सतलज नदी विषयी संपूर्ण माहिती Sutlej River information in Marathi

Sutlej River information in Marathi सतलज ही नदी खूप प्राचीन नदी आहे. सतलज नदीचे वर्णन अनेक ऐतिहासिक साहित्यात ऐकायला मिळते. सतलज नदीचा उल्लेख ऋग्वेदातही केलेला आहे. वाल्मिकीनी लिहिलेल्या रामायणातही या नदीचा उल्लेख ‘शतद्रु’ असा केलेला आहे. तसेच ह्या नदीचा उल्लेख महाभारतातही केलेला आहे. पंजाबच्या पाच प्रमुख नद्यांपैकी सतलज ही सर्वात महत्त्वाची नदी असून पंजाब शब्दाचा अर्थ पाच नद्यांचा प्रदेश असा आहे. पाच नद्यांमुळे पंजाबला पंचनांत असेही म्हणतात. त्यामध्ये झेलम चिनाब रवी व्यास व सतलज या पंजाब मधील प्रमुख नद्या आहेत. सतलज नदीचा प्रवाह टेकड्यांमधून खूपच वेगवान असून हा मैदानी भागात खूपच गुळगुळीत आहे. तर चला मग पाहूया सतलज या नदी विषयी सविस्तर माहिती.

Sutlej River Information In Marathi

सतलज नदी विषयी संपूर्ण माहिती Sutlej River information in Marathi

उगम व प्रवास :

सतलज या नदीचा उगम तिबेटमधील  राक्षसताल सरोवरातून होतो. येथे तिला लांग्केन, झांग्बो अशा नावाने ओळखले जाते. पश्चिम-उत्तर पश्चिमेस 260 किमी अंतर वाहिल्यावर सतलज शिप्कीला येथे भारतात शिरते.  हिमाचल प्रदेशमध्ये साधारण पश्चिम-आग्नेयेस दिशेत 360 किमीचा प्रवास झाल्यावर तिचा संगम बियास नदीशी होतो.

याच दिशेने 15 किलोमीटर वाहून सतलज नदी पाकिस्तान मध्ये शिरते व पुढेही नदी चिनाब नदीला मिळते. येथे ही नदी पंजनाद नदी या नावाने ओळखली जाते. तसेच येथून 100 किमी पश्चिमेला बहावलपूर शहराजवळ ही नदी सिंधू नदीला जाऊन मिळते.

सतलज नदीची नावे व लांबी :

या नदीचे पौराणिक नाव शतुर्डी असे आहे. सतलज नदीचे मूळ नाव शताद्री, शतद्रू असे आहे .पंजाब मध्ये या नदीला हैमावती असे संबोधले जाते. तर टॉलेमी ने केलेल्या  वर्णनात झाराद्रॉस असा उल्लेख आहे.

सतलज या नदीसाठी  संपू, सुतद्र, मुकसंग, सुमुद्रांग, जंगटी इत्यादी नावेही वापरली गेलेली आहेत. सतलज या नदीची एकूण लांबी 1450 किलोमीटर असून सतलज नदीची  भारतातील लांबी 1050 किलोमीटर आहे. सतलज नदीचे क्षेत्र हे पंजाब राज्यात जास्त आहे.

सतलज नदीचा इतिहास :

सतलज नदीचा इतिहास खूप प्राचीन इतिहास आहे. तिबेटमधील लांगकीन झांगबो नावाची अप्पर सतलज व्हॅली, एकेकाळी पश्चिम तिबेटमधील झांगजंग या प्राचीन संस्कृतीद्वारे गरुड व्हॅली म्हणून ओळखली जात होती.

गरुड व्हॅली हे त्यांच्या साम्राज्याचे केंद्र होते. जे जवळच्याच हिमालयात अनेक मैलांपर्यंत पसरले होते.  झांगजंगने वरच्या सतलज खोऱ्यात क्यूंगलुंग नावाचा एक भव्य राजवाडा बांधला, ज्याचे अवशेष आपल्याला तेथे आढळून येतात.

कैलास पर्वताच्या नैऋत्य दिशेला माउंट टी-से मोइनकोर गावाजवळ, अखेरीस, झांगझुंग तिबेटी साम्राज्याने जिंकले.  सतलज नदीने महाराजा रणजित सिंग यांच्या नेतृत्वाखाली शीख साम्राज्याची पूर्व सीमा देखील तयार केली. आजही सतलज नदीच्या खोऱ्यात झांगजंगच्या भटक्या वंशजांची वस्ती आढळून येते हा प्राणी पाळणाऱ्यांच्या छोट्या गावात राहतात.

सतलज नदीवरील प्रकल्प :

सतलज नदीखोऱ्याची वरच्या भागातील जमीन खालच्या टप्प्यातील जमिनीपेक्षा जास्त सुपीक आहे. खालच्या टप्प्यातील बहुतेक भाग राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात मोडतो. मैदानी प्रदेशात या नदीचा बहुउद्देशीय प्रकल्पांसाठी उपयोग करून घेण्यात आला आहे.

रूपार येथे उभारण्यात आलेल्या सरहिंद कालवा प्रकल्पामुळे तिच्या पाण्याचा शुष्क प्रदेशाला मोठ्या प्रमाणात उपयोग झाला आहे.

बिआस नदी संगमानंतरचे अप्पर सतलज प्रकल्प व लोअर  सतलज प्रकल्प यांमुळे वाळवंटी भागातील बहुतेक प्रदेश सिंचनाखाली आला आहे. याशिवाय  भाक्रा-नानगल, सतलज नदीखोरे प्रकल्प यांव्दारा हिचे खोरे समृद्ध झाले आहे.

ही नदी मैदानी प्रदेशात बहुतेक भागात लहान नावांकीसाठी वर्षभर उपयुक्त ठरते. सतलज नदीच्या उगमप्रवाहाचे 2004 ते 2006 या कालावधीत जर्मन, रशियन व अमेरिकन संशोधकांनी मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण केले आहे.

सतलज नदी काठावरील शहरे :

हिमाचल प्रदेशमधील रामपूर व बिलासपूर, पंजाब मधील रुपनगर व फिरोजपुर, व पाकिस्तानातील बहावलपूर ही या नदीकाठावरील मोठी शहरे आहेत.

सतलज नदीवरील पूल :

हिमाचलमध्ये सतलज नदी किन्नौर, शिमला, कुल्लू, सोलन आणि बिलासपूर जिल्ह्यातून वाहत असून बिलासपुर जिल्ह्यातील सतलज नदीमध्ये दऱ्या आढळून येतात. त्यामध्ये अली, गंभरोळ, गंभार, मोनी, शीर अशी त्यांची नावे आहेत. कंदौर पूल बिलासपुर जिल्ह्यातील सतलज नदीवर बांधण्यात आला आहे. किब्बर चीचम हा पुल तयार होण्याआधी आशियातील सर्वात लांब पूल होता.

सतलज नदीचा वेग :

सतलज या नदीला उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे व पावसाळ्यात पावसामुळे पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळेच या नदीला पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा महापुराची स्थिती निर्माण होते. 1955 मध्ये झालेल्या सर्वात मोठा महापुर आला होता. त्या वेळी या नदीपात्रातून दर सेकंदाला 16900 घ.मी. पाणी वाहत होते. हिवाळ्यात मात्र जेथे या नदीचा उगम होतो.

त्या प्रदेशातील हिमनद्या गोठल्यामुळे या नदीचा पाणी पुरवठा कमी होतो व तिच्या प्रवाहाचा वेगही कमी होतो. ही नदी जेव्हा सपाट भागातून वाहते तेव्हा सतलज नदीने अनेक वेळा पात्र बदलल्याचे सर्वेक्षणात आढळून आलेले आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते या नदीने दहाव्या शतकापासून ते सोळाव्या शतकापर्यंत तीन ते चार वेळा प्रवाह बदलल्याचे अनुमान आहेत. तसेच त्याचे पुरावे ही उपलब्ध आहेत.

सतलज नदीच्या उपनद्या :

सतलज या नदीच्या उपनद्यांची माहिती पुढील प्रमाणे आहे.

स्पिती नदी :

स्पिती ही नदी सतलज नदीची उपनदी असून ते सोनापोणी हिमनदी पासून उगम पावते. उगम पावल्यानंतर एकूण 130 किलोमीटर अंतर वाहत जाऊन नंतर किंन्नौर मधील खाब या ठिकाणी सतलज नदीला जाऊन मिळते. ताबो, पोह, कराटी, थुंपा, लुंपा, उलाह, सूरहल, गिमडो इत्यादी तिच्या उपनद्या आहेत. स्थिती नदीवर अनेक जलविद्युत प्रकल्प आहेत.

नोगली नदी :

नोगली नदी ही सतलजची दुसरी उपनदी असून ती रामपूर बुशहर जवळ सतळजला येऊन मिळते.

बियास नदी :

बियास नदी सतलज नदीची मुख्य उपनदी आहे. ही बियास कुंडपासून 470 किलोमीटर अंतर कापल्यानंतर पंजाब नंतर सतलज नदीला जाऊन मिळते. बियास नदी सतलजपेक्षा लहान असल्यामुळे ह्या दोघींच्या संगमाला तयार होणाऱ्या प्रवाहाला सतलज असे म्हणतात.

हंस नदी :

हंस ही नदी मुख्यतः हिमाचल मध्ये वाहते, त्यानंतर ही नदी हिमाचल सोडून पंजाबमध्ये प्रवेश करते. व जेथे टी सतळज ची उपनदी बनते. भाक्रा नांगल प्रकल्पा जवळ सतलज नदीला जाऊन मिळते.

सतलज नदीवरील मोठे जलविद्युत प्रकल्प :

  • भाक्रा-नांगल जलविद्युत प्रकल्प : हा पंजाब मधील बिलासपूर येथे आहे.
  • नाथपा झाकरी जलविद्युत प्रकल्प हा जलविद्युत प्रकल्प शिमला – किन्नोर येथे आहे.
  • रामपूर जलविद्युत प्रकल्प : हा प्रकल्प शिमला येथे आहे.
  • लुहरी धरण जलविद्युत प्रकल्प हा शिमला -कुल्लू येथे आहे.
  • कोल धरण जलविद्युत प्रकल्प
  • करचम वांगटू जलविद्युत प्रकल्प.
  • खाब जलविद्युत प्रकल्प हा किन्नौर येथे आहे.

हे सर्वच जलविद्युत प्रकल्प खूप महत्त्वाचे आहेत.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे सुद्धा अवश्य वाचा :-


सतलज नदी का प्रसिद्ध आहे?

सतलज नदीने महाराजा रणजित सिंग यांच्या नेतृत्वाखाली शीख साम्राज्याची पूर्व सीमा देखील तयार केली . आज, सतलज खोऱ्यात झांगझुंगच्या भटक्या वंशजांची वस्ती आहे, जे याक पशुपालकांच्या लहान गावात राहतात. सतलज हे त्या काळातील राजांसाठी वाहतुकीचे प्रमुख माध्यम होते.


सतलज नदीचा उगम कुठे आहे?

सतलजचा उगम तिबेटमधील राक्षसताल सरोवरातून होतो. येथे तिला लांग्केन झांग्बो (हत्ती नदी) अशा नावाने ओळखले जाते. पश्चिम-उत्तर पश्चिमेस २६० किमी अंतर वाहिल्यावर सतलज शिप्कीला येथे भारतात शिरते. हिमाचल प्रदेशमध्ये साधारण पश्चिम-आग्नेयेस दिशेत ३६० किमी वाहल्यावर तिचा संगम बियास नदीशी होतो

सतलज नदी कोठे सुरू होते आणि कोठे संपते?

सतलजचा उगम तिबेटमधील राक्षसाल सरोवराच्या पाणलोट क्षेत्राच्या पश्चिमेला आहे. हिमाचल प्रदेश राज्यात भारतात प्रवेश करणारी शिपकी ला खिंडीपर्यंत तिबेटीयन नावाने लँगकन झांगबो (एलिफंट रिव्हर किंवा एलिफंट स्प्रिंग) या नावाने प्रथम पश्चिम-वायव्य दिशेला 260 किलोमीटर अंतरापर्यंत नवजात नदी वाहते.

सतलज नदी कशासाठी वापरली जाते?

 सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो.

1 thought on “सतलज नदी विषयी संपूर्ण माहिती Sutlej River information in Marathi”

  1. अतिशय उपयुक्त आणी अचूक माहिती आहे. तेहि सध्या सरळ सोप्या शब्दात मांडली आहे.

Leave a Comment