मी केलेला रेल्वे प्रवास मराठी निबंध Mi kelela Railway Pravasa Maraṭhi Nibandha

सरकारी योजना Channel Join Now

Mi kelela Railway Pravasa Maraṭhi Nibandha नमस्कार मित्रांनो! आपले.या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती आणि निबंध वाचायला मिळेल. आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मी केलेला रेल्वे प्रवास निबंध मराठी” घेवून आलोत. आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

Mi kelela Railway Pravasa Maraṭhi Nibandha

मी केलेला रेल्वे प्रवास मराठी निबंध Mi kelela Railway Pravasa Maraṭhi Nibandha

प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्या जीवनामध्ये नक्कीच कधीनाकधी प्रवास करतो. काही प्रवास हा खूप दूरचा असतो तर काही प्रवास जवळचा असतो. परंतु प्रत्येक प्रवासातून मिळणारा आनंद हा वेगवेगळा असतो. आपण केलेल्या प्रवासातील काही प्रवास एक कायमस्वरूपी आपल्या आठवणी मध्ये असतात. आजच्या लेखात आपण “मी केलेला रेल्वे प्रवास” पाहणार आहोत.

प्रत्येक प्रवासाचा आनंद आणि मनाला सुखद करणारा असतो. प्रवास हा मानवी जीवनातील महत्त्वपूर्ण भाग आहे. आपण केलेल्या प्रत्येक प्रवासातून काही ना काही आठवणी तयार होतात या आयुष्यभर आपल्या सोबत असतात. प्रवासातून दैनंदिन जीवनात झालेला थकवा व चिंता दूर होऊन आनंदाची भावना तयार होते. अनेक संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, सुंदर निसर्गातील प्रवास हे आपले आरोग्य आणि बुद्धीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात.

दरवर्षीप्रमाणे मागील वर्षीही उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये मी माझ्या सर्व कामाला ब्रेक लावून महाबळेश्वर फिरायचा विचार केला. महाबळेश्वर ला जाण्याचा हा निर्णय माझ्या संपूर्ण कुटुंबाने घेतला. महाबळेश्वर चा हा प्रवास निसर्गमय होताच त्यासोबत आनंददायी आणि रोमांचक सुद्धा होता.

माझी आणि माझ्या कुटुंबाची महाबळेश्वर फिरण्याची सुरुवात ही रेल्वेच्या प्रवासाने होणार होती. रेल्वेचा प्रवास हा माझा आवडता चा प्रवास आहे. लहानपणापासूनच मला रेल्वेचा प्रवास करायला खूप आवडते. माझे आजोबा हे पुण्यामध्ये राहतात आणि मी सोलापूर मध्ये त्यामुळे दरवर्षी पुण्याचा प्रवास मी रेल्वेनेच करीत होतो त्यामुळे रेल्वेचा प्रवास हा माझा आवडता प्रवास आहे.

ह्या वर्षी सुद्धा मला महाबळेश्वर फिरणा-या च्या उद्देशाने मला रेल्वेचा प्रवास करण्याची संधी प्राप्त झाली होती आणि ही संधी मी कदापि गमवायला तयार नव्हतो. महाबळेश्वर चा मी केलेला रेल्वेचा प्रवास हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण ठरला.

या प्रवासामध्ये माझा सोबत माझे संपूर्ण कुटुंब होते त्यामुळे मला आणखीनच आनंद होत होता. ठरल्याप्रमाणे आम्ही महाबळेश्वरला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. रेल्वेत प्रवेश करताच मी खिडकीच्या साईचे ची सीट पकडले. 15 मिनिटा नंतर हळूहळू रेल्वे सुरु झाली. आणि बघता बघता रेल्वेने गती धरली.

रेल्वेच्या प्रवासासाठी माझ्या आईने माझ्या आवडती ची स्वादिष्ट बिर्याणी बनवली होती. आणि रेल्वे चालू झाल्यानंतर काही तासाने आम्ही सर्वांनी मिळून ती बिर्याणी खाल्ली. हळूहळू रात्र झाली बसलो आता अंधार झाला. रात्रीची वेळ असल्यामुळे बाहेरचे चित्र काही खास दिसत नव्हते. त्यामुळे सर्वांनी मनोरंजनासाठी काहीतरी खेळायचे ठरवले.

मी आणि माझी लहान भावाने अंताक्षरी खेळण्यास सुरुवात केली. अंताक्षरीचा डाव इतका रंगला की वेळेचा पत्ताच लागला नाही. खेळून झाल्यानंतर आम्ही नाश्ता म्हणून सोबत घेतलेले चिप्सचे पॅकेट काढून खाण्यास सुरुवात केली. त्यानंतर जरा वेळ सर्वांनी विश्रांती घेतली.

सकाळी मला जाग आली तेव्हा पहाटे पाच वाजले होत्या आणि हळू हळू सर्वत्र प्रकाश पसरत होता.मी खिडकीतून डोकावून पाहिले तर मला बाहेर हिरवागार निसर्ग दिसत होता. हिरवी हिरवी झाडे, लांब रस्ते, उगवणाऱ्या सुर्याचे दृश्य आणि विविध आकारांची घरे हे दृश्य पाहून मी स्तब्ध झालो. इतके सुंदर दृश्य मी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते.

आता आम्ही महाबळेश्वरच्या थोडे जवळ पोहोचलो तेव्हा थंड वाऱ्याची झुळूक रेल्वेच्या खिडकीतून माझ्या अंगाला स्पर्श करीत होती. मी माझा मोबाईल काढला व खिडकी बाहेरचे सर्व दृश्य मोबाईलमध्ये टिपले. स्ट्रॉबेरी हे फळ मी फक्त ऐकूनच होते याचे शेतीदेखील मी खिडकीतून पाहिले. उंच उंच डोंगर धुक्यांनी नटलेले पाहून मी भारावून गेलो. महाबळेश्वर चे ते दृश्य खूपच सुंदर आणि रोमांचक होते.

काही वेळानं तरच आम्ही महाबळेश्वर येथे पोहोचलो. महाबळेश्वर येथे पोहोचल्यानंतर तेथे हॉटेलांमध्ये आम्ही रूम बुक केली होती तेथे पोहोचलो. महाबळेश्वर ला गेल्यानंतर तिथे आम्ही सहा दिवस राहिले व संपूर्ण महाबळेश्वर पाहिला. त्यानंतर आम्ही रेल्वेने प्रवास करीत पुण्याला आमच्या आजोबांकडे गेलो. अशा पद्धतीने महाबळेश्वरचा मी केलेला रेल्वे प्रवास हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय रेल्वे प्रवास ठरला.

तर मित्रांनो! “मी केलेला रेल्वे प्रवास निबंध मराठी” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा. ” मी केलेला रेल्वे प्रवास निबंध मराठी” यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

धन्यवाद!

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ