Mohammed Shami Information In Marathi मोहम्मद शमी हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. मोहम्मद शमी हे एक वेगवान गोलंदाज आहे. त्यांना तीन भाऊ, एक बहीण आहे. शमी यांचे वडिलांनी त्याला वयाच्या पंधराव्या वर्षी आपल्या गावापासून 22 किमी दूर मुरादाबाद येथे नेले आणि तिथे त्याची ओळख प्रशिक्षक बद्रुद्दिन सिद्दिकी यांच्याशी करून दिली. त्यांच्या वडिलांचे नाव तैसीफ अली हे आहेत. तसेच त्यांच्या वडिलांचा व्यवसाय शेती आहे. चला तर मग त्यांच्या विषयी माहिती पाहूया.
मोहम्मद शमी यांची संपूर्ण माहिती Mohammed Shami Information In Marathi
जन्म :
मोहम्मद शमी यांचा जन्म 3 सप्टेंबर 1990 मध्ये उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे झाला. सुरुवातीला शमी हा उत्तर प्रदेशातील आमरोहाचा रहिवाशी होता. अमरोहा या गावात त्याने शेतात क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. त्याच्या शेताच्या मधोमध तयार केलेल्या सिमेंटच्या खेळपट्टीवर खेळायचा. नंतर शमीला मुरादाबाद मधील क्रिकेट अकादमीमध्ये पाठवले.
कौटुंबिक जीवन :
मोहम्मद शमी यांनी कोलकत्ता नाइट रायडर्स रीडर हसीन जहा तिच्यासोबत 6 जून 2014 रोजी आपल्या कुटुंबाच्या विरुद्ध जाऊन लग्न केले. हसिना जहाने 2014 मध्ये लग्नानंतर मॉडेलींग सोडले. दोघांनाही एक मुलगी आहे.
क्रिकेटची सुरुवात :
पश्चिम उत्तर प्रदेशातला मोहम्मद शमी आपल्या भावाप्रमाणे अमरोहामधल्या शेतात क्रिकेट खेळायचा. त्याची क्रिकेटची सुरुवात अलीनगर रसलपूरच्या गावातल्या शेतात बदल्या सिमेंट खेळपट्टीवरून झाली. यानंतर त्याने मागे वळून तेव्हाच पाहिले जेव्हा स्टेशनवर त्याला सोडायला गेले. त्यांचे वडील आणि भाऊ त्याला कोलकात्त्याला जाण्यासाठी निरोप देत होते.
शमीला उत्तर प्रदेशच्या जूनियर क्रिकेट टीममध्ये प्रवेश मिळाला नाही. तेव्हा बद्रुद्दिन यांनी त्याला कोलकत्ता मधून खेळवायचा निर्णय घेतला. अनेक वर्ष डलहौसी आणि टाऊन क्लबसाठी क्रिकेट खेळानंतर शर्मिला बंगालच्या अंडर 22 संघात स्थान मिळालं.
कुटुंबाशी जवळचे संबंध असलेल्या एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, त्या संघासाठी खेळल्यानंतर शमी अमरोहाला आला होता. थंडीचे दिवस होते, एक संध्याकाळी चहा घेताना शमी म्हणाला, “भारतीय सिलेक्टर सनी, मला उद्या किमान नेटवर जरी प्रॅक्टिस करण्याची परवानगी दिली, तर माझं आयुष्य सार्थकी लागेल.”
वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीची धडाकेबाज कामगिरी सुरूच आहे. इंग्लंडविरुद्धच्या आजच्या सामन्यात त्याने 5 विकेट घेत इतिहास रचला आहे. वर्ल्डकपमध्ये सलग तीन सामन्यांमध्ये 4 विकेट घेणारा मोहम्मद शमी हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम पाकिस्तानचा ऑलराउंडर खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या नावे होता. शमीनं आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.
वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीची धडाकेबाज कामगिरी सुरूच आहे. इंग्लंडविरुद्धच्या आजच्या सामन्यात त्याने 5 विकेट घेत इतिहास रचला आहे. वर्ल्डकपमध्ये सलग तीन सामन्यांमध्ये 4 विकेट घेणारा मोहम्मद शमी हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम पाकिस्तानचा ऑलराउंडर खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या नावे होता. शमीनं आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.
शमीने इंग्लंडच्या पाच फलंदाजांना तंबूत धाडलं. शमीच्या वनडे करिअरमधलं ही सर्वात्तम कामगिरी आहे. या सामन्यात शमीने 10 षटकांत 69 धावा दिल्या. यापूर्वी अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीने हॅट्रिक बनवण्याचा विक्रमही केला आहे. या सामन्यातही त्याने चार बळी घेतले होते. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातही त्याने चार विकेट्स घेतल्या होत्या.
मोहम्मद शमीच्या आधी पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने 2011च्या वर्ल्डकपमध्ये सलग तीन सामन्यांमध्ये 4-4 विकेट्स घेतले होते.
मोहम्मद शमी आणि वाद :
2018 च्या सुरुवातीपर्यंत मोहम्मद शमी, क्रिकेट आणि यश यांच्यात दुखापत ही एकमेव अडचण होती. शमीने यातून सावरायला सुरुवातही केली होती. पण अचानक त्याच्या खाजगी आयुष्यात वादळ उठलं.
मार्च 2018 ला त्याची पत्नी हसीन जहांने त्याच्यावर घरगुती हिंसाचार, खुनाचा प्रयत्न आणि बलात्काराचे आरोप केले आणि कोलकाता पोलिसांनी शमीविरोधात FIR दाखल केली.
या काळात शमीच्या पत्नीने आणखी एक गंभीर आरोप केला होता. मॅच फिक्सिंगचा. परिणामी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने खेळाडूंसोबत करण्यात येणाऱ्या करारातून मोहम्मद शमीला बाहेर काढलं आणि चौकशी सुरू केली.
BCCIच्या अँन्टी करप्शन युनीटने शमी मॅच फिक्सिंगच्या आरोपात निर्दोष असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर BCCIने त्याच्याशी नव्याने करार केला. मात्र दरम्यानच्या काळात ही बातमी वणव्यासारखी पसरली होती.
अमरोहामध्ये मोहम्मद शमीच्या गावातल्या मंडळींना या बातमीने तेव्हाही धक्का बसला होता आणि अजूनही ते या धक्क्यातून सावरले नाहीत. नातेवाईक असलेल्या मुमताज म्हणतात, “कळत नाही गोष्टी इतक्या हाताबाहेर कशा गेल्या. दोघंही इथे नेहमी यायचे आणि हसतमुखाने परतायचे. मुलगीही खूप गोड आहे. शमीने आपल्या पत्नीच्या नावे एक शेतही घेतलं होतं.
शमी आणि त्याच्या पत्नीमधला वाद अजून मिटलेला नाही. शमीच्या अडचणी इथेच संपल्या नाही. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडूला यो-यो नावाची एक फिटनेस टेस्ट द्यावी लागते.
घरगुती वादाच्या तीन महिन्यांनंतर झालेल्या या टेस्टमध्ये शमी अपयशी ठरला. त्यामुळे शमीला अफगाणिस्तानविरोधात होणाऱ्या कसोटी सामन्यांना मुकावं लागलं.
शमीच्या जवळच्या मंडळींचं म्हणणं आहे की, “हा शेवटचा धक्का होता आणि शमीने आता ठरवलं आहे की, नव्याने तशीच प्रॅक्टिस पुन्हा सुरू करायची जशी संघात स्थान मिळवण्यासाठी 2013 मध्ये तो करायचा.”
शमीने त्याचे सुरुवातीचे कोच बदरुद्दीन यांचीही मदत घेतली आणि फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं आहे.
ऑक्टोबर 2018 मध्ये त्याने संघात जोरदार पुनरागमन केलं. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत चांगल्या गोलंदाजीमुळे मोहम्मद शमीला याचवर्षी जानेवारीत झालेल्या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यांमध्ये टीम इंडियात स्थान मिळालं.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट :
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये मोहम्मद शमीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 बळी पूर्ण केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा मोहम्मद शमी संघात आणि बाहेर जात आहे, पण तो भारतीय संघासाठी मोठी संपत्तीपेक्षा कमी नाही. अनेकदा मोहम्मद शमी आपल्या स्विंग गोलंदाजीने विकेट्स घेत संघाला अडचणीतून मुक्त करताना दिसतो.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुण्यात दुसर्या कसोटी सामन्यातील दुसर्या डावात पहिला विकेट घेताच उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 बळी घेतले. त्याच सामन्याच्या पहिल्या डावात मोहम्मद शमीने दोन गडी बाद केले. 29 वर्षीय मोहम्मद शमीने टेंबा बावुमा आणि रिच नॉर्टजेला आपला शिकार बनवले होते, तर दुसर्या डावात सेन्युरन मुथुसामी झेलबाद झाला.
मोहम्मद शमीने 300 आंतरराष्ट्रीय बळींपैकी 182 खेळाडूंना झेलबाद केले. त्याचबरोबर त्याच्या चेंडूवर 82 खेळाडू क्लीन बोल्ड झाले आहेत. खेळाडू गोलंदाजी केली जाते. हे अत्यंत क्वचितच दिसून येत आहे, परंतु तो सतत असे करत आहे. एलबीडब्ल्यू म्हणून मोहम्मद शमीला फारच कमी बळी मिळतात.
त्याच्या कारकीर्दीत आत्तापर्यंत शमीला एलबीडब्ल्यू म्हणून केवळ 32 विकेट मिळाल्या आहेत. मोहम्मद शमीने 192 डाव्या हाताच्या फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे, तर 108 डाव्या हाताचे फलंदाज त्याचा बळी ठरले आहेत. मोहम्मद शमी हा भारतीय क्रिकेट संघामध्ये एक महत्त्वाचा खेळाडू आहे.
“तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”