एल.एल.बी. कोर्सची संपूर्ण माहिती LLB Course Information In Marathi

LLB Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलांमध्ये व त्यांच्या पालकांमध्ये 12 वी नंतर काय करावे ?कुठल्या क्षेत्रात जावे? कोणता कोर्स करावा ? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. बारावीनंतर विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग, फार्मसी ,बीएससी असे अनेक डिग्री कोर्स असतात. कोणत्या क्षेत्रात जायचे व कोणता कोर्स करायचा हा निर्णय घेणे खूप महत्त्वाचे असते.

Llb Course Information In Marathi

एल.एल.बी. कोर्सची संपूर्ण माहिती LLB Course Information In Marathi

Table of Contents

कारण हा बारावीनंतर चा टप्पा मुलांच्या भवितव्यासाठी व करिअरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो. कारण या टप्प्यावर निर्णय चुकता कामा नये. तर, चला मग आज मी तुम्हाला एल.एल.बी. या कोर्स विषयी सविस्तर माहिती सांगणार आहे. एल.एल.बी ही एक Under Graduate डिग्री आहे. या डिग्रीमध्ये कायद्याचे व नियमांचे परिपूर्ण शिक्षण दिले जाते .

एल.एल.बी.हा कोर्स केल्यामुळे आपल्याला वकील ही पदवी मिळते. वकील म्हणजे जो कायदेशीर बाबींमध्ये मार्गदर्शन करतो. कायद्याचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला इंग्रजीत ”लॉयर ‘असे म्हणतात. भारतात 1961 ,अँडवोकेट अँक्टनुसार जी व्यक्ती सन्मानीय उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करण्यासाठी पात्र असते तिला वकील असे म्हणतात. ज्याच्याकडे कायद्याची पदवी असते.

एल.एल.बी.आपल्याला कायदा व कायद्यातील केलेल्या तरतुदी यांच्याबद्दल प्रशिक्षण दिले जाते. आपल्या समाजात गंभीर गुन्हे घडत असतात त्या गुन्हेगारांना पकडण्याचे काम पोलिसांचे असते व त्यांच्यावर आरोप सिद्ध करण्याचे काम हे वकील करतो व त्यानुसार त्यांना शिक्षा देण्याचे काम हे न्याय व्यवस्थेचे असते.

पण प्रत्येक आरोपी हा गुन्हेगार नसतो त्यामुळे गुन्हेगार दोषी नसेल तर त्याला आरोपातून मुक्त करण्याचे कामही वकील करत असतो. जर तुम्हाला वकील होऊन या न्याय व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनायचं असेल तर तुम्हाला एल.एल.बी. या डिग्री नुसार वकील बनता येईल. एल.एल.बी.हा एक पदवीधर कोर्स आहे.

मी तुम्हाला या कोर्सची माहिती देण्याआधी या कोर्सचा इतिहास जाणून घेऊयात!!

एल.एल.बी. या डिग्री ची सुरुवात प्रथम इंग्लंडमध्ये झाली. त्यानंतर हळूहळू जपानमध्ये प्रचलीत झाली. एल.एल.बी. म्हणजे “Legum Baccalureus” हा लॅटिन भाषेतून आलेला शब्द आहे . साधारण भाषेत एल.एल.बी.ला Bachelor Of Law असे म्हणतात. कधी कधी चुकीच्या पद्धतीने म्हणजे ‘बॅचरल ऑफ लीगल लेटर्स’ असे म्हटले जाते.

18 व 19 व्या शतकाच्या सुरुवातीला बॅचलर पदवी पॅरिस विद्यापीठात आली नंतर ऑक्सफर्ड व केब्रिज येथे लागू करण्यात आली. देशात बॅरिस्टर असोसिएशनद्वारे कायद्याच्या पदव्या आवश्यक होत्या म्हणून एल.एल.बी. ही पदवी वकिलांसाठी एक समान पदवी बनली.

कास्य युग किंवा सिंधू संस्कृतीच्या काळातही नागरी कायदा प्रणाली अस्तित्वात होती. भारतामध्ये “Bar Council Of India” (BCI) ही सर्व महाविद्यालयात व युनिव्हर्सिटीत शिकवल्या जाणाऱ्या पदवी अभ्यासक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन करत असते.एल.एल.बी.पदवी ही BCI च्या निरीक्षणाखाली दिली जाते.

भारतातील पहिली कायद्याची युनिव्हर्सिटी बंगलोर मध्ये आहे.National Law School Of India University.(NLSIU) या युनिव्हर्सिटी स्थापना 1987 मध्ये केली गेली. ही भारतातील सर्वात चांगली युनिव्हर्सिटी आहे.

आता आपण एल.एल.बी. प्रवेश घेण्यासाठी कोणती पात्रता लागते हे पाहूयात!!

प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी बारावीच्या बोर्ड परीक्षेत पास होणे गरजेचे आहे व परीक्षेत किमान 45 % गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. महाराष्ट्रात एल.एल.बी. साठी MHT-CET ENTRANCE EXAM घेतली जाते. ही परीक्षा पण 150 मार्कची असून एक तासाचा पेपर असतो. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतात .

या परीक्षेचे मार्क ग्राह्य धरून कॉलेजमध्ये मिरीट लावून त्यानुसार प्रवेश दिला जातो. बारावीनंतर करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच वर्षाचा कोर्स करावा लागतो.ज्या विद्यार्थ्यांनी डिग्री पूर्ण केली असेल तर तीन वर्षाचा कोर्स असतो .विद्यार्थी पदवीधर असेल तर एल.एल.बी. कोर्स करायचा असेल तर मान्यताप्राप्त महाविद्यालयातून 45 टक्के गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. भारतामध्ये एल.एल.बी. कोर्स करण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही.

हा कोर्स करण्यासाठी साधारणतः दोन ते चार लाखापर्यंत खर्च येतो.एल.एल.बी. च्या अभ्यासात फौजदारी कायदा, कौटुंबिक कायदा, आंतरराष्ट्रीय कायदा, सायबर कायदा व कार्पोरेट कायदा यांचा अभ्यास असतो.

एल.एल.बी.या डिग्री चे प्रकार पुढीलप्रमाणे:-

  • बीबीए.-एलएलबी. :- बीबीए.एलएलबी. एक बॅचलर पदवी आहे. तिचा फुल फॉर्म बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन + बॅचलर ऑफ लॉ असा आहे . बीबीए.एलएलबी. हा वाणिज्य शाखेची संलग्न विषय आहे .या कोर्सचा कालावधी पाच वर्ष इतका असतो.बारावी झाल्यानंतर हा कोर्से करता येतो. बारावी या परीक्षेत 50 % टक्केवारी असणे आवश्यक असते. बीबीए एलएलबी ची सरासरी फी ही 35000 ते 150000 वार्षिक इतकी असू शकते. बीबीए.एलएलबी. अभ्यासक्रम पदवी अभ्यासक्रम आहे .याचा फुल फॉर्म बॅचलर ऑफ आर्टस् बॅचलर ऑफ लॉ हा आहे.

 

  • बीए.एलएलबी. :- बीए.एलएलबी. हा कला शाखेशी संलग्न असतो. बीए.एलएलबी. कोर्स चा कालावधी हा पाच वर्ष इतका असतो. मान्यताप्राप्त विद्यालयाकडून बारावीमध्ये बीए.एलएलबी. साठी पात्रता किमान 45 टक्के गुण असणे आवश्यक असते . बीए.एलएलबी. ची कोर्स सरासरी फी 150000 ते 500000 असते.

 

  • बीएससी.एलएलबी :- बीएससी.एलएलबी पदवीधर अभ्यासक्रम आहे. याचा फुल फॉर्म ‘बॅचलर ऑफ सायन्स +बॅचलर ऑफलेजिसलेटिव्ह लॉ’ असा आहे. या कोर्सचा कालावधी पाच वर्ष इतका असतो. बी.एस.सी.एल.एल.बी हा विज्ञान शाखेची संलग्न विषय आहे. या कोर्सची फी सरासरी 150000 ते 500000 असते.

 

  • एल.एल.बी चा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना नियमित क्लासेस, इंटरंशिप तसेच टिटोरियल ची कामे करणे आवश्यक असते. एल.एल.बी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही वकील म्हणून काम करू शकता.ही परीक्षा BCI द्वारे घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस दिले जाते. वकील म्हणून काम करण्यासाठी हे सर्टिफिकेट अत्यंत महत्त्वाचे आहे.

 आता आपण एलएलबी हा कोर्स केल्यानंतर आपल्याला नोकरीच्या संधी कोठे उपलब्ध होतात हे पाहुयात!!!

1 ) सरकारी वकील

आपण एलएलबी ही पदवी मिळाल्यानंतर सरकारी वकील म्हणून काम करू शकतो. सरकारला अर्ज करण्यापासून ते नियमन करण्यापर्यंत सर्व कायदेशीर बाबी तो हाताळतो. तसेच तो स्वतः खाजगी वकीली ही करू शकतो.

2 ) कायदेशीर सल्लागार

कोणत्याहि नामांकित कंपनीत कायदेशीर सल्लागार म्हणून काम करू शकतो. कंपनीच्या महत्त्वाच्या लोकांना कायदेशीर अटी व शर्ती विषयी मार्गदर्शन करणे व कंपनीला कोणत्याही कायदेशीर नुकसानीपासून वाचण्यास मदत करणे हे त्याचे काम असते.

3 ) व्याख्याता

कोणत्याही महाविद्यालयात किंवा विद्यापीठात कायद्याच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण देण्यासाठी नोकरी मिळू शकते.

4 ) कार्पोरेट वकिली

व्यवसायातील व्यवहार कार्पोरेट कायदे व नियमांचे पालन करणे ही त्याची जबाबदारी असते. संस्थेच्या किंवा कंपनीच्या कायदेशीर बाबींचे नियमन करण्याची जबाबदारी पार पाडणे. कायदेशीर अडचणी पासून कंपनीला किंवा संस्थेला दूर ठेवणे हे महत्त्वाचे काम असते. तसेच एलएलबी ही पदवी मिळाल्यानंतर आपल्याला नोकरीची उत्तम संधी तर मिळतेच परंतु समाजात एक आदर व प्रतिष्ठाही मिळते. तसेच कायद्याचा अभ्यास करून मिळवलेले ज्ञान हे आपल्याला कठीण परिस्थिती व समस्या या दोन्ही बाजूंचे विश्लेषण करण्यास सशक्त करते व खूप प्रभावशाली बनवते. सर्व समस्येतून मार्ग काढण्यासाठी मदत करते.

FAQ’s :-

एल.एल.बी चा लॉंग फॉर्म काय आहे?

एलएलबी चा लॉंग फॉर्म Bachelor Of Legislative Laws

एलएलबी या कोर्सचा कालावधी किती वर्षाचा असतो?

एलएलबी या कोर्सचा कालावधी बारावी नंतर पाच वर्ष व ग्रॅज्युएशन नंतर तीन वर्ष असा असतो.

एलएलबी ची सुरुवात कोणत्या देशात झाली?

एलएलबी ची सुरुवात इंग्लंड या देशांमध्ये प्रथम झाली.

देशातील पहिली कायद्याची युनिव्हर्सिटी कोणती आहे?

भारतातील पहिली कायद्याची यूनिवर्सिटी बेंगलोर मध्ये आहे. National Law School Of India University (NLSIU)

अँडवोकेट व बॅरिस्टर यामधील फरक काय?

भारतातील उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्याला अँडवोकेट म्हणतात तर इंग्लंडमधील बॅरिस्टर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या वकिलाला बॅरिस्टर म्हणतात.

Leave a Comment