बैल पोळा सणाची संपूर्ण माहिती Pola Festival Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Pola Festival Information In Marathi पोळा हा सण खेडेगावात आजही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. केवळ खेड्यातच नाही, तर भारताच्या वेगवेगळ्या राज्यात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे भारतात बैल, गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या इत्यादी शेतीवर अवलंबून असणाऱ्या प्राण्यांचे खूप महत्त्व आहे.

Pola Festival Information In Marathi

बैल पोळा सणाची संपूर्ण माहिती Pola Festival Information In Marathi

त्यामध्ये शेतीही बैलांवर अवलंबून असल्यामुळे त्यांच्या निमित्ताने हा सण साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा हा एक सण आहे. तसेच तो विदर्भात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमांध्र भागात सुद्धा हा सण साजरा केला जातो. ज्यांच्याकडे शेती नाही, ती बैलपोळ्याच्या दिवशी मातीच्या बैलांची पूजा करतात.

बैलपोळा सण साजरा करताना सणाच्या निमित्ताने तरी एक दिवस बैलाची पूजा करून नांगरापासून त्याला दूर ठेवले जाते. पोळ्याच्या दिवशी बैलाला शेतीचे कोणतेही काम करू देत नाहीत. या दिवशी त्यांना उटणे लावून, मालिश करून स्नान करतात. वेगवेगळ्या प्रकारे त्यांना सजवले जाते, त्यांना रंगीबिरंगी वस्त्रांनी दागदागिन्यांनी सजविण्यात येते. बैल पोळा सणाच्या दिवशी बैलांना नदीवर नेऊन, त्यांना आंघोळ घातली जाते. नंतर त्यांना चारा देऊन घरी आणतात.

बैलाच्या खांद्याला तुपाने किंवा हळदीने शेकतात. त्याला खान शेकणे असे म्हणतात. तसेच त्याच्या पाठीवर विविध नक्षीकाम केलेली झूल चढवतात आणि सर्व अंगावर ठिपके देऊन शिंगाना बासिंग बांधतात. काही शेतकरी आपल्या बैलांच्या पाठीवर रंगकाम करून त्याला सजवतात. तसेच बैलाच्या शिंगाला बाशिंग बांधून छन छन आवाज करणाऱ्या घुंगरांच्या माळा घातल्या जातात.

सगळं काही नवीन नवीन कसारा, पायात चांदीचे किंवा डोळ्याचे तोडे घातले जातात, बैलांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. बैलाची निगा राखणाऱ्या घरगड्यास नवीन कपडे घेतले जातात आणि मग गावात बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. हे दृश्य पाहून मन खूपच आनंदी होते व बळीराजा ही आनंदी होतो.

शेतकऱ्या साठी सदैव कष्ट करणाऱ्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ग्रामीण भागातील लोक पोळ्याला खूप महत्त्व देतात. महाराष्ट्राच्या काही भागात हा सण दोन दिवस साजरा केला जातो. बैलपोळा म्हणजेच पहिल्या दिवसाला मोठा पोळा आणि दुसऱ्या दिवसाला लहान मुले लाकडाचे नंदीबैल सजवितात याला तान्हा पोळा म्हणून साजरा केला जातो.

बैल पोळ्याचे महत्त्व:

विदर्भातील शेतकरी या सणाला खूप महत्त्व देतात. कारण विदर्भातील शेती बहुदा बैलावर अवलंबून आहे. त्यामुळे पारंपारिक दृष्टीने बैल पोळा हा सण बैलांनी शेतीमध्ये केलेल्या मदतीसाठी त्यांचे आभार मानण्यासाठी साजरा केला जातो. पण आजकाल बैलांच्या सजावटीसाठी होणाऱ्या स्पर्धा त्यातील बक्षिसे आणि बक्षिसांसाठी शेतकऱ्यांनी केलेले प्रयोग हे सारे पाहून असे वाटते, की माणसाने हा सण देखील आपल्या फायद्यासाठीच बनवून घेतला आहे.

तसे आजकाल शेतीमध्ये नवनवीन उपकरणे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे शेतीमध्ये बैलांचा वापर फक्त गरीब शेतकरीच करतात. पण हे पर्याय नसल्यामुळे वाढत्या तांत्रिक उपकरणामुळे हळूहळू शेतीच्या कामामध्ये बैलांचा वापर कमी होऊ शकतो आणि बैलपोळ्याची ही परंपरा नावापुरती राहू शकते. पोळा किंवा बैल पोळा हा बैलांचा सन्मानाचा उत्सव आहे. प्रामुख्याने मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात शेतकरी वर्ग साजरा करतात.

तेलंगणाच्या उत्तरेकडे भागातील लोक बैलपोळा सणाला पुलाला अमावस्या असे म्हणतात. या सणाला काही ठिकाणी बेंदूर सुद्धा म्हटले जाते. हा उत्सव मध्य आणि पूर्व महाराष्ट्रातील मराठी लोकांमध्ये मुख्यता साजरा केला जातो. असे उत्सव भारतातील इतर ठिकाणी सुद्धा साजरे केले जातात. दक्षिणेस यास पोंगल आणि उत्तर व पश्चिम भारतात गोधन म्हणतात.

बैलपोळा सण श्रावण महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात येतो. त्यामुळे पिठोरी अमावस्येच्या दिवशी हा असतो. महिला घरामध्ये मातीच्या बैलांची पूजा करून पिठवळ्याची पूजा करतात. तसेच या दिवशी गोड-धोड नैवेद्य बैलांना खाण्यासाठी ठोंबरा, पुरणपोळी, करी, भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ बनवतात. शेतकरीही आपल्या शेतातील राबवणाऱ्या बैलांना वेगवेगळ्या पदार्थांचे पक्वान्न खाऊ घालतात. तसेच त्यांची चांगल्या पद्धतीने आंघोळ करून सजावटही करतात व त्यांची संध्याकाळी पूजा करतात.

बैल पोळा कसा साजरा केला जातो:

बैलपोळा हा शेतकरी वर्ग मोठ्या आनंदाने व उत्साहाने दरवर्षी साजरा करीत असतो. बैल शेतीच्या कामात खूप मदत करतात. बैल म्हणजे शेतकऱ्यांचा मित्रच आहे. आज काल शेतीसाठी ट्रॅक्टर वापरतात, पण पुरातन काळापासून शेतीची अवघड कामे जसे की, नांगरणी, वखरणी, वाहतूक बैलांच्या साहाय्याने केली जात असे.

पूर्वीच्या काळी मोटर, गाड्या नव्हत्या तेव्हा दूरच्या गावी तालुक्याच्या ठिकाणी जायचे असेल तर बैलगाडीचा उपयोग होत होता. अगदी नव्याने लग्न झालेल्या जोडप्यांची वरात सुद्धा बैलगाडी तुनच काढली जात असे. या काळात बैल शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खूप जोडून होता. बैलांच्या मदतीसाठी त्यांचे आभार मानण्यासाठी बैल पोळा हा सण साजरा केला जातो.

पावसाळ्यातील पेरणी संपल्यानंतरच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीस बैलपोळा साजरा केला जातो. या दिवशी सकाळी बैलांना अंघोळ घातली जाते. नंतर त्यांना विविध वस्तूंनी सजविली जाते. जसे की त्यांच्या गळ्यातील सुंदर घंटा पायात घुंगरू शिंगे यांना वेगवेगळ्या कलरचा रंग तसेच फुले व माळा बैलांची शिंगे रंगविली जातात.

प्रत्येक शेतकरी आपल्या बैलांना सगळ्यात सुंदर सजविण्याचा प्रयत्न करतो. आज-काल बैलांच्या राजवटीच्या स्पर्धा असतात. यात मोठी बक्षिसे सुद्धा असतात. बैलांच्या पाठीवर सुंदर शाल टाकली जाते. शक्यतो ती लाल किंवा गुलाबी रंगाची असते. काही जण आपली सर्जनशीलता वापरून बैलांच्या अंगावर विविध आकाराचे आणि ठिपक्यांची रंगानी ठीपके सुद्धा काढतात.

सजावट पूर्ण झाल्यावर गावातील सगळे शेतकरी आपल्या बैलांना एकत्र घेऊन एका सार्वजनिक ठिकाणी जसे गावच्या मंदिराजवळ जमा होतात. तिथे बैलांची पूजा केली जाते. त्यांच्या पाया पडले जाते आणि त्यांना पोळ्यासाठी बनवलेल्या विशिष्ट नैवेद्य दिला जातो. बैलांना वेगवेगळ्या घरी नेऊन त्यांची पूजा केली जाते. अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो.

बैल पोळ्याविषयी पौराणिक कथा:

बैलपोळा विषयी एक कथा आहे. जेव्हा प्रभू विष्णू हे कृष्णाच्या रूपात धर्तीवर आले होते, तेव्हापासून कृष्णाचा मामा कंस भगवान कृष्णाचे प्राण घेण्याचे प्रयत्न करत होता. कंसाने एकदा कृष्णाचा वध करण्यासाठी असूर पाठवले होते. एकदा मामा कंसाने पोलासूर नावाचा राक्षस कृष्ण भगवानचा वध करण्यासाठी पाठवला होता. तेव्हा कृष्णाने त्याचा वध करून सर्वांना चकित केले होते. दिवस श्रावण अमावास्येचा होता म्हणून या दिवसाला पोळा म्हणूं लागले या दिवशी येत असून याला पिठोरी अमावस्या सुद्धा म्हणून हा सण साजरा केला जातो.

“तुम्हाला आमची बैल पोळा सणाची संपूर्ण माहिती Pola Festival Information In Marathi कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

या सणाबद्दल जरूर वाचा :


पोळा सणातून काय संदेश मिळतो?

पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो.



बैल पोळा किती तारखेचा आहे?

पोळा हा सण श्रावण महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो, याला पिठोरी अमावस्या असेही म्हणतात. तो ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात येतो. यंदा पोळा 14 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रात, विशेषतः विदर्भात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.