शेळी प्राण्याची संपूर्ण माहिती Goat Animal Information In Marathi

Goat Animal Information In Marathi शेळ्यांचा वापर दुध, मांस, फर आणि कातडी  यासाठी जगभरात केला जातो. शेळी ही गरीबाची गाय मानली जाते. शेळ्यांचा खुराक कमी असतो. शेळ्यांमध्ये नैसर्गिकरित्या कुतूहल असते.  ते चपळ आणि अनिश्चित ठिकाणी चढण्याच्या आणि संतुलन राखू शकतात. हे त्यांचे एक वैशिष्ट्य आहे. यामुळे नियमितपणे झाडांवर चढणारे ते एकमेव रम्य बनतात.  तर चला मग पाहूया शेळीविषयी सविस्तर माहिती.

Goat Animal Information In Marathi

शेळी प्राण्याची संपूर्ण माहिती Goat Animal Information In Marathi

बकरी दूध देणारा एक सस्तन प्राणी आहे. समखुरी गणाच्या बोव्हिडी कुळातील पोकळ शिंगाच्या व रवंथ करणार्‍या प्राण्यांपैकी एक आहे. बकरीचे शास्त्रीय नाव ‘कँप्रा हिकर्स’ असे आहे. शेळ्यांची सर्वात जास्त संख्या ही आशियात आढळते आणि सर्वाधिक संख्या चीनमध्ये आणि त्यानंतर भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांमध्ये देखील शेळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळते. शेळी ही रुमिनेंटसची एक प्रजाती आहे.

शेळीचे वर्णन :

शेळी ही सर्वांच्या परिचयाचा पाळीव प्राणी असून ती गरीब असते. बकऱ्यांना चार पाय आणि एक शेपूट आहे. जी वर उंचावलेली असते. तसेच बकरीला दोन लांब कान असून बकरीच्या डोक्यावर दोन शिंगे असतात पण काही शेळ्यांना शिंगे नसतात. बकऱ्यांचा रंग हा पांढरा, काळा, तपकिरी आणि लाल असू शकतो.

शेळ्यांचा इतिहास :

पाळीव प्राण्यांमध्ये शेळ्यांचा समावेश होतो.  सर्वात अलीकडील अनुवांशिक विश्लेषण पुरातत्वीय पुराव्याची पुष्टी करते की, झाग्रोस पर्वतावरील जंगली बेझोअर आयबेक्स हे आजच्या सर्व पाळीव शेळ्यांचे संभाव्य मूळ पूर्वज आहेत. नवपाषाण काळातील शेतकरी प्रामुख्याने दूध आणि मांस, तसेच त्यांच्या शेणासाठी, ज्याचा इंधन म्हणून वापर केला जात होता.

सहज उपलब्ध होण्यासाठी जंगली शेळ्या पाळण्यास सुरुवात केली आणि त्यांची हाडे, केस आणि सिन्यू यांचा वापर कपडे, बांधकाम आणि साधनांसाठी केला जात असे.  आजपासून 10,000 वर्षांपूर्वीच्या पाळीव बकऱ्यांचे सर्वात जुने अवशेष इराणमधील गंज दरेह येथे आढळतात. जेरिको,  चोगा मामी, जेईटुन आणि कायोनू येथील पुरातत्व स्थळांवर बकऱ्यांचे अवशेष सापडले आहेत, जे पश्चिम आशियातील 8,000 ते 9,000 वर्षांपूर्वीच्या काळात बकऱ्यांचे पालन करत होते.

शेळ्यांचे आयुष्य :

शेळ्यांचे जीवन 15 ते 18 वर्षांच्या दरम्यान असते.  24 वर्षे वयापर्यंत पोहोचलेल्या शेळीचे उदाहरण नोंदवले गेले आहे.  अनेक घटक ही सरासरी अपेक्षा कमी करू शकतात.   मासासाठी उपयोग करण्यात येणाऱ्या शेळ्या विषयी बोललो तर त्यांचे आयुष्य हे किमान दहा ते अकरा वर्षापर्यंत असू शकते आणि रटमध्ये जाण्याच्या तणावामुळे बोकडाचे अपेक्षित आयुष्य 8 ते 10 वर्षांपर्यंत कमी होऊ शकते.

शेळ्यांच्या प्रजाती :

भारतात शेळ्यांच्या सुमारे 25 जाती आहेत. जमनापरी, बिटल, सुरती, मारवाडी, बारबेरी वगैरे जाती दूध उत्पादनास तर बिटल, उस्मानाबादी, सुरती, संगमनेरी, अजमेरी वगैरे जाती मांसासाठी वापरल्या जातात. यांची वाढ मंद गतीने म्हणजे वर्षास सुमारे 25 किलो इतकी होते. जगातील पाळीव शेळ्या दक्षिण, पश्चिम आशिया आणि पूर्व यूरोपच्या जंगली शेळ्यांचे वंशज आहेत.

आज जगात सुमारे 300 जाती आढळतात. संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या मध्ये 2011 मध्ये जगात 924 दशलक्ष पेक्षा जास्त शेळ्या होत्या. शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळी पालन केले जाते. शेळीच्या नराला बोकड असे म्हणतात. शेळी एका वेळी 2 ते 3 पिल्लांना जन्म देते. शेळीचे दूध हे अतिशय आरोग्यदायी मानले जाते. शेळीचे वजन त्यांच्या प्रजातीनुसार बदलते काही शेळ्यांचे वजन 20 ते 25 किलो पर्यंत असते तर काही शाळा 110 ते 120 किलो व त्याहूनही जास्त वजनाच्या असतात.

विदेशी जाती :

शेळ्यांच्या जातीमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे त्यामध्ये विदेशी जातीमध्ये सानेन, टोगेनबर्ग, अल्पाईन, एग्लोन्युबियन, अंगोरा या बकऱ्यांच्या विदेशी सुधारीत जाती आहेत. यांची वाढ झपाट्याने होते. आफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळ्या वजनदार आहेत. नराचे वजन 100 ते 125 किलो व मादिचे वजन सुमारे 90 ते 100 किलो असते. भारतातील शुद्ध जातीच्या शेळ्या या उस्मानाबादी किंवा संगमनेरी आहेत.

शेळ्यांचे खाद्य :

शेळीच्या वजनाच्या किमान 0.5% खुराक, 2% वाळलेला चारा, 1.50% हिरवा चारा असे साधारणतः आहाराचे प्रमाण असते. चाऱ्याचे लहान तुकडे करून दिल्यास सुमारे 25 ते 30% चाऱ्याची बचत होते. पिल्लांना जन्मानंतर 1.50 महिना आईचे दूध मिळालेच पाहिजे. तसेच त्यांना लुसलुशीत पाला, खुराक देता येते. दिड महिन्यानंतर त्यांचे दूध तोडावयास हवे. त्यांना प्रथिनयुक्त आहार पुरेश्या प्रमाणात द्यावयास हवा.

शेळ्यांची पिलांचे वजन सुरुवातीच्या काळात जास्त प्रमाणात वाढते यासाठी पिलांना जास्तीत जास्त दुधाची गरज असते, त्यामुळे शेळ्यांना हिरव्या चाऱ्या बरोबर योग्य प्रमाणात खुराक देणे खुप गरजेचे आहे. यामध्ये दूध वाढीच्या पशु खाद्य तसेच मका, तुरीचा भरडा यासारखा खुराक देणे गरजेचे आहे. खुराकामध्ये शेंगदाणा ढेप, सरकी ढेप असावी.

शेळी पालन :

शेळीपालन व गुरेपाळणे यामध्ये बराच फरक आहे. कारण गुरांना मोठ्या प्रमाणात जागा व चाऱ्यांची आवश्यकता असते परंतु त्या मानाने शेळ्यांना एवढी चाऱ्याची किंवा जागेची उपलब्धता नसते. कमी जागेमध्ये देखील शेळी पालन हा व्यवसाय करू शकतो. शेळीपालनाचे मुख्यतः दोन प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे :

बंदिस्त शेळीपालन :

शेळ्यांची चरण्याची पद्धत ही इतर गुरांपेक्षा वेगळी असते. त्या केवळ झाडांची पाने व कोवळे शेंडे ओरबाडतात. यामुळे बकरीने तोंड लावलेल्या झाडांची वाढ खुंटते. तसेच यामुळे झुडपांचा व जंगलाच नाश होतो असा बऱ्याच लोकांचा समज आहे. बंदिस्त संगोपनात शेळ्यांची झपाट्याने वाढ होते.

यासाठी वातावरणापासून संरक्षणासाठी त्यांचेसाठी गोठा आवश्यक असतो. तो गोठा उंचवट्यावर, मुरमाड जमिनीत व पाण्याचा निचरा होऊ शकेल अशा ठिकाणी असावा. शेळ्यांना प्रत्येकी 10 ते 12 चौ.फूट, करडांना 2 ते 5 चौ.फू. व बोकडास 25 चौ.फू. जागा लागते. अशा प्रकारे संख्या बघून गोठा उभारावा. याशिवाय गोठ्याबाहेर त्यांना फिरण्यासाठी मोकळी जागा असावी.

अर्धबंदिस्त शेळीपालन :

शेळ्या या रानात किंवा शेतात चरईसाठी फिरणारे जानवर म्हणून ओळखले जाते. यामुळे जर शेळ्यांना रोज काही वेळ चरण्यासाठी मोकळे सोडले तर त्यांना विविध प्रकारच्या नैसर्गिक वनस्पती खाद्यामध्ये मिळतात व त्यांचे आरोग्य चांगले राहते तसेच खाद्यही कमी लागते. शेळ्यांना नैसर्गिकपणे फिरून चारा व झाडपाला ओरबाडण्याची सवय असते.

त्यांना गोठ्यात कोंडून ठेवल्यास व्यायाम मिळत नाही. त्यांना फिरवून आणल्याने त्यांचे खूर वाढत नाहीत. अशाप्रकारे शेळ्यांचे संगोपन आपण करू शकतो. जर तुम्हालाही शेळ्यांची संगोपन करायचे असेल तर तुम्ही शासनाकडून लाभही मिळू शकता. शेळीपालन या व्यवसायातून बरेच उत्पन्न आपल्याला मिळू शकते. त्यामुळे शेळीपालनाचा योग्य अभ्यास करूनच शेळी पालन हा व्यवसाय करावा.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते मला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

 

शेळीचा आवाज कसा येतो?

बरं, शेळ्या मेंढ्या काढतात तसाच “बा” आवाज काढतात. तथापि, शेळीचे स्वर "ब्लीट" म्हटल्या जाणार्‍या आवाजाच्या अगदी जवळ आहेत, जो कधीकधी गायी आणि हरणांनी देखील काढलेला आवाज असतो. बकरीचे आवाज अप्रशिक्षित कानाला सारखेच वाटू शकतात, परंतु बकरी कशाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहे यावर आधारित ते वेगळे असतात.

शेळ्या म्हणजे प्राणी आहेत का?

शेळ्या सामान्यतः नम्र असतात, परंतु इतर आजारी, छेडछाड, ताणतणाव किंवा वेदना होत असताना क्षुद्र प्राणी बनतात . ते तुमच्यावर हल्ला करू शकत नाहीत, परंतु ते लहान मुलांसाठी आणि अनोळखी लोकांसाठी असू शकतात.

शेळी म्हणजे काय?

GOAT: अर्थ, GOAT ची उत्पत्ती, सर्वकाळातील महान .16-Jan-2023

शेळ्या कशाचा तिरस्कार करतात?

परंतु, इतर प्राण्यांप्रमाणे, शेळ्यांनी लसूण, कांदा, चॉकलेट किंवा कॅफीनचे कोणतेही स्त्रोत यासारख्या गोष्टींचे सेवन करू नये, काही नावे. जरी बहुतेक शेळ्या उरलेल्या मांसाचे तुकडे खात नसतील, तरीही त्यांना ते देऊ नये. लिंबूवर्गीय फळे देखील टाळली पाहिजेत, कारण ते खरोखरच रुमेनला अस्वस्थ करू शकतात.

शेळीचे चारित्र्य काय असते?

शेळ्या अतिशय हुशार आणि जिज्ञासू प्राणी आहेत. त्यांच्या जिज्ञासू स्वभावाचे उदाहरण त्यांना समोर आलेली कोणतीही अपरिचित गोष्ट शोधण्याची आणि तपासण्याच्या त्यांच्या सततच्या इच्छेमध्ये दिसून येते. ते ब्लीटिंग करून एकमेकांशी संवाद साधतात. माता अनेकदा त्यांच्या लहान मुलांना (मुलांना) जवळ राहतील याची खात्री करण्यासाठी कॉल करतात.

शेळीचे चारित्र्य काय असते?

शेळ्या अतिशय हुशार आणि जिज्ञासू प्राणी आहेत. त्यांच्या जिज्ञासू स्वभावाचे उदाहरण त्यांना समोर आलेली कोणतीही अपरिचित गोष्ट शोधण्याची आणि तपासण्याच्या त्यांच्या सततच्या इच्छेमध्ये दिसून येते. ते ब्लीटिंग करून एकमेकांशी संवाद साधतात. माता अनेकदा त्यांच्या लहान मुलांना (मुलांना) जवळ राहतील याची खात्री करण्यासाठी कॉल करतात.

Leave a Comment