मेसेंजर ॲप्लिकेशन ची संपूर्ण माहिती Messenger Application Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Messenger Application Information In Marathi Messenger application बद्दल माहिती आणि Messenger application कसे वापरावे मित्रहो मेसेंजर हे सोशल मीडियाचे ॲप्लिकेशन आहे ज्याचा वापर करून आपण एकमेकांना मेसेज करू शकतो, व्हिडिओ कॉल करू शकतो, वोईस कॉल करू शकतो. मेसेंजर हे ॲप्लिकेशन फेसबुके कंपनीचे आहे. या   एप्लीकेशनची सुरुवात दहा वर्ष अगोदर नऊ ऑगस्ट 2011 मध्ये झाली.  मेसेंजर या अप्लिकेशन चा वापर संपूर्ण जगभर होत आहे,  हे ॲप्लिकेशन विविध 111 भाषांमध्ये उपलब्ध आहे. चला तर मेसेंजर एप्लीकेशन बद्दल अधिक माहिती करून घेऊया.

Messenger Application Information In Marathi

मेसेंजर ॲप्लिकेशन ची संपूर्ण माहिती Messenger Application Information In Marathi

मेसेंजर ॲप्लिकेशन कसे सुरु करावे ?

मेसेंजर ॲप्लिकेशन सुरू करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईल  मध्ये प्ले स्टोर वरून मेसेंजरचे अप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल आणि नंतर ते इन्स्टॉल करावे लागेल.  हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्याला ह्या ॲप्लीकेशन चा वापर करण्यासाठी या ॲप्लिकेशनवर अकाऊंट तयार करावे लागेल. जर आपल्याकडे अगोदरच फेसबुक अकाऊंट असेल तर आपण त्या फेसबुक अकाउंट चा ईमेल आयडी किंवा फोन नंबर आणि पासवर्ड वापरून मेसेंजरमध्ये लॉगिन करू शकतो.

मेसेंजर वर अकाउंट उघडण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स करा :-

  1. आपले मोबाईल मधील इन्स्टॉल केलेले मेसेंजरचे एप्लीकेशन उघडा.
  2. ॲप्लिकेशन  उघडल्यावर तुमच्यासमोर मेसेंजरचे लोगो दिसेल व थोड्याच वेळात तुमच्यासमोर ईमेल आयडी किंवा फोन नंबर आणि पासवर्ड  टाकून लॉग इन करण्यासाठी पर्याय येईल, आणि खाली  नवीन अकाऊंट तयार करण्यासाठी Create a new account असे पर्याय येईल.
  3. जर  तुमच्याकडे फेसबुकचे अगोदरच अकाउंट असल्यास तेथे ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा व जर तुमच्याकडे अकाउंट नसल्यास Create a new account  या पर्यायावर क्लिक करा.
  4. Create a new account  या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुमच्यासमोर तुमचे नाव आणि आडनाव विचारण्यात येईल,  तेथे ती माहिती टाका व खाली असणाऱ्या Next या पर्यायावर क्लिक करा.
  5. Next या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर तुमची जन्मदिनांक विचारन्यात येईल तेथे तुमची जन्मदिनांक टाका आणि पुन्हा खाली असणाऱ्या Next या पर्यायावर क्लिक करा.
  6. Next  या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर तुमचे अकाउंट तयार करण्यासाठी फोन नंबर  विचारण्यात येईल तिथे तुमचा फोन नंबर टाका व खाली असणाऱ्या Next या पर्यायावर क्लिक करा. जर तुमच्याकडे मोबाईल नंबर नसल्यास तुम्ही तुमच्याकडे असलेल्या ईमेल आयडीचा देखील वापर करू शकता, त्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर टाकण्यासाठी असलेल्या  पर्यायाच्या खाली असणाऱ्या Sign up using email address या पर्यायावर क्लिक करा व तुमचा ईमेल आयडी  टाका व खालील असणाऱ्या Next या पर्यायावर क्लिक करा.
  7. तुमच्या नुसार तुम्ही मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकल्यानंतर व नेक्स्ट पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे लिंग विचारण्यात येईल तेथे तुमचे लिंग टाका व खाली असणाऱ्या Next  या पर्यायावर क्लिक करा.
  8. नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर  तुम्हाला मेसेंजर  अकाउंट साठी पासवर्ड काय ठेवायचे आहे याबाबतीत विचारण्यात येईल तेथे तुम्ही तुमच्या अनुसार एखादे पासवर्ड ठरवून तेथे टाईप करू शकता व नंतर  खाली असणाऱ्या Sign up या पर्यायावर क्लिक करा.
  9. Sign up या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेसेंजर कडून we are creating your account  असे दाखवण्यात येईल व नंतर  तुम्हाला  तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल ऍड्रेस वर पाठवलेल्या कन्फर्मेशन कोड विषयी विचारण्यात येईल,  तेथे तुमच्या ई-मेल आयडी मध्ये जाऊन किंवा मोबाईल वर आलेला मेसेज बघून तो कोड मेसेंजर मध्ये आलेल्या पर्यायांमध्ये टाका.
  10. कन्फर्मेशन कोड टाकल्यानंतर खाली असणाऱ्या नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा व नंतर तुम्हाला मेसेंजर कडून तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन्स पाठवाव्यात का याबाबतीत विचार येईल तेथे तुम्ही हवे असल्यास Allow वर क्लिक करू शकता, नंतर नेक्सट या पर्यायावर क्लिक करा.
  11. Next या पर्यायावर क्लिक केल्यावर  तुमच्या समोर जर तुम्ही ईमेल आयडी दिले असेल तर तुम्हाला मोबाईल नंबर विचारण्यात येईल किंवा जर तुम्ही मोबाईल नंबर दिले असेल तर ईमेल आयडी बदल विचारण्यात येईल,  तेथे ती माहिती टाका व नंतर  उजव्या बाजूस वरच्या भागात असणाऱ्या Next या पर्यायावर क्लिक करा.
  12. Next  या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर मेसेंजर चे लॉगिन पेज ओपन होईल,  तेथे तुम्ही अकाऊंट तयार करताना वापरलेले ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका व खाली असलेल्या लॉगीन पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे आपण मेसेंजर ॲप्लिकेशनवर आपले अकाऊंट तयार करू शकतो.

मेसेंजर मध्ये आपल्या प्रोफाईल चे यूजर नेम कसे बदलायचे ?

मित्रांनो आपण मेसेंजर वर अकाऊंट तयार करीत असताना काहीतरी युजरनेम ठरवून टाकतो व नंतर आपल्याला ते बदलायचे ते तर त्यासाठी आपल्याला मेसेंजर मधून जाऊन चेंज करावे लागते.

जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल कि मेसेंजर मधून आपले प्रोफाईल चे युजरनेम कसे बदलायचे तर पुढीलप्रमाणे स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील मेसेंजरचे एप्लीकेशन उघडा.
  2. मोबाईल मध्ये मेसेंजर चे ॲप्लिकेशन आल्यानंतर तेथे प्रोफाईल या टॅब वर क्लिक करा.
  3. प्रोफाईल या टॅब मध्ये क्लिक केल्यावर,  मोबाइल स्क्रीन वर स्क्रोल करून थोडे खाली या  व तेथे युजर नेम या पर्यायावर क्लिक करा.
  4. युजर नेम या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर दोन पर्याय येतील त्यातील Edit username या पर्यायावर क्लिक करा.
  5. Edit username  या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर तुमच्या मेसेंजर प्रोफाइल चे अगोदरचे युजरनेम दिसेल तेथे तुम्ही त्या युजरनेम डिलीट मारून तुमचे नवीन युजर नेम ठेवा व नंतर उजव्या बाजूस वरच्या भागात असणाऱ्या बरोबरच या चिन्हावर क्लिक करा.

अशाप्रकारे मित्रहो आपण मेसेंजरमध्ये आपले युजरनेम बदलू शकतो.

मेसेंजर वर मेसेज करून त्रास देणाऱ्या व्यक्तींना कसे बंद करावे ?

मित्रहो काही वेळेला आपल्याला काही व्यक्ती आपल्याला मेसेंजर वर सतत मेसेज करून त्रास देत असतात ज्या मुळे आपल्या मोबाइलवर सतत नोटिफिकेशन्स येत असतात जे आपल्याला त्रास देत असते.  मित्रहो अशा वेळेला आपण अशा व्यक्तींच्या मेसेंजर वर येणाऱ्या नोटिफिकेशन बंद करू शकतो.

जर तुम्हालाही माहीत करून घ्यायचे असेल की मेसेंजर वर खूप मेसेज करून त्रास देणाऱ्या व्यक्तींच्या मेसेंजर वर येणाऱ्या नोटिफिकेशन कसे बंद करावे यासाठी पुढील स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील मेसेंजरचे एप्लीकेशन उघडा.
  2. मेसेंजर चे ॲप्लिकेशन उघडल्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही चॅटिंग केलेल्या व्यक्तींची लिस्ट दिसेल,  तिथे ज्या व्यक्तीकडून तुम्हाला खूप मेसेज येत आहेत त्या व्यक्तीच्या नावावर तीन सेकंद इतके क्लिक करा.
  3. त्या व्यक्तीच्या नावावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर काही पर्याय येथील त्यातील Ignore message या पर्यायावर क्लिक करा.
  4. Ignore message या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला कन्फर्म करण्यासाठी पुन्हा विचारण्यात येईल तेथे Ignore या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे आपण मेसेंजर मध्ये जो व्यक्ती आपल्याला मेसेंजरवर सतत मेसेज करून त्रास देत आहे  त्या व्यक्तीस ignore list  मध्ये ऍड करू शकतो, ज्यामुळे त्याचे मेसेज आपल्या पर्यंत पोहोचणार नाही.

आपले मेसेंजर वरील ऑनलाईन चे स्टेटस दुसऱ्याला दिसल्यापासून कसे थांबवावे ?

मित्रहो आपण मेसेंजर एप्लीकेशन उघडल्यानंतर आपल्या मेसेंजर मधील मित्रांना आपण मेसेजरवर ऑनलाइन असण्याचे स्टेटस दिसते,  जे आपल्याला जर हवे असेल तर आपण ते दिसण्या पासून बंद करू शकतो, यासाठी आपल्याला facebook chat off या पर्यायाचा वापर करावा लागतो.

जर तुम्हालाही माहीत करून घ्यायचे असेल की आपले मेसेंजर वरील ऑनलाइन स्टेटस दुसऱ्याला दिसण्यापासुन कसे थांबवावे तर पुढे दिल्याप्रमाणे स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील मेसेंजरचे एप्लीकेशन उघडा.
  2. मेसेंजरचे ॲप्लिकेशन उघडल्यानंतर, तुम्हाला मेसेंजर च्या खालच्या बाजूस काही पर्याय दिसतील त्यातील चौथ्या पर्यायावर क्लिक करा.
  3. खाली दिसणाऱ्या चौथ्या पर्यायावर क्लिक केल्यावर,  तुमच्या समोर काही पर्याय येथील त्यातील Active या पर्यायावर क्लिक करा.
  4. Active या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर तुमचे मेसेंजर खाते चे नाव दिसेल व त्यासमोर तुमचे मेसेंजर चे चालू असल्याचे नीळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये दिसेल,  त्यावर क्लिक करा ज्यामुळे ते बंद होईल.

अशाप्रकारे आपण मेसेंजर वर आपले ऑनलाइन स्टेटस दुसऱ्याला दिसते पासून बंद करू शकतो.

मेसेंजर मध्ये एखाद्या व्यक्तीला निकनेम कसे द्यावे ?

मित्रहो  आज-काल काहीजण मेसेंजर वर आपल्या नावाच्या ऐवजी काही दुसरे नाव ठेवतात परंतु आपल्याला ती व्यक्ती माहीत असते तर अशा वेळी आपण आपल्या माहितीसाठी आपण त्या व्यक्तीचे Nickname ठेवू शकतो.

जर तुम्हालाही मेसेंजर वर एखाद्या व्यक्तीचे निकनेम ठेवायचे असेल तर पुढील  स्टेप्स करा :-

  1. आपल्या मोबाईल मधील मेसेंजरचे एप्लीकेशन उघडा.
  2. मेसेंजर चे ॲप्लिकेशन उघडल्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही चॅटिंग केलेल्या व्यक्तींची लिस्ट दिसेल,  तिथे ज्या  व्यक्तीचे तुम्हाला निकनेम ठेवायचे आहे,  त्याच्या नावावर क्लिक करा.
  3. व्यक्तीच्या नावावर क्लिक केल्यावर,  तुमच्या समोर, तुम्ही त्या व्यक्तीशी केलेली चॅटिंग दिसून येईल,  तेथे उजव्या बाजूस वरच्या कोपऱ्यात i असे पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  4. i  या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर काही पर्याय तील त्यातील Nicknames या पर्यायावर क्लिक करा.
  5. Nicknames  या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर त्या व्यक्तीस जे निकनेम ठेवायचे आहे त्या बाबतीत विचारण्यात येईल तेथे तुम्ही तुम्हाला जे  निकनेम ठेवायचे आहे ते टाईप करा व ओके बटनावर क्लिक करा.

अशाप्रकारे आपण मॅसेंजरवर एखाद्या व्यक्तीचे निकनेम ठेवू शकतो.

अशाप्रकारे मित्रहो या लेखात मेसेंजर एप्लीकेशन बद्दल खूप काही महत्त्वाची माहिती सांगितली आहे, जी तुम्हाला मेसेंजर  सुरू करण्यास आणि वापरण्यास नक्कीच मदत करेल.  आम्ही दिलेल्या या माहितीबाबत आपल्याकडे काही शंका असल्यास  खालील असलेल्या कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका आणि जर मेसेंजर बद्दल सांगितली ही माहिती आपल्याला आवडलि असल्यास आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका.

Leave a Comment