कष्टाचे महत्त्व मराठी निबंध Kastache Mahatva Marathi Nibandh

Kastache Mahatva Marathi Nibandh नमस्कार मित्रांनो! आपले…….या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती आणि निबंध वाचायला मिळेल. आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” कष्टाचे महत्त्व मराठी निबंध” घेवून आलोत. आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

Kastache Mahatva Marathi Nibandh

कष्टाचे महत्त्व मराठी निबंध Kastache Mahatva Marathi Nibandh

आपले आयुष्य सुखात आणि आरामदायी जगण्यासाठी काहीना काही धडपड करीत असतो. म्हणजेच कुठला तरी व्यवसाय, रोजगार, काम, उद्योग धंदे असं काही ना काही करत असतो. थोडक्यात आपले जीवन आरामदायी आणि सुखी जगण्यासाठी व्यक्ती कष्ट करीत असतो. आणि या कष्टातून मिळालेला पैसा व तो आपले कुटुंबाचे व स्वतःची उपजीविका करत असतो.

खरंच! कष्टाला आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. जो व्यक्ती कष्ट करतो तो नक्कीच यशस्वी होतो. त्यामुळे सुखी जीवन जगायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये कष्टाला तितकेच महत्त्वाचे स्थान आहे जितके अन्न आणि झोपेला असते. कष्टा शिवाय जीवन व्यर्थ आहे कारण निसर्ग आधारे दिलेल्या संसाधनाचा योग्य उपाय तोच व्यक्ती करतो जो मेहनती किंवा कष्टाळू असतो.

एखादा आळशी व्यक्तीचा विचार केला तर तो व्यक्ती कुठलेही कष्ट न केल्याने त्याला निसर्गात असलेल्या गोष्टींची जाणीवच नसते किंवा कष्टाचे महत्त्व समजलेले नसते त्यामुळे असे व्यक्ती कुठलेही काम करण्यासाठी आळशीपणा करतात. व त्यातून होणारे लाभापासून देखील वंचित राहतात.

म्हणून भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की,

” कर्मण्येवाधिकारस्तू या फलेषु कदाचन:| “

या श्लोकाचा अर्थ असा कि, परिश्रम म्हणजेच कष्ट अर्थात कार्य किंवा कर्म हेच माणसाची खरी पूजा आणि अर्चना असते. या पूजेशिवाय किंवा अर्चना शिवाय कुठलाही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. जो व्यक्ती कष्ट करण्यापासून दूर राहतो तो आळशी आणि नेहमी इतरांवर अवलंबून असतो. अशा व्यक्तीला आपल्या जीवनाचे महत्त्व देखील कळत नाही.

कष्टाचे महत्त्व आतापासूनच सांगत आलेले नसून पूर्वीच्या काळापासून कष्टाचे महत्त्व सांगितलेले आहे. कठोर परिश्रम करून जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतो त्याला कष्टाचे महत्त्व समजतेच त्यासोबत याचे देखील महत्त्व समजते. कष्टाच्या बळावर आणि कष्टाच्या जोरावर या जगातील कुठलीही गोष्टी साध्य करता येते व मिळवता देखील येते.

कष्टाळू व्यक्ती आपल्या कर्मा द्वारे स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाच्या सर्व इच्छांची पूर्ती करतात. असे लोकं संकटांना न घाबरता धैर्याने सामोरे जातात. त्यामुळे जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला कष्ट करणे अनिवार्य आहे.

शेतकरी शेतात कष्ट करतो म्हणूनच देशातील सर्व लोक आज पोटभर अन्न खाऊ शकतात. शेतकरी स्वतःच्या कष्टानेच ओसाड पडलेल्या जमिनीला सोन्याचे रूप सुद्धा देतो. एवढेच नसून एखादा मूर्तिकार स्वतःच्या कष्टातून ओबडधोबड दगडाला सुंदर मूर्तीचा आकार देतो. कष्टाने किंवा परिश्रमाने मन लावून अभ्यास केलात एखादा विद्यार्थी परीक्षेमध्ये नक्कीच यशस्वी होतो.

सांगायचे एवढेच की, कष्ट हे कसे साधन आहे ज्याच्या मदतीने व्यक्ती जीवनातील सर्वच समस्येपासून सुटका मिळवू शकतो. नियमित केलेले कष्ट हे आपल्याला आपल्या ध्येया पर्यंत पोहोचण्यासाठी मदत करते.

आज जगातील प्रत्येक देश कठीण परिश्रम करून यश मिळवीत आहे. कष्टाळू किंवा मेहनती व्यक्तीला फक्त जिवंतपणीच नसून मिळाल्यानंतर हे यश प्राप्त होते. त्यामुळे ज्या देशाचे लोक कष्टाळू असतात त्या देशाचा विकास आपोआप होतो. या उलट ज्या देशाचे नागरिक आयुष्य आणि भाग यावर अवलंबून असतात तो देश नक्कीच गुलाम बनतो.

ज्या पद्धतीने सूर्याच्या प्रकाशाने संपूर्ण अंधकार दूर करतो त्या प्रमाणे कष्ट हे अज्ञानी व्यक्तीच्या जीवनातील अंधकार दूर करून त्यांना चा प्रकाश पाडते. कठिण परिश्रमाशिवाय प्रगती संभव नाही. कारण आपल्या समोर जरी स्वादिष्ट व्यंजनाचे ताठ असले तरी आपण आपल्या हाताने कार्य केल्याशिवाय ते व्यंजन खाता येत नाहीत. त्यासाठी कष्ट करावेच लागते. तेव्हा समोर असलेल्या स्वादिष्ट व्यंजनांचा आस्वाद घेता येतो.

कष्टाचे महत्त्व समजून घेण्यासाठी आपण आपल्या आजूबाजूला झालेल्या नवनवीन शोधांचा आणि प्रगतीचा विचार केला पाहिजे. मोठमोठ्या शास्त्रज्ञाने कष्ट करून नवनवीन शोधांचा पराक्रम करून दाखवला आणि त्यामुळेच आज आपले जीवन जगणे सोयीस्कर झालेले आहे. एवढेच नसून स्वतःच्या कष्टावर आजचा माणूस चंद्रावर देखील जाऊन आलेला आहे.

म्हणून मानवी जीवनात कष्टाला अनन्य साधारण महत्व आहे. जो व्यक्ती नेहमी कार्यरत राहतो कठोर परिश्रम घेतो त्याच्या पदरात यश नक्कीच असते.

तर मित्रांनो! “कष्टाचे महत्त्व मराठी निबंध” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

“कष्टाचे महत्त्व मराठी निबंध” यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

धन्यवाद!

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

कष्ट म्हणजे काय ?

श्रम म्हणजे कुठलं तरी ध्येय प्राप्त करण्यासाठी व्यक्ती जे शारीरिक, बौद्धिक कष्ट किंवा मेहनत घेणे. त्याला एका अर्थाने काम किंवा कार्य पण म्हणतात.

जीवनात कष्ट म्हणजे काय?

अशी स्थिती जी सहन करणे कठीण आहे; दुःख वंचितता अत्याचार : कष्टाचे जीवन. याचे एक उदाहरण किंवा कारण; वंचित राहणे, सांत्वनाची कमतरता किंवा सतत परिश्रम किंवा धोका म्हणून सहन करणे कठीण आहे: त्यांनी सीमावर्ती जीवनातील अनेक संकटांना धैर्याने तोंड दिले.

कष्ट का समानार्थी शब्द मराठी?

तणाव, वेदना, आकुंचन, त्रास, क्रुसिफाइ इ

कष्ट का आवश्यक आहे?

आपण कोण आहोत आणि कोण बनणार आहोत हे आपल्याला आकार देते. त्यातून मात करण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो आणि आपल्या मार्गात न येणाऱ्या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी शिकण्याची यंत्रणा निर्माण होते. कठीण प्रसंगांना तोंड देऊन आणि त्यावर मात करून तुम्ही लवचिकता निर्माण करता.

कष्ट हा जीवनाचा भाग आहे का?

वेदना आणि त्रास जाणवणे हा मानवी जीवनाचा एक सार्वत्रिक पैलू आहे आणि त्याशिवाय जगण्याची इच्छा करणे हा वेडेपणा आहे. का? कारण केवळ अशक्यच नाही, तर पूर्ण जीवन जगण्यासाठी दुःख आणि कष्ट आवश्यक आहेत.

Leave a Comment