Instagram Application Information In Marathi Instagram application बद्दल माहिती आणि Instagram application कसे वापरावे ? मित्रांनो इंस्टाग्राम हे सोशल मीडियाचे एक ॲप्लिकेशन आहे जे फोटो शेअरिंग साठी वापरली जाते. इंस्टाग्राम एप्लीकेशन ची सुरुवात अकरा वर्षांपूर्वी सहा ऑक्टोबर 2010 ला झाली. ह्या एप्लीकेशन चा शोध केविन सिस्ट्रोम यांनी लावला. इंस्टाग्राम ला फेसबूक कंपनीने 2012 मध्ये 7530 करोड रुपयांमध्ये मध्ये विकत घेतले. ह्या एप्लीकेशन चा वापर करून आपण फोटो, व्हिडिओ एकमेकांस शेअर करू शकतो. चला तर मग हे ॲप्लिकेशन कसे वापरावे हे पुढील लेखात माहिती करून घेऊया.
इंस्टाग्राम ॲप्लिकेशन ची संपूर्ण माहिती Instagram Application Information In Marathi
इंस्टाग्राम एप्लीकेशन कसे सुरु करावे ?
मित्रांनो इंस्टाग्राम एप्लीकेशन आणि वेबसाइट अशा दोन्ही सुविधेमध्ये उपलब्ध आहे, जर आपण मोबाईल किंवा संगणक वापर करत असाल तर ह्या सुविधेचा वापर करू शकता. तुम्हाला इंस्टाग्राम ॲपलिकेशन सुरू करण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये असलेल्या ॲप स्टोअर ला visit करून तेथून इंस्टाग्राम चे एप्लीकेशन डाउनलोड करावे लागेल, इंस्टाग्राम चे एप्लीकेशन डाउनलोड झाल्यानंतर ते आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.
इंस्टाग्रामचे ॲप्लिकेशन मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर, इंस्टाग्राम चे ॲप्लिकेशन सुरू करण्यासाठी पुढील प्रमाणे स्टेप्स करा :-
- आपल्या मोबाईल मधील इन्स्टॉल केलेले इंस्टाग्राम चे एप्लीकेशन उघडा.
- इंस्टाग्राम चे एप्लीकेशन उघडल्यानंतर त्यासमोर इंस्टाग्राम अकाउंट तयार करण्यासाठी काही पर्याय येतील, इंस्टाग्राम वर अकाउंट तयार करण्यासाठी तुम्ही जर तुमच्याकडे अगोदरच फेसबुकचे अकाऊंट असेल तर तुम्ही फेसबुकचे आयडी आणि पासवर्ड वापरून इंस्टाग्रामवर ॲप्लिकेशन सुरू करण्यासाठी वापरू शकता, जर तुमच्याकडे फेसबुकचे अकाऊंट नसेल तर समोर दिलेल्या Sign up with phone or email या पर्यायावर क्लिक करा.
- Sign up with phone or email या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे फोन नंबर किंवा ईमेल आयडी टाकण्यासाठी पर्याय येईल.
- समोर फोन नंबर किंवा ईमेल आयडी आलेल्या पर्यायांमध्ये आपला स्वतःचा फोन नंबर किंवा ईमेल आयडी टाका.
- जर तुम्ही फोन नंबर टाकलात तर खाली असणाऱ्या Next या पर्यायावर क्लिक करा.
- Next या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुम्हाला तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर वर इंस्टाग्राम कडून मोबाईल नंबरच्या कन्फर्मेशन साठी एक कन्फर्मेशन कोड पाठवला जाईल, तो कोड स्क्रीन वर कन्फर्मेशन कोड टाकण्यासाठी आलेल्या पर्यायांमध्ये जसाच्या तसा टाका.
- कन्फर्मेशन कोड टाकल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे नाव आणि पासवर्ड टाकण्यासाठी पर्याय येथील, तेथे तुमच नाव आणि सहा अंकी पासवर्ड ठरवून टाका.
- तुमचे नाव आणि पासवर्ड टाकल्यानंतर खालील असणाऱ्या Continue या पर्यायावर क्लिक करा.
- Continue पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर इंस्टाग्राम कडून तुमच्या मोबाईल मधील सेव असलेले कॉन्टॅक्ट नंबर वापरण्याबाबत विचारण्यात येईल तेथे तुम्ही हवे असल्यास परमिशन देण्यासाठी allow या पर्यायावर क्लिक करू शकता नाहीतर Deny या पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या समोर इंस्टाग्राम कडून वेलकम बद्दल सांगितले जाईल, तेथे Next या पर्यायावर क्लिक करा.
अशाप्रकारे मित्रांनो आपण हे ॲप्लिकेशन सुरू करू शकतो.
इंस्टाग्राम एप्लीकेशन वर प्रोफाईल कशी पूर्ण करावी ?
मित्र इंस्टाग्राम एप्लीकेशन चालू केल्यानंतर आपल्याला इंस्टाग्राम ची प्रोफाइल पूर्ण करावी लागते जसे की आपले नाव, इंस्टाग्राम अकाउंटचे प्रोफाइल पिक्चर, युजर नेम इत्यादी माहिती टाकावी लागते.
जर तुम्हाला ही माहिती करून घ्यायची असेल की इंस्टाग्राम ॲप्लिकेशनवर प्रोफाइल कशी पूर्ण करावी तर पुढील स्टेप्स करा :-
- आपल्या मोबाईल मधील इंस्टाग्राम चे एप्लीकेशन ओपन करा.
- इंस्टाग्राम एप्लीकेशन ओपन केल्यानंतर, तुमच्या समोर उजव्या बाजूस खालील कोपऱ्यात एक गोलाकार पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.
- उजव्या बाजूने खालील कोपऱ्यात असणाऱ्या गोलाकार पर्यावर क्लिक केल्यावर, तुमच्या समोर तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट ची प्रोफाइल दिसेल.
- तुमचे इंस्टाग्राम अकाउंट नवीन असल्यामुळे तुमची प्रोफाईल पूर्णपणे रिकामी असेल, तेथे फक्त तुमचे नाव दिसेल म्हणून तेथे Edit profile असे एक पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.
- Edit profile या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या इंस्टाग्राम अकाऊंटचे प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी काही माहिती विचारली जाईल जसे की तुमचे प्रोफाइल पिक्चर, तुमच्या बद्दल थोडक्यात माहिती इत्यादी.
- सर्व माहिती टाकल्यानंतर उजव्या बाजूस वरच्या भागात असणाऱ्या बरोबरच्या चिन्हावर क्लिक करा, तुमची सर्व माहिती सेव होऊन जाईल.
अशाप्रकारे मित्रहो आपण इंस्टाग्राम एप्लीकेशन वर आपल्या अकाउंट ची प्रोफाइल पूर्ण करू शकतो.
इंस्टाग्राम ॲप्लिकेशनवर एखाद्याला follow कसे करावे ?
मित्रहो आपण इंस्टाग्राम एप्लीकेशन वर आपल्या ओळखीच्या व्यक्तीचे नाव शोधून त्याला फॉलो देखील करू शकतो.
जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल की इंस्टाग्राम ॲप्लिकेशन वर एखाद्याचे नाव शोधून त्याला फॉलो कसे करावे तर पुढील स्टेप्स करा :-
- आपल्या मोबाईल मधील इंस्टाग्राम चे एप्लीकेशन ओपन करा.
- इंस्टाग्राम एप्लीकेशन ओपन केल्यानंतर, तुमच्या समोर खालच्या बाजूस दुसऱ्या नंबर वर असणारे एक भिंगासारखे पर्याय असेल, त्या पर्यायावर क्लिक करा.
- भिंगासारख्या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुमच्या समोर व्यक्तीचे नाव टाकून त्याचे इंस्टाग्राम अकाउंट शोधण्यासाठी वरच्या बाजूस एक पट्टी सारखे पर्याय येईल, त्या पर्यायावर क्लिक करा व तिथे तुम्हाला शोधायचे असलेल्या व्यक्तीचे नाव टाका व बाजूला असलेल्या search या पर्यायावर क्लिक करा.
- search या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर तुम्ही टाईप केलेल्या नावाच्या सारखे नाव असणारे सर्व इंस्टाग्राम अकाउंट समोर येतील, तेथे तुम्ही त्या अकाउंट च्या प्रोफाइल पिक्चर पाहून ओळख पटल्यास त्या नावावर क्लिक करा.
- ओळखीच्या व्यक्तीच्या इंस्टाग्राम अकाउंट वर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर त्या व्यक्तीची इंस्टाग्राम प्रोफाई दिसेल, तेथे तुम्हाला निळ्या रंगात Follow असे एक पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा.
अशाप्रकारे आपण इंस्टाग्राम एप्लीकेशन वर आपल्या ओळखीतील व्यक्तीला फॉलो करू शकतो.
इंस्टाग्राम अप्लिकेशन चा वापर करून एखाद्याला मेसेज कसे पाठवावे ?
तुम्हाला जर माहिती करून घ्यायचे असेल की इंस्टाग्राम ॲप्लिकेशन वर एखाद्याला मेसेज कसे करावे तर पुढील दिलेल्या स्टेप्स करा :-
- आपल्या मोबाईल मधील इंस्टाग्राम चे एप्लीकेशन ओपन करा.
- इंस्टाग्राम एप्लीकेशन ओपन केल्यानंतर, तुमच्या समोर उजव्या बाजूस वरच्या कोपऱ्यात त्रिकोणा सारखे एक चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करा.
- त्रिकोणा सारख्या दिसणाऱ्या चिन्हावर क्लिक केल्यावर, तुमच्या समोर काही पर्याय येथील, तिथे तुम्हाला Search असे एक पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा व तेथे तुम्हाला ज्या व्यक्तीस मेसेज करायचे आहे त्याचे नाव टाका.
- ज्या व्यक्तीस मेसेज करायचे आहे, त्या व्यक्तीचे नाव टाकल्यानंतर, तुमच्या समोर त्या व्यक्तीचे इंस्टाग्राम अकाउंट दिसेल, तेथे त्या वर क्लिक करा.
- तुम्हाला ज्या व्यक्तीस मेसेज करायचे आहे त्या व्यक्तीच्या इंस्टाग्राम अकाउंट वर क्लिक केल्यावर तुम्हाला मेसेज टाईप करण्यासाठी खालच्या बाजूस एक पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला जे मेसेज टाईप करायचे आहे ते टाईप करा व बाजूला असणाऱ्या Send या बटणावर क्लिक करा.
अशाप्रकारे आपण इंस्टाग्राम एप्लीकेशन चा वापर करून एखाद्याला मेसेज पाठवू शकतो.
इंस्टाग्राम एप्लीकेशन वर डार्क थीम कशी ऑन करावी ?
मित्रांनो इंस्टाग्राम एप्लीकेशन वर आपण डार्क थीम हा पर्याय वापरू शकतो, जसे की आपल्याला माहीतच आहे की डार्क थीम मुले भरपूर वेळ ॲप्लिकेशन वापरताना आपल्या डोळ्यावर येणारा ताण कमी होतो.
जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल कि इंस्टाग्राम एप्लीकेशन वर डार्क थीम कशी चालू करावी तर पुढील प्रमाणे स्टेप्स करा
- आपल्या मोबाईल मधील इंस्टाग्राम चे एप्लीकेशन ओपन करा.
- इंस्टाग्राम एप्लीकेशन ओपन केल्यानंतर, तुमच्या समोर उजव्या बाजूस खालील कोपऱ्यात एक गोलाकार पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.
- उजव्या बाजूने खालील कोपऱ्यात असणाऱ्या गोलाकार पर्यावर क्लिक केल्यावर, तुमच्या समोर तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट ची प्रोफाइल दिसेल.
- तुमच्या इंस्टाग्राम प्रोफाइल मध्ये उजव्या बाजूस वरच्या कोपऱ्यात तीन आडव्या रेषा असतील त्या वर क्लिक करा.
- उजव्या बाजूस वरच्या कोपऱ्यात तीन आडव्या रेषांवर क्लिक केल्यावर, तुमच्या समोर काही पर्याय दिसून येतील, तेथे सर्वात खाली settings असे एक पर्याय असेल त्यावर क्लिक करा.
- Settings या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुमच्यासमोर तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट ची सेटिंग उघडेल.
- Settings पर्याय मध्ये आल्यानंतर तुमच्या समोर खालच्या बाजूस theme असे एक पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- Theme या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर वेगवेगळ्या थीम दिसतील तेथे Dark या पर्यायावर क्लिक करा.
अशाप्रकारे मित्रहो इंस्टाग्राम ॲप्लिकेशन मध्ये आपण डार्क थीम चालू करू शकतो
इंस्टाग्राम एप्लीकेशनचा वापर करून व्हिडिओ कॉल कसे करावे ?
मित्रहो आपण इंस्टाग्राम अप्लिकेशन चा वापर करून आपल्या ओळखीतील व्यक्तीस किंवा आपल्या कामासंबंधीतील व्यक्तीस व्हिडिओ कॉल देखील लावू शकतो.
जर तुम्हालाही माहिती करून घ्यायची असेल की इंस्टाग्राम अप्लिकेशन वरून व्हिडिओ कॉल कसे लावावे तर पुढील स्टेप्स करा :-
- आपल्या मोबाईल मधील इंस्टाग्राम चे एप्लीकेशन ओपन करा.
- इंस्टाग्राम एप्लीकेशन ओपन केल्यानंतर, तुमच्या समोर उजव्या बाजूस वरच्या कोपऱ्यात त्रिकोणा सारखे एक चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करा.
- त्रिकोणा सारख्या दिसणाऱ्या चिन्हावर क्लिक केल्यावर, तुमच्या काही पर्याय येथील, तिथे तुम्हाला Search असे एक पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा व तेथे तुम्हाला ज्या व्यक्तीस व्हिडिओ कॉल करायचे आहे त्याचे नाव टाका.
- ज्या व्यक्तीस व्हिडिओ कॉल करायचे आहे त्या व्यक्तीचे नाव टाकल्यानंतर, तुमच्या समोर त्या व्यक्तीचे इंस्टाग्राम अकाउंट दिसेल, तेथे त्या वर क्लिक करा.
- तुम्हाला ज्या व्यक्तीस कॉल करायचे आहे त्या व्यक्तीच्या इंस्टाग्राम अकाउंट वर क्लिक केल्यावर तुम्हाला वरच्या बाजूस एक व्हिडिओ कॅमेरा सारखे एक चिन्ह दिसेल, त्या चिन्हावर क्लिक करा.
अशाप्रकारे आपण इंस्टाग्राम अप्लिकेशन चा वापर करून एखाद्याला व्हिडिओ कॉल करू शकतो
अशाप्रकारे मित्रहो, आम्ही या लेखात इंस्टाग्राम एप्लीकेशन बद्दल महत्त्वाची माहिती सांगितली आहे जी तुम्हाला इंस्टाग्राम एप्लीकेशन सुरू करण्यास आणि वापरण्यास नक्कीच मदत करेल. तुम्हाला याविषयी काही शंका असल्यास खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.
इंस्टाग्राम कशासाठी चांगले आहे?
Instagram हे iPhone आणि Android वर उपलब्ध असलेले मोफत फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग ॲप आहे.
इंस्टाग्रामचा मूळ उद्देश काय होता?
स्टाग्रामची सुरुवात सॅन फ्रान्सिस्कोमध्ये केविन सिस्ट्रॉम आणि माईक क्रिगर यांनी केली होती, ज्यांनी सुरुवातीला फोरस्क्वेअर सारखे प्लॅटफॉर्म तयार करण्याचा प्रयत्न केला परंतु नंतर त्यांचे लक्ष केवळ फोटो शेअरिंगकडे वळवले. इंस्टाग्राम हा शब्द “इन्स्टंट कॅमेरा” आणि “टेलीग्राम” चा मिश्रण आहे.
इंस्टाग्राम काय आहे आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत
Instagram वापरकर्त्यांना मोबाइल ॲपद्वारे फोटो आणि लहान व्हिडिओ संपादित आणि अपलोड करण्याची परवानगी देते .
मी इंस्टाग्रामवर माझा व्यवसाय कसा मार्केट करू?
सामग्री सामायिक करा आणि पोस्ट, कथा आणि रील यांसारखे भिन्न स्वरूप वापरून पहा आपल्या व्यवसायाबद्दल शब्द मिळवण्यासाठी . नवीन ग्राहक मिळवा. तुमच्या वेबसाइटवर क्लिक करून किंवा तुमच्या व्यवसायाच्या प्रत्यक्ष स्थानाला भेट देऊन उत्पादन किंवा सेवा खरेदी करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करा. संबंध निर्माण करा