Lotus Flower Information In Marathi आपण वेगवेगळ्या फुलांचे प्रकार बघितले आहेत, न जाणो जगभरात विविध फुले किंवा त्यांच्या कित्येक जाती आढळतात. तर आज आपण कमळाच्या फुला विषयी माहिती जाणून घेऊया.
कमळ फुला विषयी संपूर्ण माहिती Lotus Flower Information In Marathi
कमळाचे फुल हे दिसायला अतिशय सुंदर रंगीबिरंगी व आकर्षित, मनाला मोहित करणारे असते. कमळाच्या फुलाचे विशिष्ट असे एक महत्त्व आहे. जगभरात कमळाच्या फुलांच्या शंभर पेक्षा अधिक जाती आढळून येतात. कमळाचे फुलाचे मूळ स्थान मात्र भारत, चीन व जपान हे असून ते भारत या देशाचे राष्ट्रीय फूल आहे. तसेच भारतात सर्वच प्रदेशांमध्ये विविध रंगांची कमळाची फुले आढळून येतात. तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
कमळाच्या फुलाचे विविध नावे :
कमळाचे फुल सर्वांच्या परिचयाचे आहे परंतु त्या फुलाला विविध नावांनी ओळखले जाते. हे आपल्याला माहित आहे. तसेच कमळ हे फुल सर्वांच्या परिचयाचे असल्यामुळे कमळ जरी नावाचा उच्चार केला तरी त्या फुलाची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. ती म्हणजे दिसायला सुंदर आकर्षक व मनमोहक अशी असते. तर कमळ या फुलाला आपण एकदा जरी आयुष्यात बघितले तरी त्याला आपण आयुष्यभर विसरू शकत नाही.
कमळाच्या फुलाला कमल, कनवाल, अंबुज तर इंग्लिश मध्ये लोटस अशा नावाने ओळखले जाते. कमळाचे फूल मुख्यतः चिखलात पाण्यात आढळते परंतु दिसायला अतिशय सुंदर असणारी ही जल वनस्पती निलंबियासी कुळातील असून तिचे शास्त्रीय नाव ‘निलंबो नुसिफेरा’ असे आहे.
कमळाच्या फुलाची रचना :
कमळाचे फूल आकाराने इतर फुलांपेक्षा मोठे असते कारण या फुलाला अनेक पाकळ्या असतात. या पाकळ्यांचा रंग गुलाबी किंवा पांढरा असतो कमळ या फुलाला लांब देठ असून जेव्हा कमळ फुल पाण्यातून बाहेर येते तेव्हा लांबलचक देठावर कमळाचे फूल हे शोभून दिसते. या फुलाला मंदमंद सुगंध असतो.
कमळ या फुलाचा रंग जातीनुसार वेगवेगळा आढळतो. कमळाची पाने देखील गोल आकाराचे असतात. त्या पानांचा व्यास 60 ते 90 सेंटीमीटर एवढा असतो. कमळाची पाने कधीही ओली होत नाही. त्या पानांवर एक प्रकारची द्रव्य असते. त्यामुळे पाने सडत नाहीत. तसेच कमळाच्या पानांवर पडलेले थेंब हे जणू काही मोत्यांसारखेच दिसतात.
कमळाच्या फुलाच्या पाकळ्या :
कमळाच्या फुलाला तीन दिवस लागतात व तीन दिवसातच ते फुल कोमजते. म्हणजेच त्या फुलांच्या तीन दिवसानंतर सर्व पाकळ्या एका मागून एक पाण्यात गळून पडतात. कमळाच्या फुलांच्या पाकळ्या ह्या दिसायला अतिशय सुंदर मनमोहक असतात. केवळ फुलाचा मधला भाग हाच पाण्याबाहेर राहतो कमळाचे फुल हे पाण्यात उगवते म्हणून त्या फुलाला सहजपणे आपण तोडू शकत नाही. कमळाच्या फुलांना धार्मिक महत्त्व आहे तसेच त्यांना बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असते.
कमळाच्या फुलांची लागवड :
कमळाच्या फुलांची लागवड ही चिखलात किंवा पाण्यामध्ये केली जाते. कमळाचे रोप ऑक्सिजन कमी असणाऱ्या प्रदेशात म्हणजेच दलदलीत चांगले वाढते. कमळाचे पान, फुलं हे पाण्यावर दोन ते तीन फूट उंच वाढतात फुलांचा मोसम हा मार्च ते सप्टेंबर महिन्यात असून परागीभवन झाल्यानंतर त्यावर सर्वप्रथम हिरव्या रंगाच्या बिया येतात. या परिपक्व कमळाच्या बियांचा आकार साधारणतः टपोऱ्या शेंगदाणे एवढा असून त्याचा रंग काळपट असतो.
कमळाच्या बियांना कमळगट्टा किंवा कमळ गठ्ठ्यांचे मनी असे म्हणतात. कमळ कठ्याचे मनी हिंदू धर्मामध्ये जपाच्या माळांसाठी वापरली जातात. प्राचीन काळापासूनच लक्ष्मीचे प्रतीक म्हणून या मन्याना मान्यता आहे. कमळाच्या फुलाला हिंदू धर्मात खूप महत्त्व असल्यामुळे बरेच लोक कमळाच्या फुलांची लागवड करून आपला उदरनिर्वाह भागवितात.
राष्ट्रीय फूल :
कमळ हे फुल ज्ञानाचे प्रतीक असून ते भारत आणि व्हिएतनामाचे राष्ट्रीय फूल कमळाची प्रजाती मुख्यतः भारतामध्ये हिमालय ते श्रीलंका पर्यंत उगवतात. राष्ट्रीय फूल असलेल्या प्रजातीचा रंग गुलाबी असून इंग्रजीत त्याला इंडियन लोटस किंवा सिक्रेट लोटस असे म्हणतात.
कमळाच्या फुलाचे हिंदू धर्मातील महत्त्व :
कमळाच्या फुलाला हिंदू धर्मामध्ये आध्यात्मिक महत्त्व आहे कमळाचे फुल हे देवी महालक्ष्मी, ब्रम्हा आणि देवी सरस्वती यांचे वाहन मानले जाते. या फुलाला धन संपत्ती आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. ब्रह्मदेवांसोबत कमळ या फुलावर माता सरस्वती विराजमान झालेली आहे. सरस्वती हे ज्ञानाचे प्रतीक असते म्हणूनच या फुलालाही ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. हिंदू संस्कृतीत कमळाचे फुल अतिशय पवित्र मानले जाते कमळाच्या फुलाचा उपयोग हा पूजेमध्ये केला जातो. काही लोक कमळ या फुलाची लागवड करून आपला उदरनिर्वाह ही करतात.
कमळाच्या फुलाचा उपयोग :
कमळाच्या फुलाचा उपयोग औषधी वनस्पती म्हणूनही केला जातो. या फुलांमध्ये औषधी गुणधर्म असतो. कमळाच्या फुलांपासून खाण्यासाठी गुलकंद देखील केला जातो. कमळाचे पान फुलं बिया यांचा वापर खाण्यासाठी केला जातो तसेच कमळाचे गठ्ठे भाजून तळून किंवा लोणचे करून खाल्ले जातात.
कमळाच्या गठ्ठ्यांमध्ये जीवनसत्व क आणि रिबॉफ्लाविन, निअॅसिन असल्यामुळे ते मानवी उपयोगासाठी आहेत. तसेच कमळाचे मध हे सुद्धा बहुउपयोगी असते.
कमळाच्या फुलांचा उपयोग पटकी अतिसार यांसारखे आजारावर देखील केला जातो कमळाची बी व कार्य थांबवण्यासाठी व मुलांना लघवी होण्यासाठी ज्वर साठी देतात.
कमळाचे फूल त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे कारण या फुलांमध्ये अँटी एजिंग पोषक घटक असून त्यामुळे येथे आपली त्वचा सुधारण्याचे काम करते व आपल्या त्वचेमध्ये एलर्जी असेल तर ते सुद्धा बरी करण्याचे काम करते.
आपल्या त्वचेचा नैसर्गिक रंग ठेवण्यासाठी ही फुले उपयोगी पडतात या फुलांमध्ये अँटी-इन्फ्लेमन्तरी हे घटक असल्यामुळे पुरळ उठण्याची समस्या देखील दूर होते आणि फुलांमध्ये व्हिटॅमिन ए सुद्धा असते.
त्यामुळे आपल्या त्वचेतील दीर्घकाळ तरुण आणि आपली त्वचा निरोगी व सुंदर ठेवण्याचे काम हे फुल करत असते आपल्या चेहऱ्याची त्वचा देखील सुंदर दिसते.
कमळ हे फूल केसांना सुद्धा खूपच फायदेशीर असते या फुलांमध्ये अँटीऑक्सिडेंट हा घटक असतो त्यामुळे आपले शरीर निरोगी राहते या शरीरामध्ये असलेला रॅडिकल्सचा रोग नियंत्रित ठेवण्याचे काम देखील कमळाचे फुल करत असते.
कमळाचे फूल आपल्या टाळूचे आरोग्य देखील चांगले ठेवते. टक्कल पडले असल्यास ते खूप फायदेशीर ठरते. आपले केस निरोगी आणि दाट होण्यासाठी मदत करतात आपल्या केसांना मजबूत करण्याचे काम देखील कमळाचे फुल करत असते असे बहुउपयोगी असणारे हे कमळाचे फुल आपल्या भारत देशाचे राष्ट्रीय फूल आहे. तसेच भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ही फुले आढळतात.
तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.
हे सुद्धा अवश्य वाचा :-
- सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती
- लोहगड किल्ल्याची माहिती
- दौलताबाद किल्ल्याची माहिती
- तोरणा किल्ल्याची माहिती
- सिंहगड किल्ल्याची माहिती
FAQ
कमळ हे आपले राष्ट्रीय फूल का आहे?
हे भारतभरातील तलाव, तलाव आणि नद्यांमध्ये वाढत आहे आणि त्याचे विशिष्ट आकार आणि दोलायमान रंग हे देशाचे एक प्रिय प्रतीक बनवतात. त्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व, त्याचे सौंदर्य आणि अभिजातपणा आणि त्याचे पर्यावरणीय आणि आर्थिक महत्त्व यासह अनेक कारणांमुळे कमळ हे भारताचे राष्ट्रीय फुल आहे.
कमळाच्या पानाला काय म्हणतात?
कमळाच्या पानाला पुरिन म्हणतात. कमळाचे फूल पाण्याच्या बाहेर पानांच्या वर असते. कमळाचे फूल अतिशय मऊ असते. कमळाचे देठ लांब, पातळ आणि पोकळ असते ज्याला देठ म्हणतात आणि त्याची मुळे पाण्याच्या आत जमिनीत असतात.
कमळाची पाने पाण्यावर का तरंगते?
त्याला ‘कमलकाकडी’ असे म्हणतात. कमळाची पाने गोलाकार आणि आकाराने मोठी असतात. पानावर मेणाचा थर असल्यामुळे ती पाण्यावर तरंगत असूनदेखील खराब होत नाहीत.
कमळाची फुले कोठे वाढतात?
कमळे स्वतःला चिखलात रुजतात, त्यांचे लांब दांडे पाण्याच्या शिखरावर जाण्यासाठी वरच्या दिशेने पोहोचतात. तिथे हिरवळ फुलते आणि कमळ जसजसे उमलते तसतसे एक एक उमलते.
कमळाचे फूल काय दर्शवते?
कमळ ही एक वनस्पती आहे जी नेलुम्बो वंशातील आहे आणि ती शुद्धता, पुनर्जन्म आणि देवत्वाशी जोडलेली आहे. कमळाचे फूल गडद ठिकाणाहून सौंदर्य आणि पुनर्जन्माकडे जाण्याचे प्रतीक आहे, कारण कमळाचे फूल कसे वाढते.