आय.आय.टी कोर्सची संपूर्ण माहिती IIT Course Information In Marathi

IIT Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो आज या लेखात आपण आय.आय.टी कोर्स विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ हा आय.आय.टी चा फुल फॉर्म आहे ‘भारतीय प्रौद्योगिकी संस्थान’ असे त्याला हिंदीमध्ये संबोधले जाते.जगभरात व संपूर्ण भारतात नावलौकिक मिळवलेली आय.आय.टी ही एक प्रतिष्ठित संस्था असून या संस्थेमधून भारतातील व जगातील अनेक संशोधन तंत्रज्ञ अभियंते उच्चस्तरीय शास्त्रज्ञ या संस्थेतून बाहेर पडत असतात.

Iit Course Information In Marathi

आय.आय.टी कोर्सची संपूर्ण माहिती IIT Course Information In Marathi

आज आपण या लेखात आय.आय.टी कोर्स बद्दल ची संपूर्ण माहिती घेणार आहोत. व जर तुम्ही बारावी उत्तीर्ण झाले अससाल आणि जर तुम्हाला इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये पुढे शिक्षण करायचे असेल तर तुम्ही आय.आय.टी हे क्षेत्र तुमच्या पुढील आयुष्यासाठी निवडू शकता म्हणजे भारतात राहून इंजिनीअरिंगचे शिक्षण एखाद्या नामांकित संस्थेमार्फत घ्यायचे असेल तर त्यासाठी आय.आय.टी संस्था सर्वोत्तम पर्याय मानला जातो इंजीनियरिंग करण्याची आवड व इच्छा असलेल्या कोणत्याही विद्यार्थी हीच अपेक्षा बाळगतो की त्याचे शिक्षण हे आय.आय.टी मार्फत झाले पाहिजे, पण आय.आय.टी ला प्रवेश घेणे खरच खूप अवघड असते.

अत्यंत पराकोटीची मेहनत करून अभ्यास करावा लागतो तेव्हा कुठे सिलेक्शन होण्याची शक्यता असते. प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया ही दरवर्षी घेतली जात असते. आपल्या देशात आय.आय.टी महाविद्यालय एकूण 20 आहेत.

या संस्थेमार्फत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना व अत्यंत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देशात व देशाबाहेर देखील खूप चांगल्या नोकरीची संधी असते. या संस्थेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना खूप चांगले पॅकेज देखील मिळते आय.आय.टी परीक्षेसाठी आणि कोचिंग क्लासेस सध्या उपलब्ध आहे. जो अभ्यासक्रम तुम्हाला अकरावी-बारावी असतो त्याच धर्तीवर तुम्हाला परीक्षाही द्यावी लागते.

शैक्षणिक पात्रता मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण भावेल ही महत्त्वाची पात्रतेची अट असते. आय.आय.टी मध्ये प्रवेश घेण्यासाठी निकष हे वेळोवेळी बदलत असतात पण जास्त करून आय.आय.टी प्रवेश घेण्यासाठी 75 टक्के गुण असणे अनिवार्य असते.

वयाची अट विचाराल तर तुम्ही 17 वर्षाचे असावे ही महत्त्वाची अट असते अनुसूचित जमाती,अनुसूचित जाती व अपंग मुलांना थोड्या प्रमाणात सूट देण्यात येते. प्रवेश प्रक्रिया आयआयटीमध्ये प्रवेश घेत असताना सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो म्हणजे प्रवेश परीक्षेचा टप्पा साल 2013 पासून आय.आय.टी प्रवेश परीक्षा ही दोन टप्प्यांमध्ये घेतली जात असते जेईई मेन्स परीक्षा आणि जेईई ऍडव्हान्स परीक्षा.

जेईई परीक्षेसाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर परीक्षा द्यावी लागते जेईई मेन्स परीक्षे मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी अर्ज करावा लागतो. जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी सुमारे दीड लाख विद्यार्थी हे पात्र ठरत असतात व त्यातले फक्त दहा हजार विद्यार्थी हे वेगवेगळ्या आयटी संस्थांमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरतात .

परीक्षेच्या पॅटर्न बद्दल बोलायचे असता तुम्हाला पहिला पेपर बी.टेक म्हणजे यात गणित,भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र असे विषय असतात. या दोन्ही पेपर मध्ये तीस तीस प्रश्न प्रत्येकी असतात व प्रत्येक प्रश्न हाच चार गुणांचा असतो, याचा अर्थ हे होतात 90 प्रश्न व त्यासाठी 360 गुण असतात.

दुसऱ्या पेपर बद्दल बोलायचे झाले तर त्यामध्ये बी. आर्क आणि बी.प्लॅनिंग हे दोन विषय असतात यामध्ये 30 प्रश्न गणित ह्या विषयाचे असतात, ज्याला 120 गुण असतात व योग्यता चाचणीत देखील 50 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात ज्याला तब्बल 200 गुण असतात.त्याचबरोबर ड्रॉइंग टेस्टचे दोन प्रश्न असून त्याला 70 गुण असतात व या सर्व पेपर साठी एकूण तीन तासाचा वेळ दिला जातो.

• आय टी करण्याचे फायदे

सर्वप्रथम आय.आय.टी या संस्थेतून इंजिनीअरिंग करून उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला सहजपणे चांगले ठिकाणी प्लेसमेंट मिळू शकते व सहजपणे चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळाल्यानंतर तिथे तुम्हाला चांगल्या प्रकारची काम करण्याची संधी देखील मिळू शकते, म्हणजेच काम करण्यासाठी सुसज्ज असे आधुनिक संगणकाची सुविधा देखील मिळू शकते जर तुम्ही आय.आय.टी संस्थेमधून उत्तीर्ण होऊन चांगले इंजिनीयर व शास्त्रज्ञ झालात तर समाजात तुम्हाला मान व स्वाभिमान देखील मिळू शकतो.

जर जर तुमची आय.आय.टी मार्फत एखाद्या चांगल्या कंपनीत प्लेसमेंट झाली तर आयआयटी कॅम्पस मध्ये जे काही खासगी रेस्टॉरंट असतात त्यामध्ये तुम्हाला दहा ते वीस टक्‍क्‍यांपर्यंत सूट मिळू शकते व मेडिकल शेतामध्ये तुम्हाला डॉक्टरांची मोफत सेवा देखील मिळेल. भारतातील नामांकित आयटी विद्यालयांची यादी पुढीलप्रमाणे आहेत.

आय.आय.टी गुवाहाटी, आय.आय.टी पटना,आय.आय.टी जोधपुर,आय.आय.टी हैदराबाद, आय.आय.टी गांधिनगर, आय.आय.टी भुबनेश्वर,आय.आय.टी रोपार, आय.आय.टी रूरके, आय.आय.टी दिल्ली, आय.आय.टी धारवाड, आय.आय.टी जम्मू, आय.आय.टी भिलाई, आय.आय.टी गोवा, आय.आय.टी धांबड, आय.आय.टी कानपूर, आय.आय.टी मद्रास, आय.आय.टी बॉम्बे, आय.आय.टी खरागपूर, आय.आय.टी तिरूपति, आय.आय.टी पलाक्कड, आय.आय.टी (BHU)वाराणसी, आय.आय.टी मांडी, आय.आय.टी इंदोर. प्रवेश परीक्षेची तयारी सुरू असताना एखाद्या चांगल्या कोचिंग क्लासची मदत घेणे खूप गरजेचे असते व सातत्याने अभ्यास करणे हेच या परीक्षेचे अंतिम फळ मिळण्याचे मुख्य साधन आहे.

अभ्यास करत असताना आसपास इकडे तिकडे लक्ष न देता तुम्ही फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.परीक्षेच्या क्रम यादीत अव्वल येण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. कोणत्याही प्रवेश परीक्षेची तयारी करत असताना सगळ्यात महत्त्वाचे असते म्हणजे मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे व त्यानुसार पुढील अभ्यासाची रणनीती ठरवणे.

परीक्षेसाठी तुम्हाला तीन तासाचा वेळ दिला जातो त्यामुळे या तीन तासांमध्ये पेपर सोडवणे व ते चेक करणे खूप महत्त्वाचे असते त्यामुळे वेळेचे नियोजन करणे खूप महत्त्वाचे असते. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी चालू घडामोडी तुमच्या क्षेत्राशी निगडित इंटरनेटवरील व्हिडिओस व यशस्वी विद्यार्थ्यांच्या मुलाखती या खूप महत्त्वाच्या असतात.

या परीक्षेसाठी तयारी करत असताना तुम्हाला तुमचे वेळापत्रक बनवणे खूप गरजेचे असते. साधारणपणे आय.आय.टी चा प्रवेश परीक्षेसाठी तुम्हाला इयत्ता अकरावीचे 45 टक्के प्रश्न इयत्ता बारावीचे 55 टक्के प्रश्न विचारले जात असतात. त्यामुळे अकरावी व बारावी चा अभ्यास काळजीपूर्वक करणे खूप महत्त्वाचे असते. आय.आय.टी साठी जी प्रवेश परीक्षा आपण देतो ती म्हणजे जेईई परीक्षा याचे परीक्षेसाठी तुम्हाला फक्त तीन वेळा अर्ज करता येतो.

FAQ’s

आय.आय.टी चा फूल फॉर्म काय आहे?

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ हा आय.आय.टी चा फुल फॉर्म आहे.

आय.आय.टी. चा लॉंग फॉर्म काय आहे?

आय.आय.टी.चा लॉंग फॉर्म 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी' असा आहे. 'भारतीय प्रौद्योगिकी संस्थान' असे त्याला हिंदीत बोलले जाते.

आय.आय.टी.साठी कोणती पात्रता लागते ?

बारावी बोर्ड परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावी लागते. बारावी मध्ये आपल्याला 75% गुण असणे अनिवार्य आहेत.

आय.आय.टी.करण्यासाठी वयाची अट आहे का?

हो ,आयआय.टी.करण्यासाठी वयाची अट असते .वयाची अट 17 वर्ष असावी ही महत्त्वाची अट असते. अनुसूचित जाती जमाती साठी व अपंगांना थोड्या प्रमाणात सूट दिली जाते.

आयआय.टी.करण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात?

2012 यापासून आय.आय.टी. प्रवेश परीक्षा दोन टप्प्यांत घेतली जाते. ती म्हणजे जेईई मेन्स व जेईई ऍडव्हान्स परीक्षा. या दोन परीक्षा देऊन त्यात उत्तीर्ण होणे महत्त्वाचे आहे .म्हणजेच प्रथम जेईई मेन्स ही परीक्षा द्यावी लागते. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर जेईई ऍडव्हान्स परीक्षेला अर्ज करावा लागतो व त्यात तुम्ही उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही आय.आय.टी. पात्र होत असतात. परंतु जेईई ऍडव्हान्स ही परीक्षा अवघड असते. कारण सुमारे दीड लाख विद्यार्थी परीक्षेला बसले तर दहा हजार विद्यार्थी वेगवेगळ्या आय.आय.टी. संस्थांमध्ये पात्र होतात.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment