:

भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री मथुरा नगरीमध्ये श्रीकृष्ण भगवान यांनी पृथ्वीवर जन्म घेतला. त्या वेळेस मधुरेमध्ये जन्म झाला होता. त्यावेळेसचे मथुरे मधील राजा अत्याचारी कंस याला प्रजा कंटाळली होती. तो प्रजेवर असह्य यातना आणि जुलूम करत होता. त्यामुळे तेथील प्रजा खूपच दुखी व कष्टी होती. या लोकांचे अत्याचारी कंस राजापासून मुक्ती देण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला. गोकुळाष्टमी या निमित्त होणारी हालचाल संपूर्ण भारतामध्ये बघितली जाते. त्याचबरोबर परदेशी राहणाऱ्या भारतीय लोकांमध्ये सुद्धा गोकुळाष्टमी खूप धुमधडाक्यात मध्ये साजरी केली जाते.

भक्त गोकुळाष्टमीच्या उत्सवावर उपवास ठेवली जातात, मंदिरांना सजवले जाते तसेच गोपाळाच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून झोका दिला जातो. भजन-कीर्तन केली जाते आणि त्यासोबतच तरुणांमध्ये दहीहंडी फोडण्याची स्पर्धा केली जाते. त्याच्यासोबत श्रीकृष्णाची नगरी मथुरा मध्ये सुद्धा दुरून भक्त दर्शनासाठी येत असतात. त्या दिवशी संपूर्ण मथुरा नगरी भगवान श्रीकृष्णाच्या नावाने दुमदुमून जाते. श्रीकृष्ण त्यांच्या लहानपणी लोणी, दही, दूध आपल्या मित्रांसोबत एकत्र येऊन चोरून खाण्याचा प्रयत्न करीत असत. दही हे त्यांचे आवडते खाद्य होते. म्हणून दहीहंडी महोत्सव त्यांच्या आठवणी निमित्त साजरा केला जातो.

उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपाळकाला असे म्हणतात. कृष्णजयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत कोकणात या सणानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला केला जातो. त्याचे जेवण करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे गोविंदा आला, गोकुळात आनंद झाला. असे गाणे म्हणत लहान-मोठे पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात.

कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून श्रीकृष्ण चरित्रातील सोंगे करण्याचीही प्रथा आहे. या दिवशी महाराष्ट्रात मुंबई येथे उच्च मडक्यात दही, दूध यांनी भरलेला हंडा ठेवून तिथपर्यंत मानवी मनोरेची स्थापना करून दहीहंडा फोडण्याचा साहसी खेळ होतो. महाराष्ट्रातील एक वैष्णव वृत्त आहे. श्रीकृष्ण त्याच्या मित्रांसोबत गाई चारण्यासाठी जात असत व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोर्‍या एकत्र करून त्या खाद्यपदार्थाचा काला केला व सर्वात सत्याचे रक्षण केले, अशी एक कथा आहे. म्हणून या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे.

गोकुळाष्टमीची पौराणिक कथा:

श्रीकृष्णाने पृथ्वीवर देवकी आणि वासुदेव यांच्या पोटी जन्म घेतला. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळेस अवकाश वाणी झाली होती, की देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करेल. कंसाच्या अत्याचारांनी संपूर्ण मथुरा नगरी त्रस्त झालेली होती. त्याच्या राज्यात राज्यांमध्ये निर्दोष लोकांना सुद्धा शिक्षा केली जाई. आपल्या मृत्यूच्या भीतीने त्याने एवढेच नव्हे तर आपली बहिण देवकी आणि तिचा पती वासुदेव ह्यांना सुद्धा काळकोठळीमध्ये टाकले होते. एवढेच नव्हे तर कंसाने आपल्या अत्याचाराने देवकीचे सहा पुत्रही आधीच मारून टाकले होते.

भगवान श्रीकृष्णांच्या जन्म दिवशी आकाशा मधून घनघोर पावसाचे वर्ष सुरू होण्यास सुरुवात झाली. भगवान श्रीकृष्णाला सुरक्षित स्थानावर घेऊन जाण्यासाठी वासुदेव यांनी त्याला एका टोपलीमध्ये टाकले. यमुना नदी पार करत त्यांनी भगवान श्रीकृष्णाला आपल्या मित्र नंद गोपाल कडे नेले आणि त्यांनी आपल्या पुत्राला, भगवान कृष्णाला यशोदा माते पाशी झोपून ठेवून त्यांची कन्या घेऊन परत आले. अशा प्रकारे देवकी पुत्र भगवान कृष्णाचे पालन-पोषण यशोदा मातेने केले मात्र भगवान श्रीकृष्णाच्या दोन माता आहेत. एक जन्मदाती आणि एक पालन कर्ती. एक म्हणजे देवकी माता आणि दुसरी म्हणजे यशोदा माता.

अशाप्रकारे गोकुळाष्टमी भारतातील विविध राज्यात मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरी केली जाते.

“तुम्हाला गोकुळाष्टमी विषयी आमची माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करू नक्की सांगा.”

या सणाबद्दल जरूर वाचा :

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 3 / 5. Vote count: 2

No votes so far! Be the first to rate this post.