हत्ती प्राण्याची संपूर्ण माहिती Elephant Animal Information In Marathi

Elephant Animal Information In Marathi हत्ती हा प्राणी सर्वांच्या परिचयाचा आहे. हत्तीला इंग्रजी भाषेमध्ये एलिफंट (elephant) असे म्हणतात. एलिफंट हा शब्द मूड लॅटिन भाषेतील एलिफोस या शब्दातून आलेला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचे वर्गीकरण केले असता, हत्ती हा प्राणी या उपवर्गात मोडतो. तर चला मग पाहूया हत्ती विषयी सविस्तर माहिती.

Elephant Animal Information In Marathi

हत्ती प्राण्याची संपूर्ण माहिती Elephant Animal Information In Marathi

हत्ती हा सस्तन प्राणी असून त्याला कळपाने जंगलात राहणे आवडते. इतर प्राण्यांच्या तुलनेने हत्ती हा खूपच मोठा प्राणी आहे. हत्तीच्या प्रमुख तीन प्रजाती आहेत. आफ्रिकन जंगलातील हत्ती आफ्रिकन झुडपातील हत्ती आणि आशियाई हत्ती या मधील काही हत्तींच्या प्रजाती ह्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यांची शिकार ही केवळ हस्तीदंतासाठी केली जाते. त्यावर सरकारने निर्बंध आणले.

हत्तीची रचना :

मुख्यतः हत्तीच्या शरीराची घडण आपणा सर्वांना माहीतच आहे. हत्तीच्या डोक्याच्या कवटीमध्ये हवेची पोकळी असते यामुळे त्याच्या
डोक्याला लवचिकता आलेली असते. हत्तीचे कान हे सुपासारखे असून यामध्ये असंख्य रक्तवाहिन्या पसरलेल्या असतात. या रक्तवाहिन्यांमधून अनावश्यक उष्णताही वातावरणात फेकली जाते. त्यामुळे हत्तीच्या शरीराचे तापमान नियंत्रित होण्यास मदत होते. हत्तीचे कान हे अगदी कमी वारंवारतेची ध्वनी ऐकू शकतात.

सोंड :

हत्तीचे नाक म्हणजे त्याची सोंड. सोंड हे त्याची नाक आणि वरचे ओठ याचे एकत्रीकरण असते. हत्तीच्या सोंडेमुळे हत्ती हा सर्वात वेगळा प्राणी बनला आहे. तसेच त्याच्यामध्ये एकही हाडं नसून अगदी कमी प्रमाणात मेद आहे. हत्तीची सोंड डोक्याच्या कवटीला जोडली गेलेली पहावयास मिळते. हत्तीची सोंड ही घनेंद्रिय असून त्याचा उपयोग श्वास घेण्यासाठी, स्पर्श करण्यासाठी व कोणत्याही गोष्टीचे आकलन करण्यासाठी तसेच आवाज निर्माण करण्यासाठी केला जातो.

हत्ती आपल्या सोंडेने कोणतेही जड वस्तू उचलू शकतो. त्यामध्ये जोरदार पकड करण्याची ताकद असते तसेच पिळणे किंवा गुंडाळण्याची देखील त्यामध्ये क्षमता असते. हत्तीला 26 दात व त्याचे दोन हस्तिदंत सूळ्यासारखे बाहेर दिसून येतात.

हत्तीची त्वचा :

हत्तीचा रंग राखाडी असून तो खूप टणक असतो. त्याची त्वचेची जाडी 2.5 सेंटीमीटर असते तसेच हत्तीच्या पिल्लांचे केस व लालसर असून त्यांचे डोके आणि पाठीवर केस असतात. मोठ्या हत्तीचे केस गडद रंगाचे असून नंतर कमी-कमी होत जातात. आशियाई हत्तींची त्वचा ही मोठ्या प्रमाणात केसांनी भरलेली असते. या केसांचा उपयोग शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी केला जातो.

आपण बऱ्याचदा पाहिले आहे की, हत्ती हे चिखलांमध्ये लोळतात कारण त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रणात राहते.
हत्ती चिखलात लोळून आपले सूर्याच्या अतिनील किरणापासून संरक्षण करतात. हत्तींसाठी चिखल खूप महत्त्वाचा असतो. चिखलात त्यांनी स्नान केले नाही तर त्यांची त्वचा खूप मोठ्या प्रमाणात खराब होऊ शकते. त्वचा जळणे, कीटकांपासून होणारा त्रास आणि आद्रता यांची कमतरता त्यांना जाणवू शकते.

हत्तीचे महत्त्व :

हत्तीचे महत्त्व आपल्याला प्राचीन काळापासूनच दिसते. भारतीय संस्कृतीमध्ये हत्तीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. हत्तीविषयी भारतीय धार्मिक ग्रंथांमध्ये देखील बरीच अनेक आख्याने लिहिले आहेत. कारण हत्तीचा प्राचीन काळापासून धर्म आणि संस्कृतीशी खूप जवळचा संबंध आहे. त्याला प्रेमाने गज असेही म्हटले जाते. आपला समाज हत्तीला समृद्धीचे प्रतीक म्हणून ओळखतो. महाभारतातही हत्तीला युद्धात स्थान होते. आपली धार्मिक संस्कृतीत हत्तीला खूप महत्त्व देते.

हत्ती व मानव संबंध :

हत्ती मानवाच्या बहुउपयोगी पडणारा प्राणी असून तो पाळीवही करता येतो. हत्तीला कामगार प्राणी देखील म्हटले जाते कारण हत्ती हा माणसाच्या बऱ्याच कामांमध्ये मदत करतो. हत्ती त्याच्या कामांमध्ये लाकूड उचलणे, व दुसऱ्या जागी ठेवणे रस्त्यांमधून किंवा पाण्यात अवजड वस्तूंची वाहतूक करणे, राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांना पाठीवर बसवून फिरवणे, धार्मिक कार्यक्रमांमध्ये पालखी सोहळ्यांमध्ये हत्तीचा उपयोग केला जातो बरीच कामे हत्तींकडून केली जातात. म्हणूनच हत्तीची गणना ही बुद्धिमान प्राण्यांमध्ये केली जाते.

हत्तीचे संरक्षण उपक्रम :

हत्ती हा देखील पर्यावरणाचा एक घटक आहे त्यामुळे हत्तीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. हत्तीची घटत चाललेली संख्या 1979 मध्ये 1.3 दशलक्ष एवढी होती. परंतु 1989 पर्यंत ती 74 टक्क्यांनी घटत गेली व 2000 मध्ये आशिया खंडात 13,000 ते 16,500 कामासाठी वापरण्यात आले होते.

भारतामध्ये कामगार हत्तींची संख्या ही संशयितरित्या फक्त मोठ्या प्रमाणात त्रास देण्यासाठी पकडले जायचे असे सरकारच्या निदर्शनास आले. नंतर प्राणीकृता प्रतिबंध कायदा 1960 च्या अंतर्गत हत्तींना संरक्षण देण्यात आले. भारत सरकार किंवा कोणत्याही देशाचे सरकार प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी निरनिराळे कायदे बनवत आहे. त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाने ही कोणत्याही प्राण्याची क्रूरतेने शिकार किंवा त्यांना त्रास देऊ नये.

हत्तीच्या प्रजाती :

हत्तीच्या प्रजातींमध्ये मुख्यतः हत्तीच्या तीन प्रजाती आढळून येतात त्याची माहिती आपण खालील प्रमाणे पाहूया.

आफ्रिकन हत्ती :

हे हत्ती आशियाई हत्तींपेक्षा वेगळे आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे कान मोठे असून आफ्रिकन हत्ती आशियाई हत्तींपेक्षा मोठे असतात आफ्रिकन हत्येच्या त्वचेवर नर आणि मादी या दोन्हींमध्ये हस्तिदंत दात आणि केस कमी असतात. या हत्तीचे नाव जॅर्जेस क्युव्हीयर यांनी 1825 मध्ये ठेवले होते.

आशियाई हत्ती :

आशियाई हत्ती हा आशिया खंडातील जमिनीतील सर्वात मोठा प्राणी असून राष्ट्रीय उद्यान मध्ये पर्यटक आणि राइड्सची वाहतूक करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. त्यांचे डोके त्यांच्या शरीराचा सर्वोच्च भाग असतो. त्यांची पाठ उंच किंवा सपाट असते. त्यांचे कानही अफ्रिकन हत्तीपेक्षा लहान असतात. त्यांच्या शेपटीत वीस जोड्या आणि चौतीस हाडे असतात. आशियाई हत्तीच्या इतर तीन उपप्रजाती म्हणजे सुमात्रन हत्ती, श्रीलंकन हत्ती आणि बोनिर्यो हत्ती ह्या आहे.

भारतीय हत्ती :

भारतीय हत्ती हा आशियाई हत्तीच्या चार उपजातींपैकी एक प्रजात असून ही उपप्रजाती व्हिएतनाम, थायलंड, नेपाळ, म्यानमार, मलेशिया, चीन, कंबोडिया, भूतान, लाओस, पाकिस्तान, बांगलादेश येथे आढळते. तसेच भारतीय हत्ती झाडाझुडपांच्या जंगलात राहत असून इतरत्र सर्वत्र आढळतो. ते भटक्या स्वभावाचे असून जास्तीत जास्त एका ठिकाणी राहू शकत नाही.

हत्तीची जीवनशैली :

हत्ती हा स्वतः शांत आणि संतप्त स्वभावाचा प्राणी आहे. नर हा हत्ती एकटे राहणे पसंत करतो तर मादी हत्ती कळपात राहणे पसंत करते. मादी हत्ती तिच्या पिल्लांना जन्म देते आणि दूध पाजते. हत्ती मादीचा गर्भधारणेचा काळ 22 महिन्याचा असतो.

हत्ती हा शाकाहारी प्राणी असून त्याचा मुख्य आहार केळी, ऊस, झाडांच्या फांद्या, हिरवे गवत इत्यादी आहे त्याचे जीवनमान दीर्घ असून 100 वर्षापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त काळ ते जगू शकतात. परंतु आजच्या काळात त्याचे वय आपोआप कमी होत आहे लोक हत्तीची शिकार करतात तर वेडा म्हणून त्यावर नियंत्रण करण्याचे उपाय शोधतात. यामध्ये बरेच हत्ती मृत्युमुखी पडतात.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

हत्ती काय खातो?

आफ्रिकी हत्ती मुख्यत्वे कोवळ्या फांद्या, झाडाची पाने व मुळ्या खातात ते क्वचितच गवत खातात.

हत्तीच्या पिल्लाचे नाव काय?

हत्तीच्या पिल्लाला इंग्रजी मध्ये baby elephant (बेबी एलिफेंट) असे म्हणतात. हत्तीचे पिल्लू हे अतिशय प्रेमळ पिल्लू साधारण आकाराने मोठे असते.

हत्तीचे आवडते फळ कोणते?

जॅकफ्रूट ... हत्तीचे आवडते फळ! दुर्दैवाने ते खूप महाग आहे, त्यामुळे राष्ट्रीय हत्ती दिनाप्रमाणेच त्यांना फक्त एकदाच मिळणारी ट्रीट आहे.

हत्ती कसा झोपतो?

आफ्रिकन आणि आशियाई हत्ती अजूनही झोपायला व्यवस्थापित करतात, दोघेही बराच वेळ त्यांच्या बाजूला झोपलेले असतात किंवा उभे असताना झोप घेतात, आधारासाठी झाडाला झुकतात . हत्तींना डोळ्यांच्या जलद हालचाली (REM) झोपेचा अनुभव घेताना दिसला, REM स्लीप आठवणी तयार करण्यात महत्त्वपूर्ण असल्याचे मानले जाते.

हत्ती शाकाहारी आहेत का?

अन्न. हत्ती शाकाहारी आहेत , याचा अर्थ ते फक्त वनस्पतींचे पदार्थ खातात. आफ्रिकन हत्ती गवत, झाडाची साल, डहाळ्या, मुळे, पाने, फळे आणि भाज्या यासह वनस्पतींचे विविध साहित्य खातात.

हत्ती किती तास झोपतो?

दहा हजार वर्षांपूर्वी हत्तींच्या ११ जाती जगभरात होत्या. आजमितीस केवळ तीन जाती शिल्लक आहेत. हत्ती २४ तासांत केवळ चार तास झोपतो.

Leave a Comment