Radiology Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आजचे युग हे स्पर्धात्मक युग बनले आहे. आजकाल नोकरी मिळवणे मिळवणे हे एक मोठे आव्हानच प्रत्येकासमोर उभे आहे. कारण आत्ताची परिस्थिती पाहता नोकरी मिळवणे ही एक अवघड गोष्ट बनलेली आहे .प्रत्येक जण आपल्या करियरच्या नवनवीन संधी शोधत असतो .प्रत्येक क्षेत्रात विद्यार्थी तेचतेच पर्याय निवडत असतात त्यामुळे त्या फिल्डमध्ये नोकर्या कमी झाल्या आहेत म्हणजे इंजिनिअरिंग या क्षेत्राकडे खूप विद्यार्थ्यांचा कल होता .विद्यार्थी या फिल्डमध्ये करीयर करायचे म्हणून तोच पर्याय निवडतात. परंतु यामुळे आपोआपच त्या क्षेत्रात नोकरी मिळेनाशी होते व बेरोजगारी वाढते. म्हणून आज मी तुम्हाला आजच्या या पोस्ट मध्ये एका नवीन करियरचा पर्याय व त्या विषयी सविस्तर माहिती सांगणार आहे तो कोर्स आहे रेडिओलॉजी!!!
रेडिओलॉजी कोर्सची संपूर्ण माहिती Radiology Course Information In Marathi
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रेडिओलॉजी म्हणजे रेडिओ मध्ये काम करायचं की काय? तर असे अजिबात नाही रेडिओलॉजी हे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित एक फिल्ड आहे .एक्स-रे च्या मदतीने रेडिओग्राफर रुग्णाचा रेडिओग्राफी अहवाल तयार करत असतो व रुग्णाच्या आजाराबद्दल अचूक माहिती देतो. रेडिओग्राफी अहवाल तयार करण्यासाठी रेडिओग्राफर हा एक्स-रे व्यतिरिक्त सिटीस्कॅन ,अल्ट्रासाउंड आणि एमआरआय चा अभ्यास करतो. चला तर आज मी तुम्हाला या रेडिओलॉजी अभ्यासाबद्दल माहिती देणार आहे.
आजच्या या वर्तमान काळात बघायला गेलं तर रेडिओलॉजी या क्षेत्रात करिअर हे चांगले घडेल याच्या संभावना ह्या सर्वात जास्त दिसून येतात. आजकाल हेल्थकेअर इंडस्ट्रीज फक्त डॉक्टरांपुरत्या सीमित राहिलेला नाहीत. व अशी बरीचशी लोक आहेत त्यांच्यामुळे ही इंडस्ट्री चालू शकणार नाही.व ह्यात रेडिओलॉजिस्ट यांचा मोलाचा वाटा आहे. व मागील काही वर्षांमध्ये रेडिओलॉजी या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना बरीच रुची असल्याचे आपण पाहत आहोत.
याचे कारण म्हणजे रेडिओलॉजी या क्षेत्रात करिअर केल्यावर रोजगाराचे बरेच मार्ग खुले तसेच रेडिओलॉजी हा कोर्स मेडिकल ह्या कोर्सेचा एक भाग असल्यामुळे ह्याला अजून जास्त प्रसिध्दी मिळाल्याचे आपण पाहतो. तसेच हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्ही डायग्नोस्टिक सेंटर, हॉस्पिटल, नर्सिंग होम किंवा हेल्थ केअर सेंटर या सर्व ठिकाणी जॉब साठी अप्लाय करू शकता. व महत्त्वाचे म्हणजे आजकाल बरेचशे हेल्थ केअर सेंटर डायग्नोस्टिक सेंटर हॉस्पिटल हे बनवले जात आहेत. जशी जशी लोकसंख्या वाढत आहे तसे तसे हॉस्पिटल्स आणि पॅथॉलॉजी सेंटर यांच्यात वाढ होत आहे व अशा ठिकाणी रेडिओलॉजी एक्स्पर्ट यांची डिमांड ही खूप जास्त वाढत आहे
. व हा कोर्स झाल्यानंतर तुम्ही तुमच्या शहरातील हॉस्पिटलमध्ये अगदी सहजपणे जॉब साठी अप्लाय करू शकता व तुम्हाला नोकरीसाठी इकडे तिकडे शोधाशोध करण्याची अजिबात गरज पडणार नाही. रेडिओलॉजी या क्षेत्रातून तुम्हाला सरकारी तसेच प्रायव्हेट सेक्टर मध्ये जॉब मिळू व प्रायव्हेट हॉस्पिटल सोडले तर तुम्हाला सरकारी हॉस्पिटल मिलिटरी सर्विसेस शिक्षण संस्था रिसर्च लॅबोरेटरी या सर्व ठिकाणी जॉब मिळवून तुम्ही भारतातच नव्हे तर परदेशात गेलात तरी तुम्ही या डिग्रीवर जॉब करू शकता.यामुळेच रेडिओलॉजी या क्षेत्रात करिअर करणे हे नक्कीच फायद्याचे ठरेल.
रेडिओलॉजिस्ट यांचे काम
रेडिओलॉजिस्टनचे मुख्य कार्य म्हणजे रेडिओग्राफीच्या मदतीने शरीरातील आपल्या भागांची तपासणी करणे. त्यामुळे डॉक्टरांना आपल्याला काय झाले आहे हे कळते. व ह्याच्याच आधारे डॉक्टरांना रोगीला काय ट्रीटमेंट द्यायची हे समजते. जसे की एक्स-रे अल्ट्रासाउंड सिटीस्कॅन इमेजिंग इं जिओग्राफी आणि मिशन तोमोग्रफी या सर्वांच्या मदतीने रोग्याला काय झाले आहे हे समजते.
रेडिओलॉजी हा कोर्स करण्यासाठी पात्रता निकष
प्रत्येक कोर्स प्रमाणे रेडिओलॉजी हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला या कोर्सची पात्रता पूर्ण करावी लागते. तुम्ही बारावी ही 50% गुणांनी पास होणे हे फार आवश्यक आहे. व तुम्ही जर वेगळ्या कॅटेगरीत येत असाल तर तुम्हाला 45 गुण मिळणे हे फार महत्त्वाचे आहे. तसेच दहावी व बारावी मध्ये तुम्हाला फिजिक्स ,केमिस्ट्री तसेच बायोलॉजी हा ग्रुप असावा लागतो.
बऱ्याचश्या विद्यार्थ्यांना समज आहे की बारावी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथेमॅटिक्स यापैकी कुठलाही एक सब्जेक्ट घेतला तर रेडिओलॉजी हा कोर्स करता येतो तर तसे नाही. तुम्हाला जर रेडिओलॉजी हा कोर्स करायचा असेल तर बारावी मध्ये तुमचा पीसीबी म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हा ग्रुप असावा लागतो व गणिताची यामध्ये कुठलीही भूमिका नसते.
रेडिओलॉजी या कोर्सचा कालावधी
रेडिओलॉजी या कोर्सचा कालावधी तुम्ही कुठला कोर्स निवडता यावर अवलंबून असते. डिप्लोमा हा अडीच वर्षांचा कोर्स असतो ज्यामध्ये दोन वर्षाचा अभ्यास आणि बाकीचा इंटर्नशिप साठी वापरला जातो. तसेच बॅचलर डिग्री ही तीन वर्ष आणि सहा महिन्यांची असते यामध्ये तीन वर्ष हा अभ्यास आणि बाकीचे सहा महिने हे इंटर्नशिप साठी असतात आणि जर तुम्हाला एमएससी करायचे असेल तर हा कोर्स दोन वर्षांचा असतो.
रेडिओलॉजी क्षेत्रातील काही प्रसिद्ध कोर्सेस
- डिप्लोमा इन रेडिओलॉजी- हा कोर्स दोन वर्षाचा असून या कोर्समध्ये तुम्हाला थेअरी व प्रॅक्टिकल या दोन्हीची माहिती दिली जाते व उरलेले सहा महिने ही इंटर्नशिप साठी असतात. तुम्हाला जर डिप्लोमा इन रेडिओलॉजी करायचा असेल तर बोर्डाकडून काही प्रवेश परीक्षा आयोजित केल्या जातात व त्या मार्गांच्या आधारे तुम्हाला ऍडमिशन दिले जाते.
- बीएससी इन रेडिओलॉजी- हा एक तीन वर्ष व सहा सहा महिन्यांचा ग्रॅज्युएशन कोर्स आहे. ज्यामध्ये तीन वर्षांचा अभ्यास आणि सहा महिन्यांची इंटर्नशिप होती कुठल्याही सरकारी रुग्णालयात करू शकता.
- एम.एस.सी इन रेडिओलॉजी- तुम्ही रेडिओलॉजी मध्ये डायरेक्ट मास्टर्स डिग्री म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएट करू शकत ना.ही यासाठी तुम्हाला पहिले तुमची बॅचलर इन रेडिओलॉजी ही डिग्री घ्यावी लागते व त्यानंतरच तुम्ही यासाठी ऍडमिशन घेऊ शकता. हा एक दोन वर्षांचा कोर्स असून यामध्ये चार सेमिस्टर असतात.
रेडिओलॉजी या कोर्सची फी
रेडिओलॉजी या कोर्से फी आता तुम्ही कुठले कॉलेज घ्याल यावर अवलंबून असते. व तुम्ही कुठला कोर्स निवडत आहात यावर देखील फी अवलंबून असते .जसे की डिप्लोमा केला तर फी कमी लागेल मात्र जर तुम्हाला बॅचलर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री करायचे असेल तर त्यासाठी फीज ही जास्त असते.
व कॉलेज जर सरकारी असेल तर खर्च हा कमी होईल आणि जर प्रायव्हेट कॉलेज असेल तर फी ही सरकारी कॉलेज पेक्षा काही पटीने जास्त असते. तुम्हाला जर डिप्लोमा इन रेडिओलॉजी करायचे असेल तर त्या कोर्सची ही दहा हजार ते एक लाख 60 हजार एवढी असते आणि जर बीएससी करायचे असेल तर त्याची फी ही चाळीस हजार ते दोन लाख एवढी असते व तुम्हाला जर एम.एस.सी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे असेल तर त्या कोर्सलाही 30 हजार ते एक लाख एवढी असते.
रेडिओलॉजी कोर्स झाल्यानंतर कुठल्या जॉब साठी अप्लाय करू शकता
रेडिओलॉजी हा कोर्स झाल्यानंतर तुम्ही सरकारी तसेच प्रायव्हेट हॉस्पिटल्स मध्ये जॉब करू शकतात तसेच नर्सिंग होम, प्रायव्हेट क्लिनिक्स, रेल्वे हॉस्पिटल्स, पी.एस.यु कंपनी या सर्व ठिकाणी तुम्हाला जॉबच्या चांगल्या संधी उपलब्ध असतात. तसेच तुम्ही स्वतःचे एक डायग्नोस्टिक सेंटर सुद्धा सुरू करू शकता.
पगार
रेडिओलॉजी हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला चांगली नोकरी तर मिळते व त्याबरोबरच तुम्हाला सॅलरी देखील ही खूप चांगली असते व तुम्ही या क्षेत्रात जर फ्रेशर असाल तर तुमची सॅलरी ही 15 ते 40 हजार रुपये एवढी असते.
भारतातील काही उत्कृष्ट रेडिओलॉजीचे कॉलेज
- गव्हर्नमेंट टीडी मेडिकल कॉलेज, केरला
- गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, पंजाब
- जी के एम सी चेन्नई, तमिलनाडु
- ईस्ट पॉइंट ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, कर्नाटका, बेंगलोर
- जामिया हमदर्द, दिल्ली
- मॅक्स हेल्थकेअर एज्युकेशन गाजियाबाद, उत्तर प्रदेश
- मणिपाल कॉलेज ऑफ हेल्थ प्रोफेशन्स, कर्नाटका
- महात्मा ज्योतिराव फुले युनिव्हर्सिटी, राजस्थान
- नेताजी सुभाष चंद्र बोस मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जबलपूर, मध्यप्रदेश
- नालंदा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल ,पटना
- आर्यभट्ट नॉलेज युनिव्हर्सिटी, बिहार
- पारू युनिव्हर्सिटी ऑफ वोकेशनल एज्युकेशन, वडोदरा ,गुजरात
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
रेडिओलॉजी या कोर्स कालावधी किती वर्षांचा असतो?
रेडिओलॉजी या कोर्सचा कालावधी तुम्ही कुठला कोर्स निवडता यावर अवलंबून असते. डिप्लोमा हा अडीच वर्षांचा कोर्स असतो ज्यामध्ये दोन वर्षाचा अभ्यास आणि बाकीचा इंटर्नशिप साठी वापरला जातो. तसेच बॅचलर डिग्री ही तीन वर्ष आणि सहा महिन्यांची असते यामध्ये तीन वर्ष हा अभ्यास आणि बाकीचे सहा महिने हे इंटर्नशिप साठी असतात आणि जर तुम्हाला एमएससी करायचे असेल तर हा कोर्स दोन वर्षांचा असतो.
रेडिओलॉजी या कोर्सची फी किती असते?
रेडिओलॉजी या कोर्स दहा हजार ते दोन लाख एवढी असू शकते.
रेडिओलॉजी हा कोर्स करण्यासाठी पात्रता निकष काय आहे?
तुम्हाला जर रेडिओलॉजी हा कोर्स करायचा असेल तर तुम्ही बारावी ही 50% गुणांनी उत्तीर्ण असणे फार महत्त्वाचे आहे. व बारावी मध्ये तुम्हाला पीसीबी म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे तीन विषय असणे फार महत्त्वाचे आहे.