बी.कॉम कोर्सची संपूर्ण माहिती B.Com Course Information In Marathi

B.Com Course Information In Marathi मित्रांनो नमस्कार ,आपल्याला माहीतच आहे की, शिक्षणाचे तीन टप्पे असतात. पहिला टप्पा म्हणजे प्राथमिक शिक्षण, दुसरा टप्पा म्हणजे माध्यमिक शिक्षण व तिसरा टप्पा म्हणजे उच्च शिक्षण असे तीन टप्पे पार करत मुले उच्च शिक्षणाच्या एक महत्त्वाच्या टप्प्यावर येत असतात. जेथे त्यांना त्यांच्या करिअरविषयी मुख्य निर्णय घ्यायचा असतो.

B.com Course Information In Marathi

बी.कॉम कोर्सची संपूर्ण माहिती B.Com Course Information In Marathi

आठवी पर्यंत मुले ही हसत खेळत शिक्षण घेत असतात .परंतु एकदा आठवी आल्यानंतर मुले व पालक हे दोघे सुद्धा पुढच्या करिअरच्या दृष्टीने गंभीर होत असतात.मुले ही अभ्यासाला लागलेली असतात. कारण आजची परिस्थिती पाहता. हे युग स्पर्धेचे युग बनलेले आहे .प्रत्येक ठिकाणी स्पर्धा ही चालू आहे.

प्रत्येक क्षेत्रात व शिक्षणाच्या प्रत्येक प्रणालीमध्ये स्पर्धा ही खूप महत्त्वाची ठरलेली दिसत आहे. म्हणून प्रत्येक जण त्याच अनुषंगाने आपले प्रयत्न करत असतात. एकदा दहावी बोर्डाचा निकाल लागल्यानंतर मुलेही वेगवेगळ्या कोर्ससाठी डिप्लोमासाठी ॲडमिशन घेत असत.

परंतु जरी भरपूर कोर्स डिप्लोमा हे दहावीनंतर असले तरी आजच्या स्पर्धेच्या युगात जेव्हा आपण जॉब साठी जातो तेव्हा दहावी पेक्षा बारावीच्या शिक्षणाला जास्त महत्त्व दिले जाते.म्हणून आजकाल सध्या मुले दहावी नंतर कोणताही कोर्स न करता अकरावी-बारावी करणे याला जास्त महत्त्व देत आहेत. म्हणून दहावी झाल्यानंतर मुलांना आर्ट्स, कॉमर्स ,सायन्स हे तीन पर्याय उपलब्ध असतात.

त्यामुळे आपापल्या पसंतीनुसार व आपल्याला मिळालेल्या दहावीच्या गुणांवर विद्यार्थी आपल्याला हवे त्या अभ्यासक्रमाला जाणे पसंत करतात .ज्यांना कला शाखेत रोज असतो ती मुले कला ही शाखा निवडतात.ज्यांना वैद्यकीय  क्षेत्रात आपले करिअर करायचे असते ते मुले विज्ञानाची शाखा निवडतात व ज्या मुलांना सीए,सीएस,बँकिंग,इन्कम टॅक्स अशा अकाउंटिंग विभागामध्ये आपले करिअर करायचे असते ती मुले कॉमर्स हा विषय निवडत असतात.

आता मी तुम्हाला बी.कॉम या अभ्यासक्रमा संबंधी माहीती सांगणार आहे!!!

बी.कॉम हा बारावीनंतर करता येणारा एक ग्रॅज्युएशन कोर्स आहे.  बी.कॉम चा फुल फॉर्म “बॅचलर ऑफ कॉमर्स” कसा आहे. बी.कॉम हा तीन वर्षाचा कोर्स असतो.जो तुम्ही दोन  पद्धतीनेही करू शकता. म्हणजे आपण रेग्युलर कॉलेज ला जाऊन बी.कॉम हा कोर्स करू शकतो व सावित्रीबाई फुले मुक्त विद्यापिठाद्वारे एक्सटर्नल प्रवेश घेऊन बाहेरूनही परीक्षा देऊ शकतो.

युजी स्तरावर बी.कॉम या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा कॉमर्स विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त कल दिसून येतो म्हणूनच कॉमर्स अंतर्गत बी.कॉम हा सर्वाधिक पसंती असलेला अभ्यासक्रम आहे असे दिसून येते. बी.कॉम हा अभ्यासक्रम पूर्ण वेळ, दुरुस्त शिक्षण तसेच ऑनलाइन या माध्यमांद्वारे दिला जातो.

कॉमर्स अंतर्गत युजी अभ्यासक्रमाची निवड करताना विद्यार्थ्यांकडे बी.कॉम आणि बी.कॉम ओनर्स असे दोन पर्याय असतात.  बी.कॉम आणि  बी.कॉम ओनर्स हे दोन्ही अभ्यासक्रम समान असतात .परंतु  बी.कॉम ऑनर्स मध्ये विद्यार्थ्यांना बिजनेस स्कील विषयी शिकवले जाते. तसेच या दोन्ही अभ्यासक्रमात हा फरक असतो की  बी.कॉम मध्ये विद्यार्थी एक विषय स्पेशलाईस करू शकत नाही.

तसेच  बी.कॉम ऑनर्स मध्ये विद्यार्थी एका विषयात स्पेशलायझेशन करू शकतो म्हणजे फायनल वर्षात तो कोणताही एक विषय स्पेशलाईस करू शकतो. उदाहरणार्थ अकाउंट किंवा अर्थशास्त्र. तसेच  बी.कॉम व   बी.कॉम ऑनर्स ला ऍडमिशन घेताना पात्रता निकष दोघांचीही सारखी असते. परंतु काही प्रेस्टीजीयस कॉलेजमध्ये  बी.कॉम ऑनर्स यासाठी कट ऑफ हा जास्त असतो.

जो विद्यार्थी बी.कॉम पास होतो त्याला बी.कॉम पास किंवा बी.कॉम जनरल म्हणूनही ओळखले जाते .काही कॉलेजेस व विद्यापीठे बी.कॉम सह अन्य व्यवसायिक पदव्या एकात्मिक देतात जसे की, बीकॉम एलएलबी, बीकॉम एमबीए, बीकॉम सीएम. विद्यार्थ्यांना वाणिज्य आणि वित्त विषयांमध्ये शिक्षण देणे हे बी.कॉम पदवी अभ्यासक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. पदवीच्या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमात उमेदवार आपल्याला आवडणारे विषय निवडू शकतो.

बी.कॉम या कोर्सचा अभ्यासक्रम

बी.कॉम या कोर्सच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना आर्थिक लेखा, कार्पोरेट कर, अर्थशास्त्र ,कंपनी कायदा, लेखापरीक्षण, व्यवसाय व्यवस्थापन इत्यादी विषय हे 6 सेमिस्टर मध्ये विभागून शिकवले जातात .चार्टर्ड अकाऊंटन्सी, कॉस्ट अकाऊंटिंग आणि कंपनी सेक्रेटरीशिपची तयारी करताना बी.कॉम चे विद्यार्थी बी.कॉम या कोर्सला प्लॅन बी असे मानतात.

आपण बी.कॉम या कोर्स विषयी माहिती पाहण्या अगोदर त्याचा एक इतिहास आहे तो जाणून घेऊयात!!

“बॅचलर ऑफ कॉमर्स” ही पदवी पहिल्यांदा बर्मिंघम विद्यापीठात देण्यात आली होती. युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ कॉमर्स ची स्थापना ऑक्‍सफर्ड विद्यापीठातील विल्यम एशले यांनी केली होती. अर्थशास्त्र आणि घटनात्मक इतिहासाचे पहिले प्राध्यापक हे टोरंटो विद्यापीठातील होते.

त्यांनीच स्कूल ऑफ कॉमर्स ची स्थापना केली. अठराव्या शतकातील अर्थशास्त्रज्ञानी इंग्रजी अर्थव्यवस्थेची कृषी, उत्पादन आणि वाणिज्य तीन क्षेत्रांमध्ये विभागणी केली. वाणिज्य या विभागात आर्थिक भूगोल, आर्थिक इतिहास, सामान्य अर्थशास्त्र आधुनिक भाषा आणि लेखाशास्त्र यांचा समावेश होता.

बी.कॉम यासाठी प्रवेश घेण्यासाठी कोणती पात्रता निकष लागते ते पाहुयात!!!!

बी.कॉम ला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला बारावी पूर्ण करणे आवश्यक आहे. बी.कॉम कोर्सला प्रवेश घेण्यासाठी अशी कोणतीही अट नाही की तुम्ही वाणिज्य शाखेतुनच 50 % गुण मिळून बारावी पूर्ण केलेली असावी .कोणत्याही शाखेतला विद्यार्थी बी.कॉम साठी प्रवेश देऊ शकतो. तसेच विद्यार्थ्याला लेखा, व्यवसाय अभ्यास, अर्थशास्त्र, गणित व इंग्रजी या मुख्य विषयांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आपण ज्या महाविद्यालयात प्रवेशासाठी अर्ज करतो तेथे विद्यार्थ्याने किमान कट-ऑफ निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

बारावी मधील वाणिज्य उत्तीर्ण उमेदवारांची एकूण टक्केवारी, कॉमर्स मधील सर्वोच्च गुण, कॉमर्समध्ये सरासरी गुण व मागील वर्षाचे किमान कट ऑफ गुण इत्यादी घटकांचा परिणाम बी.कॉम प्रवेशासाठी किमान कट ऑफ गुणांवर करत असतो.

बी.कॉम या कोर्सची फी

बी.कॉम या कोर्सची सरासरी फी ही 15000 ते 100000 दरम्यान असते. हे आपण ज्या कॉलेजला प्रवेश घेऊ त्यावर हे शुल्क अवलंबून असते. प्रत्येक कॉलेजला ती ही वेगवेगळी असू शकते. आपण जर घरापासून लांब बाहेर जाऊन बी.कॉम हा कोर्स करणार असेल तर आपल्याला हॉस्टेलचा खर्च, राहण्याचा व खाण्यापिण्याचा खर्च हा  वाढू शकतो.

बी.कॉम या कोर्समध्ये विद्यार्थी हा काही विषय स्पेशलायझेशन करू शकतो. ते म्हणजे फायनान्स, बँकिंग, टॅक्सेशन, मानवी संसाधने. बी.कॉम हा कोर्स आपण एक्स्टर्नल म्हणूनही करता येऊ शकतो म्हणजे आपण बी.कॉम ला ऍडमिशन घेऊन घरीच अभ्यास करू शकतो. आपल्याला कॉलेजला जाण्याची गरज नसते. त्यामुळे जे विद्यार्थी नोकरी करून शिक्षण करत असतात ते विद्यार्थी एक्स्टर्नल नुसार ऍडमिशन घेऊन जॉब ही करू शकतात.तसेच

बी.कॉम हा कोर्स करता करता विद्यार्थी Tally  किंवा MSCIT इतर काही कोर्स करू शकतात.तसेच काही विद्यार्थी हे MBA CET या प्रवेश परीक्षेची तयारी करू शकता.तसेच काही विद्यार्थी बीकॉम करता करता Competitive परीक्षेची तयारी करू शकतात.

काही विद्यार्थी हे बी.कॉम शिक्षण पूर्ण झाल्यानंतर M.BA किंवा  M.COM  करतात. तसेच बी.कॉम नंतर विद्यार्थ्यांसमोर बरेच पर्याय असतात परंतु भरपूर विद्यार्थी हे पुढील उच्च स्तरीय अभ्यासक्रमाचे पर्याय निवडत  असतात ते पुढील प्रमाणे:-

ACCA , CIMA , CAT , CA , CS ,CMA

बी.कॉम या कोर्सचा कालावधी

बी.कॉम या कोर्सचा कालावधी तीन वर्षाचा असतो व याचा अभ्यासक्रम हा 6 सेमिस्टर मध्ये विभागलेला असतो. आता या तीन वर्षाच्या कालावधीत कोणता अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवला जातो ते पाहूयात!!!

पहिल्या वर्षी शिकवले जाणारे विषय

 • आर्थिक लेखा
 • व्यवसाय संस्था आणि व्यवस्थापन
 • व्यवसाय सांख्यिकी
 • व्यावसायिक कायदा
 • सूक्ष्म अर्थशास्त्र
 • संगणक
 • पर्यावरण अभ्यास
 • इंग्रजी, माध्यमिक भाषा (हिंदी, मराठी)

दुसऱ्या वर्षी शिकवले जाणारे विषय

 • आर्थिक लेखा
 • कॉर्पोरेट कायदा
 • आयकर कायदा
 • कॉस्ट अकाउंटन्सी
 • प्रगत सूक्ष्म अर्थशास्त्र
 • विपणन व्यवस्थापन
 • व्यवसायाचे गणित
 • व्यवसाय व्यवस्थापनाची तत्त्वे
 • इंग्रजी, माध्यमिक भाषा (हिंदी, मराठी

तिसऱ्या वर्षी शिकवले जाणारे विषय

 • प्रगत लेखा
 • लेखापरीक्षण
 • मॅक्रो इकॉनॉमिक्स
 • बँकिंग आणि वित्त
 • अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष कर
 • व्यवसाय प्रशासन
 • उद्योजकता
 • व्यवसायिक सवांद
 • इंग्रजी, माध्यमिक भाषा (हिंदी, मराठी)

आज-काल नोकरी मिळवण्यासाठी फक्त बी.कॉम ही पदवी पुरेशी नाही तर पदवी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी वाणिज्य लेखा किंवा वित्त विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणे आवश्यक आहे. एमकॉम ,एम बीए,सीए,सीएस अभ्यासक्रम हे बीकॉम पदवीधारकांसाठी चांगले पर्याय आहेत.

बी.कॉम झालेले विद्यार्थी सरकारी क्षेत्रात नियुक्ती साठी स्पर्धा परीक्षा ची तयारी देखील करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना बी.कॉम झाल्यानंतर लगेच काम करण्याची इच्छा आहे. त्यांना बँकिंग व वित्त संबंधित क्षेत्रात कनिष्ठ  स्तरावर विविध नोकऱ्या मिळू शकतात. तसेच ते सार्वजनिक क्षेत्रातील आयटी कंपन्या, कर आकारणी विभाग ,सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फ़र्म येथे नोकरी मिळवू शकतात.

FAQ

बी.कॉम चा लॉंग फॉर्म काय आहे?

बी.कॉम चा लॉंग फॉर्म "बॅचलर ऑफ कॉमर्स" असा आहे.

बी.कॉम या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी पात्रता निकष काय असते?

बी.कॉम या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी वाणिज्य शाखेतून बारावी पूर्ण केलेला विद्यार्थी असावा अशी कोणतीही अट नाही. कोणत्याही शाखेचा विद्यार्थी घेऊ शकतो. कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून ५0 % गुणांनी बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्याला अर्थशास्त्र ,गणित व इंग्रजी या मुख्य विषयांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

बी.कॉम या कोर्स मध्ये कोणते विषय शिकवले जातात?

बी.कॉम या कोर्स मध्ये आर्थिक लेखा, कार्पोरेट कर ,अर्थशास्त्र, कंपनी कायदा, लेखापरीक्षण, व्यवसाय व्यवस्थापन इत्यादी विषय सहा सेमिस्टरमध्ये विभागून शिकवले जातात.

Leave a Comment