2023 गुरुपौर्णिमा विषयी संपूर्ण माहिती Guru Purnima Information In Marathi

Guru Purnima Information In Marathi भारतात गुरुपौर्णिमा ही पुराणकाळापासून गुरु आणि शिष्य यांच्या नात्यातून सुरू झाली. पूर्वीच्या काळात शिष्य स्वतःचे घर सोडून गुरूच्या आश्रमात किंवा त्यांच्या घरी राहत असत. ज्ञान मिळवण्यासाठी शिष्याला सुखवस्तू जीवनाचा त्याग करावा लागत असे. ज्ञानप्राप्ती नंतर गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जात असे.

Guru Purnima Information In Marathi

गुरुपौर्णिमा विषयी संपूर्ण माहिती Guru Purnima Information In Marathi

आता मात्र गुरुकुल परंपरा कमी झाली आहे आणि गुरूकडून ज्ञान घेण्याची प्रथा आजही तशीच आहे. त्याचप्रमाणे जीवनातील चांगल्या अथवा कठीण प्रसंगी आज ही आपल्या गुरूकडून असेच मार्गदर्शन घेण्यासाठी शिष्य आपल्या गुरूंची भेट घेतात. तिथीनुसार आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमा ही मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते.

गुरु विषयी वेगवेगळे सुविचार म्हटले जाते.

“गुरु म्हणजे उन्हातील सावली गुरु म्हणजे साक्षात माऊली.”

“गुरु म्हणजे ज्ञानाचा झरा गुरु म्हणजे आसमंतात सारा.”

“गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण साकार रूप.”

“गुरु तेथे ज्ञान.”

“गुरुविण कोण दाखविल वाट आयुष्याचा पथ दुर्गम अवघड डोंगर घाट.”

आई-वडिल आणि शिक्षकांप्रमाणे माणसाला जीवनात अध्यात्मिक प्रगती करण्यासाठी अध्यात्मिक गुरूंची गरज असते. खरे गुरु तेच असतात, जे त्यांच्या शिष्याचे जीवन आणि संसार सुखाचा करण्यासाठी योग्य अचूक मार्गदर्शन करतात. आजकाल मात्र गुरु मार्गदर्शन दाखवण्याऐवजी व्यवहार करून शिष्याची फसवणूक करताना आपल्याला दिसतात.

त्याचप्रमाणे स्वतः जवळील अपुऱ्या ज्ञानातून शिष्याचा बुद्धिभेद करणारे गल्लाभरू गुरु गल्लोगल्ली निर्माण झाले आहेत. अशा प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे खरे गुरु अथवा सद्गुरु ओळखणे फार कठीण झाले आहे. यासाठी शिक्षकांनी गुरुची ओळख पटविण्यासाठी भावापेक्षा तर्कशुद्ध व आपल्या स्वतःच्या बुद्धीचा वापर करावा.

गुरूपौर्णिमेचे महत्त्व:

गुरूपौर्णिमेचे महत्त्व आपल्याला शाळा, कॉलेज, व्यवसाय क्षेत्रातील शिष्य यांना दिसून येते. शिष्य आपल्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त त्यादिवशी करत असतात. वर्षभर किंवा आयुष्यभर गुरूंनी मार्गदर्शन केल्यामुळे शिष्य, जीवनात यशस्वी होत असतात. गुरु हे शहराचे रूप असून प्रत्यक्ष गुरू भगवंताचे रूप आहे असे मानले जाते. आपल्या जीवनाचे सार्थक करण्यासाठी जीवनात गुरूची आवश्यकता असते. शिष्याच्या जीवनात लवकर प्रगती होण्यासाठी देखील गुरुची गरज असते.

आयुष्यात चांगला गुरू मिळणं हे भाग्याचं लक्षण समजलं जातं कारण त्यांच्या आयुष्यात गुरू असतो. त्याला त्याच्या गुरूकडून जीवनात चांगल्या-वाईट सर्व गोष्टींना सामोरे जाण्याचे आत्मबळ मिळतं. पहिला गुरु आपली आई असते. तर शाळेत घातल्यानंतर दुसरा गुरु म्हणजे शिक्षक असतो. जो गुरू-शिष्याच्या भल्याचा विचार करतो तोच खरा गुरू असतो.

शिष्य चुकत असल्यास त्याला योग्य आणि अचूक सल्ला देण्याचा तो प्रयत्न करतो. त्याला शिष्य विषयी आंतरिक तळमळ वाटते, शिष्याची प्रगती होण्यामध्ये ज्या गुरूला धन्यता वाटते, तोच खरा गुरू असतो. अशा प्रकारे आपल्याला गुरुचे महत्त्व दिसून येते. म्हणून गुरूपौर्णिमेचे महत्त्व आपल्याला कळून येते.

जुलै महिन्यात ज्येष्ठ पौर्णिमेनंतर गुरुपौर्णिमा येते. या दिवशी भिक्कू संघाचा वर्षावासास सुरूवात होते. वर्ष वास काळात श्रद्धावान उपासक विहारात जाऊन भिक्खूंना श्रद्धा भावांनी भोजनदान करतात आणि धम्म श्रवण करतात. आषाढी पौर्णिमेला गुरू पौर्णिमा म्हणतात. हा एक बौद्ध धर्माचा देखील सण आहे. ही पौर्णिमा साधारणतः जुलै महिन्यातच येते.

गुरुपौर्णिमा कशी साजरी केली जाते:

गुरुपौर्णिमा दरवर्षी विद्यार्थी मोठ्या उत्साहाने साजरी करत असतात. गुरु म्हणजे मार्गदर्शक आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरुकडून मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमय होते. गुरु बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी गुरु हा असतोच. सर्वांच्या आयुष्यातील प्रथम गुरु म्हणजे आपली आई असते. कारण सर्वांना सर्वात पहिली संगत आपल्याला आईची असते आणि आपल्याला चालायला, बोलायला आणि जगायला शिकवते.

जगातील प्राथमिक ज्ञान आपण आपल्या प्रथम गुरु म्हणजेच आईकडून घेतो. एवढेच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई आपली मार्गदर्शक असते. आईप्रमाणेच वडील आणि पुढे अनेक शिक्षक आपली मित्र चांगली पुस्तके आपली गुरू असू शकतात. गुरुची महती थोर असते म्हणून लहानपणापासून आपल्याला आचार्य देवो भव ही शिकवण शिकविली जाते. गुरु किंवा शिक्षक हा देवताप्रमाणे असतो. शिकवणीमुळे भारतात गुरुपौर्णिमा आजही मनापासून आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते.

गुरुपौर्णिमेला गुरुपूजन करण्याची पद्धत आहे. गुरुपूजन म्हणजे गुरूंची पाद्य पूजा करणे, मात्र गुरुपूजन म्हणजे केवळ गुरुची पाद्य पूजा करणे अथवा गुरूला वाकून नमस्कार करणे मुळीच नाही. गुरूला नमस्कार करण्यात गुरूचा आदर राखणे हे जरी महत्वाचे असले, तरी हे खरं गुरुपूजन नक्कीच नाही कारण नसते. तर गुरू पूजनाचा खरा अर्थ आपल्या गुरूंनी दिलेले ज्ञान आत्मसात करणं, गुरूकडून मिळवलेल्या ज्ञानाचा आचरणात आणण्याचा प्रयत्न करणं यामुळे आपलं जीवन यशस्वी झालं, यासाठी सतत गुरु बद्दल कृतज्ञता आणि आदर करणं म्हणजे गुरू पूजन हे आहे.

अशा प्रकारच्या गुरुपूजनातूनच गुरूला खरी गुरूदक्षिणा मिळत असते. कारण जेव्हा शिष्याची प्रगती होते, तेव्हा ती प्रगती पाहून गुरूला खरा आनंद होत असतो. खऱ्या गुरूसाठी हा एक प्रकारचा सन्मान असतो. गुरु त्यांच्याजवळील पुण्यात आणि अनुभवातून शिष्यांना मार्गदर्शन करत असतात. जीवन जगत असताना या ज्ञानाचा आणि अनुभवाचा प्रत्येकालाच गरज असते. स्वभावातून शिकण्यापेक्षा एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेतल्यामुळे जीवनात समस्या लवकर सोडून आणि जीवन सुखी समाधानी होते.

म्हणजेच जीवनात गुरु शिवाय तरणोपाय नाही. म्हणूनच जन्म देणारी आई असो अथवा आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे सद्गुरू असो, खरा गुरू मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. ज्यांच्या जीवनात खरा गुरु किंवा सद्गुरु आहे त्यांचे जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र शिष्याला गुरु प्रति कृतज्ञता आणि श्रद्धा असणे गरजेचे आहे. यासाठी गुरूपौर्णिमेचे महत्त्व प्रत्येकाला माहीत असणे आवश्यक आहे.

गुरुपौर्णिमेविषयी पौराणिक कथा:

गुरुपौर्णिमा विषयी एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. ती म्हणजे भारतात प्राचीन काळापासून गुरु-शिष्य परंपरा सुरू आहे. कृष्ण – अर्जुन, अर्जुन – द्रोणाचार्य, एकलव्य – द्रोणाचार्य, चाणक्य – चंद्रगुप्त अशी अनेक उदाहरणे पुराणात आपल्याला सापडतात. असे म्हणतात की, अर्जुन कृष्णाचा एवढा मोठा भक्त होता की, त्याच्या अंगातील केसांमधून देखील कृष्णाच्या नामाचा जप ऐकू येत असे. कृष्णाच्या मार्गदर्शनानुसार अर्जुनाने आचरण केल्यामुळे महाभारतात पांडवांचा विजय झाला. राम कृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, रामदास स्वामी,छत्रपती शिवाजी महाराज ही उदाहरणे देखील आपल्याला गुरु-शिष्यासाठी प्रसिद्ध आहेत.

पौराणिक कथेनुसार वेद व्यास हे भगवान विष्णूचा भाग म्हणून कलावतार आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव ऋषी पराशर होते. तर आईचे नाव सत्यवती होते. ऋषि वेदाला लहानपणापासूनच अध्यात्मात रस होता. त्यामुळे त्यांनी आपल्या पालकांना प्रभु दर्शनाची इच्छा दर्शवली आणि जंगलात तपश्चर्या करण्याची परवानगी मागितली. परंतु आईने वेद ऋषी यांची इच्छा नाकारली. मग त्यांनी जिद्दीने पाठपुरावा केला. त्यानंतर मठात जंगलात जाण्याची परवानगी दिली.

त्यावेळी वेदव्यास यांच्या आईने त्याला घराची आठवण येईल, तेव्हा परत येण्यास सांगितले. त्यानंतर वेदव्यास तपश्चर्येसाठी जंगलात जाऊन जंगलात कठोर तपश्चर्या केली. सद्गुण प्रतापामुळे वेदव्यासांनी संस्कृत भाषेत प्रवीणता मिळवली यानंतर त्यांचा वेद एकच होता. नंतर याच ऋषींनी वेदाचे चार भाग केले. व्यासांनी महाभारत लिहिले आणि महाभारत अठरा पुराणांसह ब्रह्म सूत्रांची रचना केली. त्यांना नारायण असेही म्हणतात. वेद व्यास यांना अमरत्वाचा आशीर्वाद आहे. तर आजही वेद व्यास काहीना कोणत्या स्वरुपात आपल्यात उपस्थित आहे असे वाटते.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी वेदव्यास सचिन ची पूजा केली जाते.

“तुम्हाला आमची गुरुपौर्णिमा विषयी माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

या सणाबद्दल सुद्धा पहा :-


गुरुपौर्णिमेचे महत्व काय आहे?

आध्यात्मिक गुरू, शिक्षक यांचा सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समर्पित दिवस म्हणून गुरुपौर्णिमेला खूप महत्त्व आहे. गुरू आपल्या शिष्यांना मार्गदर्शन आणि प्रबोधन करताना बजावत असलेल्या भूमिकेची एक आठवण करून देणारा हा दिवस असतो


गुरुपौर्णिमा ला काय करतात?

गुरुपौर्णिमा ही एक परंपरा आहे जी सर्व आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरूंना समर्पित आहे. हे गुरू उत्क्रांत किंवा प्रबुद्ध मानव मानले जातात जे कर्मयोगावर आधारित त्यांचे ज्ञान शिष्यांना देतात. गुरुपौर्णिमेचा सण भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मीयांद्वारे साजरा केला जातो.


गुरुपौर्णिमा पूजा घरी कशी करावी?

शॉवर घ्या आणि स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर गुरु व्यासांची मूर्ती स्वच्छ जागेवर ठेवावी. मूर्तीला चंदन, फुले आणि प्रसाद (पवित्र अन्नदान) अर्पण करा. पूजा करताना ‘गुरूपणसिद्ध्यर्थ व्यासपूजन करिष्ये’ या मंत्राचा जप करावा.

Leave a Comment