Sanjay Dutt Information In Marathi संजय दत्त हे एक भारतीय अभिनेता आहे. त्यांनी बालपणात 1972 मध्ये आपल्या वडिलांसोबत रेशमा और शेरा या चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या छब्या उमटविले आहेत. संजय दत्त एक यशस्वी अभिनेता, प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री नरगिस व अभिनेता संसदपटू सुनील दत्त यांचा मुलगा, खासदार प्रिया दत्तचा भाऊ आहे. वडिलोपार्जित मिळालेली प्रसिद्धी व धनदौलत मिळाल्यानंतरही हा नायक शेवटी खलनायक बनून चाहत्यांचे मनोरंजन करत राहिला. त्यांच्याविषयी माहिती पाहूया.
संजय दत्त यांची संपूर्ण माहिती Sanjay Dutt Information In Marathi
जन्म :
संजय दत्त यांचा जन्म 29 जुलै 1959 या दिवशी झाला. त्यांचे पूर्ण नाव संजय बलराज दत्त आहे. त्यांचे वडील दिग्गज आणि सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सुनील दत्त हे आहे. तसेच त्यांची आई लोकप्रिय अभिनेत्री नर्गिस आहेत. 1981 मध्ये रॉकी या चित्रपटाच्या प्रीमियरच्या आधी त्यांच्या आईचे निधन झाले. नर्गिस दत्तचा कर्करोगाने मृत्यू झाला.
त्यांना दोन बहिणी आहेत. प्रिया दत्त आणि नम्रता दत्त. त्यांची बहीण प्रिया दत्त ही एक राजकारणी आहे. संजूला त्याच्या आईच्या मृत्यूने खूप मोठा धक्का बसला होता. जेव्हा आईचा मृत्यू झाला, तेव्हा संजू 22 वर्षाचा होता आणि या दुर्घटनेनंतर संजूला ड्रग्स आणि व्यसनाधीनतेचे व्यसन लागले. संजय दत्तने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले. प्रत्येक पात्र चांगले रंगवले परंतु प्रेम आणि विनोदी शैलीत तर त्यांनी यश मिळवून घेतले.
शिक्षण :
संजय दत्त यांची शिक्षण काउंसलिंग जवळील सणावरच्या लॉरेन्स स्कूलमध्ये झाले.
वैयक्तिक जीवन :
संजय दत्त याने पहिले लग्न 1987 मध्ये रिचा शर्मा हिच्यासोबत केले. मात्र लग्नाच्या नऊ वर्षानंतर रिचा शर्मा यांचे ब्रेन ट्यूमरमुळे 1996 मध्ये त्यांचे निधन झाले. मात्र यांच्या दोघांची एक मुलगी आहे, त्रिशला ही सध्या तिच्या आजी-आजोबांकडे अमेरिकेमध्ये राहते. संजय दत्त यांनी 1998 साली मोडेल रिया पिल्लई दुसरे लग्न केले.
परंतु काही कारणांमुळे त्यांचे नातलग यशस्वी झाले नाही आणि दोघांचेही घटस्फोट झाले. यानंतर संजय दत्त हे मन्यताला भेटले. दोघेही दोन वर्ष एकसारखीच राहिले. त्यानंतर दोघांनीही गाठ बांधण्याचे ठरवले आणि गोव्यात जाऊन लग्न केले. 21ऑक्टोबर 2010 रोजी मान्यता दत्तने इक्रा आणि शहारन या जुळ्या मुलांना जन्म दिला.
करियर :
संजय दत्त यांनी आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले. त्यांचा अभिनेता म्हणून सुरुवात चांगलीच गाजली. परंतु अंमली पदार्थांच्या आहारी गेले व अनेक वर्षे चित्रपट सृष्टीपासून दूर होते. अंमली पदार्थांचे सेवन केल्याने त्यांची तब्येत एकेकाळी फारच खालावली होती. त्यावेळेस सुनिल दत्त यांनी त्याला अमेरिकेत उपचारांसाठी नेले.
अंमली पदार्थांचे संजय दत्त यांचे व्यसन उपचारानंतर सुटले व त्यांनी काही काळ अमेरिकेत व्यतीत केला. या काळात त्यांना अमेरिकेतच रहाण्याची व चित्रपट सृष्टीतील प्रसिद्धी पासून दूर रहाण्याचे ठरवले होते. परंतु सुनिल दत्त यांनी आपल्या इच्छेखातर भारतात परतण्याची विनंती केली व त्यास संजय दत्त यांनी होकार दिला.
भारतात परतल्यानंतर काही काळानंतर पुन्हा चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. अनेक हिट चित्रपट दिले. या काळात व्यक्तीक आयुष्यात बदल झाले. तसेच 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के. 56 रायफल हस्तगत करण्यात आली.
राजकीय कारकीर्द :
संजय दत्त यांना 2009 च्या लोकसभा निवडणूकीसाठी समाजवादी पक्षाची उमेदवारी मिळाली. ते लखनौ या मतदार संघातून उमेदवारी लढणार होते. सी.बी.आय ने त्यांच्या मिळालेल्या शिक्षेचा दाखला देत, त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली.
31 मार्च 2009 रोजी सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या निर्णयानुसार त्यांना निवडणुक लढवता येणार नाही. 21 मार्च 2013 रोजी भारतीय सर्वोच्च न्यायालयाने 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचा निर्णय देताना बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली संजय दत्त यांना 5 वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
संजय दत्तची कारकीर्द चढउतारांनी भरली आहे. 1999 च्या मुंबई बॉम्बस्फोटांमुळे त्याला बर्याच वेळा तुरुंगात जावं लागलं. यामुळे त्याला आपल्या चित्रपट कारकिर्दीतही बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. संजय प्रथम बाल कलाकार म्हणून ‘रेश्मा और शेरा’ चित्रपटात दिसला परंतु मुख्य अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट ‘रॉकी’ होता.
जो त्या काळातील सुपरहिट चित्रपट होता. यानंतर त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आणि जवळजवळ प्रत्येक चांगल्या अभिनेत्याबरोबर काम केले पण ‘खलनायक’ चित्रपटात त्यांनी निभावलेली ‘बाळू’ ही व्यक्तिरेखा आजही सर्वांच्या मनात ताजी आहे. ‘वास्तव’ चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आणि त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
आरोग्य संबंधित माहिती :
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने कर्करोगावर मात करून पुन्हा एकदा काम सुरू केले आहे. त्याने केजीएफ 2 ची तयारी सुरू केली आहे. संजय दत्तच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, संजय दत्तने नुकतेच काम सुरू केले आहे. त्याने ‘भुज’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केली आहे आणि सध्या त्याचे हैदराबादमध्ये केजीएफ 2 चे शूटिंग सुरू आहे.
केजीएफच्या निर्मात्यांनी संजय दत्तच्या आरोग्याची स्थिती लक्षात घेत बॉडी डबल घेण्याचे सुचविले होते. मात्र याला संजय दत्तने नकार दिला आणि संजय दत्त स्वत: अॅक्शन सीक्वेन्स केले. त्याच्या आधीच्या चित्रपटांमध्येही त्याने असेच केले होते. तो आजारातून पूर्णपणे बरा झाला आहे. केजीएफ 2 चे शेवटचे आणि अंतिम वेळापत्रक आहे.
शूटिंग डिसेंबरच्या सुरूवातीला सुरू झाली आणि डिसेंबरच्या मध्यापर्यंत पूर्ण होईल. संजय दत्त दररोज शूट करत आहे आणि ब्रेकही घेत नाही. केजीएफचा प्रसिद्ध अभिनेता यश संजय दत्तसोबत ‘केजीएफ 2’ मध्ये स्क्रीन स्पेस शेअर करत आहे. बहुप्रतीक्षित चित्रपटात दोन्ही सुपरस्टार पहिल्यांदाचसोबत काम करीत आहेत.
बॉलिवूडचा ‘संजू बाबा’ अर्थात संजय दत्त यांने कर्करोगावर मात केली आहे. काही दिवसांपूर्वी संजय दत्तचे फोटो व्हायरल झाले होते. यात त्याची प्रकृती ढासळलेली दिसल्याने चाहत्यांना धक्का बसला होता.
2021च्या ऑगस्ट महिन्यात संजय दत्तला कर्करोग झाल्याचे वृत्त समोर आले होते. यानंतर तो उपचारांसाठी अमेरिकेत गेला होता. गेल्या आठवड्यात त्याचा पीटीई रिपोर्ट आला असून, त्यानुसार संजय दत्त कर्करोगातून पूर्णपणे बरा झाला असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात त्याच्या एका जवळच्या व्यक्तीने पीटीआयला ही माहिती दिली होती.
त्यांनी सांगितले की, ‘जेव्हा संजय दत्त आजारी आहे. ही बातमी समोर आली तेव्हा सगळ्यानांच शॉक बसला होता. त्यातही त्याला कर्करोग झाल्याने तो आता केवळ सहा महिनेच जगणार असल्याच्या अफवादेखील पसरल्या होत्या. या अफवांना बळी न पडता त्याच्या सगळ्या चाहत्यांनी प्राथर्ना केली आणि त्यांच्या प्रार्थनांना यश आले आहे. उपचारांना चांगला प्रतिसाद दिल्याने, तो या सगळ्यातून लवकर बाहेर पडला आहे.
ऑगस्ट 2020 मध्ये, श्वासोच्छवासाच्या त्रासानंतर संजय दत्तला मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर त्यांच्या अहवालात फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे समोर आले आहे. संजय दत्तचा कर्करोग तिसऱ्या टप्प्यात होता.
पण यादरम्यान, विश्रांती घेतल्याशिवाय आणि कर्करोगाशी लढाई सुरू न ठेवता संजय दत्तने ‘शमशेरा’ चित्रपटासाठी शूट केले. चित्रपटाच्या सेटवर कडक सुरक्षा आणि संजय दत्तसाठी सर्व सुविधा उपलब्ध होत्या.
चित्रपटांची नावे :
क्षत्रिय, जीना मरना तेरे संग, य़लगार, साजन, कुरबानी, खून का कर्ज, क्रोध, जीने दो, खतरनाक, तेजा (1990), ठाणेदार, जहरीले, दो कैदी, मोहब्बत का पैगाम, हम भी इन्सान है, भोला, कानून अपना अपना, हत्यार, अविनाश, कब्जा, खतरो के खिलाडी जिथे हे शान से मोहब्बत के दुश्मन, मर्दो वाली बात, इनाम दस हजारकलम, नाम-ओ-निशान, ईमानदारर, जीवा, मेरा हक, दो दिलो की दास्तान, मेरा फैसला, जमीन, संजू, रॉकी ई.
“ही माहिती कशी वाटली, ते कमेंट करून नक्की सांगा.”
Sanjay Dutt Biography: Life History | Career | Unknown Facts | FilmiBeat
Sanjay Dutt (born 29 July 1959) is an Indian film actor and producer known for his work in Bollywood. The son of veteran Hindi film actors Sunil Dutt and Nar...