PBA Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती चांगली असते ती मुले बारावीनंतर आपल्या पसंतीनुसार त्याला आवडेल तो अभ्यासक्रम किंवा डिग्री कोर्स निवडत असतो. परंतु ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट व हलाखीची असते. ती मुले आपल्या परिस्थितीमुळे आपल्या पसंतीचा व खर्चिक कोर्स घेऊ शकत नाही. त्यांच्या समोर एकच ध्येय असते की बारावीनंतर शक्य होईल व त्याला परवडेल तो कोर्स करून कुठेतरी नोकरी करून आपल्या घराला हातभार लावावा .त्या अनुषंगाने मुलेही झगडत असतात.
पिबीए कोर्सची संपूर्ण माहिती PBA Course Information In Marathi
परंतु काही मुले ही बारावी नंतर नोकरी मिळेल ती करण्यास तयार असतात. कारण त्यांना नोकरी करून मिळेल त्या पगारावर आपल्या घराच्या आर्थिक परिस्थितीत भर टाकायची असते. कारण दिवसेंदिवस शिक्षण प्रणालीत खूप बदल होत चालले आहेत व चांगले शिक्षण घेण्यासाठी मोठी किंमतही मोजावी लागते. पण ते काही मुलांना शक्य होत नसते. म्हणून काही मुले ही आपल्या परिस्थितीवर मात करत पुढे चालत असतात. कारण हीच वेळ अशी असते की जेथे त्याच्या करीयरची उभारणी केली जाते व त्याच्या करिअरचा पाया त्याला भक्कम रोवायचा असतो.
मी तुम्हाला आज अशाच एक कोर्स बद्दल माहिती देणार आहे. जो कोर्स केल्यावर आपल्याला नोकरीची चांगली संधी प्राप्त होईल. तीही कमी वेळात!! कमी खर्चात !!!
हा कोर्स आपण बारावी झाल्यानंतर ग्रॅज्युएशन पूर्ण करता करता हि करू शकता .त्या कोर्सचे नाव आहे पिबीए कोर्स !!! पिबीए चा लॉंग फॉर्म आहे “प्रोफेशनल बिझनेस अकाउंट” पिबीए कोर्से हा अकाऊंटन्सी क्षेत्रातील पूर्ण करियर कोर्स आहे. हा एक वेगवान कोर्स आहे. ज्यामध्ये इंटरऍक्टिव्ह अकाउंट आहे.
भविष्यातील विद्यार्थ्यांना आणि सर्व स्तरातील व्यवसायिकांना वित्तीय लेखा, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर ,मायक्रोसॉफ्ट ऑफिस, प्रगत एक्सेल पोस्टिंग आणि फायनान्स ज्ञान देण्यासाठी तयार केलेला अभ्यासक्रम आहे. पिबीए हा अकाऊंटन्सी क्षेत्रातील पूर्ण करिअर कोर्स आहे. वाणिज्य शाखेतील विद्यार्थी फक्त बँकिंग क्षेत्रासाठी मर्यादित राहिलेला नसून या क्षेत्रात वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांची गरज वाढत आहे.
वाणिज्य शाखेतील या विद्यार्थ्यांसाठी बारावी नंतर या शाखेशी निगडित भरपूर कोर्स अभ्यासक्रम आहेत. या कोर्सेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बारावी झाल्यानंतर आपण बीकॉम करत करता हा कोर्स आपण करू शकतो म्हणजे आपले ग्रॅज्युएशन सुद्धा पूर्ण होते व त्याचे सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला भेटते.
तसेच बीकॉम चा तीन वर्षाचा अमुल्य वेळ वाया घालवण्यापेक्षा याच काळात पिबीए कोर्स केल्यास लगेच चांगला जॉब व भविष्यातील सुरक्षित करिअर करता येते. जेणेकरून जेव्हा मुले बीकॉम केल्यानंतर नोकरीच्या शोधात असतात तेव्हा आपण हा कोर्स केल्यानंतर कोठे तरी चांगल्या ठिकाणी नोकरी करत असतो.
आज प्रत्येक क्षेत्रात मग ते क्षेत्र कुठलेही असो कंपनी असो,शाळा असो किंवा एखादा व्यवसाय असो प्रत्येक क्षेत्रांमध्ये अकाऊंटची माहिती चोख ठेवणे गरजेचे झाले आहे.
कारण पूर्वी वर्षातून दोन किंवा चार वेळा रिटर्न भरावे लागत होते. परंतु आता आलेल्या जीएसटी नियमानुसार दर महिन्याला तीन रिटन्स म्हणजेच वर्षाला 36 रिटर्न्स भरायला लागतात. दर महिन्याला अकाउंट कम्प्लीट करणे ,जीएसटी चे कॅल्क्युलेशन करणे, रिटर्न भरणे यासाठी पिबीए ची गरज असते. कारण हे सर्व कॅल्क्युलेशन करणे हे पिबीए ची मुख्य भूमिका असते. कारण प्रत्येक क्षेत्राच्या अकाउंटमध्ये टॅक्सेशन व फायनान्स याला खूप महत्त्व असते.
त्यामुळे नव्याने आलेल्या GST या नवीन कायद्यामुळे सर्व व्यवसायांना ऑनलाईन व्यवहार करणे हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे कॉम्प्युटर बिझनेस अकाउंट आणि ऑनलाईन बँकिंग या कामांसाठी एक उत्कृष्ट व कुशल मनुष्यबळाची आवश्यकता या क्षेत्रामध्ये सर्व व्यावसायिकांना भासत आहे .
कारण टॅक्सेशन मध्ये इन्कम टॅक्स ,जीएसटी येत असते. फायनान्स मध्ये फंड फ्लो मॅनेजमेंट, कॅश फ्लो मॅनेजमेंट,लोन मेनेजमेंट असे भरपूर कार्य असतात. व ही कार्य करण्यासाठी पिबीए व्यक्तीची गरज असते. त्यामुळे व्यवसायाच्या या क्षेत्रांमध्ये पिबीए ची मागणी वाढत असताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे काळाची गरज ओळखून बिझनेस अकाउंट सोबतच प्रत्येक व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व कायद्याचे शिक्षण घेऊन त्यात करिअर करणे म्हणजे पिबीए करिअर करणे होय.
अकाउंट क्षेत्रातून घेतलेल्या डिग्री सोबत कॉम्प्युटर, अकाउंटिंग, नेट बँकिंग, टॅक्सेशन आणि बिझनेस प्रॅक्टिकल नॉलेजे असणेही महत्त्वाचे असते. त्यामुळे कॉलेज करत असताना या अभ्यासक्रमाची आपण जर निवड केली तर शंभर टक्के जॉब मिळण्याची खात्री या कोर्समुळे मिळू शकते. या अभ्यासक्रमात थेरी प्रॅक्टिकल यापलीकडे जाऊन प्रत्यक्ष कामाचा अनुभव विद्यार्थ्यास दिला जातो. त्यामुळे जॉब करताना अनुभव विचारला जातो तेव्हा कोणत्याही इंटरव्ह्यूला जाताना कामाचा अनुभव आहे असे विद्यार्थी ठामपणे सांगू शकतो.
आता आपण पिबीए कोर्स करण्यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता लागते हे पाहुयात!!!
कोणत्याही शाखेचा बारावी झालेला विद्यार्थी या कोर्सला पात्र असतो.तसेच बीए, बीकॉम, एम ए ,एम कॉम, बीएससी ,एम बीए विद्यार्थी सुद्धा हा कोर्स करू शकतात. तसेच स्वतःचे घर सांभाळून स्वतःच्या व्यवसायाला अकाउंट सपोर्ट देण्यासाठी गृहिणीसुद्धा हा कोर्स करू शकतात.
पिबीए या कोर्सचा कालावधी दहा महिने असतो या कालावधीमध्ये विद्यार्थी प्रशिक्षण आणि जॉब या दोन्ही गोष्टींमुळे स्वयंपूर्ण होत असतो.
पिबीए या कोर्समध्ये पुढील अभ्यासक्रम शिकवला जातो.
- अकाउंटिंग चे कौशल्य Tally ERP9
- अकाउंट फायनल करणे.(Advance Tally + GST) बँकिंग, इन्शुरन्स
- इंग्लिश स्पीकिंग (MKCL KLIC)
- ॲडव्हान्स एक्सेल (MKCL KLIC)
- बिझनेस लाँ
- GST, TDS,INCOM TAX
टॅली हे सॉफ्टवेअर बिझनेस अकाउंटिंग साठी आज सर्वात जास्त वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर आहे. रोजगार निर्मिती साठी योग्य असे हे एकमेव सॉफ्टवेअर आहे. अकाउंट या विषयाबरोबरच इन्व्हेंटरी आणि टॅक्सेशन यांसारख्या अभ्यासक्रमाचे प्रॅक्टिकल नॉलेज ही विद्यार्थ्यांना देण्यात येते. टॅली या अभ्यासक्रमात फक्त रिसिप्ट आणि पेमेंट या जनरल नोंदी शिकवल्या जात नाही तर त्याच्या पलीकडे बिझनेस सी अकाउंट फायनल करण्यासाठी क्लोजिंग इंट्री आणि इतर महत्त्वाचे बदल यांचा अभ्यासही ऍडव्हान्स टॅली मध्ये शिकवला जातो.
प्रत्येक व्यवसायात व इंडस्ट्रीमध्ये अकाउंट या क्षेत्रामध्ये एक्सेल चा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. बिझनेस रिपोर्ट तयार करण्यासाठी एक्सेल हे अत्यंत महत्त्वाचे अँपलिकेशन बनले आहे. त्यामुळे एक्सेल या मध्ये वेगवेगळे फंक्शन वापरणे तसेच चार्टचा वापर कसा करणे हे शिकवले जाते.
इंग्लिश स्पीकिंग मध्ये आपल्याला इंग्लिश संवाद कौशल्य, संभाषण तसेच भाषा कौशल्य, वाचन, उच्चार व व्याकरण यासोबत सॉफ्ट स्किल हे शिकवले जाते. कारण ही बदलत्या काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना ई-मेल करणे, मेसेजला उत्तर देणे तसेच लेटर ड्राफ्ट करणे या सोबतच संवाद कौशल्य करिता हा अभ्यासक्रम मदत करणारा आहे.
अकाउंट मध्ये फक्त जनरल एन्ट्री करणे एवढेच नसून प्रत्येक व्यवसाया करता इन्कम टॅक्स त्याचबरोबर जीएसटी आणि टीडीएस रिटर्न फाईल तयार करणे हे काम ऑनलाइनच करावे लागते. या प्रत्येक कामाकरता कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे म्हणून या क्षेत्रातील जीएसटी विषयक तसेच इन्कम टॅक्स यांच्या विषयी कायद्याचा अभ्यास असणे ही बाब सर्वात महत्त्वाची आहे. त्याकरिता हा अभ्यासक्रम प्रॅक्टिकल,जीएसटी,टीडीएस,इनकम टॅक्स, रिटर्न फाईल करणे हे सर्व या अभ्यासक्रमात शिकवला जातो.
ऑनलाइन रिटर्न फाईल करणे, अकाउंट फायनल करणे, बॅलन्स शीट तयार करण्याची कामे विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्षपणे करून घेतली जातात.ही अशी कामे स्वतः केल्यामुळे प्रत्यक्षात काम करणे व अनुभवातून शिक्षण घेणे यामुळे जॉब शोधताना कामाचा अनुभव आहे असे आपल्याला आत्मविश्वासाने सांगता येते.
दहा महिन्याच्या या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी प्रशिक्षण आणि जॉब या दोन्ही गोष्टींमुळे स्वयंपूर्ण असा तयार होतो.
बीए व बीकॉम या तीन वर्षाच्या कालावधीत पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षाला असतानाच पिबीए करिअर हे म्हणजे आपल्यासाठी एक प्रकारचा टर्निग पॉइंट असू शकेल.
पिबीए ऑनलाईन कोर्स
पिबीए ऑनलाईन कोर्स केल्यामुळे विद्यार्थी / गृहिणी या कोर्समध्ये देशाच्या कुठल्याही भागातून सहभागी होऊ शकतात. व घरी बसून तज्ञ सीएकडून जागतिक दर्जाचे प्रशिक्षण घेऊ शकतात. पिबीए ऑनलाईन या कोर्सचा कालावधी पाच महिने म्हणजे दररोज 90 मिनिटे असा तास असतो.
या ऑनलाइन कोर्समध्ये व्यवसाय लेखा
- टॅली ईआरपी 0.9
- खात्यांचे अंतीमीकरण
- एमएस ऑफिस व एक्सेल आयकर ,टीडीएस
- वस्तू आणि सेवा कर (GST)
- ई बँकिंग, विमा आणि गुंतवणूक संबंधित व्यवसाय कायदे
- संप्रेषण आणि सादरीकरण कौशल्य याविषयी शिक्षण दिले जाते.
ऑनलाइन कोर्सची वैशिष्ट्ये ऑनलाईन हा कोर्स केल्यामुळे घरी बसून आपण जागतिक दर्जाचे प्रशिक्षण घेऊ शकतो व आपल्या प्रचंड खर्चात बचत करू शकतो. प्रत्येक विषयाच्या संपूर्ण नोट्स आपल्याला दिल्या जातात. वेळेचा उत्तम वापर होतो म्हणजे आपण रेकॉर्ड केलेले व्हिडिओ परत पाहू शकतो. तसेच ऑनलाईन क्लासेस मध्ये थेट बॅचेस व थेट संवाद असतात .तज्ञ चार्टर्ड अकाउंट कडून आपल्यास शिकवले जाते .ऑनलाईन क्लासेस मध्ये आपण तज्ञांना थेट प्रश्न विसरू शकतो. व आपल्या शंकेचे निरसन करू शकतो.
पीबीए या कोर्सची फी
पीबीए या कोर्सची फी ही साधारणपणे 25000 एवढी असते.
पीबीए कोर्स करण्यासाठी उत्कृष्ट कॉलेज
इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्सेशन अंड अकाउंटिंग प्रोफेशन ही भारतातील कर आकारणी लेखा वित्त व्यवसाय कोणाच्या शिक्षणातील अग्रगण्य संस्था आहे. हिची स्थापना 2008 सली झाली आहे तेव्हापासून या 13 वर्षात हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. अद्यावत व दर्जेदार प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील ही एकमेव संस्था आहे.
अनुभवी चार्टर्ड अकाउंटंट असणाऱ्या व्यक्तींनी एक गट तयार करून 2008 मध्ये विद्यार्थ्यांना कमीत कमी खर्चात सुरक्षित व विकासभिमुख करिअर प्राप्त करून देण्यासाठी व त्याचे पुढील भविष्य उज्ज्वल करण्याच्या उद्देशाने ही संस्था सुरू केली.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
पीबीए कोर्स चा फुल फॉर्म काय आहे?
प्रोफेशनल बिजनेस अकाउंटंट हा पीबीए चा फुल फॉर्म आहे.
पिबिए हा कोर्स आल्यानंतर कुठल्या कुठल्या जॉबच्या संधी उपलब्ध असतात?
पीबीए हा कोर झाल्यानंतर तुम्ही रेग्युलेटरी बीए किंवा पीएम हार्डवेअर इंजिनियर व असिस्टंट प्रोफेसर हे जॉब करू शकतो.
पीबीए हा कोर्स झाल्यानंतर किती वेतन मिळू शकते?
पीबीए हा कोर्स झाल्यानंतर तुम्हाला दोन लाख ते आठ लाख एवढा पगार असतो.