Vi अँप्लिकेशन ची संपूर्ण माहिती Vi Application Information In Marathi

Vi Application Information In Marathi Vi अँप्लिकेशन बद्दल माहिती आणि Vi अँप्लिकेशन असे वापरावे ? मित्रहो आज आपण या लेखात Vi एप्लीकेशन बद्दल माहिती करून घेणार आहोत. Vi एप्लीकेशन Vi कंपनीने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी बनविले आहे.  या ॲप्लिकेशनचा वापर करून Vi  कंपनीचे सिम वापर करते अनेक गोष्टींचा लाभ उठवू शकतात,  जसे की आपल्या बॅलन्स चेक करू शकतात,  रिचार्ज ऑफर्स चेक करू शकतात  स्वतःच्या किंवा इतरांच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज करू शकतात त्याचप्रमाणे इतर अनेक प्रकारचे बिल देखील भरू शकतात. चला तर मग Vi हे एप्लीकेशन कसे वापरावे हे माहिती करून घेऊया.

 Vi Application Information In Marathi

Vi अँप्लिकेशन ची संपूर्ण माहिती Vi Application Information In Marathi

Vi अँप्लिकेशनचा उपयोग :-

मित्रहो या अप्लिकेशन चा वापर करून आपण खालील दिल्या प्रमाणे अनेक काम करू शकतो :-

 1. आपल्या मोबाईलचा बॅलन्स चेक करू शकतो.
 2. आपल्या मोबाईल रिचार्ज साठी विविध ऑफर्स पाहू शकतो.
 3. स्वतःचे किंवा इतरांचे मोबाईल बिल त्याचप्रमाणे विजेचे आणि अनेक प्रकारचे बिल भरू शकतो.
 4. मोबाईल नंबर साठी कॉलर ट्यून सेट करू शकतो.
 5. टीव्ही शो, सिनेमे, लाईव्ह टीव्ही पाहू शकतो.
 6. Vi चा नवीन कनेक्शनसाठी Apply करू शकतो.

अशाप्रकारे मित्रहो या Vi अप्लिकेशनचा वापर करून आपण खूप काही काम करू शकतो म्हणून Vi हे ॲप्लिकेशन खूप फायदेशीर आहे.

Vi हे एप्लीकेशन कसे सुरु करावे ?

मित्रहो आपण जर अँड्रॉइड किंवा IOS  वापर करते असाल तर  आपल्या मोबाईल मधील एप्लीकेशन स्टोर मध्ये जाऊन तेथील Vi या नावाचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा.

Vi एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर ते उघडा. अप्लीकेशन उघडल्यानंतर तुमच्या समोर Vi एप्लीकेशन कडून Recharge & pay bill for self & others असा पेज येईल तेथे खालच्या बाजूस उजव्या कोपऱ्यात Next या पर्यायावर क्लिक करा.

Next या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर Get app exclusive offers only on Vi app असा पेज येईल तेथे खालच्या बाजूस उजव्या कोपऱ्यात Next या पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्या समोर Don’t worry Vi is here to help you! असा पेज येईल तेथे खालच्या बाजूस उजव्या कोपऱ्यात Lets get started या पर्यायावर क्लिक करा.

आता या एप्लीकेशन मध्ये तुम्हाला तुमचे Vi कंपनीचे मोबाईल नंबर विचारण्यात येईल, तेथे तुमचे दहा अंकी मोबाईल नंबर टाईप करा. मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर Send OTP  या पर्यायावर क्लिक करा. तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल, तो एप्लीकेशन मध्ये ओटीपी टाकण्यासाठी येणाऱ्या पर्यायामध्ये टाका व Log in with OTP  या पर्यायावर क्लिक करा, अशाप्रकारे तुमचे मोबाईल नंबर व्हेरिफाय होऊन जाईल व Vi हे ॲप्लिकेशन सुरू होईल.

Vi एप्लीकेशन मध्ये नवीन सिमच्या होम डिलिव्हरीसाठी कसे apply करावे ?

मित्रहो आपण Vi ह्या एप्लीकेशन चा वापर करून जर आपणास दुसरे Vi या कंपनीचे सिम हवे असल्यास आपण Vi या अप्लिकेशनचा वापर करून नवीन सिम साठी अँप्लाय करू शकतो, हे सिम आपल्याला घरपोच मिळून जाईल.

जर तुम्हालाही Vi या एप्लीकेशन चा वापर करून नवीन सिम साठी  ऑर्डर द्यायची आहे तर पुढील दिल्याप्रमाणे स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाईल मधील Vi  एप्लीकेशन उघडा.
 2. Vi  हे ॲप्लिकेशन उघडल्यानंतर, एप्लीकेशनच्या खालच्या बाजूस तुम्हाला चार पर्याय दिसतील.
 3. खालच्या बाजूने दिसणारी चार पर्यायांमध्ये शेवटच्या क्रमांकावर असणार्‍या Menu या पर्यायावर क्लिक करा.
 4. Menu पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर काही ऑप्शन्स समोर येतील, तेथे SIM Home Delivery या पर्यायावर क्लिक करा.
 5. SIM Home Delivery  या पर्यायावर क्लिक केल्यावर तेथे  पुढील प्रमाणे तुम्हाला कोणत्या प्रकारचे सिम पाहिजे ही विचारण्यात येईल.

A] Buy Postpaid SIM

B] Buy Prepaid SIM

C] Port to Postpaid

D] Port to Prepaid

E] Buy VIP Number

वरील  दिलेले प्रमाणे तुम्हाला ज्या प्रकारचे सिम पाहिजे आहे,  त्या पर्यायावर क्लिक करा.

६] जर  तुम्हाला प्रीपेड सिम घ्यायचे आहे आणि तुम्ही Buy Prepaid या पर्यायावर क्‍लिक केले तर, तुम्ही तुमच्या मोबाईल मधील ब्राउझर मध्ये Redirect व्हाल, येथे तुम्हाला वेगवेगळे किमती नुसार दोन किमतींचे सिम दाखवण्यात येईल,  तेथे तुम्हाला तुमच्या नुसार जे सिम घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा.

७]  सिम वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे नाव विचारले जाईल,  तेथे तुमचे पूर्ण नाव टाका. नाव टाकल्या नंतर तुम्हाला तुमचे ईमेल एड्रेस  विचारण्यात येईल, तेथे तुमचा ईमेल ऍड्रेस टाईप करा. आता तुम्हाला तुमचे मोबाईल नंबर विचारण्यात येईल ते तिथे टाइप करा.

८]  सर्व माहिती टाकल्यानंतर स्क्रीन थोडी स्क्रोल करून खालि या, तेथे तुम्हाला Get the number of my choice आणि Switch my existing number to Vi असे दोन पर्याय असतील,  तेथे जर तुम्हाला नवीन सिम घ्यायचे असल्यास Get the number of my choice या पर्यायावर क्लिक करा.

९] आता तुम्हाला काही नंबर दाखवले जातील त्यातून तुम्हाला जे नंबर तुमच्या नवीन SIM साठी हवे आहे ते निवडण्यासाठी सांगितले जाईल तर तिथे तुमच्या आवडीचे एखादे नंबर निवडा व त्यावर क्लिक करा.

१०]  एखाद्या नंबर वर क्लिक केल्यानंतर मोबाइल स्क्रीन स्क्रोल करून थोडे खालि या,  तेथे तुम्हाला Sim घरपोच करण्यासाठी Sim  delivery details विचारण्यात येईल तेथे तुमचे पत्ता, घर नंबर, लैंडमार्क टाका. आता तुम्हाला तुम्ही टाकलेल्या पत्ता तुमच्या घराचा आहे की ऑफिस आहे हे विचारण्यात येईल. जर घराचा असल्यास Home या पर्यायावर क्लिक करा आणि जर ऑफिसचा असल्यास Office या पर्यायावर क्लिक करा.

११] आता तुम्हाला delivery कोणत्या तारखेला पाहिजे यासाठी Pick delivery date असे एक पर्याय असेल, त्या पर्याय मध्ये तुम्हाला ज्या तारखेला सिम हवे आहे ती तारीख निवडा.

१२] आता सर्व डिटेल्स भरल्यानंतर तेथे खालच्या बाजूस लाल रंगा मध्ये असणाऱ्या Pay now या पर्यायावर क्लिक करा.

१३] Pay now या पर्यायावर क्लिक केल्यावर, तेथे तुम्हाला पेमेंट करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती दाखवले जातील तेथे ज्या पद्धतीने तुम्हाला पेमेंट करायचे आहे ती पद्धत निवडा आणि पेमेंट करा.

अशाप्रकारे आपण Vi या ॲप्लिकेशनवर नवीन सिम साठी Apply करू शकतो.

Vi या ॲप्लिकेशनवर इतर व्यक्तीच्या मोबाईल नंबर वर रिचार्ज कसे मारायचे ?

मित्रहो Vi या ॲप्लिकेशन चा वापर करून आपण स्वतप्रमाणे इतर व्यक्तींच्या मोबाईल नंबरवर देखील रिचार्जे मारू शकतो.

जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल की Vi या ॲप्लिकेशनचा वापर करून इतर व्यक्तींच्या मोबाईल नंबर वर कसे रिचार्ज मारायचे तर पुढील दिल्याप्रमाणे  स्टेप्स करा :-

 1. आपल्या मोबाईल मधील Vi एप्लीकेशन उघडा.
 2. Vi हे ॲप्लिकेशन उघडल्यानंतर, एप्लीकेशनच्या  खालच्या बाजूस तुम्हाला चार पर्याय दिसतील.
 3. खालच्या बाजूने दिसणारी चार पर्यायांमध्ये शेवटच्या क्रमांकावर असणार्‍या Menu या पर्यायावर क्लिक करा.
 4. Menu पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर काही ऑप्शन्स समोर येतील, तेथे Recharge for others या पर्यायावर क्लिक करा.
 5. Recharge for others या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला ज्या व्यक्तीच्या मोबाईल नंबर वर रिचार्ज मारायचा आहे, त्या व्यक्तीचे मोबाईल नंबर टाकण्यासाठी पर्याय येईल तिथे मोबाईल नंबर टाईप करा.
 6. मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर ज्या अमाऊंट चा रिचार्ज मारायचा आहे, ती अमाऊंट टाकण्यासाठी पर्याय येईल, तेथे तुमच्या रिचार्जची अमाऊंट  टाका.
 7. रिचार्जची अमाऊंट टाकल्यानंतर,  तुमच्या समोर Pay now असे पर्याय येईल त्यावर क्लिक करा.
 8. Pay now  या पर्यायावर क्लिक केल्यावर,  तुमच्या समोर विविध पेमेंटच्या पद्धती येतील, त्यातील तुम्हाला जा पद्धतीने पेमेंट करायचे आहे,  ती पद्धत निवडा व पेमेंट करा.  अशाप्रकारे रिचार्ज सक्सेसफुल होईल.

अशा रीतीने मित्रहो आपण Vi या ॲप्लिकेशन चा वापर करून आपण इतर व्यक्तींच्या मोबाईल नंबर रिचार्ज मारू शकतो.

अशाप्रकारे मित्रहो आम्ही या लेखात Vi या एप्लीकेशन बद्दल खूप महत्त्वाची माहिती दिली आहे,  जी तुम्हाला हे ॲप्लिकेशन्स समजण्यास आणि ते वापरण्यास नक्कीच मदत करेल. आम्ही सांगितलेल्या या माहितीबद्दल तुम्हाला काही शंका असल्यास कमेंट बॉक्स मध्ये कमेंट  करायला विसरू नका आणि हा लेख आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर,  नातेवाईकांबरोबर नक्कीच शेअर करा.

Leave a Comment