Hooghly River Information In Marathi हुगळी ही नदी पश्चिम बंगाल राज्यातील एक मुख्य नदी आहे. तसेच हुगळी नदीच्या किनारी कोलकत्ता हे शहर असून ते एक प्रसिद्ध बंदर आहे. येथून मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण झाल्यामुळे वाहतूकही मोठ्या प्रमाणात चालते. पश्चिम बंगालमधील दाट लोकवस्तीचा हा प्रदेश मानला जातो. हुगळी नदीवर कोलकत्ता येथे वाहतुकीसाठी बरेच पूल बांधण्यात आलेले आहे. त्यामध्ये हावडा ब्रिज हा प्रसिद्ध आहे. तसेच या नदीवर प्रकल्प जलविद्युत प्रकल्प धरणे बांधण्यात आलेली आहे. ज्याचा उपयोग निश्चितच तेथील शेतकऱ्यांना व लोकांना होतो. तर चला मग जाणून घेऊया या नदी विषयी सविस्तर माहिती.
हुगळी नदी विषयी संपूर्ण माहिती Hooghly River Information In Marathi
उगमस्थान :
हुगळी या नदीचा उगम हा गंगा नदीपासून झालेला आहे. बरद्वानव नदिया या जिल्ह्याच्या सीमेवरून दक्षिणेकडे वाहत गेल्यावर या नदीच्या फाट्याला नवद्वीप जवळ पूर्वेकडून जलांगी ही नदी येऊन मिळते. म्हणून येथे गंगा नदीचा फाटा भागीरथी म्हणून ओळखतो व तेथून पुढे या पुढील बंगालच्या उपसागरास मिळेपर्यंतचा गंगा नदीचा प्रवाह फाटा हा हुगळी नदी म्हणून ओळखला जातो.
हुगळी नदी किनारी वसलेले शहरे :
हुगळी या नदी काठी अनेक शहरे वसलेली असून त्या शहरांचा विकास या नदीमुळे झालेला आपल्याला दिसून येतो तर जाणून घेऊया कोण-कोणती ती शहर आहेत तर त्यामध्ये नइहाटी बरकपूर, पनीहाटी, बेर्हमपूर, बारानगर, नुरपूर, अगरपारा, बाटानगर, बिर्लापूर, फाल्टा, हावडा, हुगळी-चिनसुरा या शहरांचा समावेश होतो.
हुगळी या नदीची लांबी :
पश्चिम बंगाल राज्यातील गंगा नदीच्या त्रिभुज प्रदेशामधून वाहणाऱ्या दक्षिण वाहिनी फाट्याला भागीरथी-हुगळी असे म्हणतात.
या नदीची लांबी 520 किलोमीटर असून मुर्शिदाबाद जिल्ह्यात जंगीपूरच्या उत्तर दिशेला आठ किलोमीटर धुलीआनजवळ गंगा नदीपासून हा प्रवाह वेगळा होतो. तसेच बंगालच्या उपसागरापर्यंत पुढे मिळणारा गंगा नदीचा प्रवाह फाटा हा हुगळी नदी म्हणून ओळखला जातो त्याची लांबी 260 किलोमीटर आहे.
हुगळी नदीचा इतिहास :
हुगळी या नदीचे नाव कसे पडले तर त्याविषयी जाणून घेऊया. पूर्वी या नदीच्या किनारी ओगला या नावाचे गवत वाढत होते. त्यावरूनच त्याच्या जवळच्या नदी नदी प्रवाहास ओगोलिया असे म्हटले जात होते. त्यानंतर उगली व इंग्रज आमदानीत हुगळी असे नाव या नदीला प्राप्त झाले.
या नदीच्या किनारी इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई झाली होती बऱ्याच शतकांपूर्वी हुगळी ही मुख्य शाखा होती तिला भागीरथी जलंगी व मठभंगा या शाखा मिळत होत्या या नदी समूहाला नदिया असे म्हणत. त्यानंतर भागीरथी मुख्य शाखा झाली. भागीरथी व हुगळी या गंगा नदीच्या फाट्यांचे तीन विभाग केले जातात. त्यामध्ये वरचा भाग, मध्यभाग व खालचा भाग ही आहे.
हुगळी नदीच्या उपनद्या :
हुगळी या नदीच्या मुख्य दोन उपनद्या आहे. ती म्हणजे दामोदर नदी आणि रूप नारायण नदी.
ही नदी देखील गंगेच्या इतर प्रवाहाप्रमाणेच हिंदू धर्मामध्ये पवित्र मानली जाते.
हुगळी नदीची खोली :
हुगळी या नदीची खोली खूप खोल आहे. सर्वात मोठी खोली या नदीची असून ज्याची सरासरी 108 फूट आणि कमाल खोली 381 फूट आहे. त्याची दूरची खोली 95 फूट असून बेली, हावडा येथे या नदीची कमाल खोली 147 फूट असून बॅरकपुर आणि सेरामपूर येथे, ही कमाल खोली 300 फूट आहे.
नैहाटी आणि बांधील दरम्यान तिची कमाल खुली 100 फूट आहे. भरतीची सर्वात मोठी वाढ अंदाजे 85 फूट मार्च एप्रिल या महिन्यामध्ये किंवा मी महिन्यात होते तर पावसाळ्यात 40 फूट खोलीपर्यंत घडते आणि गोड्या पाण्यात किमान खोली 110 फूट असते.
हुगळी नदीचा प्रवाह व धरण :
हुगळी नदीचा नैसर्गिक स्त्रोत मुर्शिदाबाद जिल्ह्यातील गिरिया जवळ असून नदीचे बहुतेक पाणी तेथून येत नाही तर फरक्का फीडर कालव्याद्वारे तिलडांगाजवळ गंगेचे पाणी फरक्का धरणातून वाहून नेले जाते. गंगेला समांतर वाहणारा हा कालवा धुलियानजवळून जातो आणि नंतर जंगीपूर येथे भागीरथी नदीत विलीन होतो. भागीरथी नंतर पळशीच्या उत्तरेला वळते, जियागंज अजीमगंज, मुर्शिदाबाद आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बहरामपूर ओलांडते. पूर्वी हे वर्धमान जिल्ह्यात आणि नादिया जिल्ह्यात होते.
सध्याच्या काळात नदीचा प्रवाह थोडा बदलला आहे पण जिल्ह्याची सीमा पूर्वी जिथे होती तिथेच ठेवण्यात आली आहे. नंतर ती दक्षिणेकडे वाहते आणि कटोया, नवद्वीपा, कालना आणि जिरत पार करते. कालनाजवळचा त्याचा मार्ग पूर्वी नादिया जिल्हा आणि हुगळी जिल्ह्याच्या सीमेवर होता.
येथून दक्षिणेकडे पुढे जात ते हुगळी जिल्हा आणि उत्तर 24 परगणा जिल्ह्याच्या दरम्यान वाहते आणि हलीशहर, हुगळी-चुचुडा, श्रीरामपूर आणि कमरहाटी पार करते. येथून कोलकाता आणि हावडा आहेती नैऋत्येला वळण घेते आणि गंगा नदीच्या जुन्या नाल्याचा वापर करून नूरपूर येथे बंगालच्या उपसागरात वाहते.
वाहतूक :
हुगळी या नदीवर मुख्य वाहतूक चालते. तसेच या नदीवर अनेक फुल व बंदरे बांधले आहे. भागीरथी हुगळी हा गंगेचा मुख्य फाटा असून सतराव्या शतकापासून यामध्ये काळाची संचयन होऊन गंगेचे बहुतांश पाणी बंगलादेशात गंगेच्या प्रवाहामध्ये विलीन होते ती पद्मा नदीस मिळते.
त्यामुळे वर्षभरातील आठ महिने भगीरथी- हुगळी नदी प्रवाहाला पाण्याचे प्रमाण कमी असे याप्रमाणे प्रवाहातील पाणी व गाळाचे संचयन यामुळे कलकत्ता बंदरातील जलवाहतुकीत अडथळा येत होता यासाठी भारत सरकारने गंगा नदीच्या त्रिभुज प्रदेशातील
भागीरथी व पद्मा अशा विभाजन पूर्व भागात फरक्का येथे धरण बांधले आहे. या धरणातून भाकरीती हुगळी नदीमध्ये पाणी सोडण्यात येते, त्यामुळे कलकत्ता बंदरातील जलवाहतुकी येथील अडथळा आता दूर झालेला आहे.
सुरुवातीपासूनच हुगळी नदी व्यापाऱ्याच्या दृष्टीने व जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. हुगळी या नदीवर पोर्तुगीज-हुगळी हुगळी नदीवर, चाच -चिनसुरा आणि शेरामपूर, फ्रेंच-चंद्रनगर ऑस्टेन्ड कंपनी बंकीपुर ही व्यापाराचे मुख्य ठिकाण होते. हुगळी नदीची समुद्रधुनी फार रुंद होती. समुद्राचा प्रभाव नदी 140 किलोमीटर पर्यंत पोहोचत असे.
त्यामुळे उघडी नदीवर अनेक बंधारे होती परंतु पात्रातील बदल गाळ साचल्यामुळे त्यातील काही बंदरे आता निरुपयोगी झालेली आहेत.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.