Linkedin अँप्लिकेशन ची संपूर्ण माहिती Linkedin Application Information In Marathi

LinkedIn Application Information In Marathi मित्रहो आज आपण या लेखात LinkedIn या एप्लीकेशन बद्दल माहिती करून. LinkedIn  हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आज जगातील 90 टक्के कंपन्यांचे प्रोफाइल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहे, कंपनीचे Employee देखील हे ॲप्लिकेशन वापरतात. जर कंपनीमध्ये Vacancies निघाल्यास ते LinkedIn वर पोस्ट करतात ज्यामुळे मित्रहो आपण त्या जॉब ला apply देखील करू शकतो म्हणूनच जॉब शोधण्यासाठी देखील LinkedIn हे उत्तम प्लॅटफॉर्म आहे.

Linkedin Application Information In Marathi

Linkedin अँप्लिकेशन ची संपूर्ण माहिती Linkedin Application Information In Marathi

Linkedin हे अँप्लिकेशन कसे वापरावे ?

काही वेळेला व्यक्तीची प्रोफाइल बघून कंपनी स्वतः देखील व्यक्तीस  जॉब साठी इन्व्हिटेशन पाठवते. प्रत्येक जण त्याची माहिती टाकून प्रोफाईल तयार करतो त्याचप्रमाणे कंपनीची देखील माहिती आणि वेबसाईट टाकून प्रोफाईल तयार केलेली असते. म्हणूनच LinkedIn प्रोफेशनल प्लॅटफॉर्म आहे. चला तर मग मित्रांनो माहीत करून घेऊया LinkedIn हे ॲप्लिकेशन कसे वापरावे.

Linkedin हे ॲप्लिकेशन कसे सुरु करावे ?

मित्रहो जर आपण अँड्रॉइड किंवा IOS  वापरकर्ते असाल तर सर्वप्रथम आपल्या मोबाईल मध्ये एप्लीकेशन स्टोर ला Visit करून हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या व ते अप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.

आपल्या मोबाईल मध्ये Linkedin हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर  ते अप्लिकेशन उघडा. एप्लीकेशन उघडल्यावर तुमच्या  समोर Linkedin चा इंटरफेस दिसेल,  तेथे  Linkedin  जॉईन करण्यासाठी दोन पर्याय असतील म्हणजेच Join with Google आणि Join Now. येथील Join Now या पर्यायावर क्लिक करा.

Join Now या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर छोटासा फॉर्म येईल,  तेथे तुमचे नाव, तुमचे मोबाईल नंबर, ईमेल एड्रेस आणि पासवर्ड विचारला जाईल तेथे सर्व माहिती टाईप करा.

सर्व माहिती भरून झाल्यानंतर खाली असणाऱ्या AGREE & JOIN या पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला विचारण्यात येईल की तुम्ही स्टुडन्ट आहात का तिथे जर तुम्ही  शिक्षण घेत असल्यास Yes वर क्लिक करा नाही असल्यास No वर क्लिक करा. No वर क्लिक केल्यावर खाली तुम्हाला विचारण्यात येईल की तुम्ही कोणते काम करता (Most recent job title) आणि तुम्ही कोणत्या कंपनीत काम करता (Most recent company) तेथे ती सर्व माहिती भरा.

वरील सांगितल्याप्रमाणे कामाची आणि कंपनीची माहिती टाकल्यानंतर खाली असणाऱ्या Continue या  पर्यायावर क्लिक करा. Continue या  पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे पत्ता विचारण्यात येईल तेथे तुमचे देशाचे नाव निवडा व नंतर राज्य निवडा व नंतर शहर किंवा जिल्हा निवडा.  सर्व माहिती निवडल्यानंतर खाली असणाऱ्या Continue या पर्यायावर क्लिक करा.

आता तुम्हाला तुमच्या LinkedIn प्रोफाइल साठी फोटो टाकण्यासाठी सांगितले जाईल, तेथे समोर येणाऱ्या Add photo या पर्यायावर क्लिक करा व तुमच्या मोबाईल मधील तुम्हाला जे फोटो प्रोफाइल फोटो ठेवायचा आहे ते फोटो निवडा.

फोटो निवडल्यानंतर उजव्या बाजूला वरच्या भागात असणाऱ्या Save या पर्यायावर क्लिक करा व नंतर खाली असणाऱ्या Continue या पर्यायावर क्लिक करा. अशाप्रकारे तुमच्या LinkedIn प्रोफाईलला तुमचे फोटो लागेल.

आता तुम्हाला तुम्ही दिलेल्या ईमेल आयडी कन्फर्म करण्यासाठी सांगितले जाईल, त्यासाठी तेथे खाली असणाऱ्या Go to Email या पर्यायावर क्लिक करा. Go to Email  या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्ही तुमच्या मोबाईलमधील  ई-मेलच्या एप्लिकेशन्स मध्ये याल,  तेथे तुम्हाला LinkedIn  कडून एक मेल आला असेल तो मेल उघडा. मेल मध्ये तुम्हाला Confirm your email address असे  लिहलेले एक पर्याय असेल,  त्या पर्यायावर ई-मेल अड्रेस कन्फर्म करण्यासाठी क्लिक करा. अशाप्रकारे तुम्ही पुन्हा LinkedIn या ॲप्लिकेशन मध्ये याल.

आता तुम्हाला LinkedIn कडून तुमच्या मोबाईलमधील Contacts मधील कोण कोण LinkedIn  चा वापर करीत आहे हे माहिती करून घेण्यासाठी तुमच्या मोबाईल मधील Contacts चा access घेण्याबद्दल परमिशन विचारली जाईल, तेथे तुमची परवानगी असल्यास Continue या पर्यायावर क्लिक करा किंवा परवानगी नसल्यास Skip या पर्यायावर क्लिक करून तुम्ही पुढच्या  स्टेपवर जाऊ शकतात. जर तुम्ही Continue या पर्यायावर केलं तर तुम्हाला तुमच्या मोबाईल कडून कॉन्टॅक्ट चा access  देण्यासाठी परवानगी विचारली जाईल तेथे Allow या पर्यायावर क्लिक करा.

आता तुमच्या समोर तुमच्या कॉन्टॅक्ट मधील सेव असलेल्या नंबर पैकी जे व्यक्ती Linkedin वर आहेत त्यांची लिस्ट  येईल,  तेथे तुम्ही तुम्हाला हवे असल्यास त्यांच्या नावाच्या समोर असलेल्या Invite या पर्यायावर क्लिक करून त्यांच्या सोबत Linkedin वर जोडले जाऊ शकता.

आता व्यक्तीना इन्व्हाईट केल्यानंतर पुढे जाण्यासाठी खालील असणाऱ्या Next या पर्यायावर क्लिक करा आता तुमच्या समोर LinkedIn वरील अशा कंपनीच्या किंवा व्यक्तींच्या प्रोफाईलस येतील जे LinkedIn वरील येणाऱ्या संपूर्ण जॉब्स पैकी 70 टक्के जॉब्स हे या प्रोफाइलस कडून पाठवले जातात, तुम्ही त्यांचे नावासमोर असलेल्या Invite या पर्यायावर क्लिक करून त्यांच्या प्रोफाईलची जोडले जाऊ शकता, ज्यामुळे जर त्या प्रोफाइल कडून कोणतेही Vacancy बद्दल पोस्ट पाठवली गेल्यास आपल्याला ती दिसेल.

प्रोफाइल्सना Invite केल्यावर  पुढे जाण्यासाठी खाली असणाऱ्या Next या पर्यायावर क्लिक करा, आता तुमच्यासमोर तुम्ही जे काम करता, त्यात तुमच्या कामा संबंधित Linkedin वरील असणारे  प्रोफाईलस दिसून येतील, तेथे तुम्ही तुम्हाला हवे  असल्यास त्यांना त्यांच्या नावा समोर असणार्‍या Invite या पर्यायावर क्लिक करून त्यांच्याशी Linkedin वर जोडले जाऊ शकता,  आता खाली असणाऱ्या Finish या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे मित्रहो आपले LinkedIn चे अँप्लिकेशन सुरु झाले आहे.

Linkedin वर प्रोफाइल पूर्ण कशी करायची ?

मित्रहो Linkedin  हे ॲप्लिकेशन सुरू केल्यांनतर आपल्या Linkedin ची प्रोफाइल पूर्ण करणे गरजेचे असते, त्यामध्ये आपण आपले शिक्षण, आपला कामाचा अनुभव, आपले बायोडाटा ही सर्व माहिती टाकू शकतो.

जर तूम्हाला माहिती करून घ्यायचे असेल की Linkedin वर  प्रोफाईल कशी पूर्ण करायची तर पुढील दिल्या प्रमाणे स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाईल मधील Linkedin हे एप्लीकेशन उघडा.
 2. Linkedin हे ॲप्लिकेशन उघडल्यानंतर डाव्या बाजूला वरच्या भागात दिसणार्‍या तुमच्या Linkedin प्रोफाइलच्या फोटो वर क्लिक करा.
 3. Linkedin प्रोफाइलच्या फोटो वर क्लिक केल्यावर तुमच्या समोर काही पर्याय येतील त्यातील वरच्या भागात असणाऱ्या View profile या पर्यायावर क्लिक करा.
 4. View profile  वर क्लिक केल्यावर तुमच्या समोर तुमची Linkedin profile येईल.
 5. Linkedin profile मध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला खालच्या बाजूस असणाऱ्या अधिकच्या चिन्हावर क्लिक करा.
 6. अधिकच्या चिन्हावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर तुमची प्रोफाइल माहिती विचारण्यासाठी विविध पर्याय येतील जसे की About, background, स्किल्स, accomplishment अशाप्रकारे तिथे विचारलेली सर्व माहिती भरा व  तुम्ही दिलेली माहिती सेव करण्यासाठी उजव्या बाजूला वरच्या भागात असणाऱ्या Save या पर्यायावर क्लिक करा.

LinkedIn वर आपल्याला आलेले Invitations कसे पहावेत ?

मित्रहो जर तुम्हाला माहिती करून घ्यायची की Linkedin  वर आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून किंवा कंपनी कडून आलेले इन्व्हिटेशन कसे पहावे  तर पुढील दिल्याप्रमाणे स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाईल मधील Linkedin हे एप्लीकेशन उघडा.
 2. Linkedin हे ॲप्लिकेशन उघडल्यानंतर तुमच्यासमोर  मोबाईल स्क्रीनवर खालच्या बाजूस पाच आयकॉन दिसतील,  त्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या Peoples या आयकॉनवर क्लिक करा. तुमच्या समोर तुम्हाला आलेल्या invitations दिसून येतील.

अशाप्रकारे मित्रहो आपण Linkedin या ॲप्लिकेशन मध्ये आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून किंवा कंपनी कडून आलेले इन्व्हिटेशन पाहू शकतो.

Linkedin ॲप्लिकेशन मध्ये पोस्ट कसे करावे ?

मित्रहो Linkedin या ॲप्लिकेशन मध्ये आपण आपल्या Linkedin प्रोफाईल मधून Post देखील करू शकतो. Post  मध्ये आपण फोटो, व्हिडिओ किंवा टेक्स्ट कन्टेन्ट देखील पब्लिष करू शकतो.

मित्रहो जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल कि Linkedin वर पोस्ट कसे पब्लिश करायचे तर पुढील दिल्याप्रमाणे स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाईल मधील Linkedin हे एप्लीकेशन उघडा.
 2. Linkedin हे ॲप्लिकेशन उघडल्यानंतर तुमच्यासमोर  मोबाईल स्क्रीनवर खालच्या बाजूस पाच आयकॉन दिसतील,  त्यातील  तिसऱ्या क्रमांकाच्या अधिक चिन्ह असणाऱ्या आयकॉनवर क्लिक करा.
 3. अधिक चिन्ह असणाऱ्या आयकॉनवर क्लिक केल्यावर, तुमच्यासमोर फोटो अपलोड करण्यासाठी खालच्या बाजूस एक कॅमेराचे चिन्ह असेल त्यावर क्लिक करा,  त्याचप्रमाणे जर तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायचे असेल तर तुम्ही व्हिडिओ कॅमेरा चिन्हावर क्लिक करून व्हिडिओ देखील अपलोड  करू शकता.
 4. जर तुम्ही कॅमेराच्या चिन्हावर क्लिक केले तर,  तुमच्या मोबाईल मधील कॅमेरा उघडेल, तर तुम्ही तुमच्या कॅमेराचा वापर करून फोटो काढून निवडू शकता,  पण जर तुम्हाला तुम्ही अगोदरच काढलेले फोटो निवडायचे असेल तर खालील असणाऱ्या Gallery या पर्यायावर क्लिक करून तुम्ही त्यातून तुम्ही अगोदर काढलेले फोटो निवडू शकता.
 5. अशाप्रकारे फोटो किंवा व्हिडिओ निवडल्यानंतर तुमच्यासमोर स्टिकर्स दिसून येतील तुम्हाला ते हवे असल्यास तुम्ही ते निवडलेल्या फोटोवर वापरू शकता.
 6. तुम्ही पोस्ट मध्ये फोटो किंवा व्हिडिओ सोबत तुम्हाला जी माहिती टाईप करायची आहे, ती टाईप करू शकता त्याचप्रमाणे हॅशटॅग्स देखील टाकू शकता.
 7. फोटो आणि हॅशटॅग्स घेऊन झाल्या नंतर तुम्ही तिथे असणाऱ्या Who can see this post या पर्यायाचा वापर करून हे देखील ठरवू शकता की तुमची ही पोस्ट कोण बघू शकतो, जर तुम्हाला तुमची ही पोस्ट कोणीही पाहिले तरी चालणार असेल तर Anyone या पर्यायावर क्लिक करा किंवा जर तुम्हाला ही पोस्ट फक्त तुमच्या कनेक्शन्स दिसायला हवी असल्यास Connections only या पर्यायावर क्लिक करा. आता उजव्या बाजूस वरच्या भागात असणाऱ्या Post या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे मित्रहो Linkedin या ॲप्लिकेशन मध्ये पोस्ट करू शकतो.

अशाप्रकारे मित्रहो आम्ही या लेखात Linkedin या एप्लीकेशन बद्दल महत्वाची माहिती सांगितली आहे, जी तुम्हाला Linkedin  हे ॲप्लिकेशन समजण्यास आणि वापरण्यास तुम्हाला नक्कीच मदत करेल. जर तुम्हाला आम्ही  सांगितलेल्या या लेखाबद्दल काही शंका असल्यास खालील असलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर लेख आवडला असल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment