Lion Animal Information In Marathi सिंहाला जंगलाचा राजा म्हणून ओळखले जाते. सिंहाचे शास्त्रीय नाव पॅथेरा लिओ असे असून शूर माणसाला सिंहाची उपमा दिली जाते. हा एक मांसभक्षक प्राणी आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी देखील सिंह आहे. जगभरात आपल्याला सिंहाच्या दोन प्रजाती पाहायला मिळतात. एक आशियाई आणि दुसरी म्हणजे आफ्रिकन. आशियाई सिंहांचे अस्तित्व हे पूर्वापार भारतातच राहिले असून गेल्या काही वर्षांपासून तर ते गुजरातमधील गीरपुरतेच उरले आहे. तर चला मग पाहूया सिंह या प्राण्याविषयी सविस्तर माहिती.
सिंह प्राण्याची संपूर्ण माहिती Lion Animal Information In Marathi
आशियाई सिंह एकेकाळी ग्रीसपासून मध्य भारतात मध्यप्रदेश, उत्तर भारतात बिहारपर्यंत होते. पण शिकारीमुळे ते आता फक्त गीर जंगलात आढळतात. परंतु काही संशोधक लेखकांच्या मते, सिंह हा मूळचा भारतातील नसून तो बाहेरून भारतात आणला गेला व त्यामुळेच त्यांची संख्या इतकी कमी आहे.
सिंहाची शिकार :
वाघांप्रमाणेच सिंहांची शिकार हा स्वातंत्र्यपूर्व काळात राजेमहाराजांचा छंद होता. जुनागडच्या नवाबाने मात्र विसाव्या शतकाच्या प्रारंभी सिंहांच्या शिकारींवर पूर्णतः बंदी घातली. त्याकाळी सिंहांची संख्या तेरावर आली होती, अशी एक आकडेवारी सांगितली जाते. मात्र ही संख्या नेहमीच वादग्रस्त राहिली.
काहींच्या मते, प्रत्यक्षात ती संख्या शंभराच्या आसपास होती. ते काहीही असले, तरी 1910 पर्यंतच्या काळात हे संकट ओळखले गेले. त्यापुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सिंहांनाही अस्तित्व धोक्यात आलेल्या प्रजातींच्या यादीत टाकण्यात आले आणि त्यादृष्टीने काही पावले उचलली गेली.
गुजरातेतले गीर हे सिंहांसाठी संरक्षित वनक्षेत्र जाहीर करण्यात आले. गीरमधील सिंहांना आशियाई सिंहांप्रमाणेच इंडियन लायन असेही म्हणतात. आज 2010 साली गीरमध्ये 411 सिंह आहेत. 1910 ते 2010 या काळात 398 सिंह वाढले.
सिंहाचे जीवन :
सिंह हा 150 ते 250 किलो वजनाचा असून तो सामाजिक प्राणी आहे. त्याचे अस्तित्व 10,000 वर्षांपासून आशिया आणि आफ्रिकामध्ये आढळते. सिंहाचे दोन प्रकार आता आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये आफ्रिकी सिंह आणि आशियाई सिंह हे आहेत. पूर्वी अस्तित्वात असलेले युरोपियन सिंह आणि बारबेरी सिंह हे सिंह आता नामशेष झाले आहेत.
पांढरा सिंह हा दक्षिण आफ्रिकेत पाहायला मिळतो. ते लहान झुडपांच्या सवाना या जंगलात आढळतात. सिंह कळप करुन राहतात. एक किंवा दोन पूर्ण वाढलेले नर कळपाचे पुढारी असतात. कळपात 6-30 सदस्य असतात. मादीचा विणीचा हंगाम ठराविक नसतो. परंतु गीरच्या जंगलातील माद्यांना जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या महिन्यात पिले होतात.
गर्भावधी 116 दिवसांचा असतो. मादीच्या दोन वेतांमध्ये दोन वर्षांचे अंतर असते. तिला एकावेळी दोन किंवा तीन पिले होतात. कधीकधी 5 देखील होतात. जन्म झाल्यानंतर पिलांचे मिटलेले डोळे सहा ते नऊ दिवसांपर्यंत उघडतात. त्यांच्या शरीरावर काळे ठिपके असतात. दहाव्या महिन्यानंतर हे ठिपके नाहीसे होतात.
पिले अकरा महिन्यांची झाल्यावर शिकारीत भाग घेतात. मादी पिले अडीच ते तीन वर्षांची झाल्यावर जननक्षम होतात. सिंह पाच वर्षांचा झाला म्हणजे वयात येतो. जंगलातील सिंह 15-18 वर्षे जगतो, तर पाळलेला सिंह 30 वर्षे जगतो. चितळ, हरीण, काळवीट, नीलगाय, रानडुक्कर इत्यादी प्राणी हे सिंहांचे खाद्य आहे. सिंहांना अंदाजे चार प्रयत्नांनंतर एक शिकार हाती लागते, असे म्हणतात. सिंह दिवसातील वीस तास झोपतात.
आशियाई सिंह पुनर्वसन योजना :
या योजनेनुसार कुनो पालपूर या जंगलात गीरचे काही सिंह पुनर्वासित केले जातील. पण गुजरात सरकारचा या योजनेला विरोध आहे. कुनो पालपूर येथे वाघ असल्यामुळे गुजरात सरकारने या योजनेला विरोध केला. वाघ हा प्राणी सिंहापेक्षा तगडा असतो आणि वजनदारपण असतो.
कुनो पालपूरला नेल्यावर तिथले वाघ सिंहाची शिकार करू शकतील. पण सर्वोच्च न्यायालयाने या योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे गुजरातला काही सिंह आता कुनो पालपूर या अभयारण्यास देणे भाग पडणार आहे. तरीसुद्धा गुजरात सरकारचा दावा आहे की, या निर्णयाकडे सर्वोच्च न्यालयाने पुन्हा एकदा नजर द्यावी.
सिंहाची शिकार :
सिंह शिकार करण्यासाठी जेव्हा बाहेर पडतो, तेव्हा त्याचे ओरडणे मेघ गरजेने सारखे असते. कधी कधी ही गर्जना पाच किलोमीटर पर्यंत ऐकू जाते. ते रात्री जेव्हा शिकारीला बाहेर पडतात तेव्हा पहाट होण्यापूर्वी गर्जना करतात. सिंह दिवसभर झाडाच्या छायेत विश्रांती घेतात व तिन्ही सांजेच्या सुमारास स्वीकार करण्याकरता बाहेर पडता परंतु कधी कधी ते दिवसाही शिकार करतात. त्यांची शिकार म्हणजे कोणत्याही शाकाहारी प्राण्यांना ते मारून खातात. त्यामध्ये गवा, झेब्रा त्यांच्या आवडती शिकार आहेत.
हत्ती गेंडे आणि पानघोडा यांसारख्या प्राण्यांची शिकार ते करत नाहीत. सिंह शिकार करतात तेव्हा दवा धरून आपल्या शिकारची वाट पाहत असतात.सिंहांना आठवड्यातून एकदा जरी अन्न मिळाले तरीही चालते. पुष्कळ दिवस शिकार न मिळवल्यास तेव्हा मेलेल्या जनावरांवरही आपली भूक भागवतात. तसेच वृद्ध व अशक्त सिंह मानवावरही हल्ला करतात. सिंह पाण्यात चांगली तसेच बराच वेळ राहू शकतात पाण्यातील मगर, सुसर यांचेपासून ते लांब राहतात.
सिंहासाठी राष्ट्रीय उद्याने :
बऱ्याचदा प्राणी संग्रहालयामध्ये वाघ व सिंहणी आणि सिंह व वाघीण यांच्यापासून अनुक्रमे रायगड आणि रायगड अशा संकरित संतती निर्माण होतात परंतु त्यातील नर संतती वंदे असते परंतु मादीला पिले होऊ शकतात.
तसेच दक्षिण आफ्रिकेचे क्रूगर राष्ट्रीय उद्यान, टांझिनियाचे सेरेगेटी राष्ट्रीय उद्यान, नामीबियाचे इटोश राष्ट्रीय उद्यान, युगांडाचे रूबेनझोरी राष्ट्रीय उद्यान व झिंबॉब्वेचे ह्वांगे राष्ट्रीय उद्यान इ. ठिकाणी सिंह करता संरक्षित नैसर्गिक प्रदेश राखून ठेवण्यात आले आहेत. तसेच भारतात गुजरातमधील गिरी राष्ट्रीय उद्यान हे आशियाई सिंहांची शेवटचे नैसर्गिक निवासस्थान आहे.
सिंहाच्या प्रजाती :
पांढरे सिंह :
पांढऱ्या रंगाचे सिंह हे क्रुगेरी या जातीच्या सिंहासारखे असून ही प्रजाती आता अत्यंत दुर्मिळ झाली आहे. केवळ प्राणीसंग्रहालयातच किंवा अभयारण्यामध्ये पांढऱ्या रंगाचे सिंह आढळतात. तसेच आफ्रिकेच्या टिंबवती प्रदेशातही जय सिंह आढळतात. त्यांचा रंग पांढरा असतो. पांढऱ्या रंगाचे सिंह दक्षिण आफ्रिकेतील लॉरी पार्क प्राणी संग्रहालय न्युझीलँड मधील झिओन किंग्डम आणि सायबेरिया मधील बेलग्रेड प्राणी संग्रहालय आढळतात.
इथिओपियन सिंह :
या सिंहाची प्रजातीपूर्व आफ्रिकन असून या सिंहाला ऑडिस बाबा सिंह किंवा ओबीसीनियन सिंह या नावानेही ओळखले जाते.
बार्बरी सिंह :
या सिंहाची प्रजाती उत्तर अमेरिकेमध्ये सापडते, म्हणून त्याला उत्तर आफ्रिकन सिंह म्हणून ओळखले जाते. या सिंहाच्या उपप्रजाती ह्या इजिप्त अल्जेरिया आणि मोरोक्को येथे आढळल्या होत्या पण त्या सिंहाची शिकार केल्यामुळे आता त्या जंगलातील सिंह नामशेष झाले आहेत.
मसाई सिंह :
मसाई सिंह हा एक आफ्रिकन सिंह असून पूर्व आफ्रिकन मध्ये आढळतो तसेच हा सिंह इतर प्रजातींपेक्षा कमी वक्र असून त्याचे पाय लांब असतात या सिंहाची लांबी 9.7 ft इतकी असते तर सिंह निश्चि लांबी 8.5 ft इतके असते. या सिंहाची प्रजाती टांगा युगांडा, केनिया, मोझॅम्बिक आणि टांझानिया या देशात आढळते.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.
हे सुद्धा अवश्य वाचा :-
- झेंडू फुलाची संपूर्ण माहिती
- लिली फुलाची संपूर्ण माहिती
- गुलाब फुलाची संपूर्ण माहिती
- चमेली ( जाई ) फुलाची संपूर्ण माहिती
FAQ
सिंहाच्या मादीला काय म्हणतात?
आपण वाघ किंवा सिंहाला जंगलाचा राजा म्हणतो. म्हणजे त्यांच्या माद्या अर्थात वाघीण आणि सिंहीण यांना राणीसारखे आयुष्य मिळायला हवे.
सिंह काय पितात?
सिंह त्यांचे पाणी वनस्पतींमधून मिळवू शकतात. सिंह अत्यंत अनुकूल असतात आणि कलहारी वाळवंटासारख्या अतिशय कोरड्या भागात राहू शकतात. येथे ते त्यांचे बहुतेक पाणी त्यांच्या भक्ष्यातून घेतात आणि त्साम्मा खरबूज सारख्या वनस्पतींमधून देखील पितात.
सिंह किती शक्तिशाली आहे?
ते बिबट्यांसारख्या इतर काही मोठ्या मांजरींसारखे झाडांइतके चपळ नसले तरी, सिंह धोक्यापासून वाचण्यासाठी, विश्रांती घेण्यासाठी किंवा शिकार करण्यासाठी झाडांवर चढण्यासाठी पुरेसे मजबूत आणि शक्तिशाली असतात.
सिंह किती किलो मांस खातो?
मादी सिंह बहुतेक मध्यम आकाराची शिकार (वाइल्डबीस्ट, झेब्रा इ.) पकडतात परंतु नर सामान्यतः खरोखर मोठे शिकार (म्हैस आणि जिराफ) पकडतात. एक पुरुष दिवसात 43 किलो खाऊ शकतो; मादी 25 किलोपेक्षा जास्त खाऊ शकते. परंतु त्यांचे सरासरी सेवन दररोज सुमारे 8-9 किलो असते .
सिंहीण सिंहाचे रक्षण करते का?
वाइल्डबीस्ट, झेब्रा, म्हैस, इंपाला, (आणि कधीकधी गेंडे, पाणघोडे आणि हत्ती जेव्हा अन्न कमी असते तेव्हा) सस्तन प्राण्यांपासून बनलेल्या मांसाहारी आहाराचे समाधान करण्यासाठी, नर गस्त घालत असताना माद्यांना शिकार करण्याचे काम दिले जाते आणि गर्वाच्या प्रदेशाचे संरक्षण केले जाते.
सिंह किती महिन्यांची गर्भवती असते?
मादी सिंह, सिंहीणी, साधारणपणे तीन किंवा चार वर्षांच्या वयापासून, वर्षभर शावकांना जन्म देण्यास सक्षम असतात. गर्भधारणा सुमारे 110 ते 120 दिवस टिकते. अखेरीस, जेव्हा बाळंतपणाची वेळ येते, तेव्हा सिंहीणी आपल्या कौटुंबिक अभिमानाला सोडून झुडपांच्या आश्रयस्थानात एक खाजगी गुहा किंवा गुहा शोधतात.
सिंह कोणता प्राणी खातो?
सिंहांना मानवांखेरीज इतर काही भक्षक असतात. खूप तरुण किंवा आजारी सिंह हायनास बळी पडू शकतो . शावकांवर प्रौढ नर सिंह हल्ला करून खाऊ शकतात. सिंहांना मानवाकडून सर्वाधिक धोका असतो जे त्यांची शिकार करतात आणि त्यांच्या अधिवासावर अतिक्रमण करतात.