C.C.C. कोर्सची संपूर्ण माहिती CCC Course Information In Marathi

CCC Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,आजचे युग हे इंटरनेट युग आहे असे म्हटले जाते .पण ते तितकेच खरे आहे. कारण सध्याचे जग हे कॉम्प्युटरचे जग आहे. कॉम्प्युटरचे ज्ञान आपल्याला अवगत असणे ही काळाची गरज बनली आहे. कारण आजकाल सर्वच ऑनलाईन चालले आहे. बरेच लोक आता डिजिटल व्यवहार करू लागले आहेत. लाईट बिल सुद्धा ऑनलाइन भरू शकतात.

Ccc Course Information In Marathi

C.C.C. कोर्सची संपूर्ण माहिती CCC Course Information In Marathi

लोक बँकिंग व्यवहारही जास्त करून ऑनलाईनच करतात. त्यांना बँकेत जायचीसुद्धा गरज पडत नाही. तसेच काही वस्तू खरेदी केली तर त्याचे पेमेंट सुद्धा ऑनलाईन केले जाते . कोणत्याही प्रकारचे बिल भरायचे असल्यास तेही आपण ऑनलाइन भरू शकतो. म्हणजे आता सर्वत्र ऑनलाइन व्यवहार होत आहेत. त्यामुळे प्रत्येकाला कॉम्प्युटर व इंटरनेटचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

आपल्याला या इंटरनेटच्या जगात टिकून राहायचे असेल तर कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे. एका अहवालात तर असे सिद्ध झाले आहे की संपूर्ण भारतात 80 % नोकऱ्यांमध्ये संगणकामध्ये ज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांची आवश्यकता जास्त आहे. आज प्रत्येक क्षेत्रात जास्त करून कॉम्प्युटर वापरले जात आहेत. असे कुठलेही क्षेत्र नाही जेथे कॉम्प्युटरचा वापर होत नाही. आज मी तुम्हाला अशाच एका कोर्सची माहिती सांगणार आहे. जे आपल्याला संगणक व माहिती किती तंत्रज्ञानाबद्दल ओळख करून देतो. तो कोर्स आहे CCC!!!

संगणकाची गरज व आपल्याला त्याचे ज्ञान असणे या गोष्टीमुळे या अभ्यासक्रमाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. CCC हा अभ्यासक्रम सामान्य लोकांसाठी प्राथमिक पदवी आयटी साक्षरता प्रदान करणारा कार्यक्रम आहे. हा कोर्स पूर्ण संगणक संकल्पनेवर आधारित आहे. CCC चा लॉंग फॉर्म ‘कोर्स इन कॉम्प्युटर कन्सेप्ट’ असा आहे .

मराठीमध्ये याचा अर्थ ‘संगणक संकल्पनांवर आधारित कोर्स ‘असा आहे. हा कोर्से NEILIT च्या मार्फत संचलित केला जातो . ही एक मान्यताप्राप्त गव्हर्मेंट संस्था आहे. NEILIT म्हणजे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ तसेच इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाशी सुद्धा हा कोर्स संलग्न आहे.

NEILIT चे पूर्वीचे नाव DOEACC (DEPARTMENT OF ELECTRONICS AND ACCREDITATION OF COMPUTER CLASSES) असे होते नंतर त्याचे नाव बदलून NEILIT करण्यात आले. सामान्य भारतीयांसाठी हा कोर्स एक मूलभूत पातळीचा आयटी साक्षरता कार्यक्रम करण्याचे हेतूने तयार करण्यात आला आहे.

सामान्य जनतेला संगणकाचे ज्ञान प्राप्त करून देणे या हेतूने हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. दैनंदिन जीवनात विविध क्षेत्रांमध्ये शासकीय व खासगी क्षेत्रात संगणकाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. सामान्य माणसांना हा कोर्स बेसिक आयटी ज्ञान प्रदान करतो.

सामान्य माणसाला वैयक्तिक व बिजनेस लेटर तयार करता यावे, इंटरनेटचा वापर करता यावा,ई-मेल कसा करायचा व तो कसा पाठवायचा ,प्रेझेंटेशन कसे बनवायचे, डाटाबेस कसा तयार करायचा हे या कोर्स मध्ये शिकवले जाते. म्हणून हा कोर्स प्रॅक्टिकल ओरिएंटेड म्हणूनही ओळखला जातो.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा कोर्स का करावा? याचे फायदे काय ?

आपल्याला जर केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या क्षेत्रात नोकरी करायची असेल तर CCC या कोर्सचे सर्टीफिकीट लागते. आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनात कॉम्प्युटरचे महत्त्वाचे स्थान निर्माण झाले आहे. सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये कॉम्प्युटर हे वापरले जात आहे. त्याच्या वापरामुळे सर्व कामे जलदगतीने व न चुकता होऊ लागली आहेत. कॉम्प्युटरची आपल्याला व्यवस्थितपणे माहिती होण्यासाठी आपल्याला हा कोर्स करणे गरजेचे आहे. हा कोर्स केल्यामुळे आपण एक प्रकारे डिजिटल साक्षर बनतो. इंटरनेट व मल्टिमीडिया चा उपयोग करून अत्याधुनिक पणे आपण कार्य करण्यास सक्षम होतो.

संगणक क्षेत्रात उच्चतम करियरसाठी या कोर्सची अनमोल मदत आपल्याला होते. हा कोर्स दळणवळण व संदेशवहन क्षेत्रातील करिअर साठी पूरक कोर्स आहे .आपल्या जीवन कौशल्य या प्रगत तंत्रज्ञानाची जोड देऊन उज्वल करियरला हा कोर्स एक उत्तुंग भरारी आहे. भारत सरकारने राष्ट्रीय पातळीवर संचार व माहिती तंत्रज्ञान विभागाने तयार केलेला एकमेव असा कॉम्प्युटर कोर्स आहे.

इतर कोर्सच्या तुलनेत दर्जेदार अभ्यासक्रम असून दुसऱ्या कोर्सच्या तुलनेने कमी फी आहे व या कोर्सचा कालावधी ही कमी असल्यामुळे आपल्याला कमी खर्चात व कमी वेळेत हा कोर्स करता येतो. तसेच आपल्याला हा कोर्स केल्यामुळे एम्प्लॉयमेंट कार्ड ला नोंदणी करता येते .राज्य शासन व केंद्र शासन नोकरीसाठी हा कोर्स अत्यावश्यक आहे.

हा कोर्स करण्यासाठी कोणतीही पात्रता निकष नाही. या कोर्ससाठी वयाचे बंधन नाही व शिक्षणाची काही अट नाही. म्हणजे आपण कोणत्याही वयात हा कोर्स करू शकतो. तसेच आपण आठवी पास, दहावी पास, बारावी पास किंवा ग्रॅज्युएशन पास असलो तरी हा कोर्स आपण करू शकतो.

CCC हा कोर्स आपण ऑनलाईन करू शकतो तसेच आपण एखाद्या इन्स्टिट्यूटला प्रवेश घेऊनही करू शकतो. आपण जर ऑनलाईन कोर्स करायचं ठरवलं तर आपण अभ्यास स्वतःहुनही करू शकतो. स्वतः ऑनलाइन फॉर्म भरू शकतो. फक्त एक्झाम फॉर्म, एडमिट कार्ड हे सर्व आपल्यालाच करावे लागते. ॲडमिट कार्ड साठी सतत वेबसाईटवर लक्ष ठेवावे लागते.

ही सर्व जबाबदारी आपली असते. जर आपण इन्स्टिट्यूटला प्रवेश घेऊन हा कोर्स करायचा ठरवला तर एक्झाम फॉर्म व एडमिट कार्ड ही सर्व जबाबदारी ही इन्स्टिट्यूटची असते.आपण जर ऑनलाईन स्वतःहून फॉर्म भरला तर आपल्याला फक्त एक्झाम फी 500 रुपये द्यावी लागेल.

परंतु जर आपण इन्स्टिट्यूट द्वारे कोर्स करायचा ठरवलं तर एक्झाम फी 500 रुपये व त्याच बरोबर आपल्याला इन्स्टिट्यूटची वेगळी फी द्यावी लागेल ती 3000 ते 4000 एवढी असू शकते. पण आपण स्वतःहून अभ्यास करण्यापेक्षा इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घेऊन कोर्स केलेला जास्त उपयोगी ठरेल. आपण जर इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला तर अभ्यासक्रम शिकवणे ,एक्झाम फॉर्म भरून घेणे, कोर्स सुरू केल्यापासून ते प्रमाणपत्र मिळेपर्यंत सर्व जबाबदारी त्यांची असते.

CCC एक्झाम चा फॉर्म हा ऑनलाईनच भरावा लागतो. हा फॉर्म ऑफलाइन भरता येत नाही. NIELIT च्या वेबसाईटवर CCC चे फॉर्म भरून घेतले जातात. या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध करून दिलेले आहेत जसे की, आरटीजीएस ,क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग इत्यादी.

परीक्षा फॉर्म भरल्या नंतर काही दिवसांनी आपले एडमिट कार्ड येते. ऍडमिट कार्ड आल्यानंतर परीक्षा कधी आहे हे समजते. CCC ची परीक्षा ही 100 गुणांची असते .प्रत्येक प्रश्न हा एक गुणाचा असतो. ही परीक्षा 90 मिनिटांची असते. परीक्षा पास होण्यासाठी कमीत कमी 50 गुण असणे आवश्यक आहे. या परीक्षेत निगेटिव्ह सिस्टिम नसते. परीक्षा मूल्यांकन हे श्रेणी व ग्रेड पद्धतीत असते. 40 प्रश्न हे चूक की बरोबर व 60 प्रश्न हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात.

S Grade – 85%, A Grade – 75-84% ,B Grade – 65-74% ,C Grade – 55-64% ,D Grade 50-54%

आता आपण CCC व MSCIT या दोन्ही कोर्स मध्ये काय फरक आहे हे पाहूयात!!!

CCC हा एक राष्ट्रीय दर्जाचा कोर्स आहे व MSCIT हा एक राज्य शासनाचा कोर्स आहे. आपल्याला जर महाराष्ट्र राज्यात नोकरी करायची असेल तर MSCIT चे प्रमाणपत्र नोकरीसाठी देऊ शकतो. पण जर आपल्याला देशात कुठेही सरकारी नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तेथे मात्र CCC कोर्से प्रमाणपत्र मागितले जाते.

CCC कोर्स भारत सरकारचे प्रमाणपत्र असते तर MSCIT कोर्स हे राज्य शासनाचे प्रमाणपत्र असते .CCC कोर्स प्रमाणपत्र हे केंद्र व राज्य शासन जॉब साठी उपयुक्त असते. तर MSCIT कोर्स प्रमाणपत्र हे फक्त राज्यशासनाच्या जॉब साठी उपयुक्त असते. CCC कोर्से हा भारतातील सर्व स्पर्धा परीक्षेत उपयुक्त होते तर MSCIT हा कोर्स महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेस उपयुक्त होतो.

या दोन्ही कोर्सचा अभ्यासक्रम हा एकच असतो व कालावधीही दोन्हींचा तीन महिने असतो. CCC हा कोर्स करण्यासाठी आपल्याला 3000 ते 3500 एवढी शुल्क आकारावे लागते. तर MSCIT हा कोर्स करण्यासाठी आपल्याला 4000 ते 4500 एवढे शुल्क आकारावे लागते.

आता आपण या कोर्समध्ये आपल्याला कोणता अभ्यासक्रम शिकवला जातो हे पाहुयात!!!

 • कॉम्प्युटर ची ओळख.
 • ऑपरेटिंग सिस्टमची ओळख परिचय.
 • उद्दिष्ट फाइल आणि निर्देशिका व्यवस्थापन.
 • फायलींचे वापर
 • इंटरफेस प्रकार
 • ऑपरेटिंग सिस्टम साधी सेटिंग –
 •  वर्ड प्रोसेसिंगचे घटक परिचय,
 • वर्ड प्रोसेसिंग बेसिक्स टेक्स्ट फॉरमॅटिंग उघडणे आणि बंद करणे.
 • दस्तऐवज टेबल हाताळणी स्प्रेडशीट
 • संगणक संप्रेषण आणि इंटरनेट
 • इंटरनेटवरील संगणक नेटवर्क सेवांची मूलभूत माहिती
 • इंटरनेट प्रवेशासाठी संगणक तयार करणे
 • डिजिटल आर्थिक साधने व एप्लीकेशन
 • सोशल नेटवर्किंग
 • WWW आणि वेब ब्राउझर वेब, ब्राउझिंग सॉफ्टवेअर ,इंटरनेटची ओळख.
 • ई-मेल तयार करणे व ते कशाप्रकारे पाठवायचे
 • स्लाइडचे सादरीकरण
 • स्लाइड स्लाइड शोची तयारी

आपण CCC कोर्स केल्यानंतर पुढे संगणकाचे उच्च शिक्षण घेऊ शकतो. युजी व पीजी अभ्यासक्रम किंवा कोणताही कॉम्प्युटर डिप्लोमा करू शकतो.AGLA, DCA, PGDCA इ. प्रमाणपत्र अभ्यासाकडे देखील जाऊ शकता. तसेच तुम्ही सरकारी किंवा खाजगी कंपनीत लिपिक, संगणक ऑपरेटर म्हणून काम करू शकता.

FAQ’s :-

CCC लॉंग फॉर्म काय आहे?

कोर्स ऑन कॉम्प्यूटर कन्सेप्ट आहे.

CCC हा कोर्स करण्यासाठी पात्रता निकष काय आहे?

हा कोर्स करण्यासाठी कोणतीही पात्रता निकष नाही. या कोर्ससाठी वयाचे बंधन नाही व शिक्षणाची ही अट नाही हा कोर्स कोणताही व्यक्ती करू शकतो.

CCC या कोर्सचा कालावधी किती आहे ?

CCC या कोर्सचा कालावधी तीन महिने आहे.

CCC कोर्से व MSCIT कोर्स यामध्ये काय फरक आहे?

CCC कोर्स भारत सरकारचे प्रमाणपत्र असते. तर MSCIT कोर्स हे राज्य शासनाचे प्रमाणपत्र असते. CCC कोर्स केल्यामुळे आपण केंद्र व राज्य शासन या जॉब साठी पात्र असतो. तर MSCIT कोर्स केल्यानंतर आपण फक्त राज्य शासनाच्या जॉब साठी पात्र असतो.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment