ब्रह्मपुत्रा नदी विषयी संपूर्ण माहिती Brahmaputra River Information In Marathi

Brahmaputra River Information In Marathi ब्रह्मपुत्रा या नदीला बऱ्याच नावांनी ओळखले जाते. जिथून उगम पावते तिथून ते समुद्रात विलीन होईपर्यंत वेगवेगळे प्रदेश बदलत असल्यामुळे वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. ब्रह्मपुत्रा ही नदी मानस सरोवरातून उगम पावते व बांगलादेशात गंगा नदीला मिळते. तिथे या नदीला पद्मा या नावाने ओळखले जाते. नंतर ती समुद्रात विलीन होते. तेव्हा ती मेघना या नावाने ओळखली जाते. सर्व नद्यांचा उल्लेख स्त्रीलिंग मधून केला जातो परंतु ब्रह्मपुत्रा या नदीचा उल्लेख हा पुरुष लिंग मध्ये केला जातो. चला तर मग जाणून घेऊया या नदी विषयी सविस्तर माहिती.

Brahmaputra River Information In Marathi

ब्रह्मपुत्रा नदी विषयी संपूर्ण माहिती Brahmaputra River Information In Marathi

ब्रह्मपुत्रा नदीचा उगम :

समुद्रसपाटीपासून सुमारे 5051 मीटर उंचीवरच्या चीनमधील तिबेट या ठिकाणी ही नदी उगम पावते. म्हणजेच तिबेट हे चीनमध्ये असले तरीही भारतीयांच्या दृष्टीने पवित्र अशा कैलास पर्वताच्या श्रेणीमध्ये ही नदी उगम पावल्याने ब्रह्मपुत्रेला पवित्र असा महिमा लाभलेला आहे.

भारतात तिला ब्रह्मपुत्रा म्हणत असले तरीही तिबेट या चीनमधील प्रदेशात मात्र तिला ‘त्सांग पो’ या नावाने ओळखले जाते. या नदीची एकूण लांबी सुमारे 2900 किलोमीटर इतकी असून, पश्चिम पूर्व या दिशेने वाहते.

ही नदी बांगलादेश मधून देखील वाहते. ही जगातील 9 नंबरची नदी आहे. या नदीचे नदी प्रणाली क्षेत्र सुमारे 2,58,008 चौरस किलोमीटर इतके आहे. या नदीला समृद्ध अशा उपनद्या लाभलेल्या आहेत. यामध्ये दिबांग, लोहित, सुबनसिरी, कामेंग, धनशिरी, बेलसिरी, चंपामन, गंगाधर, रैधाह इत्यादी नद्यांचा समावेश होतो.

ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवास :

ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवास हा गंगा गंगेच्या संगमा पर्यंतच 1800 मैल आहे तसेच हा प्रवास केल्यानंतर ती बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते.
तसेच या नदीला आशिया खंडातील सर्वात लांब नदी म्हणूनही ओळखले जाते.

ही नदी हिमालय पर्वत रांगेतील ती बीडच्या बुरांग जिल्ह्यांमध्ये त्सांगपो किंवा यारलुंग झांबो ह्या नावाने उगम पाहून पूर्वेकडे वाहत जाते व भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये प्रवेश करते. बांगलादेशामध्ये तिला जमुना या नावाने ओळखले जाते बांगलादेशात ब्रह्मपुत्रेला प्रथम पद्मा ही गंगा नदीपासून फुटलेली नदी व मेघना या दोन नद्या मिळतात. गंगेच्या त्रिभुज प्रदेशामध्ये येऊन ब्रह्मपुत्रा आणि बंगालच्या उपसागराला मिळते.

ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्या :

आसाम राज्याच्या आसाम खोऱ्यामध्ये सादिया या शहराच्या पश्चिमी दिशेस या मैदानी प्रदेशात ब्रह्मपुत्रा नदी चीनमधून भारतात प्रवेश करते. या नदी ला पुढे दिबांग व लोहित या दोन उपनद्या येऊन मिळतात व याच संयुक्त नदीच्या प्रवाहाला ब्रह्मपुत्रा असे म्हणले जाते.

पुढे जाऊन सुबंसिरी, कमिंग, बेलसिरी, धनशिरी, चंपामन, गंगाधर, रैधाह या नद्या ब्रम्हपुत्रेस येऊन मिळतात. मोठ्या प्रमाणात ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्या असल्यामुळे या नदीचा प्रवाह खूप मोठ्या प्रमाणात वाढतो.

भारताच्या आसाम या राज्यांमध्ये ब्रह्मपुत्रेचा आकार हा खूप विस्तृत प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. मोठ्या प्रवाहामुळे या नदीचे पात्र खूप रुंद झाले आहे. परिणामी या नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेटे बघावयास मिळतात. त्यातीलच एक ‘माजुली’ हे बेट जगातील नदीपात्रातील सर्वात मोठे बेट समजले जाते.

या बेटाचे क्षेत्रफळ 1225 चौरस किलोमीटर इतके असून आसाम सरकारने या भेटायला नवीन जिल्ह्याचा दर्जा देखील दिला आहे. या बेटावर 1,50,000 पेक्षाही जास्त लोकसंख्या वास्तव्य करत आहे. पुढे ही नदी पश्चिम दिशेस कारो या टेकड्यांना गोलपाडा शहराजवळ वळसा घालते. व पुढे दक्षिणेकडे वाहायला लागते. पुढे इथून 270 किलोमीटर प्रवास करून ही नदी पद्मा या नदीला गोलंदो या शहराजवळ मिळते.

पुढे वाहत गेल्यानंतर या नदीला पद्मा या नावानेच ओळखले जाते. पुढे जाऊन या संयुक्त पद्मा नदी प्रवाहाला एकशे पाच किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूने आसाम येथे उगम पावलेली मेघना ही नदी येऊन मिळते. शेवटी हा संयुक्त नदी प्रवाह मेघना या नावाने बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतो.

ब्रह्मपुत्रा नदीकिनारी लोकजीवन :

एकोणिसाव्या शतकापासून बंगालमधून आसामच्या खोऱ्याकडे अनेक लोकांनी स्थालंतर केलेले असल्यामुळे बंगाली लोकांची संख्या तेथे जास्त आढळते. हे स्थलांतरित लोक सुपीक जमिनीवर शेती व्यवसाय करतात.

आजही आसामच्या खोऱ्यात शेजारील देशांतून येणारे स्थालंतरित ही एक अत्यंत चिंतेची बाब बनली आहे. ब्रह्मापुत्रा नदी तसेच तिच्या उपनद्यांमुळे होणरी धूप व पूरपरिस्थिती आटोक्यात आणणे निकडीचे आहे.

पूर नियंत्रण व उद्योग :

1954 पासून पूरनियंत्रक प्रकल्पांच्या, बंधाऱ्यांच्या व नदीकाठांवर बांध घालण्याच्या कामाला आरंभ झाला आहे. भारत सरकारने 31 डिसेंबर 1981 रोजी ‘ब्रह्मपुत्रा मंडळ’ नेमले असून त्याचे मुख्यालय गौहाती येथे ठेवण्यात येणार आहे.

पूरनियंत्रण, नदी खोऱ्याची धूप कमी करणे, जलनिःसारणातील सुधारणा, जलसिंचन, वीजनिर्मिती, जलवाहतूक इ. उपयुक्त सोयींच्या विकासाची सर्व कार्ये या मंडळाकडे सोपविण्यात आली आहेत. जलविद्युतनिर्मितीची क्षमता भरपूर असली, तरी प्रत्यक्षत नदीचा विशेष वापर करून घेतलेला आढळत नाही.

मात्र गौहातीजवळील बरपणी व उमिअम हे एकूण सु. 60,000 किंवा विद्युतनिर्मिती क्षमता असलेले दोन प्रकल्प उल्लेखनीय आहेत. आसाममधील चहाचे मळे, खनिज तेल, कोळसा, नैसर्गिक वायू व बांगला देशातील ताग ही ब्रह्मपुत्रेच्या खालच्या टप्प्यातील प्रमुख आर्थिक संपदा आहे.

नदीच्या पाण्याचा वाहतुकीसाठी भरपूर वापर करून घेतला, तर या संपत्तीचा अधिक चांगल्या द्रुतवाह व धबधब्यांमुळे वाहतुकीस उपयोगी ठरता नाही. आसामचा 55% व्यापार या नदीमार्गातून चालतो.

वाहतूक व्यवस्था :

ब्रह्मपुत्रा नदीवर पूल बांधलेलेच नाही. त्यामुळे रस्ते व लोहमार्ग प्रामुख्याने नदीपात्राला समांतर गेलेले आढळतात. 1963 मध्ये गौहातीजवळ एक पूल बांधण्यात आला आहे.

आसाममधील सदिया, दिब्रुगड, जोरहाट, तेझपुर, गौहाती, गोआलपाडा व धुब्री तर बागंला देशातील कुडिग्राम, रहुमारी, चिलमारी, बहादुराबाद घाट, फुलचरी, सरिशाबारी, जगन्नाथगंज घाट, नगरबारी, सिराजगंज व ग्वालंदो ही ब्रह्मपुत्रा नदीतीरावरील प्रमुख शहरे असून नदी पार करण्याच्या दृष्टीनेही ती महत्त्वाची आहेत.

वातावरणाचा ब्रह्मपुत्रा नदीवर होणारा परिणाम :

ब्रह्मपुत्रेच्या पाणलोट क्षेत्रात व उगम क्षेत्रात अर्थातच कैलास पर्वताच्या श्रेणीमध्ये बर्फ वितळून निर्माण झालेले पाणी हा या प्रवाहाचा मोठा स्त्रोत आहे.

मात्र दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे ब्रह्मपुत्रा पाणलोट क्षेत्रात बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. परिणामी पूरस्थिती, नदी प्रवाहाचे घर्षण, व काठावरील जमिनीची धूप इत्यादी महत्त्वपूर्ण धोके निर्माण होतात.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment