कोयना अभयारण्याची संपूर्ण माहिती Koyna Sanctuary Information In Marathi

Koyna Sanctuary Information In Marathi महाराष्ट्रात राज्यात अनेक अभयारण्य आपल्याला बघायला मिळतील त्यातील कोयना जलाशयाच्या काटावर पसरलेले कोयना हे अभयारण्य विविध जैवविविधता साठी महत्त्वाचे मानले जाते. आज आपण कोयना अभयारण्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग बघुयात कोयना अभयारण्य माहिती.

Koyna Sanctuary Information In Marathi

कोयना अभयारण्याची संपूर्ण माहिती Koyna Sanctuary Information In Marathi

आपल्याला माहितीच आहे की, कोयना हे अभयारण्य कोयना जलाशयाच्या कडेकडेने पसरलेले आहे. कोयना नगर हे महाबळेश्वरच्या जवळ असलेल्या तापोळा ६० ते ७० किलो मीटरच्या अंतरापर्यंत कोयना नदीच्या कडेकडेने हे जंगल पसरलेले आहे. कोयना अभयारण्याचे प्रामुख्याने मुख्य तीन भाग पडतात. ते म्हणजे महारखोरे, वासोटा व मेट इंदवली.

या अभयारण्या मध्ये इंदवाळी, कुसावळी, सिंधी, मोरवी अशा अनेक गावांच्या परिसरातील वनक्षेत्रांचा समावेश होतो. तसेच आणखी भर म्हणजे शिवनगर तलावाची नैसर्गिक तटबंदी सुद्धा या अभयारण्याला लाभली आहे. कोयना हे अभयारण्य महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण अभयारण्य समजले जाते. मुख्यतः हे अभयारण्य सातारा जिल्ह्यात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घनदाट अरण्याचा समावेश याच अभयारण्यात होतो.

महाराष्ट्राच्या इतिहासात हे जंगल जावळीचे खोरे म्हणून ओळखले जात होते. कोयना अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ हे ४२६ चौ. किलो मीटर आहे. कोयना अरण्याला 1985 मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळाला. कोयना अभयारण्याच्या पश्चिमेकडे सह्याद्री पर्वताची मुख्य रांग आहे व दुसऱ्या बाजूला सह्याद्री पर्वताची उपरांग आहे. व या रांगेच्या मध्यभागातून कोयना नदी वाहते.

कोयना अभयारण्यातील सर्वोच्च ठिकाण म्हणजे वासोटा किल्ला आहे. आणि याची उंची ११०० मीटर येवढी आहे. कोयना अभयारण्याच्या परिसरात जून ते सप्टेंबर महिन्यात सरासरी ५००० मी.मी. इतका पाऊस पडतो. कोयना अभयारण्याला व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्य सरकार आजही प्रयत्न करत आहे.

कोयना अभयारण्यातील जंगलांचा प्रकार :-

कोयना अभयारण्यातील जंगलाचा समावेश प्रामुख्याने दमट विषुववृत्तीय सदाहरित जंगलात होतो. कोयना जंगला सारखे जंगल महाराष्ट्रात फक्त महाबळेश्वर येथेच आढळते. या अभयारण्यात जंगलतोड कमी असल्याने महाराष्ट्र इतरत्र आढळणारी झाडे वनस्पती या जंगलात बघायला मिळतील.

कोयना अभयारण्यातील जैवविविधता : –

महाराष्ट्रातील प्रमुख अभयारण्यातील एक कोयना अभयारण्य आहे. व हे जैवविविधतेने आणि विविध प्राण्यांनी भरलेले आहे. कोयना अभयारण्यात वृक्षतोड कमी असल्याने इथे विविध जातीची व गुणधर्माची वनस्पती आढळतात. मध्यम उंचीच्या वनस्पती म्हणजे कारवी वाकटी येथे आढळतात. नेच्या सारख्या वनस्पती व गवता सारख्या वनस्पती असे एकाच जागी ४ वनस्पतींनी कोयना हे अभयारण्य घनदाट बनलेले आहे.

तसेच विविध प्रकारच्या लहान, मोठ्या आणि वेलींनी या अभयारण्याचा परिसर व्यापला आहे. अंजनी, जांभूळ, हिरडा, आवळा, आंबा, भोमा, काटक, उंबर, जांभा, गारंबी, करवंदे, कडुलिंब, तोर यांसारख्या वनस्पती येथे आढळतात. व काही औषधी वनस्पती सुद्धा येथे आढळतात.

कोयना अभयारण्यातील प्राणी जीवन :-

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक प्राणीजीवन कोयना अभयारण्यात आढळते. कोयना अभयारण्य हे अतिशय घनदाट असल्याने विविध प्राण्यांचे ते निवासस्थान झाले आहे. हरिणांमधील सांबर, भेकर आणि पिसोरी या जाती आढळतात. तर इतर प्राण्यांमध्ये माकड, वानर, तरस, कोल्हा, लांडगा, ऊदमांजरे, साळींदर हे प्राणी आढळतात. रात्रीच्या वेळेस या अभयारण्यात रानससे राहण्यास असे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. तर काही वेळा इथे अस्वल सुद्धा बघायला मिळते. बिबट्याचे दर्शन सुद्धा कधी- कधी येथे बघायला मिळतात.

भीमाशंकर मध्ये आढळणाऱ्या शेकरू प्राणी येथे आढळतो. त्याला येथे राक्षसी खार म्हणून ओळखले जाते. तसेच पक्षांमधील स्वर्गीय नर्तक, धनेश व इतर पक्षी सुद्धा आढळतात.

सापांच्या अनेक प्रजाती येथे आढळतात. त्यात नाग, फुरसे, घोणस आणि मण्यार या विषारी जातींचे साप येथे आढळतात. तसेच चापडा ज्याला इंग्रजीमध्ये बांबू पीट वाइपर असे म्हणतात. तो ही कोयनाच्या अभयारण्यात आढळतो. आणि विनविषारी सापांमध्ये अजगर, धामण तसेच सुमारे 56 प्रकारच्या विविध सापांच्या जाती येथे आढळतात.

कोयना अभयारण्यात जाण्याचा मार्ग :-

सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले एक ठिकाण कोयना अभयारण्य आहे. या अभयारण्यात जाण्यासाठी पुण्याहून महाबळेश्वर जावे. व तिथला सर्व परिसराचा अनुभव घ्यावा व मग महाबळेश्वर पासून ए.स. टी.ने. तापोळ येथे जावे व तेथून शिवसागर पार करून सरळ इंदवली या गावास जावे. या ठिकाणा पासून आपल्याला कोयना अभयारण्याचा परिसर अनुभवता येईल. तसेच, आपल्याला पुणे- सातारा असाही प्रवास करता येतो.

साताऱ्याहून कास बामणोली या गावाला जाऊन बामणोली पासून शिवसागर पार करून थेट इंदवलीस जाता येते. या ठिकाणा पासून आपल्याला कोयना अभयारण्यातील ठीकठिकाणाचा निसर्ग व प्राणी पक्षी बघायला मिळतील.

कोयना अभयारण्यातील ट्रेकिंग व पर्यटन :-

कोयना अभयारण्यात अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत व या जंगलाचा अनुभव घ्यायला तसेच ट्रेकिंग करायला येथे दरवर्षी अनेक हौशी ट्रेकर्स आणि पर्यटक मोठ्या संख्येने येतात. काही जण नुसतेच कोयना नदीच्या जलाशयाच्या कडे कडेने वन्य जीवांच्या शोधात शोधत ट्रेकिंग करतात.
कोयना अभयारण्यातील ट्रेकिंग करण्याजोगे किल्ले :
१. वासोटा
२. जंगली जयगड
३. मधुमकरंदगड
४. भैरवगड
या चार किल्ल्यांना पाहण्यासाठी आणि पर्यटना साठी अनेक पर्यटन येथे येतात. सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्य हे पर्यटकांसाठी महत्त्वाचे ठिकाण ठरत आहे.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

कोयना वन्यजीव अभयारण्यात कोणता प्राणी प्रसिद्ध आहे?

वजंतू. अभयारण्यात कीस्टोन प्रजाती, बंगाल वाघ (>6) यासह विविध प्रकारचे सस्तन प्राणी आहेत. तसेच, भारतीय बिबट्या (14), भारतीय गौर (220-250), आळशी अस्वल (70-80), सांबर हरण (160-175), बार्किंग डीअर (180-200) आणि उंदीर हरीण, राखाडी लंगूर, गुळगुळीत-कोटेड ओटर्स आणि भारतीय महाकाय गिलहरी सामान्य आहेत.

कोयना वन्यजीव अभयारण्यात कधी जावे?

पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) जेव्हा अभयारण्य हिरवेगार असते किंवा हिवाळ्याच्या महिन्यांत (ऑक्टोबर ते फेब्रुवारी) हवामान आल्हाददायक असते .


कोयनेत वाघ आहेत का?

बंगाल टायगर 

1 thought on “कोयना अभयारण्याची संपूर्ण माहिती Koyna Sanctuary Information In Marathi”

Leave a Comment