बाजीप्रभू देशपांडे विषयी संपूर्ण माहिती Bajiprabhu Deshpande Information In Marathi

Bajiprabhu Deshpande Information In Marathi बाजीप्रभू देशपांडे पराक्रमी लढवय्ये आणि त्यागी स्वामिनिष्ठ करारी कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते. बाजीप्रभू देशपांडे हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशपांडे आहेत बाजी प्रभू हे हिरडस मावळचे वतनदार असणाऱ्या बांदलांचे दिवाण होते. बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले आणि बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा समर्पित केली.

Bajiprabhu Deshpande Information In Marathi

बाजीप्रभू देशपांडे विषयी संपूर्ण माहिती Bajiprabhu Deshpande Information In Marathi

जन्म :

बाजीप्रभुचा जन्म भोर जवळील शिंदे या गावात, सन 1615 साली झाला असा अंदाज बांधला जातो. पुणे जिल्ह्यातील भोर नावाचा तालुका आहे. त्या भोर तालुक्याचे बाजीप्रभू हे पिढीजात देशपांडे होते. बाजीप्रभुंची हुशारी आणि त्यांचे बळ कौशल्य पाहून शिवरायांनी त्यांना आपले स्वराज्य मोहिमेत सहभागी करून घेतले आणि पुढे मरेपर्यंत बाजीप्रभू शिवरायांची एकनिष्ठ राहिले.

पन्हाळगडाला वेढा :

बाजीप्रभू यांचे नाव घेतले की, आपल्याला पावनखिंडीची हमखास आठवण होते. याच प्रसंगात शत्रूशी लढताना बाजीप्रभूंनी आपले प्राण त्यागले आणि शिवरायांप्रती आपली निष्ठा सिद्ध केली. शिवाजी महाराज पन्हाळगडावर आपल्या सैन्यासह होते.

त्यावेळेस पन्हाळगडाला सिद्दी जोहर याने जबरदस्त वेढा घातलेला होता आणि मराठे फसले होते. पन्हाळगड हा वेढा बाजीप्रभूच यशस्वीपणे लढू शकेल इतके सक्षम होता. म्हणून शिवराय जरा निर्धास्त होते परंतु त्यातच दोन मोठ्या गोष्टी कानावर आल्या पहिली अशी की शिवराया पन्हाळ्यावर वेढ्यात अडकले असताना तिकडे शाहिस्तेखानाने पुण्यावर हल्ला केला होता.

त्यामुळे त्याच्या हालचालींना बांध घालणे गरजेचे होते आणि सिद्धीला सोबत करण्यासाठी इंग्रज अधिकारी उखडी बंदूक स्पोटक भरलेले तोफेचे गोळे पुरवू लागले, ती घेऊन पन्हाळगडच्या वेढ्यात तो सामील झाला आणि त्याला तोंड देणे मुश्कील होते. शिवरायांना हे कळून चुकले होते.

वेडा तोडण्याची आणि तह करण्याचे अनेक प्रयत्न मराठ्यांकडून केली गेली. परंतु ते केवळ निष्फळ होते. शेवटी पन्हाळा किल्ला सोडून पलायन करणे आणि घोडखिंडी च्या मार्गाने विशालगडाकडे पोहोचणे असे शिवरायांनी ठरवले दिवस जुलै महिन्यातील मुसळधार पावसाचे होते.

परंतु तरीही हीच नीती वापरून शिवरायांना पन्हाळगडावरून सुखरूप जाणे शक्य होते. त्यामुळे साहित्य न्यायला सहमत झाले होते.सिद्धी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडे निघाले होते.

बाजीप्रभू हे बांधल्याची सरदार होते. रायाजी बांदल फुलाजीप्रभू आणि सुमारे 600 बांदल मावळे यावेळी महाराजांच्या समवेत होते. त्यावेळी आपली फसवणूक झाली, हे लक्षात येऊन शत्रू सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले.

संभाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापुरच्या खिंडीत सिद्दीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोच्या सैन्याला 300 मराठ्या मावळ्यांनी रोखले होते. 21 तास चालून शरीर थकल्या स्थितीत असतानाही बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिमतीने सहा ते सात तास खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्थ केली. ही खिंड कोल्हापूर जिल्ह्यात आहे.

इतिहास :

शिवरायांनी आपल्या काळात अनेक पराक्रम केले आणि भल्या भल्या शत्रूला सळो कि पळो करून सोडले. परंतु स्वराज्यात असेही काही धाडसी मावळे आणि सरदार होते. बाजीचा पराक्रम पाहू स्वतः शिवाजी महाराज आवक झाले. त्यांच्यासाठी स्वतः महाराजांनी अश्रू ढाळले आणि अशा वीरा पुढे तेही नतमस्तक झाले.

अशाच एका वीराची आठवण घेऊन जो इतिहास रचला त्याने एक बोथरा अंगावर काटा आणणारा आणि अविश्वास नाही असा प्रसंग दिला. आपल्या बलिदानाला नेत्यांनी, व्यक्तीने आपली स्वामीनिष्ठा आभाळा पेक्षा उंचीवर नेऊन ठेवली आणि शिवचरित्रात स्वतःचे अढळ असे स्थान निर्माण केले आहे.

बाजीप्रभू देशपांडे हे नाव जरी ऐकलं तरी आपल्या समोर उभी राहते. भरभक्कम आणि हातात दांडपट्टे घेऊन रक्तबंबाळ होऊन सुद्धा शत्रूला यमसदनी पाठविणारी मुद्रा.

इतिहासामध्ये बाजीप्रभू यांचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे. त्यांच्याबद्दल एक पावन खिंडीत बद्दलची गोष्ट आहे. ठरल्याप्रमाणे शिवराय 300 सैनिक घेऊन विशाळगडाकडे निघाले आणि बाजीप्रभू आपल्या 300 सैन्य सज्ज होते. गोडपिंडीच्या तोंडाला बाजींनी सैन्याची शंभर ची एक तुकडी तैनात केली त्यांच्या मागे अजून अशा काही सैन्याच्या भाड्या बाजींनी उभ्या केल्या आणि खिंडीत शिरल्यावर पुढे चढत होता. त्या चढत पन्नास मावळे उभे केले. खिंडीतून पलीकडे जाण्याचा मुख्य भाग होता.

त्या भागातून एका वेळी साधारण पाच ते दहा माणसे जाऊ शकतील असा होता. त्या मुख्य भागावर स्वतः बाजीप्रभू दोन्ही हातात दांडपट्टा घेऊन उभे राहिले कोणत्याही क्षणी सिद्धीचे सैन्य आणि तेही अगदी तेजी आल्यावर चालून येईल आणि आपण मात्र दमलेले तरीही एकाही मावळ्याने माघार घेतली नाही.

एकदा हजार विरुद्ध 300 अशी थरारक लढाई त्यांनी सुरु ठेवले अनेक तास ही लढाई चालू होती. तसेच शिवरायांचे सैनिक विशालगडाकडे पोहोचली आणि विशाळगडाचा वेढा फोडण्याचे लढाईत गुंतले आणि इकडे शत्रूचे सैन्य या एकट्या बाजीप्रभूंना पार करून खिंड ओलांडून शकत नव्हते.

संध्याकाळ होत आली तरी सिद्धी सैनिकही खिंड ओलांडून शकत नव्हते. शेवटी सिद्दीने बंदुकवाला इंग्रजी बोलणार्याला आणि त्याला बाजीप्रभूना मारायला सांगितले तोपर्यंत बाजीप्रभू इतक्या आवेशात लढत होते, की अंगावर अशी एकही जागा शिल्लक नव्हती जेथे जखम झाली नाही, तरीही त्यांच्या समोर येणारा शत्रू काही खिंडीच्या पार होईना इतकी अफाट शक्ती बाजी दाखवत होते.

शेवटी रक्तानी लालबुंद झालेल्या बाजींना इंग्रजांनी नेम लावला बंदुकीतून गोळी मारली आणि गोळी जाऊन थेट तिच्या छातीवर लागली बाजी पडले आणि मग विशालगडाकडे पाहत स्वतः अशीच बोलले. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी रक्ताने माखले होते, आणि अशातच एक मावळा आला आणि म्हणाला, “बाजिया व विशाळगडाकडे ऊण काही दूर आल्यागत वाटतेय आणि असं म्हणतात. विशालगडावर शिवाजीराजे सुखरूप पोचल्याचा इशारा त्यांना मिळाला.

मृत्यू :

सिद्धी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी जखमी झालेले शरीर, स्वतः जखमी, कशाचेही भान बाजींना नव्हते महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले, याचा इशारा देणार्‍या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. ही घटना 31 जुलै 1660 रोजी घडली.

मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली. म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले. बाजी ,फुलाजी बंधूंवर विशाळगडावर महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.
शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची गाथा जेवढे ऐकावे तेवढे कमीच आहे. एका पेक्षा एक असे बलाढ्य मावळे त्यांच्याकडे होते.

“तुम्हाला आमची माहिती बाजीप्रभू देशपांडे विषयी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

हे सुद्धा अवश्य वाचा :-


बाजी प्रभू देशपांडे का प्रसिद्ध आहेत?

बाजी प्रभू देशपांडे (इ. स. १६१५ – १३ जुलै १६६०) हे मराठा सैन्याचे सेनापती होते. घोडखिंड येथील पवनखिंडच्या लढाईतील भूमिकेसाठी तो ओळखला जातो, जिथे त्याने सिद्दी जोहरच्या येणाऱ्या आदिल शाही सैन्यापासून शिवाजीचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. तो मावळ प्रदेशातील जमीनदार किंवा वतनदारही होता.

बाजी प्रभू देशपांडे यांचे वंशज कोण?

बाजी प्रभू देशपांडे यांच्या वंशजांपैकी एक, रामचंद्र काशिनाथ देशपांडे , ब्रिटिश राजवटीविरुद्धचे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ज्ञ आणि धुळे, जळगाव येथे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते होते.

पावनखिंड कोणी लढवली?

बाजी प्रभू देशपांडे आणि संभूसिंग जाधव 

बाजी प्रभू शिवाजी महाराजांशी कधी सामील झाले?

शिवाजीने रोहिडा येथे कृष्णाजीचा पराभव करून किल्ला काबीज केल्यावर बाजी प्रभूंसह अनेक सेनापती शिवाजीस सामील झाले .

Leave a Comment