बी.सी.ए. कोर्सची संपूर्ण माहिती BCA Course Information In Marathi

BCA Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो, पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण हे आपण एक सारखेच घेत असतो.दहावी झाल्या नंतर, कोण कला शाखेकडे, तर कोण कॉमर्स शाखेकडे, तर कोण विज्ञान शाखेकडे प्रवेश घेतो. तसेच बारावीचा एकदा निकाल लागला की ,कोणता कोर्स करावा ?हा सर्वांनाच पडणारा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.

Bca Course Information In Marathi

बी.सी.ए. कोर्सची संपूर्ण माहिती BCA Course Information In Marathi

Table of Contents

आपल्यापुढे पुढील शिक्षणाकरिता अनेक डिग्री व कोर्स उपलब्ध असतात. परंतु त्यापैकी कोणती डिग्री व कोणता कोर्स निवडावा हा संभ्रम प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात असतो. आजच्या काळात कॉम्प्युटर व इंटरनेट हे आपल्या सर्वांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

आजच्या इंटरनेटच्या युगात अनेक विद्यार्थ्यांचे कॉम्प्युटर कडे अधिक आकर्षण वाढू लागले आहे. काही विद्यार्थी आपले करिअर हे कॉम्प्युटर मध्ये करायचे ठरवतात. चला तर मी तुमची थोडी मदत करते. आज मी तुम्हाला कॉम्प्युटर निगडीत अशा एका कोर्स विषयी माहिती सांगणार आहे. त्या कोर्सचे नाव आहे बी.सी.ए.कोर्स!!!

आज आपण बी.सी.ए. या कोर्सला पात्रता काय लागते, त्या कोर्सचा कालावधी किती, हा कोर्स केल्याचे फायदे व हा कोर्स केल्यानंतर मिळणाऱ्या नोकरीच्या संधी याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

बारावीनंतर करता येणारी बी.सी.ए. ही एक डिग्री आहे. आजच्या इंटरनेटच्या युगात नवीन पिढी ही कॉम्प्युटर कडे जास्त आकर्षित झाली आहे. ज्या मुलांना कॉम्प्युटर मध्ये आवड आहे त्या विद्यार्थ्यांनी बी.सी.ए. हा कोर्स नक्की करावा. बी.सी.ए. हा कोर्स कॉम्प्युटरशी संबंधित असा कोर्स आहे. बी.सी.ए. चा लॉंग फॉर्म ‘बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन’ असा आहे. या कोर्स कडे प्रोफेशनल डिग्री कोर्स म्हणूनही बघितले जाते. बीसी हा कोर्स एक प्रकारे अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे.

बी.सी.ए. हा कोर्स कॉम्प्युटर सायन्स कोर्स सारखाच आहे. या दोन्ही कोर्समध्ये जास्त असा फरक नसतो. हा कोर्स पूर्णपणे कॉम्प्युटरशी संबंधित आहे. आपली जशी मराठी भाषा असते. तसेच कॉम्प्युटरची सुद्धा एक विशेष भाषा असते. कॉम्प्युटरला एचटीएमएल किंवा जावा स्टिक यांसारख्या भाषा समजतात. तर या भाषांचा अभ्यास या कोर्स मध्ये घेतला जातो.

सध्या बी.सी.ए.या कोर्सकडे भरपूर मुला-मुलींचा कल पाहण्यास मिळतो. हा कोर्स केल्यावर तुम्हाला अनेक फायदे होतात तुम्हाला जर कॉम्प्युटर फिल्डमध्ये काम करायचे असेल तर हा बी.सी.ए.कोर्स हा उत्तम पर्याय आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही आय.टी. सेक्टरमध्ये ही तुमचे नशीब आजमावू शकता.

सध्या डिजिटल सेक्टर मध्ये भरपूर जॉब आहेत व पगारही चांगला असतो. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग,अँप डिझायनिंग ,वेबसाईट डिझायनिंग, कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इत्यादी शिकवले जाते. तुम्ही घर बसल्या ऑनलाईन कामे करू शकता व पैसे कमवू शकता.

आता आपण हा बी.सी.ए.हा कोर्स करण्यासाठी कोणती पात्रता लागते हे पाहुयात !!! बी.सी.ए.या कोर्स ला ऍडमिशन घेण्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यालयातील बारावी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण करावी लागते .फक्त विज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्याला या कोर्सला ऍडमिशन घेता येते असे सर्वांना वाटते पण ते चुकीचे आहे.

कला, वाणिज्य व विज्ञान या कोणत्याही शाखेतील विद्यार्थी हा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर या बी.सी.ए. कोर्सला प्रवेश घेऊ शकतो. बारावीमध्ये विद्यार्थ्याला 45 % गुण असणे अनिवार्य आहे .बी.सी.ए. ला प्रवेश घेण्यासाठी विज्ञान शाखा असणे ही अट नसते .परंतु बारावी मध्ये त्या विद्यार्थ्यांचे कॉम्प्युटर विषयी माहिती किंवा गणित हे विषय बंधनकारक आहेत.

आता आपण बी.सी.ए. या कोर्सची प्रवेश प्रक्रिया कशी असते हे पाहुयात!!

बी.सी.ए.या कोर्सला प्रवेश हा बारावीच्या गुणांवर दिला जातो. तसेच कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक आहे. प्रवेश परीक्षेचे गुण व बारावी बोर्डाच्या गुणांच्या आधारे तुम्हाला प्रवेश दिला जातो. बी.सी.ए. या कोर्ससाठी तुम्हाला BUMAT, SET, IPU CET, IUET इत्यादी सारख्या प्रवेश परीक्षा आहेत.

बी.सी.ए. प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे:-

  • लिव्हिंग सर्टिफिकेट.
  • दहावी व बारावी मार्क लिस्ट. कास्ट मध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट.
  • ओपन मध्ये असाल तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट.
  • ओबीसी मध्ये असाल तर नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट.
  • डोमीसाईल सर्टिफिकेट.

बी.सी.ए. या कोर्सची सरासरी 30000 ते 80000 प्रतिवर्षी असते. प्रत्येक कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये ती वेगवेगळी असते. आपण जर खाजगी कॉलेजमध्ये बी.सी.ए. करण्याचा विचार करत असताल तर खाजगी कॉलेजची फी जास्त असते. तर सरकारी कॉलेजमध्ये ही फार कमी असते.

बी.सी.ए. हा कोर्स 3 वर्षाचा असून 6 सेमिस्टरमध्ये विभागलेला असतो. या अभ्यासक्रमात डाटाबेस, नेटवर्किंग, डेटा स्ट्रक्चर, सी आणि जावा यांसारख्या कोअर प्रोग्रामिंग लैंग्वेज या विषयांचा समावेश होतो. सॉफ्टवेअर बनवायला शिकवले जाते. वेबसाइट डिझाइन शिकवले जाते. संगणक नेटवर्क, संगणकाच्या मूलभूत गोष्टी तसेच कॉम्प्युटर भाषा शिकवल्या जातात.

कॉम्प्युटर बेसिक. नेटवर्किंग, वेबसाईट डेव्हलपमेंट इत्यादी शिक्षण दिले जाते. शेवटच्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला एक प्रोजेक्ट दिले जाते व तो सबमिट करायचा असतो जे खूप महत्त्वाचे आहे .ते प्रोजेक्ट पूर्ण केल्यानंतरच तुमचा बी.सी.ए. कोर्स पूर्ण होतो .हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्ही संगणक क्षेत्रात किंवा आयटी कंपनीमध्ये इंटरंशिप करू शकता.

आता आपण बी.सी.ए कोर्स चा अभ्यासक्रम पाहुयात-

• मॅथेमॅटिक्स फाऊंडेशन-

प्रोग्रॅमएर किंवा कोड बनण्यासाठी तुमचे गणित हे चांगले असावे लागते,म्हणून गणित हा विषय फार महत्वाचा असतो. बी.सी.ए हा कोर्स करताना तुम्हाला पहिल्या सेमिस्टर मध्ये कोडिंग साठी लागणारे मूलभूत गणित शिकवले जाते.त्यामुळे चांगले कोडर किंवा प्रोग्रॅमएर बनण्यासाठी गणित ही चांगले असावे लागते.

• ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम(OOP) –

ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम ही एक कम्प्युटर प्रोग्रम्मिंग मॉडेल आहे जे आपण नवीन सॉफ्टवेअर बनवण्यासाठी वापरतो.

• सी प्रोग्रामिंग (C Language) –

सी प्रोग्रामिंग लॅंगवेज ही कम्प्युटर लॅंगवेज आहे जी मोबाइल अॅप्स, वेबसाइट्स, पेज, बनवण्यासाठी वापरली जाते.

• वेब डेवलपमेंट-

ह्या विषयात तुम्हाला वेबसाइट्स तयार करणे व त्या नीट मेंटेन करणे शिकवले जाते. वेब डेवलपमेंट मध्ये तुमहल वेबसाइट्स डिझाईन करणे त्यानंतर त्यांचे प्रोग्रामिंग आणि डेटा मॅनेज करणे देखील शिकवले जाते.

• ऑपरेटिंग सिस्टम्स(OS) –

ऑपरेटिंग सिस्टम्स हा प्रोग्राम आपल्या फोन,लॅपटॉप, व इतर इलेक्ट्रिकल वस्तु ज्या आपण कामासाठी वापरतो त्यांना मॅनेज करते.ही आपल्या फोन मधले अॅप्स व प्रोग्राम्स मनगे करते.जसे की अॅपल आय.ओ.एस व अँन्ड्रॉईड ई.

• ए.आय(AI) –

आर्टिफिश्यल इंटेलिजेंस हा एक सॉफ्टवेअर चा प्रकार आहे जे आपल्या कम्प्युटर चे हार्डवेअर व सॉफ्टवेअर मॅनेज करते.

• ई-कॉमर्स –

गेल्या दिवसांमध्ये ई-कॉमर्सला बरीच प्रसिद्धी मिळाल्याचे आपल्या पाहायला मिळते.ई-कॉमर्स म्हणजे इंटरनेट द्वारे वस्तु विकणे व विकत घेणे ही शिकवले जाते,म्हणजेच ऑनलाइन मार्केटिंग व पेमेंट गॅरंटी ही शिकवले जाते.

• क्लाऊड कम्प्यूटिंग-

क्लाऊड कम्प्यूटिंग म्हणजे इंटरनेट द्वारे पुरवल्या जाणाऱ्या सोयसुविधा जय आपल्या लॅपटॉप किंवा आपल्या फोन यांचा डेटा मॅनेज करते.

• कम्प्युटर ग्राफिक्स –

कम्प्युटर ग्राफिक्स हे जाहिराती बनवण्यासाठी वापरले जाते. जसे की डिजिटल ग्राफिक्स, डिस्प्ले, व गेम्स जसे की पबजी, फ्री फायर ह्या गेम्स चे ग्राफिक बनवण्यातही देखील वापरले जातात.

बी.सी.ए.हा कोर्स केल्यानंतर नंतर तुम्ही उच्च शिक्षण घेऊ शकता. तुम्ही एम.सी.ए.( मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन)एम.बी.ए.( मास्टर ऑफ बिझनेस एप्लीकेशन)एम.आय.एम. (माहिती व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी) एम.सी.एम.( मास्टर इन कॉम्प्युटर मॅनेजमेंट) मोठ्या पदव्या तुम्ही घेऊ शकता. तसेच तुम्ही पीजी डिप्लोमा ही करू शकता .तसेच तुम्ही संगणक अभियंता ,सॉफ्टवेअर डेव्हलपर, सॉफ्टवेअर डिझाईनर किंवा प्रोग्रॅमिंग क्षेत्रातही करियर करू शकता .

भारताबरोबरच परदेशातही तुम्हाला आयटी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही आयटी क्षेत्रातील कंपनी जसे की ओरॅकल, आयबीएम ,गुगल, मायक्रोसॉफ्ट ,टेक महिंद्रा, विप्रो, डेल ,एचसीएल इत्यादी नामवंत कंपन्यांमध्ये संधी मिळाली तर उत्तम करियर करून आपले भविष्य उज्वल करू शकता. तसेच खाजगी क्षेत्रातही नोकऱ्यांची कमतरता नाही. तुमच्या मध्ये जर चांगल्या प्रकारे कौशल्य असेल तर तुम्ही बेरोजगार राहणार नाही हे नक्की!!

FAQ’s :-

बी.सी.ए. चा लॉंग फॉर्म काय आहे?

'बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन'असा आहे.

बी.सी.ए. कोर्स व कॉम्प्युटर सायन्स कोर्स यामध्ये काय फरक आहे?

बी.सी.ए. कोर्स व कॉम्प्युटर सायन्स कोर्स हा सारखाच कोर्स आहे. या दोन्ही कोर्समध्ये जास्त असा फरक नसतो. हा कोर्स पूर्णपणे कॉम्प्युटरशी संबंधित आहे.

बी.सी.ए. कोर्स करण्यासाठी कोणती पात्रता लागते?

हा कोर्स करण्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यालयातील बारावी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. विद्यार्थ्याला 45 % गुण असणे अनिवार्य आहे. बी.सी.ए. प्रवेश घेण्यासाठी बारावी मध्ये तुम्हाला कॉम्प्युटर विषयी माहिती आणि गणित हे विषय बंधनकारक आहेत.

बी.सी.ए.हा कोर्स करण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते का?

हो, हा कोर्स करण्यासाठी प्रवेश परीक्षाही बंधनकारक आहे.BUMAT, SET, IPU CET, IUTE इत्यादी प्रवेश परीक्षा आहेत.

बी.सी.ए. ला प्रवेश घेण्यासाठी विज्ञान शाखेचा विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो का ?

नाही, बी.सी.ए.ला प्रवेश घेण्यासाठी विज्ञान शाखा असणे ही अट नसते. कोणत्याही शाखेचा विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो .परंतु बारावी मध्ये तुम्हाला कॉम्प्युटर विषयी माहिती व गणित हे विषय बंधनकारक आहेत.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment