Twitter ॲप्लिकेशन ची संपूर्ण माहिती Twitter Application Information In Marathi

Twitter Application Information In Marathi Twitter ॲप्लिकेशन बद्दल माहिती आणि Twitter हे ॲप्लिकेशन कसे वापरावे ? मित्रहो आज आपण Twitter या ॲप्लिकेशन बद्दल माहिती करून घेणार आहोत. Twitter हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे ज्याची सुरुवात 21 मार्च 2006 मध्ये झाली.  या ॲप्लिकेशनचा शोध जॅक डोर्सी, इव्हान विल्यम्स, बिझ स्टोन, नोहा ग्लास  यांनी लावला. मित्रहो ट्विटरचा वापर आज खूप  मोठ्या प्रमाणात केला जात आहे. अनेक नेत्यांची, अभिनेत्यांची, बिजनेस मेन्सची प्रोफाइल ट्विटरवर आहे, ते नेहमी आपल्या ट्विटर प्रोफाईलवरून  ट्विट करीत असतात. चला तर मग माहिती करून घेऊ या ट्विटर हेॲप्लिकेशन  कसे वापरावे.

Twitter Application Information In Marathi

Twitter ॲप्लिकेशन ची संपूर्ण माहिती Twitter Application Information In Marathi

Twitter हे ॲप्लिकेशन कसे सुरु करावे ?

 मित्रहो जर तुम्ही अँड्रॉइड किंवा IOS वापर करते असाल तर सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील ॲप्लिकेशन स्टोर मध्ये जाऊन तेथे Twitter हे नाव सर्च करा येणाऱ्या पहिल्या ॲप्लिकेशनला डाऊनलोड करा. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईल फोनमध्ये इन्स्टॉल करा.

Twitter ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यांनतर हे ॲप्लिकेशन उघडा. Twitter ॲप्लिकेशन उघड्यावर तुम्हाला Twitter चा इंटर्फेस समोर येईल. आता तुम्हाला Twitter  हे ॲप्लिकेशन पुढे सुरू करण्यासाठी येथे तुम्हाला अकाउंट तयार करावे लागेल,  ज्यामुळे तुम्ही ट्विटरवरच्या सर्व सेवांचा वापर करू शकाल.

मित्रहो  जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल की  ट्विटर वर अकाउंट कसे तयार करायचे तर पुढे दिल्याप्रमाणे स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील Twitter हे ॲप्लिकेशन ओपन करा.
  2. Twitter हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर, तुमच्या समोर Create an account आणि Have an account already असे दोन पर्याय येतील,  तेथे जर तुम्हाला अकाउंट तयार करायचे असेल तर Create an account या पर्यायावर क्लिक करा आणि जर तुमचे अकाऊंट असेल तर Have an account already या पर्यायावर क्लिक करा.  परंतु आता आपला अकाऊंट तयार करायचे आहे त्यामुळे Create an account या पर्यायावर क्लिक करा.
  3. Create an account या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर तुमचे नाव विचारले जाईल तेथे तुमचे पूर्ण नाव टाइप करा.   नाव टाईप केल्यानंतर आता खाली तुम्हाला तुमचे ईमेल एड्रेस किंवा मोबाईल नंबर विचारले जाईल तेथे तुमचे ई-मेल ऍड्रेस किंवा मोबाईल नंबर टाईप करा.
  4. तुमचे ई-मेल ऍड्रेस किंवा मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर  उजव्या बाजूला खालच्या बाजूस निळ्या रंगात असणाऱ्या Next या पर्यायावर क्लिक करा.
  5. Next या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर निल्या  रंगात Sign up असे एक पर्याय येईल त्या पर्यायावर क्लिक करा.
  6. Sign up या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर व्हेरिफिकेशन कोड टाकण्यासाठी पर्याय येईल, तेथे जर तुम्ही तुमचे ईमेल एड्रेस वापरले असेल तर तुमच्या ई-मेल अकाउंट मध्ये जाऊन ट्विटर कडून आलेला मेल ओपन करून तेथून व्हेरिफिकेशन कोड कॉपी करून त्या पर्यायामध्ये पेस्ट करा.  पण जर तुम्ही मोबाईल नंबर चा वापर केला असेल तर तुम्हाला ट्विटर कडून आलेले मेसेज ओपन करून तेथील असणारा वेरिफिकेशन कोड कॉपी करून तो पर्यायामध्ये पेस्ट करा.
  7. वेरिफिकेशन कोड पर्यायामध्ये टाकल्या नंतर उजव्या बाजूला खालच्या बाजूस असणार्‍या Next या पर्यायावर क्लिक करा.
  8. Next या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या ट्विटर अकाउंट  साठी पासवर्ड विचारण्यात येईल,  तेथे कमीत कमी सहा किंवा त्यापेक्षा  जास्त अंक असणारा पासवर्ड ठरवा व तेथे टाईप करा.
  9. पासवर्ड टाइप केल्यानंतर उजव्या बाजूला खालच्या बाजूस असणार्‍या Next या पर्यायावर क्लिक करा.
  10. पासवर्ड ठरवून झाल्यानंतर आता तुम्हाला तुमच्या ट्विटर प्रोफाइल साठी प्रोफाइल फोटो काय ठेवायचे आहे हे विचारण्यात येईल तेथे समोर असणाऱ्या Upload या पर्यायावर क्लिक करून, तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील जे फोटो प्रोफाइल फोटो ठेवायचे आहे ते फोटो निवडा.
  11. प्रोफाइल फोटो निवडून झाल्यानंतर पुन्हा उजव्या बाजूला खालच्या बाजूस असणार्‍या Next या पर्यायावर क्लिक करा.
  12. आता तुम्हाला तुमच्या बद्दल काही माहिती म्हणजेच Bio टाकण्यासाठी पर्याय येईल,  तेथे क्लिक करून तुमच्या बद्दल १६० अक्षरापर्यंत माहिती टाईप करा.
  13. माहिती टाईप करून झाल्यानंतर उजव्या बाजूला खालच्या बाजूस असणार्‍या Next या पर्यायावर क्लिक करा.
  14. आता तुम्हाला तुमच्या मोबाईल कॉन्टॅक्ट मधील असलेले व्यक्ती ट्विटरवर शोधण्यासाठी twitter कडून Sync contacts असे एक पर्याय दाखवले जाईल, तेथे जर तुम्हाला हवे असल्यास Sync contacts या पर्यायावर क्लिक करा आणि जर नको हवे असल्यास Not now या पर्यायावर क्लिक करा.
  15. अशाप्रकारे Not now या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला कशात इंटरेस आहे याबाबतीत twitter कडून विचारण्यात येईल, जसे की News, Lifestyle, Business & CEO’s, Entertainment, Sports, TV, Politics तेथे तुमच्या इंटरेस्ट नुसार तेथे दाखविला गेलेल्या गोष्टींवर क्लिक करून निवडू शकता व नंतर उजव्या बाजूला खालच्या बाजूस असणार्‍या Next या पर्यायावर क्लिक करा.
  16. आता तुम्हाला तुमच्या समोर ट्विटरवर वरील काही प्रोफाइल्स दाखवले जातील, तेथे तुम्ही त्यांना हवे असल्यास   त्यांच्या समोर असणार्‍या Follow या पर्यायावर क्लिक करून फॉलो करू शकता व नंतर उजव्या बाजूला खालच्या बाजूस असणार्‍या Follow या पर्यायावर क्लिक करा. अशाप्रकारे Twitter ॲप्लिकेशन सुरू होईल आणि तुम्हाला तुमच्या समोर तुम्ही ज्या व्यक्तीला फॉलो केलेत त्या व्यक्तीने केलेले ट्विटस तुमच्यासमोर दिसतील.

अशाप्रकारे मित्रहो आपण Twitter हे ॲप्लिकेशन सुरू करू शकतो.

Twitter वर प्रोफाइल कसे पूर्ण करावे ?

मित्रहो ट्विटर वर प्रोफाईल मध्ये जाऊन आपण आपली प्रोफाईल  पूर्ण करू शकतो म्हणजेच आपण आपल्या शैक्षणिक डिटेल्स,  आपण कुठे काम करतो,  आपले कामाचे अनुभव  अशा प्रकारच्या सर्व गोष्टी येथे टाकू शकतो.

मित्रहो जर तुम्हाला देखील माहिती करून घ्यायची असेल Twitter या ॲप्लिकेशनवर प्रोफाईल कशी पूर्ण करावे तर पुढील दिल्याप्रमाणे  स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल ट्विटर हे एप्लीकेशन ओपन करा.
  2. Twitter एप्लीकेशन ओपन केल्यानंतर,  तुमच्या समोर तुम्ही फॉलो केल्या व्यक्तींचे ट्विट दिसतील, तेथे डाव्या बाजूला वरच्या बाजूस असणाऱ्या तुमच्या ट्विटरवरील प्रोफाइल फोटोच्या आयकॉन वर क्लिक करा.
  3. प्रोफाइल फोटोच्या आयकॉन वर क्लिक  केल्यावर तुमच्यासमोर काही पर्याय असतील त्यातील पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या Profile या पर्यायावर क्लिक करा.
  4. Profile या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर तुमची ट्विटरची प्रोफाइल ओपन होईल.
  5. प्रोफाईल या पर्यायांमध्ये आल्यानंतर तुमच्या  समोर तुम्ही ट्विटर प्रोफाईल मध्ये अकाऊंट तयार करताना टाकलेली माहिती दिसेल तेथे ट्विटरच्या प्रोफाइल फोटो समोर Edit profile असे एक पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.
  6. Edit profile या पर्यायावर क्लिक केल्यावर, येथे तुम्ही तुमचे ट्विटर प्रोफाइलचे नाव, तुमची जन्मदिनांक, वेबसाईट, तुमच्या बद्दल माहिती, ही सर्व माहिती टाकू शकता, त्याचप्रमाणे येथे तुम्ही प्रोफाइल फोटो देखील बदलू शकता आणि कव्हर फोटो देखील ठेवू शकता.
  7. माहिती टाकून झाल्यानंतर तुम्ही टाईप केलेली सर्व माहिती सेव करण्यासाठी, उजव्या बाजूला वरच्या भागात असणाऱ्या Save या पर्यायावर क्लिक करा,  तुम्ही टाकलेले सर्व माहिती सेव्ह होऊन जाईल.

अशाप्रकारे मित्रहो आपण ट्विटर या ॲप्लिकेशनवर प्रोफाइल पूर्ण करू शकतो.

Twitter वर ट्विट कसे करायचे ?

मित्रहो आपण ट्विटरवर ट्विट करून फोटो व्हिडिओ किंवा एखादी माहिती शेअर करू शकतो,  आपण  ट्विटरवरील ट्विट च्या माध्यमातून शेअर केलेली माहिती किंवा फोटो लोकांना आवडल्यास ते आपले ट्विटवर कमेंट किंवा लाईक देखील करतात.

मित्रहो जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल कि ट्विटरवर ट्विट कसे करायचे  तर पुढीलप्रमाणे स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल ट्विटर हे एप्लीकेशन ओपन करा.
  2. Twitter एप्लीकेशन ओपन केल्यानंतर, तुमच्या समोर तुम्ही फॉलो केल्या व्यक्तींचे ट्विट दिसतील.
  3. तुमच्या समोर उजव्या बाजूला ट्विट करण्यासाठी खालच्या बाजूस एक निळ्या रंगाच्या गोलाकार आकारात अधिकचे चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करा.
  4. अधीकच्या चिन्हावर क्लिक केल्यावर, तुमच्यासमोर Whats happening? असे दिलेले पर्याय असेल त्यावर क्लिक करून तुम्हाला ट्विट करण्यासाठी जी माहिती टाईप करायची आहे ती तिथे टाइप करा.
  5. माहिती टाकून झाल्यानंतर तुम्ही खाली असणाऱ्या पर्यायांमध्ये पहिल्या पर्यायावर क्लिक करून तुमच्या मोबाईल मधील असणारे फोटो निवडून सुद्धा ट्विटमध्ये घेऊ शकता. फोटो टाकले नंतर तुम्हाला ते फोटो कोणत्या लोकेशन मध्ये आहे हे टाकण्यासाठी Add location असे एक पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही लोकेशन देखील टाकू शकता.
  6. जर तुम्हाला ट्विट मध्ये  एखादा ट्विटरवरील अकाउंटला मेंशन करायचे आहे,  तर तुमच्या ट्विट मधील टाईप केलेल्या माहिती नंतर @  असे टाइप करा, आणि त्यापुढे त्या व्यक्तीचे नाव टाईप करायला सुरुवात करा,  तुम्हाला ट्विटर कडून सजेशन मध्ये त्या व्यक्तीचे प्रोफाइल दाखवण्यात येईल त्यावर क्लीक करा. अशाप्रकारे ट्विटमध्ये सर्व टाकून झाल्यानंतर ते पब्लिश करण्यासाठी उजव्या बाजूला वरच्या भागात नीळ्या रंगात असणाऱ्या Tweet या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे मित्रहो आपण Tweeter या ॲप्लिकेशनवर ट्विट करू शकतो.

अशाप्रकारे मित्रहो आम्ही या लेखात ट्विटर बद्दल खूप महत्त्वाची माहिती सांगितली आहे, जी तुम्हाला ट्विटर म्हणजे काय आणि ते कसे वापरावे हे समजण्यास नक्कीच मदत करेल.  जर तुम्हाला लेखाबद्दल काही शंका असल्यास खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ट्विटर बद्दलचा हा लेख आवडला असल्यास आपल्या मित्रांना सोशल मीडियावर पाठवायला विसरू नका.


twitter चा मुख्य उपयोग काय आहे?

Twitter चा प्राथमिक उद्देश त्याच्या वापरकर्त्यांना जोडणे आणि हॅशटॅग वापरून त्यांचे विचार त्यांच्या अनुयायांसह आणि इतरांसोबत सामायिक करू देणे हा आहे . हे बातम्या, मनोरंजन आणि व्यवसायांसाठी एक विपणन साधन असू शकते.


ट्विटर हा कोणत्या प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे?

Twitter ही एक विनामूल्य सोशल नेटवर्किंग साइट आहे जिथे वापरकर्ते ट्विट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छोट्या पोस्ट प्रसारित करतात. या ट्विटमध्ये मजकूर, व्हिडिओ, फोटो किंवा लिंक असू शकतात. Twitter वर प्रवेश करण्यासाठी, वापरकर्त्यांना ॲप किंवा वेबसाइट, Twitter.com वापरण्यासाठी इंटरनेट कनेक्शन किंवा स्मार्ट फोन आवश्यक आहे.

ट्विटर ची सुरुवात कधी झाली?

ट्विटर सेवा ही इंटरनेटवर २००६ मध्ये सुरू झाली, आणि सुरू झाल्यावर तंत्रप्रेमी लोकांत, विशेषतः युवा वर्गात खूप लोकप्रिय झाली.


तुम्ही ट्विटर अकाउंट कसे सेट कराल?

www.twitter.com वर जा आणि “प्रारंभ करा” बटणावर क्लिक करा. आपले नाव, इच्छित वापरकर्तानाव, संकेतशब्द आणि ईमेल पत्ता प्रविष्ट करा. खालील बॉक्समध्ये चित्रात दाखवलेले दोन शब्द टाइप करा . हे फक्त तुम्ही मनुष्य आहात याची खात्री करण्यासाठी आहे आणि स्पॅम खाते तयार करण्याचा प्रयत्न करणारा संगणक प्रोग्राम नाही.

Leave a Comment