कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी केली जाते ? Kojagiri Purnima Information In Marathi

Kojagiri Purnima Information In Marathi भारतात कोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय हिंदू, बौद्ध धर्म संस्कृतीतील महत्त्वाचा सण मानला जातो. यालाच बुद्ध पौर्णिमा असेसुद्धा म्हणतात. हिंदू लोक कोजागरी पौर्णिमा म्हणून हा सण साजरा करतात. तर बौद्ध धर्माचे लोक बुद्ध जयंती म्हणून साजरा करतात. हा दिवस सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात दरम्यान येतो. कृषी संस्कृतीत या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

Kojagiri Purnima Information In Marathi

कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी केली जाते ? Kojagiri Purnima Information In Marathi

पोर्णिमेला माणिकेथारी संबोधले जाते. कोजागिरीच्या दिवशी घराघरात नवीन धान्य आलेले असते. त्यामुळे घरात पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोडे ही केले जातात. अशी प्रथा काल विवेक या ग्रंथात नोंदवलेली आहे. नवीन धान्य व भाज्या यांची रेलचेल असते. हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते. पोर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात. मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील महत्त्वाच्या वस्तू वर नवी बांधतात. आंब्याच्या पानात भात, नाचणी आणि लोंबी तसेच कुर्डूवाडी झेंडूची फुले, एकत्र करून बांधलेली जोडी असते.

कोजागरी पौर्णिमा ही माडी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. व ती आश्विन महिन्यात येते या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या दिवशी दम्यावर चे आयुर्वेदिक औषध घेण्याची पद्धत आहे. ही घेतलेली औषधे लवकर लागू पडते, असा समज आहे. या दिवशी पाळावयाच्या व्रताला कोजागिरी व्रत असे म्हणतात.

कोजागिरी पौर्णिमेचे महत्व:

कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध केले जाते. या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते मग ते दूध प्रसाद म्हणून पिले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची आश्विनी साजरी करतात.

कृषी संस्कृतीमध्ये हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. शेतकरी वर्गामध्ये हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ग्रामीण भागातही ही प्रथा आपल्याला आजही दिसून येते. निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञते पोटी कोकणात पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, कुरडूची फुले, नाचणी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यास मोठी गर्दी होते.

कोजागिरी पौर्णिमेचे महत्व:

कोजागिरी पौर्णिमेचे आरोग्यदृष्ट्या महत्त्व आहे. दमा किंवा अस्थमा यासारख्या आजारांच्या वरील औषधे दुधामध्ये मिसळून कोजागरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवले जाते. चंद्राची किरण त्या खीरीवर पडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो, असे मानले जाते. आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. तिला कौमुदी पौर्णिमा असेही म्हणतात.

कोजागिरी पौर्णिमेचे महत्व म्हणजे कि, शरद ऋतूमध्ये हवामानात बरेच बदल घडून येत असताना, एकीकडे उन्हाळा संपत असतो तर दुसरीकडे हिवाळा सुरू होत असतो. दिवसा गरम आणि रात्री थंडी पडते. दूध दिल्यामुळे पद्धत पित्तप्रकोप कमी होतो. याच कारणामुळे बहुतेक पौर्णिमेच्या रात्री मसाला दूध पिण्याचे प्रथा आहे. कोजागिरीचा शीतल चांदणं अंगावर घेतलं की, मनःशांती, मनःशक्ती उत्तम आरोग्य लाभो हेच महत्त्व आपल्याला दिसून येतात.

कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करतात:

कोजागिरी पौर्णिमा हे व्रत बरेच लोक पाळत असतात. दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करतात. या पूजेनंतर रात्री आटीव दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून नैवेद्य दाखवला जातो. देव, पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावेत तसेच ते सर्वांसोबत स्वतः सेवन करावी. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे बळ देतात आणि ते दूध मग पितात. उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते.

अशी एक आख्यायिका आहे की, या दिवशी उत्तररात्री साक्षात लक्ष्मी चंद्र मंडळातून पृथ्वीवर उतरते व लक्ष्मी देवी येऊन संस्कृतमध्ये विचारते. ‘कोजागर्ति’ म्हणजेच कोण जागे आहे का? असे विचारते. म्हणून या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी दूध खेळावे असेही सांगितले आहे. लक्ष्मीच्या स्वागतार्थ रात्री रस्ते घरे मंदिरे उद्याने घाट इत्यादी सर्व ठिकाणी असंख्य दीप लावतात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी विधीपूर्वक स्नान करून उपवास ठेवला पाहिजे.

काही लोक तांब्याच्या किंवा मातीच्या कलशावर वस्त्राने झाकलेली सोन्याची महालक्ष्मी मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करून पूजा करतात. संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर सोने चांदी किंवा मातीचे तुपाने भरलेले १०० दिवे लावतात. देवीला नैवेद्य दाखवला जातो. तूप घातलेली खीर तयार करावे व बऱ्याच पात्रात भरून ती चंद्रकिरण खाली ठेवावी. तीन तासानंतर संपूर्ण खीर लक्ष्मीला अर्पित करून ब्राह्मणांना प्रसाद म्हणून वाढावे. त्याबरोबर मंगलमय गाणी म्हणून भजने म्हणत रात्री जागरण करावे. सकाळी सूर्योदयाच्या वेळी स्नान करून लक्ष्मीची सुवर्णाची मूर्ती स्थापित करातात. अशी ही काही ठिकाणी पद्धती व परंपरा आपल्याला दिसून येते.

दरवर्षी करण्यात येणारे हे व्रत म्हणून लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी केले जाते. त्याने लक्ष्मी व्रत प्रसन्न होऊन समृद्धी लागतेच पण मृत्यूनंतरही परलोकात सद्गती मिळते. गुजरातमध्ये कोजागिरी पौर्णिमा रास व गरबा खेळून शरद, पुनम नावाने साजरी केली जाते. तर बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात. या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची आश्विनी साजरी करतात. अश्विनी महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा असे म्हणतात.

पौराणिक कथांनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म दिवस मानला जातो. या दिवशी ती समुद्रमंथनातून प्रकट झाली होती. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या १६ कलामध्ये असतो. त्याची किरण विशेष अमृतमय गुणांनी युक्त असतात. श्रीकृष्ण १६ कलांचे अवतार मानले जातात. युगात वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्णाने गोपीकांसोबत रात्री रासक्रीडा केली होती. वृंदावन निधीवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपीका असलेल्या भक्तात अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाची आठवण करुन वैष्णव संप्रदायाचे भक्त उत्सव साजरा करतात.

कोजागिरी पौर्णिमा विषयी पौराणिक कथा:

कोजागिरी पौर्णिमे विषयी एक पौराणिक कथा आहे. प्राचीन काळी मगध देशात वलीत नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण जेवढा संचारी होता, त्याची पत्नी तेवढीच दृष्ट होती. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती. संपूर्ण गावातील तिच्या पत्तीची निंदा करत असे व तिच्या विरूद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नव्हे तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती.

एकदा शरद श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले. पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला. जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटली. त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती. तिने ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करायचे कोजागरी व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने विधी व्रत कोजागरी व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपर धनसंपत्ती प्राप्त झाले. भागवती महालक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीची ही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दांपत्य सुखाने संसार करू लागले. अशीही एक कथा आहे.

तसेच असेही म्हटले जाते की, एक राजा होता. तो आपले सगळे वैभव आणि संपत्ती गमावून बसतो. त्याची राणी महालक्ष्मीची व्रत करते आणि लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद देते आणि त्या राज्याचे वैभव त्याला परत मिळते. असेही म्हणतात की, महालक्ष्मी मध्यरात्री या चंद्र मंडळातून उतरून खाली पृथ्वीवर येते. ती चांदण्याच्या प्रकाशात सगळ्यांना ती अमृत म्हणजे लक्ष्मीचं वरदान देते. धनधान्य सुख-समृद्धी देते असे म्हटले जाते.

“तुम्हाला आमची माहिती कोजागिरी पौर्णिमे विषयी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

या सणाबद्दल जरूर वाचा :

प्रमोद तपासे

माझे नाव प्रमोद तपासे आहेत आणि मी या ब्लॉगचा संस्थापक आहेत. माझे शिक्षण एम.कॉम, एम.बी.ए. झाले आहेत. या ब्लॉगवर मी सर्वच माहिती लिहित असतो. तसेच ब्लॉगिंग मध्ये ५ वर्षांचा अनुभव आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
माझे आवडते शिक्षक वर १० ओळी 10 Lines On My Favourite Teacher In Marathi माझी शाळा वर १० ओळी 10 Lines On My School In Marathi