एम.बी.ए. कोर्सची संपूर्ण माहिती MBA Course Information In Marathi

MBA Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,प्रत्येकाचे स्वप्न असते की आपले एक सुवर्ण भविष्य असावे. बहुतेक मुले ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर वेगवेगळ्या कोर्सला ऍडमिशन घेतात .काही मुलांचे एक स्वप्न असते की व्यावसायिक व्यवस्थापन क्षेत्रात आपले करिअर करावे .काही मुलांना नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय असावा असे वाटत असते.तर, मी आज तुम्हाला या कोर्स बद्दल सविस्तरपणे माहिती सांगणार आहे.

Mba Course Information In Marathi

एम.बी.ए. कोर्सची संपूर्ण माहिती MBA Course Information In Marathi

परंतु व्यवसाय चालू करण्यासाठी योग्य मार्गदर्शन, घरच्यांचा पाठिंबा, तसेच मुबलक भांडवल या गोष्टींची खूप आवश्यकता असते. काही मुलांना या गोष्टी उपलब्ध होतात. परंतु काही मुले ही या गोष्टीचा अभाव यामुळे आपले स्वप्न मनात धरून एखादा कोर्स करून नोकरी करून उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या स्वतःचा व्यवसाय असावा हे स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचे असेल व खरच आपल्याला व्यवसाय व व्यवस्थापनाची आवड असेल तर त्यांच्याशी संबंधित असा एक अभ्यासक्रम आहे. ज्याला आपण एम.बी.ए. कोर्स असे म्हणतात.

एम.बी.ए. केल्याने आपल्याला काय फायदे होतात ?एम.बी.ए. कोण करू शकतो? त्याची पात्रता निकष काय आहे ?तसेच एम.बी.ए. म्हणजे काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे मी आज तुम्हाला या पोस्टमध्ये देणार आहे. आपल्याला जर स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल किंवा ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर एखादा चांगला जॉब मिळवायचा असेल.

तसेच आपण बिझनेस मॅनेजमेंट मध्ये आपले करिअर करायचे असेल तर आपल्याला एम.बी.ए. हा कोर्स केल्यामुळे खूप फायदा होईल.आपल्याला जर आपले भविष्य उज्वल बनवायचे असेल तर तुम्ही नक्की एम.बी.ए.ला ऍडमिशन घ्यावे. एम.बी.ए.एक पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आहे. तुम्ही चांगल्या प्रकारचा जॉब मिळविण्यासाठी करण्यात येणारा कोर्स आहे.

आताच्या काळात कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच या अभ्यासक्रमाला व्यवसाय व व्यवसायाचे व्यवस्थापन कसे करायचे हे शिकवले जाते. त्यामुळे आपण योग्य मार्गदर्शनानुसार स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता. हा कोर्स केल्यामुळे आपल्याला दोन गोष्टी साध्य होतात .एक म्हणजे आपल्याला कार्पोरेट क्षेत्रात चांगला जॉब मिळू शकतो व दुसरे म्हणजे आपण आपल्या व्यवसाय सुरू करू शकतो. म्हणजे या कोर्समुळे आपल्याकडे दोन पर्याय उपलब्ध होतात.

एम.बी.ए. चा लॉंग फॉर्म ‘मास्टर ऑफ बिझनेस अँडमिनिस्ट्रेशन’ आहे. हा एक प्रोफेशनल कोर्स आहे. भारतात तसेच बाहेरील इतर देशात सुद्धा एम.बी.ए. हा कोर्स खूप लोकप्रिय आहे. 20 व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिका हा देश औद्योगीकरण मध्ये प्रगती करत होता.

त्यावेळी औद्योगिकीकरणा मध्ये व्यवसाय व्यवस्थापन करणे आवश्यक होते. हीच गरज लक्षात घेऊन अमेरिकेत या देशाने एम.बी.ए. हा अभ्यासक्रम चालू केला. व्यवसाय व्यवस्थापन करण्यासाठी लागणारे कौशल्य ज्या व्यक्तीं मध्ये आहे अशा व्यक्तींना व्यवसायांमध्ये असणारी मागणी पूर्ण करण्यासाठी अमेरिकेने सर्वप्रथम हा अभ्यासक्रम देणाऱ्या शाळा सुरू केल्या व त्यानंतर काही वर्षातच एम.बी.ए. हा पदवीधर कोर्स लोकप्रिय झाला.

एम.बी.ए. हा कोर्स दोन वर्षाचा असतो. यामध्ये 4 सेमिस्टर असतात .प्रत्येक वर्षी 2 सेमिस्टर अशी रचना असते .जर आपण बारावीनंतर बी.बी.ए. केल्यास एम.बी.ए. हा कोर्स पाच वर्षाचा असतो. म्हणजे बीबीए + एमबीए हे दोन्ही कोर्स पाच वर्षात पूर्ण होतात.

एम.बी.ए. अभ्यासक्रमांमध्ये वेगवेगळे स्पेशलायझेशन सुद्धा आपण घेऊ शकतो. ते म्हणजे मार्केटिंग, फायनान्स, एचआर, प्रोडक्शन, सप्लाय चेन मॅनेजमेंट, ऑपरेशन, एग्रीकल्चरल मॅनेजमेंट व्यवसायाचा विस्तार कसा करायचा व व्यवसायाचे मॅनेजमेंट कसे करायचे या संबंधित अभ्यासक्रम शिकवला जातो.

आता आपण एम.बी.ए. हा पदवीधर कोर्स करण्यासाठी कोणती पात्रता लागते हे पाहुयात!!!

प्रत्येक कोर्स करण्यासाठी आपल्याला एक पात्रता निकष ठरवून दिलेली असते .हा एक पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. एम.बी.ए. हा कोर्स करण्यासाठी ग्रॅज्युएशन पूर्ण करावे लागते. एम.बी.ए. हा कोर्स करण्यासाठी कोणत्याही शाखेची अट नसते. कला ,वाणिज्य, विज्ञान या कोणत्याही क्षेत्रातील विद्यार्थी एम.बी.ए. या कोर्सला प्रवेश घेऊ शकतो .

फक्त हा कोर्स करण्यासाठी तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. म्हणजे कोणत्याही शाखेतून मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पूर्ण केलेली असावी. खुल्या वर्गासाठी 50 % गुण असणे आवश्यक आहे. तर अनुसूचित जाती जमातींसाठी 45 % गुण असणे अनिवार्य आहे.

आपण एम.बी.ए. शिक्षण का घ्यावे असा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येत असतो. परंतु हा कोर्स केल्यानंतर आपल्याला फायदाच होतो व आपण आपले करिअर या कोर्स नुसार उत्कृष्टपणे करू शकतो. हा कोर्स केल्यामुळे आपल्याला व्यवसाय व्यवस्थापनाचे कौशल्य विकसित होते .

आपल्याला एम.बी.ए. या अभ्यासक्रमाबरोबरच मार्केटिंग, फायनान्स, एचआर इत्यादी वेगळ्या विषयांचा अभ्यासही केला जातो .तसेच व्यवसाय कसा करायचा याबद्दलचे कौशल्य ही आपल्यामध्ये तयार होते व या कौशल्यामुळे आपण आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतो.

आजच्या काळात बीटेक, बीए, बीकॉम, बीएस्सी असे पदवीधर पदव्युत्तर पदवीसाठी एम.बी.ए. या कोर्सची निवड करत आहेत. आजच्या काळामध्ये सर्वांना उच्चस्तरीय कंपन्या म्हणजेच मल्टिनॅशनल कंपनीमध्ये एम.बी.ए. कोर्स केलेल्या लोकांची खूप मागणी आहे.
आता आपण एम.बी.ए. या कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया कशी आहे हे पाहूयात!!!

या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक आहे. या प्रवेश परीक्षांच्या गुणांच्या आधारावर मेरिट लिस्ट लावण्यात येते व प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेत जास्त गुण आहेत त्यांना कॉलेज प्राधान्य देते .
आता आपण या कोर्ससाठी कोणत्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात हे पाहुयात.

CAT, MAT, CMAT, ATMA या राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा आहेत या परीक्षा फिक्स मंडळाद्वारे घेतल्या जातात.MAH-CET, OJEE, KMAT, TANCET, APICET या राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा आहेत. या परीक्षा राज्यस्तरीय संस्था किंवा त्या राज्यातील इतर सहभागी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केल्या जातात. या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सामूहिक चर्चा किंवा मुलाखत घेतली जाते व त्यानुसार आपल्याला अंतिम प्रवेश दिला जातो.

एम.बी.ए. कोर्सचे प्रकार

पूर्णवेळ एम.बी.ए.

पूर्णवेळ एम.बी.ए. हा कोर्स 2 ते 3 वर्षाचा असतो. याला आपण नियमित अभ्यासक्रम या नावाने सुद्धा ओळखतो. याला प्रवेश मिळवण्यासाठी आपल्याला ग्रॅज्युएशन मध्ये 50 % गुण असणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना व्यापक आणि सखोल प्रशिक्षण दिले जाते . संपूर्ण भारतात पूर्ण वेळ एनडीए हे शिकवणारे एकूण 5009 विद्यापीठ आहेत.

अर्धवेळ एम.बी.ए.

अर्धवेळ एम.बी.ए. अभ्यासक्रम कार्यकारी एमबीए म्हणूनही ओळखला जातो. या कोर्सचा कालावधी एक वर्षाचा असतो. हा अभ्यासक्रम लक्षणीय तज्ञ असलेल्या काम करणाऱ्या व्यक्तींसाठी असतो .व्यवस्थापक, उद्योजक ,व्यावसायिकांना प्रशिक्षित करण्यासाठी हा अभ्यासक्रम असतो.

या अभ्यासक्रमाने मानव संसाधन, व्यवस्थापन ,आंतरराष्ट्रीय व्यवसाय व सूक्ष्म वित्त पुरवठा यांसारखा विषयांचा अभ्यास केला जातो. तसेच या अभ्यासक्रमात स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट आणि एक्झिक्यूटिव्ह कम्युनिकेशनचा ही समावेश होतो. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी GMAT ,GRE या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात तसेच काही विद्यापीठे ही CAT यांसारख्या प्रवेश परीक्षा घेतात.

ऑनलाइन एम.बी.ए.

अनेक UGC मान्यताप्राप्त महाविद्यालय जसे अँमिटी नोएडा,आसाम डॉन बॉस्को विद्यापीठ ,जयपूर राष्ट्रीय विद्यापीठ इत्यादी विद्यापीठ हा अभ्यासक्रम देतात. कारण हा अभ्यासक्रम अलीकडच्या काळात खूप लोकप्रिय झाला आहे. या अभ्यासक्रमासाठी 50 % गुण असणे आवश्यक आहे.

यामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लेक्चर व ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतल्या जातात. या अभ्यासक्रमात आपल्याला घरापासून दूर राहण्याची गरज लागत नाही .त्यामुळे आपला बराचसा खर्च वाचतो. आपण लेक्चर रेकॉर्ड करून आपल्या हवे त्या वेळेनुसार पाहू शकतो. भारतात एकूण 170 विद्यापीठ हे ऑनलाइन पद्धतीने एमबीए शिकवत आहेत.

अंतर एम.बी.ए.

अंतर एम.बी.ए. म्हणजेच दूरस्थ शिक्षण हा दोन वर्षाचा पदवीत्तर व्यवस्थापन पत्रव्यवहार अभ्यासक्रम आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना स्वतःचा अभ्यास स्वतःचा करावा लागतो. या अभ्यासक्रमात कोणत्याही प्रकारचे लेक्चर होत नाहीत.

जे विद्यार्थी नियमित एम.बी.ए. करू शकत नाही त्यांच्यासाठी दुरुस्त एम.बी.ए. हा अभ्यासक्रम सर्वात उपयुक्त आहे. संपूर्ण भारतात एकूण 490 कॉलेज आहेत.

एक्झिक्यूटिव्ह एम.बी.ए.

ज्या उमेदवाराला पाच वर्षापेक्षा जास्त कामाचा अनुभव आहे. अशा उमेदवारांसाठी हा अभ्यासक्रम खूप उपयुक्त आहे. एक्झिक्युटिव्ह एम.बी.ए.अभ्यासक्रम व पूर्णवेळ अभ्यासक्रम हा जवळ जवळ सारखाच असतो याचा कालावधी 15 ते 19 महिने इतका असतो. येथे उमेदवाराला जास्त फी आकारावी लागते .भारतात हा अभ्यासक्रम देणारे 440 विद्यापीठे आहेत.

एम.बी.ए कोर्स करायला किती खर्च येतो हे आपण पाहूयात!! आपण ज्या कॉलेजला प्रवेश घेणार आहे त्या कॉलेजवर त्या कोर्सचे शुल्क अवलंबून असते. आपण जर गव्हर्मेंट कॉलेजला प्रवेश घेतला तर गव्हर्मेंट कॉलेजला खाजगी कॉलेज पेक्षा कमी प्रमाणात फी असते. गव्हर्मेंट कॉलेजची फी 200000 ते 1000000 पर्यंत असते .जर आपण प्रायव्हेट कॉलेजला प्रवेश घेतला तर ही फी 500000 ते 2000000 पर्यंत असू शकते.

महाराष्ट्रातील शीर्ष 10 एम.बी.ए. महाविद्यालये आहेत ती पुढील प्रमाणे:-

  • एन.एम.आय.एम.एस मुंबई
  • वी स्कूल मुंबई
  • आय.टी.एम बिझनेस स्कूल नवी मुंबई
  • युनिव्हर्सल बिझनेस स्कूल कर्जत लेक्सिकॉन माईल पुणे
  • श्री बालाजी विद्यापीठ पुणे
  • पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट पुणे
  • इंदिरा स्कूल ऑफ इंडिया. बिझनेस स्टडीज पुणे
  • इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज पुणे
  • विजय पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट नवी मुंबई.

एम.बी.ए चे प्रकार कोणते?

– पूर्णवेळ एम.बी.ए, अर्धवेळ एम.बी.ए, ऑनलाइन एम.बी.ए, अंतर एम.बी.ए. एक्झिक्युटिव्ह एम.बी.ए झाल्यानंतर कोणत्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतात
– एम.बी.ए कोर्स केल्यानंतर आपल्याला दोन पर्याय उपलब्ध होतात ते म्हणजे आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो, तसेच कार्पोरेट क्षेत्रात चांगल्या जॉबच्या संधी उपलब्ध होतात, तसेच सरकारी क्षेत्रातही आपल्याला नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.

FAQ’s :-

एम.बी.ए चा लॉंग फॉर्म काय आहे?

एम.बी.ए लॉंग फॉर्म मास्टर्स ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन आहे.

एम.बी.ए ह्या कोर्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्रता निकष काय आहे?

एम.बी.ए ला ॲडमिशन घेण्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. म्हणजे आपले ग्रॅज्युएशन पूर्ण असावे लागते मग ते कोणत्याही शाखेतून केलेले असेल तरी चालेल. तसेच आपल्याला 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे व अनुसूचित जाती जमातींसाठी 45 टक्के गुण अनिवार्य आहे.

या कोर्सचा कालावधी किती वर्षाचा असतो?

एम.बी.ए या कोर्सचा कालावधी दोन वर्षाचा असतो.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment