पैसा ही सर्व काही नसतो मराठी निबंध Paisa Hi Sarva Kahi Nasato Maraṭhi Nibandha

Paisa Hi Sarva Kahi Nasato Maraṭhi Nibandha आपल्या जीवन जगण्यासाठी अन्न, पाणी यांची जितकी गरज आहे तितकं पैशाची गरज असते. परंतु पैसा हाच मानवाचे आयुष्य किंवा सर्वस्व नसतो. पैसा आवशक्य असतो त्यामुळे मनुष्य आपल्या सुखसुविधा आणि जीवनावश्यक वस्तूची पुरते करू शकेल.

Paisa Hi Sarva Kahi Nasato Maraṭhi Nibandha

पैसा ही सर्व काही नसतो मराठी निबंध Paisa Hi Sarva Kahi Nasato Maraṭhi Nibandha

पैशाशिवाय जीवन जगणे म्हणजे नीसंशय पणे आभासी नरक आहे. त्यामुळे आपल्या ते काही व्यक्ती हे पैशाला सर्वस्व समजतात व पैसा कमावण्याच्या मागे धावतात. परंतु सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे की, पैसा ही सर्व काही नसतो पैसा हेच आपले सर्वस्व नाही.

पैशाचे आवशक्यता ही तितकीच असते, पैशामुळे आपल्याला आवश्यक असलेली वस्तू खरेदी करता येते. त्यामुळे पैशाला सर्व काही मानणाऱ्या लोकांनी पैशाचा वापर हा आवश्यक तेवढाच करणे गरजेचे आहे. जर आपण पैशाला आपल्या आयुष्याच्या सुखद साधन समजले तर या जगामधील कुठलीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपण पैशाचा वापर करतो.

म्हणूनच आपल्या समाजातील काही व्यक्ती पैसा शिवाय जगूच शकत नाही. खरतर जीवन हे आनंदाने आणि संयमाने जगणे म्हणजे खरे जीवन जगणे होय. परंतु सध्याच्या काळामध्ये सर्वजण पैशाला सर्वकाही मांडून त्याच्या मागे धावतात. आज सुख सुद्धा पैशाने विकत घेतले जाते.

आजच्या काळात जगणारा लोकांचे ध्येय फक्त पैसा गोळा करून श्रीमंत आणि अधिक श्रीमंत होणे हेच एकमेव लक्ष्य बनले आहे. प्रत्येक व्यक्तीने फक्त पैसे आणि पैसे जमा करण्याच्या उद्दिष्टाने पैसे कमावण्याच्या मागे धावतात एवढेच नसून पैसे कमवण्याची मर्यादा देखील पहात नाहीत.

आपल्या आवश्यक ते त्याच्या कितीतरी पटीने ठळक पैसा जमा करून ठेवतात. त्यामुळेच पैशाची लालसा ही आजची जीवनशैली बनले आहे. पैसे कमावण्याच्या मागे धावणाऱ्या लोकांना जीवनाचे खरे रहस्यंच कळाले नाही. अशा व्यक्ती पैसे कमी होण्यामागे आपल्या जीवनातील सर्व सुखा आणि आणि कुटुंबातील प्रेम असेच विसरतात. पैसा हे सर्व काही नसतो. खरे सुख हे सर्वांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवून आनंदाने राहणे यामध्ये असते.

आपल्या सभोवताली असे अनेक किती गरीब लोक अनेक कुटुंबे राहतात. त्यांच्याकडे जेवण जाण्यासाठी पुरेसा पैसा नसतो तरी सुद्धा त्यांनी आनंदामध्ये राहतात कारण त्यांच्याकडे माणुसकी, आनंद आणि आहे त्यामध्ये समाधान ठेवण्याची क्षमता असते.

पैशाशिवाय आपल्या जीवनामध्ये अनेक सुंदर गोष्टी आहेत ज्या आपल्या घेऊन आला सुंदर आणि यशस्वी बनवण्याकरिता फायद्याचे ठरतात. एखाद्या व्यक्तीकडे पुरेसे पैसे नसतात तरीसुद्धा त्या व्यक्तीला समाजामध्ये मान आणि सन्मान असतो. याउलट एखाद्या व्यक्तीकडे कोट्यावधी रुपयांचा पैसा असतो तरीसुद्धा समाजामध्ये त्याला कोणी विचारत नाही.

पैसा जीवन जगण्यासाठी आवश्यकता आहे परंतु पैसाच जीवन नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या कुटुंबाला आणि स्वतःचे जीवन सुखी करण्यासाठी आवश्यक असेल तेवढा पैसा त्या मिळणे गरजेचे आहे. अति पैसा कमावण्याच्या लालसेपोटी आपल्याकडून जीवनाची अनेक सुखे सुटतात हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

पैसा कमने च्या लालसेपोटी दिवसेन रात्र कष्ट केल्यास आपण आपल्या कुटुंबाला पाहिजे तेवढा वेळ न दिल्याने कुटुंबामध्ये दुरावा निर्माण होतो. सर्वजण आपल्या परिवाराला जवळ आवश्यक सर्व वस्तू आणि सुख सुविधा देण्याकरिता पैसे कमी होतात मग या पैशाच्या मागे धावण्यात साठी आपण आपल्या परिवाराला पुरेसा वेळ देत नसेल तर हे पैसे कमवणे मध्ये अर्थ काय?

त्यामुळे पैशाला आपल्या जीवनामध्ये कितपत महत्त्वाचे स्थान देणे हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. सर्वांना माहिती आहे की पैसा हा जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे, परंतु त्या पैसा कमी होण्यामागे आपण कोणकोणत्या गोष्टी कमावू शकतो याचा देखील विचार करणे तितकेच गरजेचे आहे, जितका की जीवन जगण्यासाठी पैसा आवशक्य आहे.

आती पैसा कमविल्याने झोपण्यासाठी मखमली पलंग खरेदी केला जाऊ शकतो परंतु त्या पलंगावर झोपण्यासाठी आवश्यक असलेली शांती आणि झोप खरेदी केली जाऊ शकत नाही.

थोडक्यात सांगायचे एवढेच की पैशामुळे आपल्याला आवश्यक असलेल्या चैनीच्या आणि आरामदायी वस्तू खरेदी करता येऊ शकतात परंतु जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या शांती, आनंद, सुख आणि कौटुंबिक प्रेम खरेदी करता येऊ शकत नाही.

त्यामुळे सर्वांनी आपल्या जीवनामध्ये पैशाला आवश्यक तेवढ्याच प्रमाणात महत्व देणे गरजेचे आहे. पैशाला अति महत्व दिल्याने माणूस स्वतःचा अंत ओढावून घेतो.व पैशाच्या गर्वाने आपल्या जीवनाचा अंत करतो. म्हणूनच पैसा ही सर्व काही नसतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment