ग्राफिक डिझाईन कोर्सची संपूर्ण माहिती Graphic Design Course Information In Marathi

Graphic Design Course Information In Marathi ग्राफिक डिझाईन ही आजपर्यंत कला आहे हे नक्की होते मात्र आजकाल लोक या विषयात शिक्षण घेऊन नोकरी व व्यवसायाच्या उत्तम संधी प्राप्त करून घेत आहेत. एखाद्या नामांकित संस्थेमधून तुम्ही ग्राफिक डिझाईनिंग हा कोर्स केल्यास या क्षेत्रामध्ये तुम्हाला उत्कृष्ट करिअर संधी आहेत. ग्राफिक डिझाईन ही तुमची कलाच नव्हे तर तुमच्या उपजीविकेचे साधन देखील बनू शकते. म्हणूनच जर तुमच्या हाती कला असेल तर नक्कीच तुम्ही हा कोर्स करावा.ग्राफिक डिझाईन सध्याच्या युगात निवडला जाणारा सर्वात पसंतीचा असा कोर्स आहे.

Graphic Design Course Information In Marathi

ग्राफिक डिझाईन कोर्सची संपूर्ण माहिती Graphic Design Course Information In Marathi

ग्राफिक डिझाईन म्हणजे काय?

ग्राफिक्स म्हणजे चित्र किंवा डिझाईन यांची रचना. ग्राफिक डिझाईनिंग द्वारे अशी कलाकृती बनवली जाते ज्यामधून एखादा संदेश लोकांना दिला जाईल किंवा व्हिज्युअल कम्युनिकेशन केले जाते अशा कलाकृतीला ग्राफिक डिझाईन असे म्हटले जाते. पेंटिंग स्केच किंवा फोटो यामध्ये जर काही संदेश दिला असेल तर त्याला ग्राफिक डिझाईन म्हणतात.

तसेच ग्राफिक डिझाईन मध्ये कमर्शियल आर्ट फाईन आर्ट अप्लाइड आर्ट आणि ॲनिमेशन यांचाही समावेश असतो. व आजच्या या युवा पिढीसाठी युजर इंटरफेस डिझाईन म्हणजे यु आय डिझाईन आणि युजर एक्सपिरीयन्स डिझाईन हे ग्राफिक डिझाईनच्या क्षेत्रात आता समाविष्ट करून घेण्यात आले आहेत.

ग्राफिक डिझायनर होण्यासाठी तुम्हाला एखाद्या विद्यापीठातून कोर्स घेणे महत्त्वाचे आहे तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये पदवी देखील घेऊ शकता.या क्षेत्रात जर करिअर करायचे असेल तर ह्या कामाचा अनुभव असणे फार महत्त्वाचे आहे.

तुम्हाला कला ह्या क्षेत्रात करियर करायचे असेल तर ग्राफिक डिझाईन हा कोर्स तुम्ही नक्कीच करावा. तुम्हाला कला या विषयाकडे आकर्षण असेल, तुमच्यात जर कलात्मक विचार करण्याची क्षमता असेल, तसेच जर तुम्हाला रंगांविषयी खास आकर्षण असेल, चित्रकलेत रस असेल व या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर तुम्ही ग्राफिक डिझाईनिंग हा कोर्स नक्कीच निवडावा.

ग्राफिक डिझाईन कोर्स अभ्यासक्रम

ग्राफिक डिझाईन या कोर्स अभ्यासक्रमात खालील विषय समाविष्ट केलेले असतात.

 • प्रिन्सिपल्स ऑफ ग्राफिक्स अंड मेथोड ऑफ डिझाईन
 • कलर थेअरी
 • टाईपोग्राफी
 • कंपोझिशन
 • कोरल ड्रॉ
 • फोटोशॉप
 • इल्यूस्ट्रेटर इन डिझाईन वरील ग्राफिक डिझाईनिंग सॉफ्टवेअर चे प्रशिक्षण दिले जाते.
 • अॅडोब आफ्टर इफेक्ट्स ॲनिमेशन याचे प्रशिक्षण दिले जाते.
 • काही ग्राफिक डिझाईनिंग च्या कोर्समध्ये वेब डिझाईनिंग चा समावेश केला गेलेला असतो ज्यामध्ये तुम्हाला एचडी इमेज जावा स्क्रिप्ट आणि पायथन या कम्प्युटर लँग्वेजेस देखील शिकवल्या जातात.

ग्राफिक डिझायनर म्हणजे कोण?

ग्राफिक डिझाईन तयार करणारे व्यक्ती म्हणजेच ग्राफिक डिझायनर. तो चित्र टाईपोग्राफी मोशन कलरेशन या सर्वांचे कॉम्बिनेशन करून डिझाईन तयार करत असतो. ग्राफिक डिजाइनर हे विविध कम्प्युटर डिझायनिंग सॉफ्टवेअर वापरून वेगवेगळे कलात्मक चित्र व डिझाईन बनवत असतात यांचा उद्देश हा आपल्या चित्रातून लोकांपर्यंत एखादा संदेश पोहोचवणे हा असतो किंवा कोणत्याही एखाद्या गोष्टीबद्दल लोकांना प्रोत्साहित करणे हा देखील असू शकतो.

ग्राफिक डिझायनर कोर्स कसा करावा

ग्राफिक डिझायनर बनण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन, ऑफलाइन अशा दोन्ही पद्धती उपलब्ध असतात. येथे तुम्हाला ग्राफिक डिझाईन अभ्यासक्रम हा सहजरीत्या शिकवला जातो मात्र ग्राफिक डिझायनर होण्यासाठी तुम्ही एकत्र प्रसिद्ध संस्थेतून किंवा विद्यापीठातून कोर्स करणे सर्वात जास्त फायदेशीर ठरेल.

कारण तुम्ही एखाद्या संस्थेमार्फत ग्राफिक डिझाईनिंग कोर्स केला तर तुम्हाला प्लेसमेंट लागण्याची शक्यता जास्त असते.ग्राफिक डिझायनिंग हा कोर्स भारतात अनेक संस्था व महाविद्यालय उपलब्ध करून देत आहेत, तसेच तुम्ही याच्यात डिग्री किंवा डिप्लोमा कोर्स देखील करू शकता.

ग्राफिक डिझाईनिंग या कोर्स साठी पात्रता निकष

तुम्हाला ग्राफिक डिझाईनिंग हा कोर्स करायचा असेल तर विद्यार्थ्यांनी कुठल्याही मान्यताप्राप्त कॉलेजमधून किंवा महाविद्यालयातून विज्ञान या शाखेतून बारावी किमान 50 टक्के गुणांनी पास करणे फार अनिवार्य आहे. तुमचे वय हे 16 किंवा त्याहून अधिक असणे महत्त्वाचे आहे.

तुम्हाला जर एक प्रोफेशनल ग्राफिक डिझायनर बनायचे असेल तर तुमच्याकडे आयडिया, क्रिएटिव्हिटी आणि क्वालिटी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्राफिक डिझायनर हे एक असे क्षेत्र आहे ज्यामध्ये तुम्हाला टेक्निकल नॉलेज असणे हे फार महत्त्वाचे आहे या क्षेत्रामध्ये तुम्हाला कार्य करायचे असेल तर तुमच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज असणे हे फार महत्त्वाचे आहे तशी तुमची कलात्मक क्षमता तुमचा अभ्यास व तुमचा अनुभव हे देखील फार महत्वाचे आहे.

ग्राफिक डिझायनर बनण्यासाठी तुमच्यामध्ये गरजेची असणारी कौशल्ये

 • ऍनालिटिकल स्किल्स
 • आर्टिस्टिक अबिलिटी गुड कम्युनिकेशन स्किल्स
 • कंप्यूटर अबिलिटी
 • सर्जनशीलता कौशल्य असणे फार महत्त्वाचे आहे
 • टाईम मॅनेजमेंट
 • टेक्नॉलॉजी स्किल्स

ग्राफिक डिझायनिंग मधले काही कोर्स

 • बी.एफ.ए- बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स या कोर्स कालावधी हा तीन ते चार वर्षांचा असतो.
 • बीएससी इन मल्टीमीडिया- या कोर्समध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर बद्दल माहिती व सॉफ्टवेअर द्वारे तुम्ही व्हिडिओ कसे संपादन करू शकता या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला जातो. या कोर्स कालावधी हा तीन वर्षांचा असतो.
 • एम.ए.इन ग्राफिक डिझाईन- हा कोर्स केल्यानंतर तुम्ही ग्राफिक डिझायनिंग या कोर्समध्ये शिक्षकाची भूमिका देखील बजावू शकता तसेच फ्रीलान्स डिझायर डिझाईन मॅनेजर व्हिडिओ एडिटर या सर्व पदांवर तुम्ही जॉब देखील करू शकता
 • पीजी इन ग्राफिक ऍडमिशन- हा कोर्स एक ते दोन वर्षांचा असतो हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुम्ही प्रिंट मेकर किंवा ॲडवटाईज व कलादिग्दर्शक हे जॉब करू शकता.
 • सर्टिफिकेट इन थ्रीडी ॲनिमेशन- हा कोर्स तीन ते सहा महिन्यांचा असतो व हा कोर्स केल्यानंतर तुम्ही थ्रीडी इमेजेस क्रिएटर थ्रीडी व्हिडिओ एडिटर या पदांवर जॉब करू शकता.

ग्राफिक डिझाईन या कोर्सची फी काय आहे?

ग्राफिक डिझाईन या कोर्सची तुम्ही कोर्स कुठल्या इन्स्टिट्यूट किंवा विद्यापीठातून करता यावर अवलंबून असते मात्र या कोर्सची ही वीस हजार ते दीड लाख एवढी असते.

ग्राफिक डिझाईन हा कोर्स झाल्यानंतर उपलब्ध असणाऱ्या जॉबच्या संधी

ग्राफिक डिझायनर हे जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये सहज नोकरी शोधू शकतात. तुम्ही जर ग्राफिक डिझाईन हा कोर्स पूर्ण केला असेल तर तुमच्यासाठी अनेक जॉब चे मार्ग हे खुले असतात अनेक लोक हे कंपन्या व मीडिया हाऊस यासाठी काम करतात तर काही लोक हे स्वतः बिझनेस बनवतात म्हणजेच बनण्याचा पर्याय निवडतात. ग्राफिक डिझायनिंग हे तुम्हाला बऱ्याच पर्यायांमध्ये करिअरची संधी उपलब्ध करून देते.

ग्राफिक डिझायनर साठी जॉब वॅकन्सी

 • मॅगझिन्स
 • न्यूज पेपर्स
 • ऍडव्हर्टायझिंग एजन्सी
 • प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडिया
 • टेलिव्हिजन
 • वेबसाईट डिझाईन
 • कंपनी पब्लिशिंग हौसेस
 • डिझाईनिंग इंडस्ट्री
 • फॅशन हाऊसेस
 • आर्किटेक्चर
 • फॉर्म कॉर्पोरेट सेक्टर
 • शो बिझनेस
 • ब्रँड मॅनेजमेंट

तुम्ही जर ग्राफिक डिझाईन केले असेल तर तुम्ही खालील जॉब साठी अप्लाय करू शकता

 • आर्ट डिरेक्टर
 • मार्केटिंग मॅनेजर
 • ग्राफिक डिझायनर
 • क्रिएटिव्ह डायरेक्टर
 • इंडस्ट्रियल डिझायनर
 • लोगो डिझायनर
 • इलस्ट्रेशन आर्टिस्ट
 • लेआउट आर्टिस्ट
 • ब्रँड आयडेंटिटी डिझाइनर
 • बॅनर अँड पोस्टर डिझायनर
 • वेब डिझायनर
 • विजूलायझेशन आर्टिस्ट
 • डिझाईन कन्सल्टंट
 • मल्टीमीडिया आर्टिस्ट
 • ॲनिमेटर
 • कॅम्पेन मॅनेजर
 • आर्किटेक्चर अँड इंजीनियर ड्राफ्टर
 • व्हिडिओ एडिटर
 • फ्लॅश डिझायनर
 • फिल्म एडिटर
 • प्रॉडक्ट डिझायनर
 • विजुअल मर्चंटायझर

ग्राफिक डिझाईन या कोर्स साठी काही उत्कृष्ट कॉलेजेस

 • कॉल अकॅडमी, दिल्ली
 • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, अहमदाबाद
 • एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, पुणे
 • इंटरनॅशनल स्कूल ऑफ डिझाईन, पुणे
 • युनायटेड वर्ल्ड इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, अहमदाबाद
 • लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी
 • विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, पुणे
 • सृष्टी मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, बंगलोर
 • वर्ल्ड युनिव्हर्सिटी ऑफ डिझाईन, सोनीपत

नेहमी विचारले जाणारे प्रश्न-

ग्राफिक डिझायनिंग हा कोर्स किती प्रकारचा असतो?

ग्राफिक डिझाईनिंग हा कोर्स तीन प्रकारचा असतो पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स, सर्टिफिकेट कोर्स आणि अंडरग्रॅज्युएट कोर्स.

ग्राफिक डिझायनिंग कोर्स साठी पात्रता निकष काय आहे?

तुम्हाला जर ग्राफिक डिझाईन हा कोर्स करायचा असेल तर तुम्ही विज्ञान शाखेतून बारावी ही 50% गुणांनी पास असणे फार महत्त्वाचे आहे.

ग्राफिक डिझायनिंग या कोर्सेची फी किती आहे?

ग्राफिक डिझायनिंग या कोर्ससाठी फी ही वीस हजार ते दीड लाखापर्यंत असते.

1 thought on “ग्राफिक डिझाईन कोर्सची संपूर्ण माहिती Graphic Design Course Information In Marathi”

Leave a Comment