MSRTC अँप्लिकेशन ची संपूर्ण माहिती MSRTC Application Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

MSRTC Application Information In Marathi MSRTC या अँप्लिकेशन बद्दल माहिती आणि MSRTC हे अँप्लिकेशन कसे वापरावे ? मित्रहो आपण या लेखात MSRTC या महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या ॲप्लिकेशन बद्दल माहिती करून घेणार आहोत, हे ॲप्लिकेशन महामंडळाने सर्व प्रवाशाना त्यांच्या मोबाईलचा वापर करून एसटी मध्ये रिझर्वेशन करण्यासाठी काढला आहे, ज्या मुळे प्रवासी घरबसल्या एसटीचे तिकीट बुक करू शकतो. या ॲप्लिकेशनचा वापर करून आपण चार वेगवेगळ्या महामंडळाच्या बसचे तिकीट बुक करू शकतो जसे की साधी बस, शिवनेरी, शिवशाही स्लीपर, शिवशाही इत्यादी. चला तर माहिती करून घेऊया हे ॲप्लिकेशन कसे वापरावे.

Msrtc Application Information In Marathi

MSRTC अँप्लिकेशन ची संपूर्ण माहिती MSRTC Application Information In Marathi

MSRTC हे ॲप्लिकेशन कसे वापरावे ?

मित्रहो जर आपण अँड्रॉइड किंवा IOS वापरकर्ते असाल तर आपण आपल्या मोबाईल मधील ऍप्लिकेशन स्टोर ला भेट देऊन तेथून MSRTC या नावाचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा. MSRTC हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला त्या एप्लीकेशन मध्ये जर तिकीट बुक करायचे असेल तर एप्लीकेशन मध्ये आपल्याला अकाऊंट तयार करावे.

अशाप्रकारे आपण मोबाईल मध्ये हे ॲप्लिकेशन सुरू करू शकतो.

MSRTC अँप्लिकेशन वर आपले खाते कसे खोलावे ?

मित्रहो MSRTC च्या ॲप्लिकेशन मध्ये आपल्याला काही सुविधांचा वापर करण्यासाठी या ॲप्लिकेशनवर खाते खोलावे लागते जसे की तिकीट बुक करण्यासाठी.

जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल की MSRTC या एप्लीकेशन वर खाते कसे खोलावे तर पुढे स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील MSRTC हे एप्लीकेशन उघडा.
  2. MSRTC  हे ॲप्लिकेशन उघडल्यानंतर, तेथे तुम्हाला चार वेगळ्या प्रकारच्या बसेस दिसतील तेथे कोणत्याही बस च्या चित्रावर क्लिक करा व नन्तर डाव्या बाजूला वरच्या भागात असणाऱ्या तीन आडव्या रेषांवर क्लिक करा.
  3. तीन आडव्या रेषांवर वर क्लिक केल्यावर, तुमच्या समोर काही पर्याय येथील,  त्यातील Login / Sign up या पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या पर्यायावर क्लिक करा.
  4.  Login / Sign up  या पर्यायावर क्लिक केल्यावर  तुमच्या समोर लॉगिन करण्यासाठी  युजर नेम आणि पासवर्ड विचारला जाईल, तेथे  खालच्या बाजूस असणाऱ्या Sign up या पर्यायावर क्लिक करा.
  5. Sign up या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर या ॲप्लिकेशनवर खात तयार करण्यासाठी खाली दिल्या प्रमाणे तुमच्याबद्दल काही माहिती विचारली जाईल

A] Username

B] नाव

C] आडनाव

D] लिंग

E] जन्म तारीख

F] मोबाईल नंबर

G] Landline नंबर

H] पत्ता

I] शहर

J] पिन कोड

K] ई-मेल ऍड्रेस

L] पासवर्ड

6.वरील प्रमाणे सर्व माहिती भरा व खाली असणाऱ्या Register या पर्यायावर क्लिक करा.

7. Register या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन साठी एक कोड पाठवला जाईल तो घेऊन                             ॲप्लिकेशन मध्ये टाका व खाली असणाऱ्या सबमिट बटणावर क्लिक करा.

अशाप्रकारे आपण MSRTC ॲप्लिकेशन मध्ये आपले खाते तयार करू शकतो.

MSRTC या अप्लिकेशन मध्ये एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी उपलब्ध असणारे बस कशा पहाव्यात ?

मित्रहो आपण MSRTC या अप्लिकेशनचा वापर करून जर आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं असेल त्या ठिकाणी जाण्यासाठी कोणत्या बस उपलब्ध आहेत, त्याचप्रमाणे त्या बसची निघायची वेळ व ती बस कुठे कुठे थांबणार आहे ही सर्व माहिती या अप्लिकेशन मध्ये पाहू शकतो.

जर तुम्हाला MSRTC एप्लीकेशन मध्ये एखाद्या ठिकाणी जाणाऱ्या बस बद्दल माहिती करायची असेल तर पुढील स्टेप्स करा :-

  1. मोबाईल मधील MSRTC हे ॲप्लिकेशन उघडा.
  2. MSRTC हे ॲप्लिकेशन उघडल्यानंतर, तुमच्या समोर विविध प्रकारच्या चार बसेसचे चित्र येतील, तेथे तुम्हाला ज्या बसने प्रवास करायचा आहे त्या बसच्या चित्रावर क्लिक करा.
  3. ज्या बस मधून तुम्हाला प्रवास करायचा आहे त्या बसच्या चित्रावर क्लिक केल्यावर, तुमच्यासमोर तीन रिकामे बॉक्सेस येतील, तेथे Source असे लिहिलेले असणाऱ्या पर्यायावर तुम्ही कोणत्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणाचे नाव टाका व नंतर असे Destination लिहिलेले असलेल्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणाचे नाव टाका त्याचप्रमाणे Date of journey असे लिहिलेल्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या तारखे दिवशी जायचं आहे ती तारीख निवडा.
  4. सर्व माहिती रिकाम्या बॉक्स मध्ये टाकून झाल्यानंतर खाली काल्या रंगात असणाऱ्या Search bus या पर्यायावर क्लिक करा.
  5. Search bus या पर्यायावर क्लिक‌ केल्यावर तुमच्या समोर तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात त्या पासून ते जिथे तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी जाणाऱ्या बसेसची नावे तुमच्या समोर येतील त्याचप्रमाणे त्या बसेस कोणत्या वेळेस जाणार आहेत ते देखील तेथे असेल.
  6. समोर आलेल्या वेगवेगळ्या वेळेस असणाऱ्या बसच्या लिस्टमध्ये तुम्हाला ज्या वेळेस जायचे आहे त्यावेळेस असणाऱ्या बसच्या नावावर क्लिक करून तुम्ही ती बस कोणत्या मार्गाने जाणार आहे व किती वाजता कुठे पोहचणार आहे ही सर्व माहिती देखील पाहू शकता.

MSRTC एप्लीकेशन वर बस तिकीट कसे बुक करावे ?

मित्रहो MSRTC या एप्लीकेशनचा वापर करून आपण एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी त्या ठिकाणी जाणाऱ्या असणाऱ्या MSRTC च्या बस मधील सीट बुक करू शकतो. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सीट बुक केल्यामुळे आपल्याला हवी असणारी बसमधील सीट देखील मिळते आणि त्याच प्रमाणे ह्या ॲप्लिकेशनचा वापर करून आपण बसमधील सीट घरबसल्या बुक करू शकतो.

जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल की MSRTC या ॲप्लिकेशन वरून MSRTC बस मधील सीट कशी बुक करावी तर पुढील प्रमाणे दिलेल्या स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील MSRTC हे ॲप्लिकेशन उघडा.
  2. MSRTC हे ॲप्लिकेशन उघडल्यानंतर, तुमच्या समोर विविध प्रकारच्या चार बसेसचे चित्र येतील, तेथे तुम्हाला ज्या बसने प्रवास करायचा आहे त्या बसच्या चित्रावर क्लिक करा.
  3. ज्या बस मधून तुम्हाला प्रवास करायचा आहे त्या बसच्या चित्रावर क्लिक केल्यावर, तुमच्यासमोर तीन रिकामे बॉक्सेस येतील, तेथे Source असे लिहिलेले असणाऱ्या पर्यायावर तुम्ही कोणत्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणाचे नाव टाका व नंतर असे Destination लिहिलेले असलेल्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणाचे नाव टाका त्याचप्रमाणे Date of journey असे लिहिलेल्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या तारखे दिवशी जायचं आहे ती तारीख निवडा.
  4. सर्व माहिती रिकाम्या बॉक्स मध्ये टाकून झाल्यानंतर खाली काळ्या रंगत असणाऱ्या Search bus या पर्यायावर क्लिक करा.
  5. Search bus या पर्यायावर क्लिक‌ केल्यावर तुमच्या समोर तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात त्या पासून ते जिथे तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी जाणाऱ्या बसेस ची नावे तुमच्या समोर येतील त्याचप्रमाणे त्या बसेस कोणत्या वेळेस जाणार आहेत ते देखील तेथे असेल.
  6. समोर आलेल्या वेगवेगळ्या वेळेस असणाऱ्या बसच्या लिस्टमध्ये तुम्हाला ज्या वेळेस जायचे आहे त्यावेळेस असणाऱ्या बसच्या नावावर क्लिक करा.
  7. बस च्या नावावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर त्या बसची वेळ आणि ती बस कोणत्या मार्गाने जाणार आहे ही सर्व माहिती येईल तेथे खाली असणाऱ्या Select seats या पर्यायावर क्लिक करा.
  8. Select seats या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर त्या बस मधील सीट चे फोटो दिसून येतील, त्याच प्रमाणे त्या बसमध्ये कोणत्या सीटस अगोदर बुक केले आहेत हे लाल रंगाच्या माध्यमाने दाखवले असेल, तेथे तुम्हाला reservation करायचे आहे त्या सीटवर क्लिक करा.
  9. तुम्हाला ज्या सीट बुक करायचे आहेत त्या सीट वर क्लिक करून झाल्यानंतर, तेथे खालच्या बाजूस तुम्हाला तिकिटांची किंमत व सीट नंबर दाखवण्यात येईल व तिथे असणाऱ्या Next या पर्यायावर क्लिक करा.
  10. Next या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला तिथे प्रवासी बद्दल माहिती विचारण्यात येईल, जसे की त्याचे नाव, फोन नंबर, त्याचे वय आणि त्याचे लिंग, ही सर्व माहिती टाका व खाली असणाऱ्या Proceed या पर्यायावर क्लिक करा.
  11. Proceed या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर तुम्ही निवडलेली बस, तिची वेल आणि तुम्ही टाकलेल्या पॅसेंजर ची माहिती समोर येईल, तिथे खाली असणाऱ्या Pay या पर्यायावर क्लिक करा.
  12. Pay या पर्यायावर क्लिक करून तुमचे MSRTC एप्लीकेशन मध्ये उघडलेल्या खात्याचे युजर नेम आणि पासवर्ड टाका व Log ईन वर क्लिक करा व नंतर समोर आलेल्या पर्यायामध्ये तुम्हाला ज्या पर्यायाने पेमेंट करायचे आहे ते पर्याय निवडा व आपले सीट रिझर्वेशन साठीचे बिल पे करा.

अशाप्रकारे आपण MSRTC  या ॲप्लिकेशन मध्ये घर बसल्या बस मधील सीटचे तिकीट रिझर्वेशन करू शकतो.

MSRTC एप्लीकेशन बद्दल काही शंका असल्यास काय करावे ?

मित्रहो आपण MSRTC वापरत असताना आपल्याकडे काही शंका असल्यास  किंवा या अप्लिकेशन चा वापर करून सीट रिझर्वेशन करीत असताना आपले पेमेंट झाले आणि आपली सीट मात्र बुक नाही झाली तर यावेळी आपण यांच्या कस्टमर केअरना कॉन्टॅक्ट करू शकतो,  जे आपल्या शंकांचे निरसन करण्यास २४ X ७ मदत करतात.

जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल की  MSRTC  या ॲप्लिकेशन मध्ये कस्टमर केअरला कसे कॉन्टॅक्ट करावे तर पुढील स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील MSRTC हे एप्लीकेशन उघडा.
  2. MSRTC  हे ॲप्लिकेशन उघडल्यानंतर ज्या बस संबंधित तुम्हाला शंका आहे, त्या बस वर क्लिक करा व नंतर डाव्या बाजूला वरच्या भागात असणाऱ्या तीन आडव्या रेषांवर क्लिक करा.
  3. तीन आडव्या रेषांवर वर क्लिक केल्यावर तुमच्या समोर काही पर्याय येतील,  त्यातील Contact us या तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या पर्यायावर क्लिक करा.
  4. Contact us या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुमच्या समोर या अँप्लिकेशनच्या कस्टमर केअरला कॉन्टॅक्ट करण्यासाठी त्यांचे ई-मेल आयडी दिले असेल त्याच प्रमाणे तेथे त्यांचे टोल फ्री असणारे फोने नंबर देखील असेल, त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या शंकांचे निरसन करू शकता.

अशाप्रकारे मित्रहो आपण MSRTC या ॲप्लिकेशनवर आपल्याला काही शंका असल्यास या ॲप्लिकेशनच्या कस्टमर केअरला कॉन्टॅक्ट करू शकतो.

अशाप्रकारे मित्रहो आम्ही या लेखामध्ये MSRTC या एप्लीकेशन बद्दल खूप महत्वाची माहिती सांगितली आहे जी तुम्हाला  हे एप्लीकेशन वापरण्यास  आणि समजण्यास नक्कीच मदत करेल.  जर तुम्हाला या लेखाबद्दल काही शंका असल्यास आपले शंकांचे निरसन करण्यासाठी खालील कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका.

माझे Msrtc तिकीट ऑनलाइन कसे रद्द करू शकतो?

ई-तिकीट रद्द करण्यासाठी, तुम्हाला लॉग इन करावे लागेल, नंतर डाव्या नेव्हिगेशन बारवरील ‘माय तिकीट’ लिंकवर जा, रद्द करण्यासाठी तिकीट निवडा आणि ‘रद्द करा’ लिंकवर क्लिक करा . मी सवलतीचे ई-तिकीट बुक करू शकतो का? ई-तिकीट बुकिंगवर केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीचे तिकीट उपलब्ध असेल.

Msrtc राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे का?

आरटीसी कायदा 1950 च्या कलम 3 मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना महाराष्ट्र राज्य सरकारने केली आहे.


मी माझे Msrtc लॉगिन कसे सक्रिय करू?

कृपया लॉगिन स्क्रीनवर जा आणि “पासवर्ड विसरला” बटण निवडा आणि तुमचा ई-मेल आयडी प्रविष्ट करा . ई-मेल आयडी यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर, सिस्टमला तुमच्या ई-मेल आयडीवर सक्रियकरण मेल पाठविला जाईल. कृपया तुमचा ई-मेल आयडी उघडा आणि तुमचे खाते सक्रिय करा.


Msrtc कधी सुरू झाली?

1948 मध्ये पुणे ते अहमदनगर अशी पहिली बस रवाना झाली.

Leave a Comment