Interior Designer Course Information In Marathi एक घर दगडाचं जुन्या कोरिव विटांचं सोप्याचं आणि पडवीच भरलेल्या अंगनाचं दारापुढेल्या तुळशीचं घडवंची वरच्या कळशीच एक घर!!! आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी तुम्हाला या कवितेच्या ओळी का सांगत आहे. कारण आजच्या परिस्थितीत घर ही संकल्पना बदलत चालली आहे. पूर्वी घर म्हणजे चार भिंतीचे विटा व मातीने बनवलेले असे असायचे. कालांतराने त्यामध्ये बदल होत चालला आहे हे आपल्याला दिसत आहे. माती व विटांनी बांधण्यात येणाऱ्या घरांचे स्वरूप बदलून ति घरे आता फ्लॅट, बंगलो, रो हाऊसेस या स्वरूपात दिसत आहे. प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते की, आपले हक्काचे एक सुंदर घर असावे.
इंटिरिअर डिझायनर कोर्सची संपूर्ण माहिती Interior Designer Course Information In Marathi
आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात फॅशन, डिजाईनचे खूप महत्त्व वाढताना दिसत आहे. घर बांधल्या नंतर त्या घरातील भिंतींना रंग कोणता द्यायचा व फरशी कशी, कोणत्या डिझाईनची बसवायची, रंगसंगती नुसार पडदे व सोफे कवर कोणत्या रंगाचे असावेत. उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर करून घर सुशोभित करणे. लाइट्स ,फर्निचर यांचे नियोजन करणे .अशा बऱ्याच गोष्टी विचारात घ्याव्या लागतात.
तुम्हाला माहीत आहे का!! की हे काम व्यवस्थितपणे पार पाडणारे कोण असते? ते असतात इंटिरिअर डिझायनर!!! घराला आकार देण्यामध्ये इंटरियर डिझाईन चा मोलाचा वाटा असतो. घरात आकार येण्यामागे इंटिरिअर डिझायनर ची मेहनत व कल्पकता असते .इंटिरिअर डिझायनर फक्त घरच्या डिझाईन विषयी मर्यादित नसून दुकान, मॉल, कार्यालय ,हॉटेल येथे ही आपली भूमिका योग्यप्रकारे निभावत आहेत.
जसे आपण घरातील इंटरियर डिझाईनिंग करतो त्याचप्रमाणे मॉल, हॉटेल, दुकान येथेही इंटरियर डिझाईनिंग ला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या डिजाइन क्षेत्रात इंटिरिअर डिझायनर लोकांची मागणी वाढत आहे. पूर्वी मुले ही फक्त इंजीनियरिंग, बी फार्मसी, ॲग्री यांसारखे अभ्यासक्रम घेत असत. इंटिरिअर डिझायनर कोर्सेस कडे मुले जास्त वळत नव्हती. कारण कोणताही कोर्स करण्याचे ठरवले की त्या कोर्स बद्दल संपूर्ण माहिती आपल्याला अवगत असणे गरजेचे आहे .
मुलांना या इंटिरिअर डिझायनर या कोर्सची माहिती नसल्यामुळे हा कोर्स पडद्या आड दडला होता. पण आताची परिस्थिती पाहता इंटिरिअर डिझायनर या कोर्सला खूप मागणी आली आहे. डिझायनिंगचं क्षेत्र व्यापक आहे. आज मी तुम्हाला या इंटिरिअर डिझायनर या कोर्स ची संपूर्ण माहिती सांगणार आहे.
आता आपल्याला प्रश्न पडला असेल की इंटिरिअर डिझायनर म्हणजे काय ?
आपण प्रथम इंटिरिअर डिझायनर म्हणजे काय याची सविस्तर माहिती देणार आहे.इंटिरिअर डिझायनर म्हणजे अंतर्गत सजावट. परंतु ही अंतर्गत सजावट फक्त घरा पुरतीच मर्यादित न राहता हॉटेल, मॉल, दुकाने ,औद्योगिक रचना तयार करण्यासाठी डिझाईनचा सहभाग असतो.पूर्वी डिझायनिंग क्षेत्रात येण्यासाठी चित्रकला ही कला अवगत असणे गरजेचे होते. परंतु आज मात्र डिझाईनशी संबंधित अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत.
इंटेरियर डिझाईन चे मूलभूत व प्रमुख काम आहे की पुरेश्या जागेचे योग्य प्रकारे नियोजन करून त्या जागेला सुशोभित करणे. घर किंवा ऑफिस सजवताना लाईट, सजावटीच्या वस्तू ,फर्निचर, भिंतींना देण्यात येणाऱ्या रंगाची रंगसंगती, तसेच त्या रंगसंगतीनुसार पडदे व सोफा सेट यांचे कापड निवडणे ही सर्व कामे इंटिरिअर डिझायनरला करावी लागतात.
इंटिरिअर डिझायनर या कोर्सच्या अभ्यासक्रमात ड्रॉइंग, जागेचे स्पेस नुसार नियोजन कसे करायचे ,फर्निचर डिझाईन ,तसेच सपाट व सखल पृष्ठभागावर वस्तू कशा ठेवायच्या याचा अभ्यास केला जातो .रंगसंगती, पडदे व सोफ सेट कव्हर यांची रंगसंगती इत्यादी कार्यपद्धतीचा अभ्यास या कोर्समध्ये शिकवला जातो.
या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तुमच्यात काही गुण असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे प्रथम कलेचे ज्ञान म्हणजेच चित्रकला व हस्तकला यांचे ज्ञान अवगत असले पाहिजे. तसेच तुमच्यात कल्पना शक्ती असली पाहिजे. विचार करण्याची क्षमता, निरीक्षणशक्ती असणे गरजेचे आहे.
तसेच कोणत्याही ग्राहकांशी बोलताना त्याचे म्हणणे काय आहे हे ऐकून घेण्याची तयारी असली पाहिजे व त्याचे म्हणणे समजून घेऊन ग्राहकाला त्याच्या आवडीनुसार काम करून देणे ही जबाबदारी पार पाडण्याचे कौशल्य असले पाहिजे. तसेच आत्ताचे तंत्रज्ञान हे कॉम्प्युटरशी जास्त संबंधित असल्यामुळे आपल्याला कॉम्प्युटर सॉफ्टवेअरची माहिती असणे आवश्यक आहे. इंटिरिअर डिझायनर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला नोकरीच्या संधी निश्चितपणे उपलब्ध होतील.
इंटेरिअर डिझायनर याला भारतातच नाही तर परदेशातही नोकरीच्या अनेक संधी आहेत .काही तज्ञांच्या मते इंटेरियर डिझाइनिंग ची बाजारपेठ विस्तारत चालली आहे. 2025 पर्यंत या बाजारपेठेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे .त्यामुळे काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांनी डिझायनिंगच्या या क्षेत्राकडे वळायला हरकत नाही.
इंटिरिअर डिझायनर च्या क्षेत्राची निवड करण्यासाठी शैक्षणिक पात्रता
इंटिरिअर डिझायनर हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थी हा कोणत्याही शाखेतून (10+2) 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बारावीमध्ये किमान 40 ते 50 % गुण असणे आवश्यक आहे. इंटिरिअर डिझायनर हा कोर्स तुम्ही पदवी नंतरही करू शकता. इंटिरिअर डिझायनर हा कोर्स डिप्लोमा आणि पदवी या दोन्ही स्तरांवर अभ्यासक्रम देतात.
तुम्ही तुमच्या इच्छेनुसार हा अभ्यासक्रम निवडू शकता. इंटिरिअर डिझायनर डिप्लोमा अभ्यासक्रमांचा कालावधी हा एक वर्षाचा असतो आणि पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षाचा असतो. इंटिरियर डिझायनर या कोर्स करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
इंटिरिअर डिझायनर कोर्स ला प्रवेश देण्यासाठी काही महाविद्यालय प्रवेश परीक्षा घेतात. त्याशिवाय राष्ट्रीय स्तरावरही प्रवेश परीक्षा घेतल्या जातात .या प्रवेश परीक्षांची यादी खालील प्रमाणे:-
UCEED (अंडरग्रॅजुएट कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन फोर डिझाईन)
आयआयटी बॉम्बे दरवर्षी BDes सारख्या इंटरियर डिझाईन कोर्सेस मध्ये प्रवेश देण्यासाठी आयोजित केली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मुंबई ,गुवाहाटी, दिल्ली ,हैदराबाद, जबलपूर येथील विविध भारतीय तंत्रज्ञान संस्था मध्ये प्रवेश दिला जातो.
NATA (नॅशनल एप्टीट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर)
ही भारतातील वास्तुकला परिषद नवी दिल्ली ची एक संस्था आहे. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते .ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संपूर्ण भारतातील विविध इंटेरियर डिझाईन महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जातो.
SEED सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन
ही परीक्षा देशभरातील आयआयटी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने घेतली जाते.
NID DAT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन
राष्ट्रीय स्तरावरिल डिझाईन प्रवेश परीक्षा आहे. या प्रवेश परीक्षेचे दोन पेपर असतात .ते म्हणजे प्राथमिक परीक्षा आणि नंतर मुख्य परीक्षा इंटिरियर डिझाईन कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्याला हे दोन्ही पेपर उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
AIEED आर्च अकॅडमी ऑफ डिझाईन
अखिल भारतीय प्रवेश परीक्षा आहे .ही परीक्षा बहुतांश ऑनलाइन घेतली जाते.
इंटिरियर डिझायनर कोर्स या अभ्यासक्रमात खालील गोष्टी शिकवल्या जातात.
डिझाईन कौशल्य, कला आणि ग्राफिक्स, डिझाईन सराव, बांधकाम आणि डिझाईन, फर्निचर डिझाईन ,इंटरियर डिझाईन सिद्धांत, बांधकाम तंत्रज्ञान, खर्चाचा अंदाज, रंगसंगती. इंटिरिअर डिझायनर मध्ये शॉर्ट टर्म कोर्स,डिप्लोमा कोर्स ,अंडर ग्रॅज्युएट कोर्स,पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स असे अनेक अभ्यासक्रम दिले जातात.
शॉर्ट टर्म कोर्स या अभ्यासक्रमात परिधान आणि घरासाठी प्रिंट डिझाईन मधील प्रमाणपत्र. इंटिरियर साठी स्टाइलिंग मधील व्यवसायिक प्रमाणपत्र . घरासाठी स्टाइलिंग मध्ये प्रमाणपत्र. इंटरियर्स आणि फॅशन साठी टेक्स्टाईल मधील प्रमाणपत्र.
डिप्लोमा अभ्यासक्रम
- इंटिरियर डिझायनिंग मध्ये डिप्लोमा
- इंटीरियर डिझायनिंग मध्ये मास्टर डिप्लोमा
- इंटिरियर डिझाईन मध्ये ॲडव्हान्स डिप्लोमा
पदवीपूर्व अभ्यासक्रम
- इंटिरियर डिझाईन मध्ये युजी प्रोग्रॅम
- बीएससी इंटरियर डिझाईनिंग आणि सजावट
- इंटीरियर डिझायनिंग मध्ये आंतरराष्ट्रीय ड्युअल डिग्री प्रोग्राम.
पदव्युत्तर अभ्यासक्रम
- इंटेरियर डिझाईन आणि स्टायलिंग मध्ये पीजी प्रोग्रॅम M.Voc.इंटिरियर डिझायनिंग आणि बिझनेस मॅनेजमेंट
- इंटीरियर डिझायनिंग मध्ये एमबीए
- फर्निचर आणि इंटिरियर डिझाईन मध्ये एमडीएस
इंटिरिअर डिझायनर हा कोर्स पदवी आणि डिप्लोमा या दोन स्तरांवर असल्याने या दोन्ही कोर्सचे शुल्क वेगवेगळे असते. आपण ज्या संस्थेमार्फत आपण हा कोर्स करणार आहे. त्या संस्थेवर ही फी अवलंबून असते. डिप्लोमा कोर्स केल्यास फी ही कमी भरावी लागते व डिग्री कोर्स केल्यास फी ही जास्त भरावी लागते .इंटिरिअर डिझायनर कोर्सला 30000 ते 200000 पर्यंत शुल्क आकारावे लागते.
इंटीरियर डिझायनर हा कोर्स केल्यानंतर ते मी कोणत्याही मोठ्या कंपनीत इंटेरियर डेकोरेटर, कन्सल्टंट, फर्निचर डिझाईनर, एक्जीबिशन डिझायनर , लाइटिंग डिजाइनर,किचन डिजाइनर ,आर्किटेक टेक्नॉलॉजी अनेक संधी उपलब्ध आहेत.
इंटिरिअर डिझायनर हा कोर्स केल्यानंतर तुम्ही दरमहा 20000 रुपये सहज मिळू शकता. आपल्या अनुभवानुसार आपल्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. भारतातील सरासरी वार्षिक वेतन तीन लाख रुपये इतके असू शकते.
इंटिरियर करण्यासाठी कॉलेज-
- आय.एन.आय.एफ.डी. पुणे,कोथरूड
- आय.एन.आय.एफ.डी.,कोरेगाव पार्क
- सूर्यादत्ता इन्स्टिट्यूट ऑफ वोकेशनल अँड ॲडव्हान्स स्टडीज
- आय.एन.आय.एफ.डी डेक्कन
- डिझाईन मेनियाक बेस्ट बीएससी ॲनिमेशन इन्स्टिट्यूट
- सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन
- नॅशनल स्कूल ऑफ डिझाईन, पुणे
- सजरण कॉलेज ऑफ डिझाईन
- इंटेक्स इन्स्टिट्यूट ऑफ इंटेरियर डिझाईन
- जगन्नाथ राठी वोकेशनल गार्डन सेंटर इन्स्टिट्यूट
- संस्कार अकॅडमी पुणे
सतत विचारले जाणारे प्रश्न:
इंटिरियर डिझायनिंगसाठी कोणती कौशल्ये असायला हवी?
इंटिरियर डिझाइन कोर्स करणारे विद्यार्थी हे कुशाग्र, वक्तशीर, सक्रिय, सर्जनशील तसेच तांत्रिकदृष्ट्या सुदृढ असावेत.
इंटिरियर डिझायनिंगसाठी मुख्य विषय कोणते आहेत?
इंटिरियर डिझायनिंगमध्ये समाविष्ट असलेले मुख्य विषय आहेत - संशोधन धोरण, आर्किटेक्चर, CAD, चित्रण, रेखाचित्र, प्रस्तुतीकरण, मांडणी, छायाचित्रण, डिझाइन प्रक्रिया, याशिवाय, सादरीकरण आणि संप्रेषण कौशल्ये.
इंटिरियर डिझायनिंगसाठी कोर्सची फी किती आहे?
विविध इंटिरिअर डिझायनिंग कोर्सची फी कोर्सची पातळी आणि कॉलेजच्या आधारावर अवलंबूनअसते. वार्षिक रु. 5 लाख ते रु. 20 पर्यंत असते.
इंटिरियर डिझाइन कोर्स पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत?
इंटिरियर डिझायनिंग अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर करिअरचे अनंत पर्याय आहेत. त्यापैकी काही आहेत - इंटिरिअर डेकोरेटर, कन्सल्टंट, इंटिरियर ऑडिटर, इंटिरियर प्रॉडक्ट डिझायनर, क्रिएटिव्ह डायरेक्टर, इंटिरियर फोटोग्राफर इ.