Telegram Application Information In Marathi Telegram application बद्दल माहिती आणि Telegram application कसे वापरावे ? मित्रहो आज आपण टेलिग्राम एप्लीकेशन बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. टेलिग्राम हे सोशल मीडिया चे मेसेज पाठवण्यासाठीचे ॲप्लिकेशन आहे. टेलिग्राम ऍप्लिकेशन हे आठ वर्षापूर्वी 14 ऑगस्ट 201३ ला सुरू झाले आहे आणि या ॲप्लिकेशन चा शोध पावेल दुरोव आणि निकोले दुरोव या दोघांनी लावला. टेलिग्राम हे अप्लिकेशन सर्व जगभर वापरले जात आहे व हे चौदा विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे. टेलिग्राम या एप्लीकेशनचे चालू वापरकरते 2021 जानेवारी मध्ये पन्नास करोड इतके होते. चला तर हे अप्लिकेशन कसे वापरावे हे जाणून घेऊया.
टेलिग्राम ॲप्लिकेशन संपूर्ण माहिती Telegram Application Information In Marathi
टेलिग्राम एप्लीकेशन कसे सुरु करावे?
मित्रांनो टेलिग्राम ॲप्लिकेशन सुरू करण्यासाठी आपल्याला प्रथम हे ॲप्लिकेशन आपल्या डिवाइस मध्ये इन्स्टॉल करावे लागेल, त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईल मधील ॲप स्टोअर मध्ये जाऊन तेथून टेलिग्राम हे ॲप्लिकेशन डाउनलोड आणि त्याच प्रमाणे इन्स्टॉल करावे लागेल. टेलिग्राम ऍप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला त्यावर अकाउंट बनवावे लागेल.
टेलिग्राम वर अकाउंट बनवण्यासाठी आपल्याला आपला स्वतःचा चालू असणारा मोबाईल नंबर लागेल.
तर अशाप्रकारे टेलिग्राम ॲप्लिकेशन सुरू करण्यासाठी पुढील प्रमाणे स्टेप्स करा :-
- आपल्या डिवाइस मधील इन्स्टॉल केलेले टेलिग्राम चे ॲप्लिकेशन ओपन करा.
- टेलिग्राम एप्लीकेशन ओपन तुमच्यासमोर Start messaging असे एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- Start messaging या पर्यायावर क्लिक केल्यावर टेलिग्राम वर तुमचा मोबाईल नंबर टाकण्यासाठी पर्याय येईल, तेथे तुमच्या देशाचे कोड निवडा जसे की भारतासाठी +91, देशाचे कोड टाकून झाल्यानंतर आपले दहा अंकी मोबाईल नंबर त्या पर्यायांमध्ये टाईप करा.
- मोबाईल नंबर टाईप करून झाल्यानंतर तुमच्या समोरील असणाऱ्या Next या पर्यायावर क्लिक करा.
- Next या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला टेलिग्राम कडून त्या मोबाईल नंबर वर एक व्हेरिफिकेशन साठी कोड पाठवला जाईल, तेथे तो कोड तुम्हाला स्क्रीनवर विचारल्या जाणाऱ्या पर्यायांमध्ये टाका व Next पर्यायावर क्लिक करा.
- Next पर्यायावर क्लिक केल्यावर, तुम्हाला टेलीग्राम वर तुमचे पहिले आणि शेवटचे नाव विचारण्यात येईल तेथे तुमचे पहिली आणि शेवटचे नाव टाका व नाव टाकल्यानंतर त्याच बाजूला असणाऱ्या प्रोफाइल पिक्चर साठीच्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही टेलिग्राम साठी तुम्हाला हवा असणारा प्रोफाइल पिक्चर ठेवू शकता.
- नाव आणि प्रोफाईल पिचर टाकून झाल्यानंतर उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात असणाऱ्या Next या पर्यायावर क्लिक करा.
- Next या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला टेलिग्राम कडून तुमच्या मोबाईल मधील सेव असलेले कॉन्टॅक्ट वापरण्याची परवानगी बद्दल विचारण्यात येईल तेथे तुम्ही हवी असल्यास त्यावर क्लिक करू शकता.
अशाप्रकारे आपण टेलिग्राम हे ॲप्लिकेशन सुरू होऊ शकतो.
टेलिग्राम चा वापर करून एखाद्याला मेसेज कसे पाठवावे ?
मित्रांनो टेलिग्राम ॲप्लिकेशन इन्स्टंट मेसेज पाठवण्यासाठी चे ॲप्लिकेशन आहे, या अप्लिकेशन चा वापर करून आपण आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि आपल्या कामासंबंधीच मेसेज पाठवू शकतो.
जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल कि टेलीग्राम वर मेसेज कसे पाठवायचे तर पुढील प्रमाणे स्टेप्स करा, ज्यामुळे तुम्ही एप्लीकेशन चा वापर करून इन्स्टंट मेसेज पाठवू शकता :-
- आपल्या मोबाईल मधील टेलिग्रामचे ॲप्लिकेशन ओपन करा.
- टेलिग्रामचे एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुमच्या समोर उजव्या बाजूच्या कोपऱ्यात एक पेन्सिल सारखे चिन्ह दिसेल, त्या चिन्हावर क्लिक करा.
- पेन्सिल सारख्या दिसणाऱ्या चिन्हावर क्लिक केल्यावर, तुम्हाला तुमच्या समोर तुमच्या मोबाईल मधील कॉन्टॅक्ट मधले जी माणसे टेलिग्राम वर आहेत त्यांचे अकाउंट दिसेल.
- तुमच्या समोर दिसणाऱ्या तुमच्या कॉन्टॅक्ट मधील माणसांचे टेलिग्राम अकाउंट वर तुम्हाला ज्याला मेसेज पाठवायचा आहे त्याच्या अकाउंट वर क्लिक करू शकता.
- ज्याला तुम्हाला मेसेज पाठवायचा आहे त्याच्या टेलीग्राम अकाउंट वर क्लिक केल्यावर तुम्हाला मेसेज टाईप करण्यासाठी पर्याय येतील तेथे तुम्ही मेसेज टाईप करून उजव्या बाजूने असणाऱ्या सेंड या पर्यायावर क्लिक करून मेसेज पाठवू शकता.
अशाप्रकारे आपण टेलिग्राम या अप्लिकेशन चा वापर करून आपल्या ओळखीतील माणसांशी संवाद साधू शकतो.
टेलीग्राम वर फोटो किंवा व्हिडिओ कसे पाठवावे ?
टेलिग्राम या ऍप्लिकेशन वापर करून आपण एकमेकांना फोटो किंवा व्हिडिओ देखील पाठवू शकतो.
जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल की टेलिग्राम अप्लिकेशन चा वापर करून एखाद्याला फोटो किंवा व्हिडिओ कसे पाठवावे पुढील दिल्याप्रमाणे स्टेप्स करा :-
- आपल्या मोबाईल मधील इन्स्टॉल केलेले टेलिग्राम चे ॲप्लिकेशन ओपन करा.
- टेलिग्राम चे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही विविध व्यक्तींशी केलेले चॅटिंग दिसून येईल, तेथे तुम्हाला ज्या व्यक्तीला फोटो किंवा व्हिडिओ पाठवायचे त्याच्या नावावर क्लिक करा.
- ज्याला फोटो किंवा व्हिडिओ पाठवायचा आहे त्याच्या नावावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर तुम्ही ज्या व्यक्तीशी मेसेज ने केलेला संवाद दिसून येईल, तेथे तुम्हाला खालच्या बाजूस उजव्या कोपऱ्यात एका पिनासारखे चिन्ह दिसेल, त्या चिन्हावर क्लिक करा.
- पिनासारखे दिसणाऱ्या चिन्हावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर तुमच्या मोबाईल मधील असलेल्या फोटो आणि व्हिडिओ दिसून येतील, त्यातील तुम्हाला जो व्हिडिओ किंवा फोटो पाठवायचा आहे ते निवडा.
- तुम्हाला जे फोटो किंवा व्हिडिओ पाठवायचे आहे ते निवडल्यानंतर तुमच्यासमोर ते फोटो किंवा व्हिडिओ पाठवण्यासाठी उजव्या कोपऱ्यात निळ्या रंगात एक पर्याय असेल.
- तुमच्या समोर दिसणार्या त्या निळ्या रंगात असणाऱ्या गोलाकार पर्यायावर क्लिक करा, ज्यामुळे तुम्ही निवडलेले फोटो किंवा व्हीडिओ या व्यक्तीस सेंड होतील.
अशाप्रकारे आपण टेलिग्राम एप्लीकेशन वर एखाद्याला फोटो किंवा व्हिडिओ वेगाने पाठवू शकतो.
टेलिग्राम एप्लीकेशन ची भाषा हि आपल्या आवडीची भाषा कशी सेट करावी ?
जेव्हा आपण टेलिग्राम एप्लीकेशन मोबाईल मध्ये इन्स्टॉल करतो आणि अकाउंट तयार करून सुरु करतो तेव्हा ते अप्लिकेशन आपल्याला इंग्लिश भाषेमध्ये दिसत असते परंतु तुम्हाला माहिती आहे का टेलिग्राम हे ॲप्लिकेशन विविध 14 भाषेमध्ये उपलब्ध आहे ज्यामुळे तुम्ही तुम्हाला हवे असलेल्या भाषेमध्ये टेलिग्राम ॲप्लिकेशन वापरू शकता.
जर तुम्हाला तुमच्या टेलिग्राम एप्लीकेशन वर भाषा बदलायची असेल तर पुढील दिलेल्या प्रमाणे स्टेप्स करा :-
- आपल्या मोबाईल मधील टेलिग्राम चे ॲप्लिकेशन ओपन करा.
- टेलिग्राम चे ॲप्लिकेशन ओपन केल्यावर, तुमच्या समोर तुम्ही मेसेज पाठविलेल्या विविध व्यक्तींची नावे किंवा ग्रुप ची नावे दिसून येतील, तेथे तुम्हाला डाव्या बाजूस वरच्या भागात तीन आडव्या रेषा दिसतील, त्यावर क्लिक करा.
- डाव्या बाजूस वरच्या भागात असणाऱ्या तीन आडव्या रेशन वर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर काही पर्याय दिसून येतील, त्या पर्याय मधील Settings या पर्यायावर क्लिक करा.
- Settings या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुमच्या समोर तुमच्या टेलिग्राम ॲप्लिकेशनच्या विविध सेटिंग्सचे पर्याय दिसून येतील.
- Settings मध्ये आल्यानंतर तुम्हाला खालच्या बाजूस Language असा एक पर्याय असेल, त्या पर्यायावर क्लिक करा.
- Language या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर विविध प्रकारचे 14 भाषा दिसून येतील तेथे तुम्हाला जी भाषा तुमच्या एप्लीकेशन साठी निवडायची आहे ती भाषा तुम्ही निवडा.
- तुम्हाला हवी असणारी भाषा निवडून झाल्यानंतर Save या पर्यायावर क्लिक करा, Save या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्ही निवडलेली भाषा तुमच्या मोबाईल मधील टेलिग्राम एप्लीकेशन साठी वापरण्यात येईल.
अशाप्रकारे मित्रहो आपण टेलिग्राम एप्लीकेशन मध्ये आपणास हवी असणारी भाषा निवडून हे ॲप्लिकेशन आपल्या आवडत्या भाषेत मनसोक्तपणे वापरू शकतो.
टेलिग्राम चा वापर करून एखाद्याला व्हॉइस कॉल किंवा व्हिडिओ कॉल कसे करावे ?
मित्रहो टेलिग्राम अप्लिकेशन चा वापर करून आपण आपल्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा एखाद्या कामासंबंधी व्हिडिओ कॉल किंवा व्हॉइस कॉल देखील करू शकतो.
जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल की टेलिग्राम या ॲप्लिकेशनचा वापर करून एखाद्याला व्हॉइस कॉल किंवा व्हिडिओ कॉल कसे करावे तर पुढील प्रमाणे स्टेप करा :-
- आपल्या मोबाईल मधील टेलिग्राम चे ॲप्लिकेशन ओपन करा.
- टेलिग्राम एप्लीकेशन ओपन केल्यानंतर, तुमच्या समोर तुम्ही ज्या व्यक्तींशी मेसेजने चॅटिंग केलं त्या व्यक्तींची नावे दिसून येतील.
- तुमच्यासमोर दिसणाऱ्या व्यक्तींच्या नावांच्या लिस्टमध्ये, त्या व्यक्तीच्या नावावर क्लिक करा ज्याला तुम्हाला वोईस किंवा व्हिडिओ कॉल करायचा आहे.
- ज्या व्यक्तीस व्हिडिओ कॉल किंवा व्हॉइस कॉल लावायचा आहे त्या व्यक्तीच्या नावावर क्लिक केल्यावर, तुमच्या समोर त्या व्यक्तीशी तुम्ही मेसेजने केलेला संवाद दिसून येईल, तेथे उजव्या बाजूस वरच्या कोपऱ्यात तुम्हाला तीन उभे बिंदू दिसतील, त्या तीन उभ्या बिंदू वर क्लिक करा.
- तीन उभ्या बिंदूंवर क्लिक केल्यावर, तुमच्यासमोर काही पर्याय दिसून येतील, त्या पर्यायांमध्ये Voice call आणि Video call असे पर्याय असतील, येथे जर तुम्हाला त्या व्यक्तीस व्हॉइस कॉल लावायचे असल्यास Voice call या पर्यायावर क्लिक करा व जर त्या व्यक्तीस तुम्हाला व्हिडिओ कॉल लावायचे असल्यास Video call या पर्यायावर क्लिक करा.
अशाप्रकारे मित्रहो तुम्ही टेलिग्राम अप्लिकेशनचा वापर करून एखाद्या व्यक्तीस व्हिडिओ किंवा व्हॉइस कॉल करू शकता.
अशाप्रकारे मित्रहो आम्ही या लेखात एप्लीकेशन बद्दल खूप महत्त्वाची माहिती दिली आहे, जी तुम्हाला हे ॲप्लिकेशन वापरण्यासाठी खूप मदत करेल. जर तुम्हाला हा लेख महत्त्वपूर्ण वाटत असेल तर तुमचे या लेखाबद्दल चे विचार खालील असलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.