एमटीएस परीक्षेची संपूर्ण माहिती MTS Exam Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

MTS Exam Information In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आज आपण या लेखा मध्ये एमटीएस परीक्षेबद्दल माहिती (MTS exam information in marathi) जाणून घेणार आहोत. मित्रांनो MTS परीक्षा ची तयारी संपूर्ण भारतामधील विद्यार्थी करत असतात. देशभरातील उमेदवारांना नौकरीच्या मार्ग मिळवून देण्याचे काम स्टाफ सिलेक्शन कमिशन वेगवेगळ्या परिक्षांद्वारे करत असते. त्यातीलच एक परीक्षा म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन-मल्टी टास्किंग ची परीक्षा दर वर्षी संपूर्ण भारतामध्ये घेतली जात असते या परीक्षेतून उत्कृष्ट उमेदवारांची नेमणूक करण्यात येते.

Mts Exam Information In Marathi

एमटीएस परीक्षेची संपूर्ण माहिती MTS Exam Information In Marathi

मित्रांनो एसएससी मध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे वेगवेगळ्या पदांसाठी परीक्षा दर वर्षी घेतली जात असतात. स्टाफ सिलेक्शन तर्फे केंद्रीय स्तरावर ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या परीक्षा घेतल्या जातात. मित्रांनो पण अनेक जणांना परीक्षेचा अभ्यास आणि त्याची तयारी करताना त्यांच्याकडून खूप चुका होत असतात त्यामुळे त्यांना उशिरा यश मिळते आणि यासाठी त्यांना कठोर मेहनत घ्यावी लागते.

मित्रांनो या लेख मध्ये आपण एमटीएस परीक्षा बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जसे की एमटीएस परीक्षा काय आहे? एमटीएस परीक्षेचा एक्साम पॅटर्न काय आहे? एमटीएस चा फुल फॉर्म काय आहे? तर तुम्ही या लेख ला शेवटपर्यंत वाचावे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल

MTS Exam Information In Marathi | एमटीएस परीक्षा बद्दल संपूर्ण माहिती

मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल एमटीएस परीक्षा ही एसएससी म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे घेतले जात असते. एसएससी एमटीएस परीक्षा ही ग्रुप सी (Group C) परीक्षांमध्ये येत असते स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) हे वेगवेगळ्या परीक्षा घेत असते. जसे एसएससी एमटीएस (SSC MTS), एसएससी सीजीएल (SSC CGL), एसएससी सीएचएसएल (SSC CHSL) सारखे अनेक परीक्षा स्टाफ सिलेक्शन कमिशन घेत असते.

एसएससी एमटीएस स्टाफ सिलेक्शन कमिशन मल्टी टास्किंग परीक्षा (staff selection commission multi tasking exam) ही दरवर्षी भारतातील विविध मंत्रालयांच्या विभाग कार्यालयांमध्ये ग्रुप सी च्या पदांसाठी राष्ट्रीय स्तरावरील घेतले जाणारे परीक्षा आहे. जे उमेदवार सरकारी नौकरी साठी इच्छुक आहेत. ते दहावी नंतर एसएससी एमटीएस ची परीक्षा देऊ शकतात. एसएससी MTS परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर उमेदवारांना स्टाफ सिलेक्शन मार्फत भारत सरकारमध्ये चांगली नौकरी मिळते.

केंद्र सरकारच्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ यांची निवड केली जात असते MTS या पदासाठी विद्यार्थी दहावीत असताना सुद्धा अर्ज करू शकतो हे परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवारांना चौकीदार, शिपाई सफाई कामगार आणि माळी इत्यादी सारख्या पदावर काम करावे लागते.

एसएससी एमटीएस परीक्षेसाठी काय पात्रता असते? | SSC MTS Exam Eligibility in Marathi

1) एसएससी एमटीएस परीक्षेसाठी विद्यार्थी हा दहावी पास असायला पाहिजे.

2) एमटीएस परीक्षेसाठी उमेदवार हा भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.

3) या परीक्षेला बसण्यासाठी उमेदवाराची वये 18 वर्षाचे 25 वर्षे या दरम्यान असायला पाहिजे.

एसएससी एमटीएस परीक्षेचा एक्झाम पॅटर्न काय आहे? | SSC MTS Exam Pattern in Marathi

एसएससी एमटीएस ची परीक्षा ही दोन टप्प्यात घेतले जात असते. पेपर 1 कॉम्प्युटर आधारावर घेतला जातो यामध्ये एकूण 100 प्रश्न एमसीक्यू टाइप्स असतात आणि या पेपरसाठी वेळचा कालावधी 90 मिनिटांचा असतो या परीक्षेमध्ये मुख्यतः रीजनिंग, इंग्रजी, एप्टिट्यूड आणि जनरल अवेरनेस यासारख्या विषयावर प्रश्न विचारले जातात.

जे उमेदवार पेपर 1 पास करतात त्यांना पेपर 2 साठी बसता येते. पेपर 2 हा वर्णनात्मक स्वरूपाचा असेल यामध्ये इंग्रजी आणि कुठल्याही भाषेत लहान निबंध आणि पत्र लिहायला सांगितले जाते. हा पेपर एकूण 50 गुणांचा आहे. या पेपर साठी 30 मिनिटांचा वेळ देण्यात येतो.

SSC MTS Department List | एसएससी एमटीएस विभागांची यादी.

मित्रांनो एसएससी एमटीएस (ssc MTS) च्या परीक्षामध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये पोस्टिंग केली जात असते त्यातील काही डिपार्टमेंट आपण खालीलपैकी दिलेले आहेत यामध्ये एसएससी एमटीएस भरती मध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांची पोस्टिंग होत असते.

  • (Central Secretariat) केंद्रीय सचिवालय
  • (Labour Bureau Ministry of External Affairs) श्रम ब्यूरो परराष्ट्र मंत्रालय
  • (Ministry of Defence) संरक्षण मंत्रालय
  • (Central Board of Excise and Customs) सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम्स
  • (Press Information Bureau) प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो
  • (Department of Science & Technology) विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग
  • (Department of Telecommunication) दूरसंचार विभाग
  • (Comptroller & Auditor General) नियंत्रक आणि महालेखा परीक्षक
  • (Central Board of Direct Taxes) केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ

इत्यादी सारख्या वेगवेगळ्या शाखांमध्ये एमटीएस पास झालेल्या उमेदवारांची पोस्टिंग होत असते.

एसएससी एमटीएस परीक्षेची तयारी कशी करावी? – How To Prepare For Ssc MTS in Marathi

मित्रांनो एसएससी एमटीएस परीक्षेची तयारी ही संपूर्ण भारतातील विद्यार्थी करत असतात या परीक्षेसाठी तुम्हाला दिवस रात्र मेहनत घ्यावी लागते. तेव्हाच तुम्ही यामध्ये यशस्वी होतात आणि परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी तुमचा अभ्यास करण्याची पद्धत सुद्धा महत्त्वाची असते आणि आपण कशाप्रकारे तयारी करायला हवी ही गोष्ट ही महत्त्वाची असते. तर तुम्हाला या लेख मध्ये तुम्हाला काही टिप्स दिलेल्या आहेत. जे तुम्हाला परीक्षेची तयारी करण्यासाठी कामात येतील.

1) परीक्षेची तयारी करण्याआधी तुम्ही सिल्याबस कडे लक्ष देणे महत्त्वाचे असते. सिलॅबस नुसार तुम्ही तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी तयार करावी.

2) तुम्हाला या परीक्षेला पास करण्यासाठी दररोज अभ्यास करणे आवश्यक आहे.

3) ज्या विषयांमध्ये तुम्ही कमजोर असणार सर्वात आधी त्या विषयावर जास्त फोकस करायचा जेणेकरून तुम्ही त्या विषयाला ही पास करू शकणार.

4) एमटीएस परीक्षेसाठी तुम्ही maths आणि reasoning या विषयावर जास्त लक्ष द्यावे कारण यामध्ये तुमचा चांगला स्कोर असला म्हणजे तुम्ही ही परीक्षा पास करू शकणार.

5) तुम्ही नेहमी मॉक टेस्ट साठी तयारी करायला पाहिजे यामुळे तुमचे प्रश्न सॉल करण्याची स्पीड वाढेल आणि तुम्हाला समजेल की परीक्षेची तयारी कशी करायची.

6) एमटीएस परीक्षेसाठी तुम्ही मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका पाहून त्यांचे विश्लेषण करून त्यांचा अभ्यास करू शकतात.

7) करंट अफेअर साठी तुम्ही नेहमी न्यूज पेपर वाचला पाहिजे.

8) जर तुम्हाला सेल्फ स्टडी करायचे आहे तर तुम्ही स्टडी करू शकता किंवा कोचिंग सेंटर ही तुम्ही जॉईन करू शकता. त्यामुळे तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे आणि कोण कोणते पुस्तके या परीक्षेसाठी लागतात त्याची संपूर्ण माहिती कोचिंग सेंटर मधून तुम्हाला मिळून जाईल.

FAQs

एमटीएस ची नौकरी काय असते?

एसएससी एमटीएस ही एक नॅशनल लेवल कॉम्पिटिटिव्ह परीक्षा आहे जी स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच केंद्र सरकार द्वारा वेगवेगळ्या विभागांमध्ये मंत्रालयाने मंत्रालय आणि कार्यालयांमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ ग्रुप सी म्हणून भरती आयोजित केली जाते.

एमटीएस (MTS) मध्ये कोण कोणत्या पोस्ट साठी परीक्षा घेतली जात असते?

एमटीएस परीक्षेमध्ये शिपाई, कार्यालय, जमादार, जूनियर जनरेटर ऑपरेटर, माळी, सफाई कामगार इत्यादी सारख्या वेगवेगळ्या पदांसाठी एमटीएस परीक्षा घेतली जात असते.

एमटीएस परीक्षेमध्ये एकूण किती पेपर असतात?

एसएससी एमटीएस (SSC MTS) परीक्षेमध्ये एकूण दोन पेपर असतात पेपर 1 हा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा असतो आणि पेपर 2 हा डिस्क्रिप्टिव स्वरूपाचा असतो.

एमटीएस परीक्षेचा फुल फॉर्म काय आहे?

एमटीएस परीक्षेचा फुल फॉर्म Staff Selection Commission exam for Multi-Tasking Staff. असा एमटीएस परीक्षेचा फुल फॉर्म होत असतो.

1 thought on “एमटीएस परीक्षेची संपूर्ण माहिती MTS Exam Information In Marathi”

Leave a Comment