गुगल प्ले स्टोअर मधील ५ खूप उपयोगी टिप्स Google Play Store Information In Marathi

Google Play Store Information In Marathi गुगल प्ले स्टोअर मधील ५ खूप उपयोगी टिप्स मित्रहो आपण जर अँड्रॉइड मोबाईल वापरत असाल तर तुम्हाला गुगल प्ले स्टोअर ॲप्लिकेशन बद्दल माहित असेलच. आपण अँड्रॉइड मोबाईल वर ह्या ॲप्लिकेशनचा वापर करून आपल्या मोबाईल मध्ये विविध ॲप्लिकेशन गेम्स डाऊनलोड करतो. आज आपण या लेखात गुगल प्ले स्टोअर ॲप्लिकेशन मधील पाच अशा खूप महत्वाचे टिप्स समजणार आहोत, ज्या आपल्याला हे ॲप्लिकेशन वापरताना खूप उपयोगी ठरतील. चला तर मग जाणून घेऊया या पाच टिप्स.

Google Play Store Information In Marathi

Google play store मधील ५ खूप उपयोगी टिप्स Google Play Store Information In Marathi

टीप १]

आपण गुगल प्ले स्टोअर वर आपल्या कामा संबंधित विविध प्रकारचे ऍप्लिकेशन डाऊनलोड करतो, परंतु काहीवेलेला आपल्याला नंतर समजते की एप्लीकेशन काही उपयोगाचे नाही,  तर अशावेळी या गुगल प्ले स्टोअर मधील सेटिंग करून आपण  त्या ऍप्लिकेशनला डाऊनलोड  करण्याअगोदर ते कसे आहेत यासाठी आपण ते ॲप्लिकेशन वापरून बघू शकतो, व  जर आपल्याला ते एप्लीकेशन आवडल्यास आपण डाऊनलोड करु शकतो. यामुळे आपल्याला आपण जे एप्लीकेशन डाउनलोड करायचे आहे ते आपल्याला अपेक्षित असणारे काम करणार आहे की नाही याबद्दल माहिती मिळते, आणि एप्लीकेशनला डाऊनलोड करण्यासाठी आपला जास्त इंटरनेट डेटा सुद्धा वाया जाणार नाही.

तुम्हालाही माहीत करून घ्यायचे असेल की गुगल प्ले स्टोअरवर एप्लीकेशन डाउनलोड करण्या अगोदर ते कसे वापरून पाहावे तर पुढील प्रमाणे स्टेप करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोर चे एप्लीकेशन उघडा.
  2. गुगल प्ले स्टोअर ॲप्लिकेशन उघडल्यानंतर उजव्या बाजूस वरच्या कोपऱ्यात असणाऱ्या आपल्या आयकॉन वर क्लिक करा.
  3. आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही पर्याय येतील, तेथे Settings असे एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  4. Settings  या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर काही पर्याय येतील त्यातील General या पर्यायावर क्लिक करा.
  5. General  या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुमच्या समोर चार पर्याय येथील त्यातील Google play instant या पर्यायावर क्लिक करा.
  6. Google play instant या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला हे पर्याय चालू करण्यासाठी विचारले जाईल तिथे चालू करा व आपले मोबाईल रिस्टार्ट करा.
  7. Google play instant हे पर्याय चालू केल्यावर आणि मोबाइल रिस्टार्ट केल्यांनतर गुगल प्ले स्टोअरवर जे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचे आहे त्याबद्दल शोधा व त्यावर क्लिक करून तेथे तुम्हाला Try Now या पर्यायावर क्लिक करा.
  8. Try Now या पर्यायावर क्लिक केल्यावर,  ते ॲप्लिकेशन सुरू होईल.

अशाप्रकारे मित्रहो आपण ऍप्लिकेशन डाऊनलोड न करता ते अप्लिकेशन कसे आहे  हे वापरून बघू शकतो व जर आवडल्यास आपण ते ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकतो.

टीप २]

मित्रांनो आपण गुगल प्ले स्टोअरवर आपण अनेक ॲप्लिकेशन बघतो जे डाउनलोड करताना तेथे This item isn’t available in your country  असे प्रॉब्लेम येते,  अशा वेळेला आपल्याला एक सेटिंग करावी लागते.

जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल की प्ले स्टोर वर असे अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी काय करावे,  तर पुढील टिप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर ॲप्लिकेशन ओपन करा.
  2. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तेथे Free vpn असेच सर्च करा, व  पहिल्या  क्रमांकावर  येणाऱ्या ऍप्लिकेशनला डाऊनलोड करा व ते अप्लिकेशन उघडून तेथे कंट्री चेंज करा.
  3. नंतर आपल्या मोबाईल मधील सेटिंग मध्ये जाऊन,  तेथे एप्लीकेशन  मध्ये जाऊन तेथे गूगल प्ले स्टोर साठी क्लियर कॅच आणि क्लियर डेटा करा व नंतर प्ले स्टोअर हे ॲप्लिकेशन उघडा.
  4. अप्लीकेशन उघडल्यानंतर तेथे त्या एप्लीकेशन चे नाव टाकून शोधा ज्या ॲप्लिकेशनला डाऊनलोड करताना तुम्हाला This item isn’t available in your country असे प्रॉब्लेम येत होते,  तेथे तुम्हाला डाऊनलोड करण्यासाठी ऑप्शन येईल.

अशाप्रकारे मित्रहो आपण  गुगल प्ले स्टोअरवर ते ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकतो जे आपल्या देशामध्ये डाउनलोड करू शकत नाही.

टीप ३]

मित्रहो आजकाल लहान मुले मोबाईलच खूप मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत, त्यामुळे गूगल प्ले स्टोअरवर मुलांचे आईवडील मुलांच्या प्प्लेस्टोरवरून अँप्लिकेशन्स आणि डाउनलोड करण्यावर कंट्रोल करू शकतात, यासाठी गूगल प्प्लेस्टोरवर Parental control असे एक पर्याय आहे, त्याला चालू करावे लागते.

गूगल प्लेयस्टर वर पॅरेंटल कंट्रोल चालू करण्यासाठी पुढील स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोर चे एप्लीकेशन उघडा.
  2. गुगल प्ले स्टोअर ॲप्लिकेशन उघडल्यानंतर उजव्या बाजूस  वरच्या कोपऱ्यात असणाऱ्या आपल्या आयकॉन वर क्लिक करा.
  3. आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही पर्याय येतील, तेथे Settings असे एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  4. Settings  या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर काही पर्याय असतील, त्यातील Family या पर्यायावर क्लिक करा.
  5. Family या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर parental controls असा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  6. Parental controls वर क्लिक केल्यावर, तुमचा समोर parental controls are off असे दिसेल तिथे समोर असलेल्या पर्यायाला चालू करा.
  7. या पर्यायावर चालू केल्यानंतर, तुम्हाला तिथे पिन ठरवण्यासाठी विचारले  जाईल, तिथे तुमच्या आवडीचा पिन निवडा व ओके वर क्लिक करा.
  8. ओके वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा कन्फर्म करण्यासाठी तेथे पुन्हा पिन टाकण्यासाठी पर्याय येईल तेथे  पुन्हा पिन टाका व ओके बटनावर क्लिक करा.

अशाप्रकारे आपण गुगल प्ले स्टोअरवर पॅरेंटल कंट्रोल हा पर्याय चालू करू शकतो.

टीप ४]

मित्रानो आजकाळ अनेक ठिकाणी लहान मुले आपल्या आई-वडिलांच्या क्रेडिट कार्डचा वापर करून त्यांच्या नकळत मोबाईल वर गेम्स किंवा एप्लीकेशन विकत घेतात व आई वडिलांनी मेहनतीने कमवलेले पैसे गेम किंवा एप्लीकेशन विकत घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करतात,  ज्यामुळे आई-वडिलांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते.  म्हणूनच गुगल प्ले स्टोअर वर Biometric authentication असे एक पर्याय आहे,   ज्यामुले लहान मुले  त्यांच्या आई-वडिलांच्या परवानगीशिवाय प्लेस्टोर वर कोणतेही एप्लीकेशन किंवा गेम विकत घेऊ शकत नाही.

जर तुम्हाला ही माहिती करून घ्यायची असेल की Biometric authentication हे पर्याय कसे चालू करायचे तर पुढीलप्रमाणे दिलेले स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोर चे एप्लीकेशन उघडा.
  2. गुगल प्ले स्टोअर ॲप्लिकेशन उघडल्यानंतर उजव्या बाजूस  वरच्या कोपऱ्यात असणाऱ्या आपल्या आयकॉन वर क्लिक करा.
  3. आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही पर्याय येतील, तेथे Settings असे एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  4. Settings  या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर काही पर्याय असतील त्यातील Authentication या पर्यायावर क्लिक करा.
  5. Authentication या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर Biometric authentication असा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  6. Biometric authentication वर क्लिक केल्यावर, तुमचा समोर Biometric authentication पर्याय बंद दिसेल तिथे समोर असलेल्या पर्यायाला चालू करा.
  7. या पर्यायावर चालू केल्यानंतर तुम्हाला तिथे जीमेल अकाउंटचा पासवर्ड टाका आणि  उजव्या बाजूने असणाऱ्या Ok या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे हे पर्याय चालू केल्यावर मुले त्यांच्या पालकांच्या परमिशन शिवाय कोणतेहि एप्लीकेशन किंवा गेम डाउनलोड करू शकत नाही. म्हणून आपण गुगल प्ले स्टोअर वरील या पर्यायाचा वापर करून आपले होऊ शकणारे नुकसान वाचवू शकतो.

टीप ५]

मित्रहो आपल्याला गूगल प्ले स्टोर कडून अनेक नोटिफिकेशन्स येत असतात, जसे की  एखाद्या एप्लीकेशनचे अपडेट आले आहे ते डाउनलोड करा किंवा एखादे नवीन अँप्लिकेशन आले आहे ते डाउनलोड करा अशा अनेक नोटिफिकेशन्स गुगल प्ले स्टोर कडून येत असतात,  जे आपण आपल्या मोबाईल वर काम करत असताना मध्ये मध्ये येतात व त्रास देतात.  तुम्हाला माहित आहे का अशा नोटिफिकेशनना आपण गूगल प्ले स्टोर मधून एका पर्यायाद्वारे बंद होऊ शकतो.

जर तुम्हालाही माहीत करून घ्यायचे असेल कि गुगल प्लेस्टोर कडून अशा प्रकारच्या येणाऱ्या गरज नसलेल्या नोटिफिकेशन्सला कसे बंद करावे तर पुढे  स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोर चे एप्लीकेशन उघडा.
  2. गुगल प्ले स्टोअर ॲप्लिकेशन उघडल्यानंतर उजव्या बाजूस  वरच्या कोपऱ्यात असणाऱ्या आपल्या आयकॉन वर क्लिक करा.
  3. आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही पर्याय येतील, तेथे Settings असे एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  4. Settings या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर काही पर्याय असतील त्यातील General या पर्यायावर क्लिक करा.
  5. General या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर Notifications असा एक पर्याय दिसेल जो बंद असेल तर तेथे त्यावर क्लिक करा व त्याला चालू करा.

अशाप्रकारे आपण गुगल प्लेस्टोअर कडून येणाऱ्या त्रासदायक नोटिफिकेशन्सना बंद करू शकतो.

अशाप्रकारे मित्रहो आम्ही या लेखात गुगल प्ले स्टोर बद्दलच्या पाच खूप महत्त्वपूर्ण टिप्स सांगितल्या आहेत, ज्या तुम्हाला गुगल प्ले स्टोअर ॲप्लिकेशन वापरताना नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला याबाबत काही शंका असल्यास आम्हाला या बाबतीत खालील असलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

गुगल प्ले स्टोअरचा उपयोग काय?

तुम्ही Google Play Store वरून तुमच्या डिव्हाइसवर ॲप्स, गेम आणि डिजिटल सामग्री इंस्टॉल करू शकता. काहीवेळा तुम्ही इन्स्टंट ॲप्स देखील वापरू शकता ज्यांना इंस्टॉलेशनची आवश्यकता नसते. काही सामग्री कोणत्याही शुल्काशिवाय उपलब्ध आहे आणि काही तुम्हाला खरेदी करणे आवश्यक आहे.


गुगल सर्च कसे वापरावे?

टायपिंग क्षेत्रात तुम्ही जे शोधत आहात ते टाइप करा .

Google Play सेवा कशासाठी वापरली जाते?

Google Play सेवा ॲप्सना Google साइन इन आणि Google नकाशे सारख्या इतर Google सेवांशी कनेक्ट करते . Google Play Services हे Google Play Store ॲप सारखे नाही आणि Android सह समाविष्ट केले आहे. Google Play Services मुळे तुमची बॅटरी जलद संपुष्टात येत नाही किंवा तुमच्या मोबाईल डेटा प्लॅनचा जास्त वापर होत नाही.

Google Play Store कसे कार्य करते?

Google Play, ज्याला Google Play Store म्हणूनही ओळखले जाते, ते ठिकाण आहे जिथे तुम्ही तुमच्या Android डिव्हाइसवर लाखो ॲप्स, गेम आणि इतर मीडिया डाउनलोड किंवा खरेदी करू शकता . आपण स्वारस्यांच्या विस्तृत श्रेणीसाठी प्रोग्राम शोधू शकता. तुम्ही Play Store मधील ॲप किंवा गेम पेजवर नेव्हिगेट करून आणि इन्स्टॉल टॅप करून ॲप्स किंवा गेम डाउनलोड करू शकता.

Leave a Comment