स्टेनो कोर्सची संपूर्ण माहिती Steno Course Information In Marathi

Steno Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,आजच्या या लेखात आपण स्टेनो या कोर्स विषयी माहिती पाहणार आहोत. सध्याच्या काळात पडद्याआड लपलेला स्टेनोग्राफर हा व्यक्ती सरकारी कार्यालय, कोर्टकचेऱ्या मध्ये, सरकारी कार्यालयांमध्ये व काही खासगी संस्थांमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

Steno Course Information In Marathi

स्टेनो कोर्सची संपूर्ण माहिती Steno Course Information In Marathi

सध्याच्या आधुनिक व तंत्रज्ञानाच्या काळात एम.बी.बी. एस., इंजिनिअरिंग, डॉक्टरेट या सर्व कोर्सला खूप मागणी आहे. त्यामुळे स्टेनो कोर्सचे महत्त्व हे थोडे कमी होताना आपल्याला दिसते. पण कोर्सचे महत्त्व हे जरी कमी होत असले तरी रोजच्या कामकाजात ,सरकारी क्षेत्रात स्टेनोग्राफर हा व्यक्ती खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

त्यामुळे आजच्या लेखात आपण स्टेनो या कोर्स विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. स्टेनो कोर्स साठी लागणारी पात्रता, स्टेनो कोर्स करण्यासाठी चे असलेल्या शैक्षणिक संस्था ,कोर्स पूर्ण झाल्यानंतर असणाऱ्या नोकरीच्या संधी, मिळणारा पगार इत्यादी बद्दल माहिती पाहणार आहोत.

स्टेनोला स्टेनोग्राफर असे म्हटले जाते. स्टेनोग्राफी ही एक भाषा आहे. या भाषेला कोडिंग भाषा किंवा शॉर्ट हॅन्ड असेही म्हणतात. स्टेनोग्राफी मध्ये समोरच्या व्यक्तीने सांगितलेले एखादे भाषण थोडक्यात लिहायला शिकवले जाते.त्याचा वापर करणाऱ्या व्यक्तीला स्टेनोग्राफर असे म्हणतात म्हणजे एखाद्या व्यक्तीने दिलेले भाषण हाताच्या साह्याने कमी वेळात लिहिण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला स्टेनोग्राफर असे म्हणतात.

यामध्ये कोणत्याही प्रादेशिक भाषेचे कोडेड भाषेत रूपांतर केले जाते. ज्याला आपण शॉर्टहँड म्हणून ओळखतो म्हणजेच स्टेनोग्राफर याचे काम शब्दाचे सांकेतिक भाषेत भाषांतर करणे व ही सांकेतिक भाषा परत मूळ स्वरूपात बदलली जाते. यामध्ये मूळ भाषेत 200 शब्द प्रतिमिनिट तितक्या जास्त वेगाने भाषांतर केले जाते .

नवीन तंत्रज्ञान प्रणालीमुळे या व्यवसायाचे महत्त्व कमी झाले आहे. कारण जिथे माणसाला भाषांतर करणे हे मूलभूत काम स्वतः करावे लागते. जेथे बोललेले शब्द जसेच्या तसे टाईप करावे लागतात. प्रत्येक ठिकाणी स्टेनोग्राफी ची गरज असते .आजच्या काळात कुठलेही तंत्रज्ञान कितीही विकसित झाले असले तरीही असे कोणतेही तंत्रज्ञान इतके विकसित नाही की भाषांतर एखादे मशीन करू शकेल.

त्यामुळे या कोर्सचे महत्त्व कमी झाले असले तरी काही ठिकाणी म्हणजेच सरकारी कार्यालय ,कोर्ट कचेरीत व खाजगी संस्थांमध्ये कॉर्पोरेट विभाग ,प्रिंटिंग प्रेस ,डॉक्टर या ठिकाणी अजूनही महत्त्वाची भूमिका बजावत आहे .त्यामुळे या क्षेत्रात स्टेनोग्राफरची मागणी वाढत आहे .स्टेनोग्राफर होण्यासाठी मेहनती असणे आवश्यक आहे तसेच कौशल्य चांगले असेल तर अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये त्यांचा समावेश केला जातो .

स्टेनोग्राफर चे मुख्य काम भाषांतर करणे हे असल्यामुळे इंग्रजी व इतर प्रादेशिक भाषेचे ज्ञान अवगत असणे आवश्यक आहेत. तसेच शॉर्टहँडचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. आपल्याला सोपविण्यात आलेले काम अधिक कुशलतेने व कार्यक्षमतेने पार पाडणे तसेच एकापेक्षा जास्त क्षेत्रात सर्व समावेशक ज्ञान असले पाहिजे. स्टेनोग्राफर होण्यासाठी अचूक व जलद गतीने टायपिंग करण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे.

आता आपण स्टेनोग्राफर होण्यासाठी कोणती पात्रता लागते हे पाहुयात !!

स्टेनोग्राफर या कोर्सला पात्र होण्यासाठी दहावी व बारावी बोर्ड परीक्षा मान्यताप्राप्त विद्यालयातून पास होणे महत्त्वाचे आहे. मिळालेले गुण व तुम्ही ज्या शाखेतून शिक्षण घेतले आहे याला कोणतेही बंधन नाही .परंतु सरकारी कार्यालयात नोकरीसाठी ही अट स्टेनोग्राफी साठी 60% अनिवार्य असते. शॉर्टहँड शिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी हे महत्त्वाचे असते.

स्टेनोग्राफर या कोर्ससाठी साठी वयाची अट बंधनकारक नाही. परंतु सरकारी क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी भरती प्रक्रियेच्या वेळी स्टेनोग्राफर साठी वयोमर्यादा ठरलेली असते .सर्वसाधारणपणे ती वयोमर्यादा 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असते. काही वेळेस ही वयोमर्यादा 30 वर्षापेक्षा जास्त ही असू शकते.

स्टेनोग्राफर होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी स्टेनोग्राफर होण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा स्टेनो टायपिंग शिकावे लागेल. पॉलिटेक्निक किंवा आय.टी.आय. इन्स्टिट्यूटमध्ये किंवा खाजगी संस्थांमध्ये तुम्हाला टायपिंग शिकावे लागेल. खासगी संस्थेतून टायपिंग शिकताना त्या संस्थेला सरकारची मान्यता आहे की नाही याची शहानिशा करणे आवश्यक आहे.

तुम्ही जेव्हा एखाद्या संस्थेत स्टेनोग्राफी शिकण्यासाठी प्रवेश घेता तेव्हा शॉर्टहँड जाणून घेण्यासाठी सहा महिने व एक वर्षाचा कालावधी दिला जातो. या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्ष ते दीड वर्ष असतो .टायपिंग शिकल्यानंतर तुम्हाला तुमच्या टायपिंगचा वेग वाढवावा लागतो. तुमचा टायपिंगचा वेग हिंदी भाषेत 80 शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी भाषेत 80 शब्द प्रतिमिनिट असा असावा लागतो.

स्टेनोग्राफर चा टायपिंग स्पीड कमीत कमी 40 शब्द प्रतिमिनिट असावा व जास्तीत जास्त 80 शब्द प्रतिमिनिट असावा .स्टेनोग्राफी या पदाची निवड करताना टायपिंग चा मोठा वाटा असतो म्हणजेच निवड करताना आपल्या टायपिंग विषयी सर्व माहिती म्हणजे स्पीड किती आहे हे जाणून घेतले जाते. स्टेनोग्राफर होण्यासाठी तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागते व ती परीक्षा स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे घेण्यात येते. ही परीक्षा उत्तीर्ण होणे महत्त्वाचे असते .

या परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षा पॅटर्न ठरवून दिलेला असतो तो पुढीलप्रमाणे :-

सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क सामान्य जागृकता इंग्रजी भाषा व आकलन या विषयाचा नीट अभ्यास करून तुम्ही या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला टायपिंग चाचणीसाठी बोलवले जाते. जर तुम्ही परीक्षेस व टायपिंग चाचणीत उत्तीर्ण झाले तर तुम्हाला स्टेनोग्राफर पदासाठी नियुक्त केले जाते.

आपण स्टेनोग्राफर ही हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण कोणत्याही खाजगी कंपनीत काम करू शकतो तसेच प्रिंटिंग प्रेस कोर्टात खाजगी संस्था सरकारी विभागातही आपण काम करू शकतो सरकारी विभागात स्टेनोग्राफी या पदासाठी करण्यात येणारी नियुक्तीही कर्मचारी निवड आयोगाची द्वारे केली जाते.

आज काल भरपूर मुलांचा कल हा आय.आय.टी. स्टेनोग्राफी कोर्स याच्याकडे आहे.

ITI स्टेनोग्राफर कोर्स क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम (CTS) अंतर्गत येतो. जो कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या प्रशिक्षण महासंचालनालय (DGT) अंतर्गत स्थापन केला जातो. या कोर्सचा कालावधी एक वर्षाचा असून नॉन इंजिनिअरिंग अभ्यासक्रम आहे.

आय.टी.आय.स्टेनोग्राफर कोर्स हा इंग्रजी स्टेनोग्राफर व हिंदी स्टेनोग्राफर म्हणजे विद्यार्थ्याला या कोर्समध्ये इंग्रजी स्टेनोग्राफर मध्ये इंग्रजी भाषेत ट्रान्स्क्रीपशन व हिंदी स्टेनोग्राफर मध्ये हिंदी भाषेत ट्रान्स्क्रीपशन शिकावे लागते .

या कोर्समध्ये तुम्हाला व्याकरण, संभाषण कौशल्य, लेखन कौशल्य, कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर ,इंटरनेटचा वापर ,ईमेल, एम.एस.ऑफिस इत्यादी विषय शिकवले जातात. आय.टी आय.. स्टेनोग्राफी कोर्स करताना त्या संस्थेने घेतलेल्या प्रवेश परीक्षेस बसावे लागते व गुणवत्ता यादीच्या आधारे प्रवेश दिला जातो. काही खाजगी आय.आय.टी.मध्ये दहावीच्या गुणांवर प्रवेश दिला जातो.

या कोर्सची फी सरकारी संस्थांमध्ये 5000 ते 10000 पर्यंत असते. तर खासगी संस्थेमध्ये 10000 ते 50000 पर्यंत असते .हा कोर्स केल्यानंतर आपण स्टेनोग्राफर, लघुलेखक, सचिव ,डेटा इंट्री ऑपरेटर,स्टेनो टायपिस्ट, कार्यालय सहाय्यक इत्यादी नोकरीच्या संधी आपणास मिळू शकतात.

आयटी स्टेनोग्राफी नंतर आपण डिप्लोमा इन स्टेनोग्राफर करू शकतो तसेच इतर आयटी स्तरावरील वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी सुद्धा जाऊ शकतो तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता किंवा एखाद्या कंपनीतही काम करू शकता.
स्टेनोग्राफर चा पगार हा 5200 तो 20200 दरम्यान असतो.

स्टेनोग्राफर व टायपिंग या पदासाठी सरकारी विभागाची जाहिरात दिली जाते .या रिक्त जागा एसएससी, यूपीएससी, राज्य सेवा निवड मंडळ, बँकिंग सेवा भरती मंडळ, या एजन्सीद्वारे लेखी परीक्षा घेऊन व मुलाखती घेऊन भरल्या जातात. नंतर हे निवडलेले उमेदवार स्टेनोग्राफर म्हणून सरकारी कार्यालयात नियुक्त केले जातात.

FAQ’s :-

स्टेनोग्राफर कोणाला म्हणतात?

समोरच्या व्यक्तीने सांगितले डिक्टेशन कोडींग भाषेत कमी वेळात व जलद गतीने लिहून टाईप करणे हे काम जी व्यक्ती करते तिला स्टेनोग्राफर म्हणतात. शब्दाचे सांकेतिक भाषेत रूपांतर करणे हे त्याचे महत्त्वाचे काम असते. स्टेनोग्राफर ला व्यक्तीच्या बोलण्याच्या वेगाने टाईप करावे लागते.

स्टेनोग्राफर कोर्स ची पात्रता काय असते?

स्टेनोग्राफर होण्यासाठी बारावी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. काही खाजगी संस्था दहावी झाल्यानंतर ही या कोर्सला प्रवेश देतात.

स्टेनोग्राफर कोर्सची वयोमर्यादा किती आहे?

स्टेनोग्राफर या कोर्ससाठी वयाची अट बंधनकारक नाही .पण सरकारी भरती प्रक्रियेत साठी वयाची अट ही सर्वसाधारणपणे 18 ते 27 वर्षाच्या दरम्यान असते.

स्टेनोग्राफर हा कोर्स केल्यानंतर नोकरीच्या संधी कोठे कोठे उपलब्ध असतात ?

स्टेनोग्राफर हा कोर्स केल्यानंतर आपण एखाद्या खासगी संस्थेत किंवा कंपनीत काम करू शकतो. तसेच कोर्टकचेरी ,जिल्हा परिषद, सरकारी कार्यालय ,मुख्य कार्यकारी कार्यालय येथे काम करू शकतो. तसेच आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो. जर आपण आय.आय.टी. स्टेनोग्राफर हा कोर्स केला असेल तर आपण आय.आय.टी.च्या क्षेत्रातही काम करू शकतो.

Leave a Comment