व्हेटर्नरी कोर्सची संपूर्ण माहिती Veterinary Course Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Veterinary Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो, प्रत्येक मुलाने आपल्या करिअर साठी काही ना काही तरी सुचून ठेवलेले असते. एकदा दहावी बारावीचा निकाल लागला की मुले आपल्या करियर विषयी खूप गंभीर होत असतात. काही मुले उच्च अभ्यासक्रम आपल्या पसंतीनुसार निवडत असतात. तर काही मुलांवर त्याला न आवडणारे अभ्यासक्रम लादले जातात .म्हणजे प्रत्येक मुलगा हा अभ्यासात हुशार असतो असे नाही. काही मुलांना कला या विषयात रस असतो. तर काही मुलांना वेगवेगळ्या क्षेत्रात जायचे असते .जसे की काही मुलांना लहानपणापासून प्राण्यांविषयी खूप ओढ असते. त्यांना प्राणी खूप आवडत असतात.

Veterinary Course Information In Marathi

व्हेटर्नरी कोर्सची संपूर्ण माहिती Veterinary Course Information In Marathi

मी तुम्हाला आजच्या पोस्टमध्ये अशाच एका कोर्सची माहिती सांगणार आहे .जो कोर्से केल्यामुळे तुमची प्राण्याविषयी असलेली आवड पूर्ण करता येईल व एक प्रकारे भूतदया म्हणजे त्या मुक्या प्राण्यांविषयी काहीतरी करता येईल.त्या कोर्सचे नाव आहे  व्हेटर्नरी कोर्स!!!

व्हेटर्नरी कोर्स ज्याला आपण मराठीत पशुवैद्यकीय डॉक्टर असे म्हणतो. बॅचलर ऑफ व्हेटर्नरी सायन्स हे पशुवैद्यकीय विज्ञान क्षेत्रातील पाच वर्षाचा पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाचा उद्देश प्राण्यांचे पोषण ,उपचार आणि प्रजाजनासाठी आवश्यक ज्ञान प्रदान करणे हे आहे. भारतामध्ये व्हेटर्नरी कोर्स चे शिक्षण देणारे बरेच महाविद्यालय आहेत .ज्यात भारतीय पशु वैद्यकीय संशोधन संस्था, पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान महाविद्यालय, पश्चिम बंगाल पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ इ.

एका संशोधनानुसार असे समोर आले आहे सध्या भारतात प्राण्यांची संख्या सुमारे पाचशे दशलक्ष इतकी आहे त्याच्या तुलनेत पशुवैद्यकीय डॉक्टर खूपच कमी आहेत. गेल्या काही वर्षापासून प्राणी व पक्षी हे भरपूर प्रमाणात प्राणघातक आजारामुळे मरण पावत आहेत. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन त्या दिशेने खूप उपयुक्त पावले उचलली आहेत. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.

आपल्या देशात प्राण्यांची संख्या पाहता वैद्यकीय डॉक्टरांची मोठी कमतरता आहे. बदलत्या हवामानामुळे प्राणी व पक्षी ही जीवघेण्या आजारांना बळी पडत आहे. मात्र त्यांच्या उपचारासाठी पशुवैद्यकीय डॉक्टर उपलब्ध नसतात जर तुम्हाला प्राणी व पक्षी आवडत असतील तर या निष्पाप प्राण्यांच्या वेदना दूर करायच्या असतील तर पशुवैद्यकीय म्हणजेच व्हेटर्नरी हा कोर्स तुमच्यासाठी अधिक चांगला पर्याय ठरू शकतो.

या अभ्यासक्रमामध्ये प्राणीशरीरशास्त्र आणि शरीरशास्त्र पासून ते प्राण्यांच्या  रोगावर उपचार आणि शस्त्रक्रिया पर्यंत सर्व काही समाविष्ट आहे. या कोर्समध्ये प्राण्यांचे शरीर रचना पोषण रोग आणि शरीर विज्ञान यांचे ज्ञान दिले जाते.

पशुवैद्यकीय बनण्यासाठी पशु वैद्यकीय शास्त्रात पदवी आणि पदविका, पदवीत्तर पदवी आणि पीएचडी स्तरावरील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तुम्ही यापैकी कोणताही कोर्स करू शकता-

  • डिप्लोमा इन व्हेटरनरी फार्मसी (2 वर्षांचा डिप्लोमा)
  • पशुवैद्यकीय विज्ञान मास्टर (2 वर्ष पदवी)
  • पशुवैद्यकीय विज्ञानात पीएचडी (2 वर्षांची पदवी)
  • पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी (5 वर्षांची पदवी)

या कोर्समध्ये तुम्हाला थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्हीचे ज्ञान दिले जाते. सुरुवातीला तुम्हाला शरीरशास्त्र, बायोकेमिस्ट्री, फिजिओलॉजी, पोषण, पशुधन व्यवस्थापन आणि उत्पादन, पॅथॉलॉजी आणि आनुवंशिकी इत्यादी विषय शिकवले जातात. यानंतर, त्यांना प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवले जाते.

व्हेटर्नरी कोर्स करण्यासाठी काही पात्रता निष्कष विद्यार्थ्यांना पूर्ण कराव्या लागतात .व्हेटर्नरी कोर्स या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून इंग्रजीसह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे विषय अनिवार्य असतात. बारावी मध्ये विद्यार्थ्याला किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. SC व ST विद्यार्थ्यांसाठी 45 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे .या निकषांमध्ये वयाची अट सुद्धा देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांचे वय हे 17 ते 22 वर्ष असावे.

व्हेटर्नरी कोर्स याचा कालावधी पाच वर्षाचा असतो. हा अभ्यासक्रम  नऊ सेमिस्टर मध्ये विभागलेला असतो .त्यानंतर सहा महिन्यांची इंटर्नशिप प्रोग्रॅम असतो. या पाच वर्षाच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांमध्ये प्राण्यांची शरीररचना ,पोषण, रोग आणि शरीर विज्ञान यांचे ज्ञान दिले जाते.

तसेच  या अभयसक्रमात सिद्धांत व व्यवहारिक दोन्ही परीक्षा असतात. या अभ्यासक्रमाच्या सर्व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 12 महिन्यांच्या कालावधीची इंटरंशिप अनिवार्य असते. या कालावधीत विद्यार्थ्यांना लहान मोठ्या प्रमाणात क्लीनिकल आणि प्रयोगशाळा आधारित संशोधनासह प्राणी कुकुटपालन आणि रोग व्यवस्थापन विषयांचे प्रशिक्षण दिले जाते.

व्हेटर्नरी या कोर्ससाठी प्रवेश कसा घ्यायचा

व्हेटर्नरी सायन्स मधील बॅचलर डिग्री कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. ती VCI म्हणजे व्हेटर्नरी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या मार्फत घेतली जाते दरवर्षी मे आणि जून मध्ये प्रवेश परीक्षा होत असते. ही स्पर्धा परीक्षा भारतातील प्रत्येक राज्यात घेतली जाते. ज्यामध्ये 15 टक्के जागा इतर राज्यांसाठी राखीव असतात आणि 85 टक्के जागा या राज्यात संस्था आहे त्या राज्यातील उमेदवारांसाठी असतात. व्हेटर्नरी कोर्ससाठी प्रवेश परीक्षांची यादी खालील प्रमाणे:-

NEET, AAU VET, OUAT, RPVT, BHU UET.

आपल्याला चांगले पशुवैद्यकीय होण्यासाठी काही गुण आपल्यात असणे महत्त्वाचे आहे. ते म्हणजे पशुवैद्यकीय डॉक्टर होण्यासाठी सर्वात मुख्य गुण म्हणजे तो संवेदनशील असणे महत्त्वाचे आहे. तसेच पशुवैद्यकीय होण्यासाठी त्यांच्यामध्ये प्राणीप्रेम असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण जेव्हा तो प्राण्यांवर व पक्षांवर प्रेम करतो तेव्हाच तो त्याच्या हावभावावरून त्याच्या समस्या सहज समजू शकतो.

व्हेटर्नरी हा कोर्स केल्यानंतर तुम्ही सरकारी रुग्णालयात नोकरीसाठी अर्ज करू शकता. तुम्हाला जर सरकारी नोकरी मिळाली तर तुम्हाला दरमहा 50 ते 60 हजारांची नोकरी मिळू शकते. याशिवाय तुम्ही स्वतःचा खाजगी दवाखाना सुद्धा उघडू शकता .तुम्ही महिन्याला किमान पंधरा ते वीस हजार रुपये कमवू शकता.

ग्रामीण भागात शक्यतो शेती व्यवसायाला पूरक म्हणून पशु व्यवसाय केला जातो. त्यावेळेस गाय ,बकरी ,मेंढी, म्हैस इत्यादी पाळीव प्राण्यांचे उपचारांसाठी पशुवैद्यकाकडे लोकं जातात. तसेच व्हेटर्नरी हा कोर्स केल्यानंतर तुम्ही पशुवैद्यकीय रुग्णालय, पशुसंवर्धन विभाग, पोल्ट्री फार्म, डेअरी उद्योग, दूध व मांस प्रक्रिया उद्योग आणि पशु जैवतंत्रज्ञान या क्षेत्रात सुद्धा काम करून आपले करिअर घडवू शकता.

व्हेटर्नरी हा कोर्स केल्यानंतर तुम्ही वरिष्ठ वैद्यकीय प्रतिनिधी, पशुवैद्यकीय डॉक्टर ,पशु वैद्यकीय सल्लागार, पशुवैद्यकीय संशोधक ,पशुवैद्यकीय सर्जन यांसारख्या भूमिका पार पाडू शकता.

व्हेटर्नरी कोर्स या अभ्यासक्रमाचे तीन प्रकार आहे

पूर्णवेळ अभ्यासक्रम

पूर्णवेळ अभ्यासक्रमात विद्यार्थ्याचे वय 17 वर्षे असणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी 5 ते 5.5 वर्ष असतो. पूर्णवेळ अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी  विद्यार्थ्याला 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थी समक्ष या कोर्सला उपस्थित राहून प्रशिक्षण घेत असतो.

दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रम

या अभ्यासक्रमाचा कालावधी चौदा आठवड्याचा असू शकतो. प्रत्येक महाविद्यालयात हा कालावधी बदलत असतो. या अभ्यासक्रमात महाविद्यालय शेवटी परीक्षा घेत असतात. दुरुस्त शिक्षण व पूर्णवेळ अभ्यासक्रम यामध्ये बराच फरक असला तरी दूरस्थ शिक्षणाद्वारे हा अभ्यासक्रम पात्र आणि सराव करणाऱ्या पशुवैद्यकीय उमेदवारासाठी सुरू केलेला आहे.

ऑनलाईन कोर्स

हा अभ्यासक्रम वैयक्तिक साइटवर उपलब्ध आहे जसे की ,Edx, Courses इ. हा अभ्यासक्रम एकाच वेळी पूर्ण करण्यासाठी उपलब्ध नसून वेगवेगळे छोटे अभ्यासक्रम शिकवले जातात .किमान कालावधी काही दिवसांपासून तीन महिन्यांपर्यंत असू शकतो.

व्हेटर्नरी हा कोर्स करण्यासाठी काही उत्कृष्ट कॉलेज

  • व्हेटर्नरी कॉलेज, हेबाल
  • कॉलेज ऑफ व्हेटर्नरी सायन्स
  • महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्सेस युनिव्हर्सिटी, नागपूर
  • तमिळनाडू वेटरनरी अँड ऍनिमल सायन्सेस युनिव्हर्सिटी, चेन्नई
  • आय व्ही आर आय डिम्मेड युनिव्हर्सिटी
  • ॲनिमल सायन्स युनिव्हर्सिटी, लुधियाना
  • कॉलेज ऑफ व्हेटर्नरी सायन्स अँड ऍनिमल हसबंडरी, आनंद
  • लाला लजपत राय युनिव्हर्सिटी ऑफ व्हेटर्नरी अंड अनिमल सायन्सेस, हिसार
  • राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटर्नरी अँड रिसर्च

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

व्हेटर्नरी हा कोर्स साठी पात्रता निकष काय आहे?

व्हेटर्नरी हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त बोर्डातून इंग्रजी सभोवती भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवनशास्त्र हे विषय घ्यावेत व बारावी मध्ये विद्यार्थ्याला किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्याचे वय हे 17 ते 22 वर्ष असावे लागते.

व्हेटर्नरी या कोर्स कालावधी किती असतो?

व्हेटर्नरी या कोर्स कालावधी हा पाच वर्षाचा असतो.

व्हेटर्नरी कोर्स पॅटर्न काय आहे?

व्हेटर्नरी कोर्स हा सेमिस्टर पॅटर्नमध्ये असतो व याचा अभ्यासक्रम हा 9 सेमिस्टर मध्ये विभागला गेलेला असतो.

व्हेटर्नरी हा कोर्स करण्यासाठी कुठली प्रवेश परीक्षा द्यावी लागते?

व्हेटर्नरी हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात.

1 thought on “व्हेटर्नरी कोर्सची संपूर्ण माहिती Veterinary Course Information In Marathi”

Leave a Comment