मनाला शांती देणारे भगवान गौतम बुद्धांचे महान विचार Gautam Buddha Quotes In Marathi

Gautam Buddha Quotes In Marathi जगातील धर्मसुधारक आणि विचारवंतांमध्ये सामील असलेले महात्मा बुद्ध हे बौद्ध धर्माचे प्रचारक होते. भगवान बुद्धांनी संपूर्ण जगाला ज्ञान, विवेक आणि सत्याचा मार्ग दाखवला. आज चीन, भारत, जपान आणि श्रीलंका समवेत दहापेक्षा जास्त देशांमध्ये भगवान बुद्धांची पूजा केली जाते. येवढेच नव्हे तर बौद्ध धर्माचे अनुयायी भगवान बुद्धांची शिकवण जगभरात पोचवण्यासाठी कार्य करीत आहेत.

Gautam Buddha Quotes In Marathi

भगवान गौतम बुद्धांचे महान विचार Gautam Buddha Quotes In Marathi

आजच्या या लेखात आपण भगवान बुद्धांचे काही अनमोल सुविचार पाहणार आहोत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या ह्या प्रेरणादायी सुविचारांमधून आपणास खूप काही शिकण्यास मिळेल.

मन शांत केल्यावर सर्व समस्यांचे समाधान सापडते.

Gautam Buddha Quotes In Marathi

 

ज्याने आपल्या मनाला नियंत्रणात केले, त्याच्या विजयाला परमेश्वर देखील अपयशात बदलू शकत नाही.

 

सर्व वाईट कार्य मनामुळेच होतात. जर मन परिवर्तित झाले तर वाईट कार्य देखील थांबतील.

 

एक निष्ठाहिन आणि वाईट मित्र जंगली प्राण्यापेक्षा जास्त भयानक असतो; कारण एक जंगली प्राणी फक्त शरीराला घाव देतो परंतु एक वाईट मित्र तुमच्या मनाला आणि बुद्धीला घाव घालतो.

Gautam Buddha Quotes In Marathi

 

चातुर्याने जगणार्‍या लोकांना मृत्यूलाही घाबरण्याची आवश्यकता नाही.

 

द्वेष हा द्वेष केल्याने कमी होत नाही, परंतु प्रेम केल्याने नक्कीच कमी होतो. आणि हेच शाश्वत सत्य आहे.

 

ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी पेक्षा अधिक महत्त्वपूर्ण प्रवास व्यवस्थित करणे आहे.

 

तुम्हास आपल्या क्रोधासाठी दंड मिळणार नाही तर तुमचा क्रोधच तुम्हाला दंड देईल.

 

हजारो शब्दांपेक्षा तो एक शब्द चांगला आहे जो शांती निर्माण करतो.

 

पाण्याचा जग हा थेंब थेंब पाण्यानेच भरतो.

 

भूतकाळाकडे लक्ष देऊ नका, भविष्याचा विचार करू नका, आजच्या वर्तमानात चित्त केंद्रित करा.

Gautam Buddha Quotes In Marathi

 

आरोग्य ही सर्वात मोठे बक्षीस आहे, संतोष सर्वात मोठे धन आहे आणि प्रामाणिकता सर्वात मोठा संबंध आहे.

 

ज्या पद्धतीने मेणबत्ती आगीशिवाय जळत नाही, त्याच पद्धतीने मनुष्य अध्यात्मिक जीवनाशिवाय जगू शकत नाही.

 

तीन गोष्टी जास्त वेळ लपून राहत नाहीत. सूर्य, चंद्र आणि सत्य.

 

आपल्या मोक्षप्राप्तीसाठी स्वतः प्रयत्न करा दुसऱ्यावर अवलंबून राहू नका.

 

जीवनात सर्वात मोठी विफलता असत्यवादी असणे ही आहे.

 

आकाशात पूर्व आणि पश्चिम मध्ये काहीही भेदभाव नाही. लोक स्वतः आपल्या मनात भेदभाव निर्माण करतात आणि हेच सत्य आहे असे समजू लागतात.

 

शांती ही व्यक्तीच्या आत असते तिला बाहेर शोधण्याचा प्रयत्न करू नका.

 

आनंदाचा कोणताही मार्ग नाही, नेहमी आनंदी राहणे हाच एकमेव मार्ग आहे.

 

मनुष्य हा जन्माने नव्हे तर कर्माने शूद्र आणि ब्राह्मण असतो.

 

या जगात सत्य शिवाय सर्वांचा अंत होणे ठरलेले आहे.

 

अज्ञानी लोकांनी सांगितलेल्या मार्गावर चालल्याने जीवन व्यर्थ होते.

 

अज्ञानी मनुष्य एका बैलाप्रमाने आहे जो ज्ञानाने नव्हे तर फक्त शरीराने वाढतो.

 

जर आपण अंधकरात बुडलेले आहात तर आपण प्रकाशाचा शोध का नाही घेत?

 

वाईट गोष्टींपासून दूर राहण्याकरिता आपल्यामध्ये चांगल्या गोष्टींचा विकास करा आणि आपले मन सकारात्मक गोष्टींनी भरा.

 

स्वर्गाचा मार्ग आकाशात नव्हे तर आपल्या ह्रदयात आहे.

 

धबधबा खूप आवाज करतो. समुद्र शांत आणि खोल असतो.

 

ज्ञान ध्यानाद्वारे उत्पन्न होते. आणि ध्यानाशिवाय ज्ञान हरवून जाते.

 

तर मित्रांनो या लेखात आपण भगवान गौतम बुद्ध मराठी सुविचार व उपदेश पाहिले. आपणास हे सुविचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि याशिवाय लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा वाचण्यासाठी पुढील लिंक्स पाहा.

या सणाबद्दल जरूर वाचा :

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 5 / 5. Vote count: 75

No votes so far! Be the first to rate this post.

1 thought on “मनाला शांती देणारे भगवान गौतम बुद्धांचे महान विचार Gautam Buddha Quotes In Marathi”

Comments are closed.