वीरेंद्र सेहवाग यांची संपूर्ण माहिती Virendra Sehwag Information In Marathi

Virendra Sehwag Information In Marathi  वीरेंद्र सेहवाग हा एक भारतीय  क्रिकेटपटू  आहे. तो उजव्या हातानी फलंदाजी व गोलंदाजी सुद्धा करतो. वीरेंद्र सेहवाग हा दिल्ली शहराचा रहिवाशी आहे. त्यांच्या वडिलांचे नाव किशन सेहवाग आणि आईचे नाव कृष्णा सेहवाग आहे. त्यांना एक भाऊ व दोन बहिणी आहेत. त्यांच्या भावाचे नाव विनोद आहे तसेच त्यांच्या बहिणीचे नाव मंजू आणि अंजू आहे. वीरेंद्र ला सर्वजण प्रेमाने वीरू अशी हाक मारतात. तर चला मग त्यांच्याविषयी माहिती पाहूया.

Virendra Sehwag Information In Marathi

वीरेंद्र सेहवाग यांची संपूर्ण माहिती Virendra Sehwag Information In Marathi

जन्म :

वीरेंद्र सेवाग यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1978 ला झाला. त्याचा जन्म धान्य व्यापार करणाऱ्या कुटुंबात झाला होता. त्यावेळी त्याच्या वडिलांना वीरुने मोठे होऊन आपला हाच व्यावसाय पुढे चालवावा असे वाटत होते. पण क्रिकेटची आवड असलेल्या वीरुला हे काही मान्य नव्हते.

त्याने त्याच्या आईच्या मदतीने क्रिकेट खेळणे सुरुच ठेवले. वडीलांनी किटबॅग पाहू नये म्हणून तो घराच्या गच्चीवर किटबॅग लपवून ठेवायचा. पण त्याच्या वडीलांना त्यांच्या मागे वीरुच्या या चाललेल्या करामतींची जाणीव होती. पण त्यांनी त्याला नंतर त्याबद्दल रोखलं नाही.

सेहवाग यांची लव्ह स्टोरी :

आरती पहिल्यांदा भेटली जेव्हा तो फक्त 7 वर्षांचा होता, तर आरती 5 वर्षांची होती.  सेहवागने आरतीला पहिल्यांदा प्रपोज केले तेव्हा तो फक्त 21 वर्षांचा होता.  आरतीच्या मोठ्या बहिणीने एका मुलाखतीत सांगितले होते.

तो प्रेम विवाह होता. सेहवागने स्वतः त्याच्या प्रस्तावाचा खुलासा केला होता आणि म्हटले होते की, 2002 मध्ये आरतीला मजेदार स्वरात प्रपोज केले होते, पण आरतीने हा खरा प्रस्ताव मानून लगेच हो म्हटले, आणि दोघांनी 3 वर्षे डेट केले आणि नंतर एप्रिल 2004 मध्ये लग्न केले.  सेहवागला 2 मुले आहे ज्यांची नावे आर्यवीर आणि वेदांत आहे.

क्रिकेट करियर :

वीरेंद्र सेहवागने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 1997 मध्ये दिल्ली क्रिकेट संघासह केली होती.  1998 मध्ये, दुलीप ट्रॉफीसाठी उत्तर जॉन क्रिकेट संघात त्याची निवड झाली.  या करंडकाच्या सामन्यादरम्यान त्याने सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये आपले स्थान निर्माण केले. यानंतर त्याने रणजी करंडकातही जबरदस्त कामगिरी दाखवली आणि त्यानंतर त्याला 19 वर्षांखालील संघात समाविष्ट करण्यात आले.

त्याला 1999 मध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदा भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली पण केवळ 1 धावेवर बाद झाला आणि त्यात भर म्हणजे त्याने गोलंदाजी करताना 3 षटकात 35 धावा दिल्या. त्यामुळे अखेर नंतर त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले. यानंतर वीरुला भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी तब्बल 20 महिने वाट पहावी लागली.

या काळात त्याने देशांतर्गत क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. त्याने 1999-2000 च्या मोसमात दुलिप ट्रॉफीमध्ये 65.60 च्या सरासरीने 328 धावा केल्या. यामध्ये त्याच्या 274 धावांच्या खेळीचाही समावेश आहे. त्यावेळी ही त्या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळी होती. त्यानंतर त्याने पंजाबविरुद्धच्या रणजी सामन्यात 175 चेंडूत 187 धावांची तुफानी खेळी करताना सर्वांचे लक्ष वेधले. या मधल्या काळात तो 1998 ला 19 वर्षांखीलील विश्वचषकात भारतीय संघाकडूनही खेळला.

सेहवागने एएन शर्मा यांच्याकडून सुरुवातीला क्रिकेटचे धडे गिरवले होते. त्यांनी सेहवागमधील आक्रमक फलंदाजीची गुणवत्ता हेरली होती. त्यामुळे त्यांना त्याच्यातील आक्रमकपणा न बदलता त्यातच त्याला तयार केले. क्रिकेटचे प्रशिक्षण घेत असतानाचीच एक गोष्ट म्हणजे आशिष नेहरा आणि वीरु जूने मित्र ते दोघेही एकत्र सरावाला जायचे. त्यावेळी वीरु नेहराच्या घरी यायचा आणि मग नेहराच्या स्कूटीवर ते दोघे एकत्र मैदानात जायचे.

देशांतर्गत क्रिकेट गाजवत असताना सेहवागची डिसेंबर 2000 मध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली. त्याच्या निवडीमागील एक किस्सा असा की निवड समितीत उत्तर विभागातील मदन लाल निवड समीतीच्या बैठकीत नेहमी सेहवागचे नाव पुढे करायचे पण अन्य सदस्य त्याकडे दुर्लक्ष करायचे. पण एकदा त्यांनी जयवंत लेलेंना विश्वासात घेऊन निवड समिती अध्यक्ष असलेल्या चंदू बोर्डेंना मनवण्यास सांगितले. अखेर लेलेंनी बोर्डेंचे मन वळवले आणि सेहवागची भारतीय संघात निवड झाली.

सेहवागनेही त्यानंतर मागे वळुन पाहिले नाही. तो 2001 च्या मध्यापर्यंत भारताच्या वनडे संघाचा नियमीत सदस्य झाला होता. याच दरम्यान नोव्हेंबर 2001 मध्ये त्याला कसोटीतही पदार्पणाची संधी मिळाली. सुरुवातीला केवळ मर्यादीत षटकांचा खेळाडू म्हणून समजल्या जाणाऱ्या सेहवागचे कसोटी पदार्पण दणक्यात झाले.

त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पण करताना 6 व्या क्रमांकावर फलंदाजीला येत 173 चेंडूत 105 धावांची शतकी खेळी केली होती. त्यावेळी शॉन पोलाक, जॅक कॅलिस, मखाला एनटीनी, लान्स क्लुसेनर असे आफ्रिकेचे गोलंदाजी आक्रमण होते. विशेष म्हणजे या सामन्यात भारताची अवस्था 4 बाद 68 धावा अशी असताना सेहवाग फलंदाजीला आला होता.

इतर कार्यचालू घडामोडी, क्रिकेट सामने आणि अनेक सामाजिक विषयांवर तो बिनधास्त भाष्य करतो. समाजकार्यातही तो आघाडीवर असतो पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या मुलांना तो त्याच्या वीरेंद्र सेहवाग अकादमीत प्रशिक्षक देतोय आणि त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही त्यानेच उचलला आहे.

इंडियाची सर्वोत्तम सलामीवीर जोडी वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर मैदानात दिसली. त्यांनी  इंडिया लीजेंड्स विरुद्ध बांग्लादेश लेजेंड्स यांच्यात झालेल्या सामन्यात जोरदार फटकेबाजी करत हा सामना सहज खिशात टाकला. दोन्ही सलामीचे फलंदाज शेवटपर्यंत नाबाद राहिले. यावेळी दोघांनी जोरदार फलंदाजी केली.

क्रिकेट प्रेमींना या सामन्यात चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. छत्तीसडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या हस्ते मालिकेचा शुभारंभ करण्यात आला. या मालिकेत भारत, बांग्लादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचे खेळाडू सहभागी झाले आहेत. छत्तीसगडमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर वर  इंडिया लीजेंड्स  विरुद्ध बांग्लादेश लेजेंड्सचा पहिला सामना झाला.

सचिनची एक झलक  :

वीरेंद्र सेहवागसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हा सामना सहज जिंकला. त्याने 26 चेंडूत 33 नाबाद धावा केल्या. या दरम्यान त्याने 5 चौकार ठोकले. सचिनची एक झलक पाहायला प्रेक्षक पूर्णपणे उत्सुक झाले होते आणि स्टेडियममध्ये त्याच्या नावाचे फलकही दिसत होते. सचिनच्या नावाने जल्लोष पाहायला मिळाला.

सचिन/सेहवागज शेवटपर्यंत नाबाद :

इंडिया लीजेंड्सला 110 धावांचे सोपे टार्गेट ठेवण्यात आले होते. यजमान इंडिया लीजेंड्सच्यावतीने वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरने एक शानदार खेळी केली. त्यांनी 10.1 षटकांत 114 धावा करून हा सामना जिंकला. सचिन आणि वीरेंद्र सेहवागज शेवटपर्यंत नाबाद राहिले.

वीरेंद्र सेहवागचे जोरदार षटकार :

वेगवान डाव खेळताना इंडिया लेजेंड्सचा सलामीवीर वीरेंद्र सेहवागने  फक्त 35 चेंडूंत 80 नाबाद धावा फटकावल्या. या दरम्यान त्याने 10 चौकार आणि 5 षटकार लगावले. स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी जोरदार जल्लोष केला आणि यजमान संघाने हा सामना 10 गडी राखून जिंकला.

कसोटी सामने :

कसोटी – 104 सामने, 8586 धावा, 23 शतके, 32 अर्धशतके, 6 द्विशतके, 2 तिहेरी शतके एकदिवसीय – 251 सामने, 8273 धावा, 15 शतके, 38 अर्धशतके, 1 द्विशतक  टी 20 – 19 सामने, 394 धावा, 2 अर्धशतके आयपीएल – 104 सामना 2728 धावा, 2 शतके, 16 अर्धशतके.

ही माहिती कशी वाटली, ते कमेंट करून नक्की सांगा.

हे सुद्धा अवश्य वाचा :-