धनाजी जाधव विषयी संपूर्ण माहिती Dhanaji Jadhav Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Dhanaji Jadhav Information In Marathi धनाजी जाधव हे मराठा साम्राज्याचे सरसेनापती होते. त्यांचा जन्म 1650 साली झाला. सर सेनापती धनाजी जाधव यांचे सुपुत्र सेनापती संताजी जाधव ही शूरवीर होते. शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्य रक्षणाचे कार्य करणारे हे शूर शिलेदार आपल्या सातारा जिल्ह्यातील नागठाणे परिसरातील मांडवे गावचे आहेत. हे सन 1697 ते 1708 या काळात सरसेनापती होते. त्यांनी संभाजी महाराजांच्या तसेच राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धुरा वाहिली.

Dhanaji Jadhav Information In Marathi

धनाजी जाधव विषयी संपूर्ण माहिती Dhanaji Jadhav Information In Marathi

संताजी मरण पावल्यानंतर धनाजी यांनी सरसेनापती पदाची सूत्रे हाती घेतली. शाहू महाराजांना छत्रपती बनविण्यात त्यांचा मोठा वाटा होता.छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर धनाजी व संताजी यांनी मोठा पराक्रम केला. श्रीवर्धन होऊन साताऱ्याला आलेल्या बाळाजी भट व त्याच्या कुटुंबाला आधार देण्याचे काम धनाजी जाधव यांनी केले. धनाजी जाधव यांनी शाहू महाराजांकडे शिफारस केल्यामुळे बाळाजी भटाला प्रथमच पेशवाईची सूत्रे मिळाली. धनाजी जाधव यांना दोन बायका होत्या. गोपिकाबाई त्यांचा मृत्यू झाल्यानंतर सती गेल्या.

धनाजीच्या पहिल्या पत्नीकडून संताजी व दुसरे चंद्रसेन आणि शंभुसिंग असे पुत्र होते. त्यापैकी चंद्रसेन हा पुढे सेनापती झाला. राजे शिवाजी च्या तालमीत तयार झालेल्या धनाजी हा शाहूच्या कारकीर्दीत शेवटचाच पुरुष आहे. धनाजी हा सत्तेच्या जोरावर लोकांचे वतनी हक्क दडपण कमी करीत असे हे सर्व करण्याच्या देशमुखीच्या तत्कालीन थंड यावरून दिसून येते.

धनाजी जाधव यांची समाधी:

धनाजी हे कोल्हापूरवारा वरील रणांगण याच्या मोहिमेवरून परत येत असताना, वारणा नदीच्या काठी वडगाव येथे मरण पावले. त्याला कित्येक दिवसांपूर्वी झालेली एक जखम पुन्हा वाहू लागल्यामुळे ते बरेच दिवस पर्यंत आजारी होते. या आजारात त्याने वसुधाच्या कामाकरता बाळाजी विश्वनाथ यांची नेमणूक केली होती. धनाजी जाधव यांची समाधी स्मारक कोल्हापूर जिल्ह्यामधील पेठ वडगाव तालुका हातकणगले येथे आहे.

सर सेनापती धनाजी जाधव यांचा मृत्यू 27 जून 1708, मध्ये झाला. शिवकालीन राज्यात अनेक धुरंधर योद्धे या जिल्ह्यात होऊन गेलेत अशीच एक गोड जोडी ती म्हणजे सरसेनापती धनसिंग उर्फ धनाजी जाधव व संताजी घोरपडे यांची आहे. यांची छबी सुद्धा पाण्यात दिसता, मोगलांचे घोडे पाणी पिण्यास दचकत असत. छत्रपती शिवरायानंतर हिंदवी स्वराज्य राखण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती यांनी दिलेली आहे.

इतिहास:

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदानानंतर महाराष्ट्रातील परिस्थिती सावरण्यासाठी औरंगजेबाच्या प्रचंड सेनेला सामोरे जाण्याचे धैर्य दाखवणाऱ्या काहीच सेनापती पैकी संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी एक तेजस्वी इतिहास निर्माण केलेला आहे. संताजी घोरपडे यांच्या नंतर धनाजी जाधव यांना सेनापती पद मिळाले.

तेव्हा छत्रपती राजाराम महाराजांच्या निर्वाणानंतर धनाजी जाधव यांनी अतिशय निष्ठेने स्वराज्याची सेवा केली. ती आपल्याला दिसून येते. 1708 मध्ये शाहू महाराज मोगल कैदेतून सुटले. खेड येथे वक्ता राणे यांचे सैन्य समोरासमोर आले त्यावेळी धनाजी जाधव यांनी ताराराणीचा पक्ष सोडला व ते शाहू महाराजांना मिळाले.

जाधव यांचा पुत्र जो अचलोजी त्यास निजामशहा यांनी ठार मारल्यावर त्यांचा मुलगा संताजी यांचे संगोपन जिजाबाईंनी केले. कनकगिरीच्या लढाईत त्याला शंभुसिंग म्हणून पुत्र होता. त्याचा मुलगा धनाजी यांचा जन्म 1650 च्या सुमारास झाला. हा प्रथम प्रतापराव गुजराच्या हाताखालीं होता.

लढाईत तो प्रथम पुढे आला 1674 मध्ये धनाजी हा हंबीरराव मोहिते यांच्या हाताखाली गेला. विजापूरचा सेनापती अब्दुलकरमी यांची झालेल्या या लढाईत यांनी विशेष शौर्य दाखवल्यामुळे त्यास बढती देण्यात आली. सरावसंच या लढाईत याने हुसेन खान यांचा पुरा मोड केला, तेव्हा राजे शिवाजींनी यांची तारीफ केली.

धनाजींनी लढलेल्या लढाया:

धनाजी हे संताजी घोरपडे बरोबर महाराष्ट्रातून कर्नाटक गेल्यानंतर ते संताजी बरोबरच तेथे होते. परंतु शेवटी या दोन्ही सरदारांमध्ये वैमनस्य उत्पन्न होऊन धनाजी संताजीच्या सैन्यातील काही लोकांचा फितवले व एके दिवशी विजापूर जवळ संताजी वर एकदम हल्ला केला. तसेच संताजी आपला जीव वाचवून कसातरी तिथून निसटले.

तेव्हा काही लोकांना त्यांच्या पाठलागाला पाठवून व साताऱ्यास राजारामकडे रवाना करून धनाजी अर्ध्या लोकांसह झुल्फिकारखानचा समाचार घेण्याकरता पुन्हा कर्नाटकात आले. यापुढे दोन वर्षें धनाजीची व जुल्फिकारखानची कर्नाटकात धडपड चालू होती. त्यावेळी व त्यानंतर धनाजीने कर्नाटकात व महाराष्ट्र सर्व बाजूस आपली फौज करून मुघलशाही चाललेल्या युद्धात बरेच नावाच यासारखे पराक्रम करून दाखवले. सन 1703-1705 या काळात औरंगजेब फार चिडला. परंतु मराठ्यांचा पूर्ण पराभव त्याच्याकडून झाला नाही.

इ.स. 1705 ते 1707 च्या सुमारास औरंगजेबाने तेथील गडीस वेढा दिला, तेव्हा धनाजी मोगलांच्या सैन्या भोवती त्यांना त्रास देत होता. आलेल्या दृष्टीत पडतात ते पळायला सुरुवात करत. अशी एक आख्यायिका आहे की, दचकून जेव्हा घोडा पाणी पीत नसे, तेव्हा मोगल स्वारी तुला पाण्यात धनाजी दिसतो की काय? असं घोड्यास विचारत होते.

मध्यंतरी 1707 मध्ये घोरपडे यांनी ताराबाइंच्या मुलखात लुटालूट केल्यामुळे धनाजी त्यांच्या पारिपत्य गेला असता, जुल्फिकारखान घोरपडे आला व त्याने धनाची दूर काढून दिले. यानंतर मोगलांचे सैन्य महाराष्ट्रातून निघून गेल्याबरोबर धनाजीने पुण्याचा फौजदार लोदी खान यांचा पराभव करून चाकण किल्ला परत घेतला.

संभाजी यांचा मृत्यू झाल्यावर :

संभाजीचा मृत्यू झाल्यावर आता पुढे काय करावे? हे ठरविण्याकरिता जी मुख्य मराठी मंडळी रायगडावर जमली. त्यात धनाजी जाधव होता. त्याने साताऱ्यात सर्जाखानचा पराभव केला. पुढे 1690 धनाजी राजाराम बरोबर जिंजीस गेला. तिथे त्यांनी इस्लायमककाचा पराभव केला. यावेळी महाजी नाईक पानसंबळ यांच्या मृत्यूचे वर्तमान समजल्यामुळे संताजी घोरपडे यांस सेनापती नेमण्यात येऊन त्यांच्याबरोबर धनाजी जयसिंगराव ही पदवी देऊन महाराष्ट्रात पाठविण्यात आले.

महाराष्ट्रात 1693 साली संताजीच्या कडील व गोदेच्या उत्तर तिरीच्या मोहिमांत बरोबर धनाजी होता. पण तो आपल्या लोकांना अधिक प्रिय होता. धनाजीने अमात्य व सचिव यांच्याबरोबर पन्हाळा घेतला.

“तुम्हाला आमची माहिती ‘धनाजी जाधव’ यांच्या बद्दल कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करू नक्की सांगा.”

हे सुद्धा अवश्य वाचा :-

धनाजीराव जाधव यांचा जन्म कधी झाला?

धनाजीराव जाधवराव (जन्म : इ. स. १६५०; – २७ जून १७०८) हे मराठा साम्राज्याचे इसवी सन १६९७ ते १७०८ या काळात सरसेनापती होते.

संताजी आणि धनाजी कोण होते?

धनाजी आणि त्याचा शत्रू, संताजी घोरपडे 

Leave a Comment