नारळी पौर्णिमा सणाची माहिती Narali Purnima Information In Marathi

Narali Purnima Information In Marathi नारळी पौर्णिमा हा सण समुद्रकाठी राहणाऱ्या व प्रामुख्याने मासेमारी करणाऱ्या मुख्‍य कोळी लोकांचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी लोक या दिवशी समुद्राची पूजा करतात.

Narali Purnima Information In Marathi

नारळी पौर्णिमा सणाची माहिती Narali Purnima Information In Marathi

समुद्राला नारळ अर्पण करतात. महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा अखंड समुद्रकिनारा लाभलेला आहे. या ठिकाणी राहणाऱ्या कोळी लोकांचे उपजीविकेचे प्रमुख साधन किंवा व्यवसाय हा मासेमारी आहे. ते लोक श्रावणी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हणतात.

नारळी पौर्णिमेच्या काही दिवस अगोदर कोळी बांधवांनी समुद्रात जाणे बंद केलेले असते. कारण एक तर तो काळ समुद्रातील माशांचा प्रजननाचा काळ असतो किंवा मग पावसाळ्यामध्ये समुद्र खवळलेला असल्याने समुद्रात मासेमारीसाठी कोळीबांधव जात नसतात.
कोळी बांधव त्यांच्या त्या सुट्टीच्या काळात बरेच आपापल्या मूळ गावी गेलेले दिसतात.

बोटीवरचे खलाशी देखील आपल्या गावी जातात. बरेच कोळी बांधव यादरम्यान देवदर्शन करण्यासाठी गेलेले आपल्याला देखील दिसतात. मात्र नारळी पौर्णिमेचा सण जसा जवळ येउ लागतो, तसे कोळीबांधवांना मासे पकडण्याचे वेध लागते आणि सगळेजण मुंबईला आपल्या कोळीवाड्या मध्ये परततात.

नारळी पौर्णिमेचा सण कोळी बांधव अत्यंत पारंपारिक पद्धतीने साजरा करतात. कोळी बांधव आपल्या पारंपारिक वेश त्या दिवशी परिधान करतात. कमरेला रुमाल अंगात टीशर्ट आणि डोक्याला टोपी. तर स्त्रिया जरीचे कपडे परिधान करून अक्षरश: सोन्याचे पूर्ण दागिने अंगावर परिधान करतात.

कोळी स्त्रिया कायमचेच सोन्याचे भरपूर दागिने अंगभर घालत असतात. त्यामुळे सामान्य लोकांना त्यांचे खूप आश्चर्य वाटते. सगळेच कोळी बांधव सायंकाळ -च्या वेळेला समुद्राची पूजा करायला निघतात. दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करतात. सोन्याचा नारळ म्हणजे त्या नारळाला सोनेरी कागदाचे वेस्टन गुंडाळल्या जाते आणि तो नारळ सागराला अर्पण केला जातो व समुद्राला गोड नैवेद्य दाखवून गाऱ्हाणं घातला जातो.

नारळी पौर्णिमेचे महत्व:

पावसाळ्यात समुद्रामध्ये मासेमारीसाठी उतरणारे कोळी लोकांना समुद्रापासून धोका असतो. त्यामुळे श्रावणी पौर्णिमेनंतर पावसाचा जोर थोडा कमी झालेला असतो. समुद्र हे वरून देवतेच्या वास्तव्याचे ठिकाण मानले जाते. समुद्राची कृपा कोळी लोकांवर रहावी. म्हणून रीतसर पूजा करून वाजत-गाजत सोन्याचा नारळ अर्पण करतात.

या दिवशी नारळाच्या पदार्थाला महत्त्व असते. देवाला नारळ भाताचा आणि ओल्या नारळाची करंजीचा नैवेद्य अर्पण करतात. नारळी पौर्णिमेला अर्पण करावयाचे. नारळ हे फळ शुभसूचक मानले जाते तसेच ते सर्जन शक्तीचे प्रतीक मानले आहे. यामुळे समुद्राला नारळ अर्पण करताना तो पाण्यात फेकू नका तर हळूवारपणे सोडा. नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवतेला आवाहन करून सागराला नारळ अर्पण करतात. त्यामुळे सागरातील येणारे संकट पळून जाईल असा त्यामागचा उद्देश आहे.

नारळी पौर्णिमा कशी साजरी करतात:

नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपत्तीजनक यमलहरींचे आधिक्‍य असते. या लहरी ब्रह्मांडात भोवऱ्याप्रमाणे वेगात असतात. वरुण देवता ही जलावर ताबा मिळवणारी व त्याचे संयमन करणारी असल्याने या दिवशी सागररूपी वरुणदेवतेला आवाहन करून नारळ अर्पण करून ब्रह्मांडात कार्यरत असणार्‍या यमलहरींना ताब्यात ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते. नारळातील पाण्यात तेजतत्त्वाचे प्रमाण अधिक असते. नारळातील पाणी हे अपंगत्वाचे प्रमाण जास्त असणार्‍या यमलहरी ग्रहण करण्यात अतिशय संवेदनशील असते.

वरुणदेवतेला आवाहन करतांना तिच्या कृपा आशीर्वादाने यमलहरी नारळाच्या पाण्याकडे आकृष्ट होतात. नारळाच्या पाण्यातील तेजतत्त्व या यमलहरींना ताब्यात ठेवून त्यांतील रज-तम कणांचे विघटन करून त्यांना सागरात विलीन करते. म्हणून या दिवशी वायुमंडलातील यमलहरीचे नारळाच्या माध्यमातून उच्चाटन करून सागररूपी वरुण देवतेला चरणी त्यांचे समर्पण करण्याला महत्त्व आहे. यामुळे वायुमंडळाची शुद्धी होते.

कोळी लोकांचा नारळी पौर्णिमा हा महत्त्वाचा सण असल्यामुळे नारळी पौर्णिमा कोळी वाड्यांमध्ये आजही धुमधडाक्यात साजरी केली जाते. होड्या रंगरंगोटी करून सजवण्यात येतात. दर्या म्हणजेच सागराला आपला मान देण्यासाठी कोळी महिला नैवेद्याच्या तयारीला लागलेले असतात. सोन्याचा नारळ अर्पण करून खवळलेल्या दर्याराजाला शांत करून त्या प्रती असलेली कृतज्ञता व्यक्त त्या दिवशी केली जाते. तसेच काही ठिकाणी भव्यदिव्य मिरवणुका देखील काढले जातात.

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील ऐरोली, बोनकोडे, विसावा, माहीम, सातपाटी चारकोप, मालवणी, वाशी, सारसोळे इत्यादी ठिकाणी नारळी पौर्णिमेच्या तयारीची लगबग पाहायला मिळते. कोळी महिलांसह लहान मुले सुद्धा घरात सजावट करताना दिसतात तसेच कोळी लोक किनारी नांगरून ठेवलेल्या होड्यांना रंग देतात. समुद्राला नैवेद्यासाठी कोळी महिला ओल्या नारळाच्या करंज्या, नारळी भात, नारळी पाक तयार करण्यात गुंतलेल्या असतात. एकूण कोळी वाड्यातील उत्साह शिगेला पोहोचल्याचे चित्र त्या दिवशी पाहायला मिळते. अशा प्रकारे नारळी पौर्णिमा साजरी केली जाते.

नारळी पौर्णिमा विषयी :

नारळीपौर्णिमा ही शास्त्राप्रमाणे श्रावण पौर्णिमेस सागराची पूजा करून, त्याला श्रीफळ अर्पण करतात. म्हणून या दिवसाला नारळी पौर्णिमा असे म्हटले जाते. श्रीफळ सागराला अर्पण करायचे असले तरी हेतू संपूर्ण जलदेवतेची पूजा हाच आहे. कोळी समाजाचा आणि सागराचा संबध अतूट असल्याने ते नारळी पौर्णिमा वाजतगाजत थाटामाटात आणि अतिशय जल्लोषात साजरी करतात. पालखी सजवून तिच्या सोन्याचा नारळ ठेवून नाचतात व त्याची आनंद आणि मिरवणूक काढतात.

हिंदू धर्मात पूजाविधीत नारळाला फार महत्व आहे. नारळाला श्रीफळ असेही म्हणतात श्री म्हणजे लक्ष्मी आणि फळ म्हणजे नारळ नारळाच्या बहुविध गुणांमुळेच नारळाला पवित्र फळ म्हणून मान्यता मिळाली आहे. नारळात अनेक औषधी गुण देखील आहेत. शरीराचा दाह, उष्णता कमी करण्यासाठी ओले खोबरे खावे. रक्त पडल्यास साखर खोबरे खावे रक्त पडावयाचे थांबते. खोकल्यातून रक्त आल्यास मनुक्या बरोबर खोबरे खावे. ओले खोबरे खाल्ल्यास जास्त तहान लागत नाही.

नारळाचे दूध बळ वाढविते, पाणी लघवी साफ करते, तूप अर्धा अंगावर उपयोगी आहे. केस गळत नाहीत तसेच उचकी थांबते. नारळाची वाटी किंवा जाळून देखील ठेवल्यास त्याचे जे तेल येते त्याने खरूज नाईट यासारखे त्वचारोग बरे होतात. नारळाच्या झाडाच्या फांद्या व खोडापासून अनेक उपयोगी वस्तू तयार होतात. म्हणून माडाला कल्पवृक्ष असेही म्हटले जाते.

अशा प्रकारे नारळाची पूजा म्हणजेच निसर्गाची पूजा अर्थात वृक्षवल्ली, आम्हा सोयरे ! जलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नारळी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो .

“तुम्हाला आमची माहिती नारळी पौर्णिमा विषयी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

या सणाबद्दल सुद्धा पहा :-

नारळी पौर्णिमेला काय करायचे?

सण मुख्यत्वे भारताच्या पश्चिम किनारपट्टी भागातील हिंदू मच्छीमार समुदाय साजरा करतात.


नारळी पौर्णिमा का साजरी करतात?

पावसाळा हा माशांचा प्रजनन काळ आहे. अशात कोळी लोकं काही काळासाठी मासेमारी थांबवतात आणि त्यांचं सेवन पण करत नाही. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची भरती सर्वाधिक असताना समुद्रात नारळ सोडलं जातं. समुद्राचा कोप होऊ नये तसेच जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात म्हणून कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात.

नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन एकच आहे का?

नारळी पौर्णिमा ही रक्षाबंधनाच्या दिवशीच साजरी केली जाते आणि त्यामुळे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील अनेक कुटुंबांसाठी हा दुहेरी उत्सव आहे. नारळी म्हणजे नारळ आणि पौर्णिमा म्हणजे पौर्णिमा आणि हा दिवस हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा येतो.

Leave a Comment