आय.टी.आय कोर्सची संपूर्ण माहिती ITI Course Information In Marathi

ITI Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो, दहावी व बारावी झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या करिअरचे मार्ग शोधत असतो व त्याबद्दल योग्य माहिती मिळवत असतो. प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते की आपण एखाद्या चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यावे व चांगली नोकरी मिळवून आपले भविष्य उज्वल करावे किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करावा.

Iti Course Information In Marathi

आय.टी.आय कोर्सची संपूर्ण माहिती ITI Course Information In Marathi

पण कोणताही कोर्स करण्यापूर्वी त्याबद्दल योग्य माहिती असणे आवश्यक असते. कारण का ही एक प्रकारची जोखीम असते. कारण या निर्णयावरच आपले पुढचे भविष्य अवलंबून असते. म्हणून विद्यार्थी आपल्याला कोणता कोर्स योग्य आहे याची शहानिशा करण्यासाठी आपले मित्रमंडळी व नातेवाईक तसेच घरातल्या सर्व लोकांची मते विचारात घेत असतो .

कारण का कोणत्याही कोर्सला ऍडमिशन घेताना तो कोर्स कसा आहे?त्याची फीज किती? तो कोर्स केल्यानंतर आपल्याला नोकरीच्या संधी कोठे कोठे उपलब्ध होतील? याचा विचार सर्वप्रथम केला जातो. हा कोर्स प्रथमतः आपल्याला आर्थिक दृष्टीने परवडणारा आहे का ही सगळ्यात महत्त्वाची बाब असते. चला तर मग आज मी तुम्हाला अशाच एका कोर्सची माहिती सांगणार आहे .तो कोर्स म्हणजे आयटीआय कोर्स !!!!

ज्या विद्यार्थ्यांना कमी कालावधीत व्यवसायिक तांत्रिक अभ्यासक्रम करायचा आहे. त्यांच्यासाठी आयटीआय हा एक उत्तम अभ्यासक्रम आहे. हा एक चांगला नोकरीभिमुख तांत्रिक अभ्यासक्रम आहे.

हा कोर्स केल्यामुळे आपल्याला वेळही कमी लागतो व खर्चही कमी लागतो .या दोन्ही बाबी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. चला तर मग आयटीआय कोर्स म्हणजे काय? आयटीआय कोर्स ची पात्रता निकष काय आहे? त्याची फीज किती व हा कोर्स केल्यानंतर आपल्याला नोकरीच्या संधी कोठे कोठे उपलब्ध होतील? या सर्व तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मी आज तुम्हाला या पोस्टमध्ये देणार आहे.या माहितीचा उपयोग आपल्याला बारावीनंतर करिअरच्या संधी निवडताना नक्कीच होईल.

आयटीआय चा लॉन्ग फॉर्म हा ‘इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ असा आहे .याला मराठीत औद्योगिक प्रशिक्षण संस्था असेही म्हणतात. वाढत्या इंडस्ट्रीच्या गरजा लक्षात घेऊन राज्य सरकारने या कोर्सची सुरुवात केली .आयटीआय हा एक औद्योगिक प्रशिक्षण देणारा कोर्स आहे .ही शासनाची एक मान्यताप्राप्त संस्था आहे .

जी विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात असलेल्या विविध तांत्रिक व विना तांत्रिक विषयांचा संबंधित ज्ञान प्राप्त करून देतात. या कोर्समध्ये पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहारिक ज्ञान याला जास्त महत्त्व असते. म्हणजे याच्यात प्रॅक्टिकल ज्ञान जास्त शिकवले जाते. आयटीआय कोर्स शिकवण्यासाठी महाराष्ट्रात अनेक सरकारी व खासगी प्रशिक्षण कॉलेज आहेत . आज देशभरात 13,353 आयटीआय कॉलेज आहेत. त्यापैकी 11000 खाजगी आयटीआय कॉलेज आहेत.

महाराष्ट्रात वाढत्या औद्योगिक क्षेत्रा मुळे आयटीआय या कोर्सला खूप महत्त्व प्राप्त झाले असून तो खूप लोकप्रिय झाला आहे. विद्यार्थी हा कोर्स करून फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, वायरमेन अशी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आयटीआय या कोर्सचा मुख्य उद्देश हा कुशल कार्यशीलता विकसित करणे हा आहे. आयटीआय या कोर्सला शॉर्ट टर्म जॉब ओरिएंटेड कोर्स असे म्हणू शकतो कारण या कोर्समुळे कमी वेळात विद्यार्थ्याला योग्य ते प्रशिक्षण देऊन लवकरात लवकर नोकरी मिळू शकते.

इंजिनिअरिंग मध्ये जसे जसे वेगवेगळे बॅचेस असतात. त्याचप्रमाणे आयटीआय मध्ये सुद्धा अनेक ट्रेड असतात. प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार हा ट्रेड निवडू शकतो .आयटीआय कोर्सचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे टेकनिकल कोर्स याला आपण इंजिनिअरिंग कोर्स असे म्हणतो. व दूसरा म्हणजे नॉन टेक्निकल कोर्स याला आपण नॉन इंजिनिअरिंग कोर्स म्हणतो.

इंजिनिअरिंग कोर्स

यामध्ये गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाशी संबंधित ट्रेड असतात. ज्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान ,संगणक अशा विषयांमध्ये आवड आहे असे विद्यार्थी हा ट्रेड निवडतात. कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेन्टेनन्स, डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर ,इन्फोर्मेशन ऍन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेंटेनन्स हे इंजीनियरिंग कोर्से ची उदाहरणे आहेत.

नॉन इंजीनियरिंग कोर्स

या कोर्समध्ये सर्व नॉन तांत्रिक ट्रेड असतात. यामध्ये तांत्रिक विषय नसतात. त्यामुळे या कोर्सला नॉन टेक्निकल कोर्स असे म्हणतात. ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक आणि वैज्ञानिक व गणिती या विषयात आवड नाही ते हा कोर्स निवडतात .कारपेंटर ,पेंटर, ड्रेस मेकिंग ,बुक बाइंडर हे नॉन इंजीनियरिंग ची उदाहरणे आहेत.

आयटीआय या कोर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स असतात. त्या कोर्स नुसार कालावधी हा वेगवेगळा असतो. हा कालावधी सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत असू शकतो.

फिटर, इलेक्ट्रिशियन ,वायरमन ,मशीन टूल मेंटेनन्स ,पेंट टेक्नॉलॉजी, सिव्हिल या कोर्सचा कालावधी दोन वर्षांचा असतो. तर प्लंबर, वेल्डर, मेकॅनिक डिझेल, संगणक ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅमिंग सहाय्यक या कोर्सचा कालावधी एक वर्षाचा असतो. इंजिनिअरिंग मध्ये जसा कालावधी चार वर्षांचा असतो. तसे आयटीआय या कोर्समध्ये आपण जो कोर्स निवडू त्यावर तो कालावधी ठरलेला असतो.

आयटीआय या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी दहावी व बारावी उत्तीर्ण असावा .किमान मार्कांची कोणतीही अट नसते. बारावीत नापास झालेला विद्यार्थी सुद्धा आयटीआयला प्रवेश घेऊ शकतो परंतु प्रवेश घेताना दहावीच्या मार्क्स वर घ्यावा लागतो. या कोर्सला वयाची अट असते.

विद्यार्थ्यांचे वय कमीत कमी 14 वर्ष इतके व त्या पेक्षा जास्त असणे आवश्यक आवश्यक आहे. तसेच चाळीस वर्षाच्या आत असायला हवे. बारावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आयटीआय कोर्स ची प्रवेश प्रक्रिया सुरू होते. आयटीआय कोर्स ची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होते.

DVET (Directorate of Vocational Education and Training) या ऑफिशिअल वेबसाईट वर फॉर्म सुटतात. आयटीआय ची प्रवेश प्रक्रिया DVET यांच्यामार्फत राबवली जाते. तुम्हाला फॉर्म भरून रजिस्ट्रेशन फी भरावी लागते. ऍडमिशन फॉर्म मध्ये आयटीआय कॉलेज व त्यामध्ये उपलब्ध असलेले कोर्स असतात. विद्यार्थी आपल्या सोयीनुसार कॉलेज व कोर्स निवडू शकतो. मिरीट लिस्ट लागण्याचे तीन राऊंड असतात.

फॉर्म भरल्यानंतर पहिल्या राउंडला मेरिट लिस्ट जाहीर होते व तुम्हाला एसएम एस द्वारे कळवले जाते. परंतु तुम्हाला वेबसाईट तपासत राहणे गरजेचे आहे .जर तुमचे नाव मेरिट लिस्ट मध्ये आले तर तुम्ही कॉलेजला जाऊन ती भरून तुमच्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करू शकता. जर पहिल्या राउंडला तुम्हाला हवे ते कॉलेज मिळाले नाही तर तुम्ही दुसऱ्या व तिसऱ्या राउंडाची ही प्रतीक्षा करू शकता.

आयटीआय कॉलेज सरकारी व खाजगी कॉलेजची फी ही वेगवेगळी असते आयटी कोर्स फी इंजिनिअरिंगच्या कोर्स पेक्षा कमी असते. सरकारी कॉलेजमध्ये एक वर्ष 2000 ते 9000 ते 50000 हजार असू शकते कधी शासकीय कॉलेजात कास्ट नुसार फीमध्ये सवलत मिळते तर कधी कधी फी माफ पण होते. आयटीआय चे शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण नोकरी करू शकतो. सरकारी नोकरी पण मिळते तसेच खाजगी कंपनी सुद्धा काम करू शकतो.

नोकरीसाठी आपण टेक्निकल सेक्टर किंवा नॉन टेक्निकल सेक्टर देखील मध्ये देखील जॉब मिळवू शकतो. एम.आय.डी.सी. मध्ये आयटीआय केलेल्या उमेदवारांची जास्त मागणी असते व तेथे नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. आपण वेल्डर व इलेक्ट्रिशियन म्हणून स्वतःचे दुकान सुरू करू शकतो व स्वतःचा व्यवसाय करू शकतो. तसेच आपण इंजिनिअरिंग व डिप्लोमा या सारख्या पुढील अभ्यासक्रम घेऊ शकतो.

फिटर-

फिटर हा कोर्स दोन वर्षाचा असतो. यामध्ये तुम्हाला फिटिंग विषयी संबंधित शिक्षण दिले जाते. या कोर्स या कोर्ससाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमात मशीन्स व वेल्डिंग ची माहिती दिले जाते.

वायरमन एलेक्ट्रिशियन-

2 वर्षाचा कोर्समध्ये विद्यार्थ्यांना 20 ट्रान्सफॉर्मर मोटार इत्यादी संबंधित संपूर्ण माहिती व त्याबाबत शिक्षण दिले जाते. या कोर्ससाठी दहावी पास असणे आवश्यक आहे. या कोर्समुळे तुम्हाला महावितरण कंपनीत किंवा इतर कंपन्यांमध्ये काम मिळते.

वेल्डर-

एक ते दोन वर्षाचा कोर्स असतो तुम्हाला या कॉलेजमधून वेल्डिंग बद्दल सर्व माहिती विद्यार्थ्यांना वेल्डिंग मशीन व तिचे प्रशिक्षण दिले जाते.

प्लम्बर-

प्लम्बर हा दोन वर्षाचा कोर्स आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना पाईप व पाईपलाईन से संबंधित माहिती व शिक्षण दिले जाते. दहावी पास असणे या कोर्ससाठी अनिवार्य आहे.

सी.ओ.पी.ए (कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट)-

एक वर्षाचा कोर्स असून या कोर्ससाठी दहावी पास असणे अगदी गरजेचे आहे. ह्या कोर्स मध्ये आपल्याला कम्प्युटर ऑपरेटिंग चे ज्ञान मिळते कम्प्युटर ऑपरेटर जॉब मध्ये कम्प्युटर हार्डवेअर, सॉफ्टवेअर, सी-प्रोग्रामिंग शिकवतात.

वायरमेन-

वायरमेन या कोर्स मध्ये विद्युत घटकांबद्दल शिकवले जाते विद्युत घटकांचे मेंटेनन्स व रिपेरिंग याचे शिक्षण दिले जाते.

डिसेल मेकॅनिक-

डिसेल मेकॅनिक  हा एक वर्षाचा कोर्स असून, या कोर्ससाठी दहावी पास असणे अनिवार्य आहे. या कोर्समध्ये डिजिटल इंजीनियरिंग व ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करणे किंवा बदलणे वाहनांची स्थिती तपासणे हे सगळे शिकवले जाते.

मेकॅनिक-

मोटर वेहिकल 2 वर्षाचा कोर्स असून, या कोर्ससाठी देखील दहावी पास असणे अगदी अनिवार्य आहे. या कोर्समध्ये वाहनाचे खराब झाले भाग व यंत्रणा दुरुस्त करण्याचे शिक्षण दिले जाते.

FAQ’s :-

आयटीआय चा लॉंग फॉर्म काय आहे?

'इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट'असा आहे.

आयटीआय म्हणजे काय?

आयटीआय ही शासनाची मान्यता प्राप्त एक औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. जी विद्यार्थ्यांना तांत्रिक व विना तांत्रिक विषयांचा संबंधित ज्ञान प्राप्त करून देते.

आयटीआय कोर्सचा कालावधी किती असतो?

आयआयटीमध्ये वेगळे कोर्स असतात त्या कोर्स नुसार कालावधी ठरलेला असतो. काही कोर्स एक वर्षाचे असतात. तर काही कोर्स दोन वर्षाचे असतात.

आयटीआय मध्ये कोणते कोणते कोर्स असतात?

आयटीआय मध्ये इलेक्ट्रिशियन, वेल्डर ,वायरमेन, मशीन टूल मेंटेनन्स, पेंट टेक्नॉलॉजी, सिव्हिल, प्लंबर, बिल्डर्स मेकॅनिक डिझेल ,संगणक ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅमिंग सहाय्यक इत्यादी अनेक प्रकारचे कोर्स असतात.

आयटीआय ची प्रवेश प्रक्रिया कशी असते?

आयटीआय ची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन असते. DVET या ऑफिशियल वेबसाइट यांच्यामार्फत ती राबवली जाते.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment