MahaDBT वर Scholarship Form कसे भरायचे? MahaDBT Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

MahaDBT Information In Marathi  MahaDBT वर scholarship form कसे भरायचे? मित्रहो आज आपण या लेखात महाडीबीटी वेब पोर्टलवर स्कॉलरशिप फॉर्म कसे भरायचे याबद्दल जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र सरकारच्या या वेबसाईटचा वापर करून आपण जर  शाळेत, महाविद्यालयात किंवा तुमचे पदवी शिक्षण पूर्ण करत असाल तर या वेबसाईटवर तुम्ही स्कॉलरशिप साठी apply करू शकता. जर आपण कोणत्या दुसऱ्या वेबसाईटवर स्कॉलरशिपसाठी अप्लाय केले असल्यास तुम्ही या वेबसाइट वर स्कॉलरशिप साठी अप्लाय करू शकत नाही. आपण या महाराष्ट्र सरकारच्या पोर्टलवर स्कॉलरशिप साठी अप्लाय केल्यानंतर आपण पात्र असणाऱ्या स्कॉलरशिप स्कीम नुसार आपल्याला मिळणारी स्कॉलरशिप आपल्या खात्यामध्ये जमा होते.  चला तर माहिती करुन घेऊया या वेबपोर्टलवर स्कॉलरशिप साठी कसे अप्लाय करायचे.

Mahadbt Information In Marathi

MahaDBT वर Scholarship Form कसे भरायचे? MahaDBT  Information In Marathi

सर्वप्रथम आपल्या मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये ब्राउझर मध्ये जाऊन तिथे सर्च इंजिन मध्ये MahaDBT mahait असे सर्च करा. MahaDBT mahait असे सचिन इंजिनवर सर्च केल्यानंतर तुमच्या समोर येणाऱ्या पहिल्या लिंक वर क्लिक करा.

तुम्ही MahaDBT mahait च्या वेब पोर्टलमध्ये याल. तुमच्यासमोर खूप पर्याय दिल त्यातील उजव्या बाजूस New Applicant Registration असे एक पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा. New Applicant Registration त्यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर रेजिस्ट्रेशन साठीचा फॉर्म  येईल.

समोर येणाऱ्या फॉर्म मध्ये पहिल्या Applicant Name पर्यायामध्ये तुम्हाला तुमचे नाव विचारले असेल तेथे कॅपिटल लेटर्स मध्ये तुमचे पूर्ण नाव टाका. तुमचं नाव टाकल्यानंतर पुढच्या पर्यायांमध्ये तुम्हाला युजरनेम विचारले जाईल, तेथे जास्तीत जास्त पंधरा आणि कमीत कमी चार अक्षरापर्यंत तुम्ही युजरनेम ठरवून, ते तिथे टाइप  करा.

युजरनेम टाईप केल्यानंतर तुम्हाला पुढच्या पर्यायांमध्ये पासवर्ड विचारला जाईल तेथे दिलेल्या नियमानुसार एखाद्या पासवर्ड ठरवा व ते तिथे टाइप करा.  पासवर्ड टाईप केल्यानंतर तुम्हाला पुढच्या पर्यायांमध्ये पुन्हा पासवर्ड कन्फर्म करण्यासाठी टाईप करण्यासाठी सांगितले जाईल तेथे पासवर्ड पुन्हा टाईप करा.

युजर नेम आणि पासवर्ड टाकून झाल्यानंतर आता तुम्हाला तुमचे ईमेल आयडी विचारले जाईल,  जे तुमच्या स्कॉलरशिप फॉर्म साठी वापरले जाईल त्यासाठी तेथे तुमचे ईमेल आयडी टाका जर तुमच्याकडे ईमेल आयडी नसल्यास तुम्हाला ईमेल अकाउंट बनवून तेथे तुमचा ईमेल आयडी टाकावे लागेल.  ईमेल आयडी टाकल्यानंतर तिथे बाजूला असणाऱ्या Get OTP for Email id verification या पर्यायावर क्लिक करून तुमच्या ई-मेल आयडी वर आलेला OTP  तेथे टाईप करा व नंतर Verify OTP for email id या पर्यायावर क्लिक करा.

ई-मेल ऍड्रेस व्हेरिफाय झाल्यानंतर आता तुम्हाला पुढच्या पर्यायामध्ये तुमचे मोबाईल नंबर विचारले जाईल, तेथे तुमचे दहा अंकी मोबाईल नंबर टाका व बाजूला असणाऱ्या Get OTP for Mobile number verification या पर्यायावर क्लिक करा,  तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो तेथे टाका व बाजूला असणाऱ्या Verify OTP for mobile number  या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे तुमचे ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर व्हेरिफाय होऊन जाईल,  नंतर खाली हिरव्या रंगामध्ये असणाऱ्या Register या पर्यायावर क्लिक करा.

Register या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्ही या वेबसाईटवरील लॉगिन पेज वर याल तेथे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना ठरवलेला युजरनेम आणि पासवर्ड टाकून तेथे दाखवल्याप्रमाणे कॅपच्या टाईप करून Login here या पर्यायावर क्लिक करा.

लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्याकडे आधार नंबर आहे का,  हे विचारण्यात येईल तेथे तुम्ही Yes या पर्यायाला निवडा, Yes हे पर्याय निवडल्यानंतर तेथे तुम्हाला तुमचे आधार कार्ड नंबर विचारण्यात येईल, तेथे तुमचे बारा अंकी आधार कार्ड नंबर टाईप करा, आधार कार्ड नंबर टाईप केल्यानंतर तेथे तुम्हाला Choose authentication type असे एक प्रश्न विचारला जाईल,  तेथे OTP या पर्यायाला निवडा.

OTP या पर्यायाला निवडल्यानंतर तुमच्यासमोर एक पॉप पप नोटिफिकेशन येईल,  तेथे I agree हा पर्याय निवडा. I agree हा पर्याय निवडल्यानंतर तुमच्या आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवला जाईल,  पण जर तुमच्या आधार कार्ड मध्ये तुमचं मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला सर्वात पहिले महा ई सेवा केंद्राला भेट देऊन तुमचे आधार कार्डसोबत तुमचे मोबाईल नंबर लिंक करावे लागेल.

तुमच्या मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी तेथे OTP टाकण्यासाठी असलेल्या पर्यायांमध्ये टाका व Verify OTP या पर्यायावर क्लिक करा. OTP या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर Aadhar registration successful अशी नोटिफिकेशन येईल, तेथे असलेल्या Ok या पर्यायावर क्लिक करा.

Aadhar registration successful झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा लोगिन पेज वर पाठवले जाईल तेथे पुन्हा तुमचे रजिस्ट्रेशन च्या वेळी वापरलेले युजरनेम आणि पासवर्ड आणि नंतर दाखविल्या प्रमाणे कॅपच्या टाकून Login here या पर्यायावर क्लिक करा.

लॉग इन केल्यानंतर तुम्ही डॅशबोर्ड मध्ये याल, तेथे तुम्हाला डाव्या बाजूस Profile असे पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. Profile मध्ये आल्यानंतर तुम्हाला तिथे पुढील प्रमाणे सहा प्रकारची माहिती विचारली जाईल :-

  1. पर्सनल इन्फॉर्मेशन
  2. ऍड्रेस इन्फॉर्मेशन
  3. ऑदर इन्फॉर्मेशन
  4. करंट कोर्स
  5. पास्ट कॉलिफिकेशन
  6. होस्टेल डिटेल्स

येथे आपल्या प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी वरीलप्रमाणे सहा विविध प्रकारची माहिती पूर्ण करावी लागेल.

सर्वप्रथम पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये या, आपण रजिस्ट्रेशन करताना आधार कार्ड चा वापर केल्यामुळे पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये  नाव, जन्मदिनांक, वय, लिंग ही सर्व माहिती तुमच्या आधार कार्ड च्या माहितीनुसार आपोआप घेतली जाईल.

आता पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये खाली आल्यानंतर तुम्हाला Cast details  विचारल्या असतील तेथे या पर्यायांमध्ये तुमची Caste category विचारलि असेल तेथे तुमची कास्ट कॅटेगिरी निवडा,  नंतर तुमची कास्ट निवडण्यासाठी पर्याय असेल तिथे  तुमची कास्ट निवडा, आता तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे काय हे विचारण्यात येईल तेथे Yes या पर्यायाला निवडा.

आता तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट आपले सरकार सेवा केंद्र कडून आले आहे का,  हे विचारण्यात येईल,  तेथे नाही आले असल्यास No या पर्यायाला निवडा. तुम्हाला पुढच्या पर्यायांमध्ये कास्ट सर्टिफिकेट चे नंबर विचारले जाईल तेथे तुमचे कास्ट सर्टिफिकेट वरील नंबर पाहून तेथे टाईप करा.

कास्ट सर्टिफिकेट वरील नंबर टाकल्यानंतर तुम्हाला Issuing District  विचारण्यात येईल तेथे तुम्हाला  कास्ट सर्टिफिकेट मिळालेल्या जिल्ह्याचे नाव निवडा. आता तुमचे  कास्ट सर्टिफिकेट वर असल्याप्रमाणे नाव Applicant Name या पर्यायामध्ये टाका. Applicant Name  टाईप केल्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची Issuing authority  विचारले असेल तेथे तुम्ही तुमच्या   कास्ट सर्टिफिकेटला पाहून तिथे पर्याय निवडा.

Issuing authority निवडून झाल्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी सांगितले जाईल तेथे तुमचे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करा व नंतर तुमच्या कास्ट सर्टिफिकेट कोणत्या तारखेला मिळाले आहे ते विचारले जाईल तेथे ती तारीख टाका.

कास्ट सर्टिफिकेट्स टाकल्यानंतर आता तुम्हाला इन्कम डिटेल्स विचारले  जातील. तिथे पहिल्या पर्याय मध्ये तुमची इनकम विचारले असेल तिथे टाइप करा व नंतर तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट आहे का हे विचारण्यात येईल तेथे या पर्यायावर क्लिक करा जर तुमच्याकडे इनकम सर्टिफिकेट नसल्यास तुम्हाला ते Apply करून मिळवावे लागेल.

आता तुम्हाला तुमचे इन्कम सर्टिफिकेट आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडून मिळाले आहे का हे विचारण्यात येईल तेथे नाही असल्यास No या पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला तुमचे इनकम सर्टिफिकेट चे नंबर टाकण्यासाठी पर्याय असेल तिथे तुमचे इनकम सर्टिफिकेट वर असणारे नंबर टाका.

तुमच्या इनकम सर्टिफिकेट चे नंबर टाकल्यानंतर, तुमच्या इनकम सर्टिफिकेट ची Issuing authority विचारली जाईल, तेथे तुमच्या इन्कम सर्टिफिकेट वर पाहून ते  पर्याय तिथे निवडा. Issuing authority  निवडल्यानंतर तुम्हाला  तुमचे इनकम सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी पर्याय असेल तेथे तुमचे इनकम सर्टिफिकेट ची फाईल अपलोड करा.  इनकम सर्टिफिकेट ची फाईल अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या इनकम सर्टिफिकेट ची Date of issue विचारले जाईल ती तिथे टाइप करा.  अशाप्रकारे इन्कम डिटेल्स टाकावेत.

इन्कम डिटेल्स टाकून झाल्यानंतर आता डोमेशियल डिटेल्स टाकावे लागणार आहेत, तेथे असणाऱ्या पहिल्या Are you domicile of Maharashtrian या पर्यायाला Yes असे निवडा. आता तुमच्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट आहे का हे विचारण्यात येईल Do you have Domicile certificate तिथे Yes हे पर्याय निवडा आणि पुढील Relation type या पर्यायामध्ये Self असे निवडा.

आता तुम्हाला तुमचे डोमिसाइल सर्टिफिकेट आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडून मिळाले आहे का हे विचारण्यात येईल तेथे नाही असल्यास No या पर्यायावर क्लिक करा.

आता तुम्हाला तुमचे डोमिसाइल सर्टिफिकेट चे नंबर टाकण्यासाठी पर्याय असेल तिथे तुमचे इनकम सर्टिफिकेट वर असणारे नंबर टाका.

तुमच्या डोमिसाइल सर्टिफिकेट चे नंबर टाकल्यानंतर, तुम्हाला Applicant Name विचारले असेल तेथे तुमचे पूर्ण नाव टाका. तुमच्या डोमिसाइल सर्टिफिकेट ची Issuing authority विचारली जाईल, तेथे तुमच्या डोमिसाइल सर्टिफिकेट वर पाहून ते  पर्याय तिथे निवडा. Issuing authority  निवडल्यानंतर तुम्हाला  तुमचे डोमिसाइल सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी पर्याय असेल ते तुमचे डोमिसाइल सर्टिफिकेट ची फाईल अपलोड करा.  डोमिसाइल सर्टिफिकेट ची फाईल अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोमिसाइल सर्टिफिकेट ची Date of issue विचारले जाईल ती तिथे टाइप करा.  अशाप्रकारे डोमिसाइल सर्टिफिकेट डिटेल्स टाकावेत.

आता डोमिसाइल सर्टिफिकेट डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला Personal eligibility details विचारल्या जातील तेथे Are you salaried या पर्यायाला No असे निवडा आणि Disability of any type मध्ये तुम्ही जर अपंग नसाल तर No असे निवडा.

आता तुम्हाला Adhar Bank details मध्ये विचारले जाईल कि तुमच्या बँकेतील अकाउंटला पैसे काढण्यासाठी किंव्हा Deposit करण्यासाठी लिमिट आहे का, कारण तसे असल्यास तुमच्या बँकेचे खाते मध्ये स्कॉलरशिप  जमा होताना अडचण येऊ शकते,  तर तेथे तुमच्या खात्याला लिमिट नसल्यास No या पर्यायावर क्लिक करा.

आता आपल्याला Bank details  विचारल्या असतील तेथे  पहिल्या पर्यायांमध्ये तुमचे बँक खाते क्रमांक  टाका,  दुसऱ्या पर्यायमध्ये तुमच्या बँकेच्या खात्याचे IFSC code टाका. IFSC code टाकल्या नंतर पुढच्या पर्यायांमध्ये आपोआप तुमच्या बँकेच्या ब्रांचचे नाव येईल. अशाप्रकारे बँक डिटेल्स टाकून होईल.

अशा प्रकारे आपली पर्सनल इन्फॉर्मेशन टाकून पूर्ण झाली आहे, आता खालील असणाऱ्या Save या पर्यायावर क्लिक करा.

आता तुम्ही ऍड्रेस इन्फॉर्मेशन या नवीन टॅब वर याल, येथे  तुम्ही आधार कार्डच्या मदतीने रजिस्ट्रेशन केल्यामुळे तेथून तुमचा पत्ता येथे आपोआप भरला जाईल. येथे तुम्हाला Village हे पर्याय रिकामे असेल तिथे तुमचे गावाचे नाव टाका.

गावाचे नाव टाकल्यानंतर तेथे Is correspond address same as permanent असे एक पर्याय  असेल,  तेथे आधार कार्ड वर दिलेले ऍड्रेस हेच तुमचे आत्ताचे ऍड्रेस आहे का ही विचारण्यात येईल तिथे असल्यास Yes या पर्यायावर क्लिक करा.

Yes या पर्यायावर क्लिक केल्यानंतर खाली विचारलेली Correspond address details ही माहिती, वर असलेल्या ऍड्रेस प्रमाणेच सारखी भरली जाईल. आता ऍड्रेस इन्फॉर्मेशन भरून झाल्यानंतर पुन्हा खाली असणाऱ्या Save या पर्यायावर क्लिक करा.

ऍड्रेस इन्फॉर्मेशन भरून झाल्यानंतर आता तुम्ही ऑदर इन्फॉर्मेशन या स्टेप मध्ये याल, येथे तुम्हाला पहिल्या पर्यायांमध्ये Is father alive? असे प्रश्न विचारले असेल, तेथे तुमचे वढील हयात असलास yes यावर क्लिक करा, पुढे तुम्हाला तुमच्या वडिलांचे नाव, त्यांचं Occupation म्हणजेच धंदा, Is salaried? हे विचारले असेल ती माहिती भरा.

अशा प्रकारे ऑदर इन्फॉर्मेशन सेव करा, व नंतर करंट कोर्स, पास्ट कॉलिफिकेशन, होस्टेल डिटेल्स ही सर्व माहिती भरा.   अशाप्रकारे प्रोफाइल पूर्ण होईल,  प्रोफाइल पूर्ण झाल्यानंतर All schemes या पर्यायामध्ये जाऊन तुम्ही eligible असणाऱ्या scholarship scheme ला apply करा.

शिष्यवृत्तीचा फॉर्म ऑनलाइन कसा भरायचा?

नोंदणी पूर्ण करण्यासाठी तुम्ही आधार कार्ड, मार्कशीट, श्रेणी प्रमाणपत्र, स्वाक्षरी, छायाचित्र, बँक खाते यासारखी मूलभूत कागदपत्रे वापरावीत. यूपी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती फॉर्म 2024 भरण्यासाठी अधिकृत वेबसाइट स्कॉलरशिप.up.gov.in आहे जिथे तुम्ही आधार कार्ड वापरून भेट देऊ शकता आणि नोंदणी करू शकता .


महा डीबीटी शिष्यवृत्ती म्हणजे काय?

विभाग शालेय शिक्षण विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग, इत्यादी विभागांचा समावेश या महाडीबीटी पोर्टल वर केलेला आहे. आदिवासी विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती मध्ये आदिवासी विद्यार्थी परीक्षा फी आणि ट्युशन फी यामध्ये शिष्यवृत्ती प्राप्त करू शकतात.


Mahadbt साठी शिष्यवृत्तीची रक्कम किती आहे?

महाडीबीटी शिष्यवृत्ती अंतर्गत पुरस्कार किंवा लाभ INR 100 ते INR 25,000 च्या दरम्यान शिष्यवृत्तीचा प्रकार आणि अर्जदाराच्या पात्रता निकषांवर अवलंबून असतात. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे आणि त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 आहे

Leave a Comment